Skip to main content

Posts

Showing posts from May, 2018

21 May 2018

इतिहासाचा धडा आपला काही दोष नसताना शाळकरी मुलांना समाजाने दिलेली भयंकर शिक्षा वाचल्यानंतर, आजच्या विखारी आंदोलनांचा वेगळा काही विचार करावासा वाटेल. मोहिब कादरी या तरुणाचे लिखाण वाचले, आणि स्तब्ध झालो. आजवर दलितांची, ग्रामीण तरुणांची आत्मनिवेदनं वाचली होती. ...पण आिथं त्याहून वेगळं. हे मुस्लिम-ग्रामीण आत्मनिवेदन. या अनुभवंाची जात काहीशी वेगळी, अनोळखी..... त्याच्या लहानपणी हिंदू-मुस्लिम हे समाज किती छान अेकमेकांशी निगडीत होते. आीदचे नमाज पटांगणावर पढून झाले की सगळे गावात यायचे. सगळे गावकरी अुभेच असायचे. मिठ्या मारणे, हातात हात घेअून हलविणे... मग पोलीस पाटलाच्या वाड्यावर चहा... विड्याच्या पानांचे मळे, तिथं जाअून पान खायचेे, त्या दिवशी पैसे नाहीत. कुठं गेलं ते?' -ज्या पुस्तकाच्या  प्रस्तावनेत अनिल अवचट यांनी हे लिहिलं आहे, ते `आठवणी जुन्या  - शब्द नवे' पुस्तक नुकतंच `साधने'नं प्रकाशित केलं आहे. ग्रामीण भागात लहानपण गेलेल्या कादरी यांनी आपले अनुुभव साध्या सरळ भाषेत, या छोटेखानी पुस्तकात नमूद केले आहेत. तथापि त्या अनुभवांतून हा लेखक बाहेर आला असून कुठलाही राग द्वेष मनात  न

14 May 18

पदवी आहे पण कौशल्यांचे काय? रोजगारवाढरहित विकास (जॉबलेस ग्रोथ) ही सगळया जगापुढील समस्या आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा फैलाव आणि अंगीकार उत्पादन व्यवस्थेमध्ये झालेला असल्याने रोजगारवाढीसंदर्भातील चर्चा अधिक आहे. विकसित पश्चिमी देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण वाढत असल्याने तरुण मनुष्यबळाची त्यांना वानवा आहे. त्यामुळे यंत्रमानवाच्या संचाराबाबत त्या देशांना फिकीर नसली तरी, विकसनशील देशांमधील तरुण रोजगारेच्छूंच्या पोटात गोळा उभा राहतो. खर्चात बचत करत गुणात्मक दर्जा अव्वल राखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे उपयोजन करण्याची लाट कॉर्पोरेट विश्वामध्ये असल्यामुळे, तिसऱ्या जगातील धोरणकर्ते `जॉबलेस'पायी सचिंत आहेत. चांगल्या दर्जाचा उत्पादक रोजगार निर्माण होणे अथवा न होणे, या समस्येचा धागा शिक्षणक्षेत्राशी जोडलेला आहे. पदवी असते परंतु रोजगारक्षमता कमकुवत असते. हातांना रोजगार नाही आणि उद्योगधंद्यांना प्रशिक्षित मनुष्यबळ नाही. पदवी आहे, पण ज्ञान आणि कौशल्ये नसल्यामुळे वास्तव अत्यंत दाहक आणि दु:खद आहे. शाळा महाविद्यालयांच्या शिक्षणाला व्यावसायिक अथवा धंदेशिक्षणाची जोड नसल्यामुळे रोजगार मिळण्य

7 May 2018

पुतळा अुभारणीचा पराक्रम  `पुतळा' हा शब्दही आज भीती वाटण्याजोगा आहे. पुतळा अुभारणीचं काम तर जोखमीचं, आणि सामाजिक दृष्ट्या नाजूक. परंतु खूप पूर्वीच -म्हणजे १९६७ सालीच त्यानी पुतळा अुभारणीचं स्वप्न पाहिलं, तो पुतळाही भगवान् परशुरामाचा! `ते' जर्मनीला अुच्च शिक्षणासाठी जायले निघाले, तेव्हा त्यांच्या आआीनं त्यांना लोटे परशुराम येथे भगवान परशुरामांच्या दर्शनासाठी नेलं हेातं. परशुरामांचं दर्शन, तिथलं वातावरण वगैरेचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. त्यांनी मनोमन ठरवून टाकलं, - अेक दिवस आपण पुणे आिथल्या हनुमान टेकडीवर परशुरामांचा चांगला १०फुटी पुतळा अुभाायचाच! ही कल्पना वास्तवात आणण्याची वेळ पुढे आली, तेव्हा त्यांच्या लक्षात व्यवहारिक अडचण आली. हनुमान टेकडी सरकारी मालकीची आहे, तिच्यावर खाजगी पुतळा अुभा राहू शकत नाही. आणि त्यासाठी हनुमान टेकडी विकत घेणं शक्य नव्हतं.. मग त्यांनी कोकणात दापोलीपासून सुमारे १० किमी अंतरावर बुरोंडी गावाच्या टेकडीअुताराचा भाग विकत घेतला. आणि तिथे परशुरामांची चिरंजीव अशी चैतन्यभूमी निर्माण केली. १२ मीटर(४०फूट) व्यासाच्या फेरोक्रीटने बनविलेल्या अर्धगोल प

26 April 2018

झुंज देण्याची हीच वेळ  कविवर्य सुरेश भट यांचा जन्म १५-०४-१९३२ चा. त्याना जाअूनही आता १५वर्षे झाली. प्रस्तुतचा लेख त्यांनी २५ वर्षांपूर्वी लिहिला.  त्या लेखातली परिस्थिती आणि आव्हाने आज तितकीच गंभीर आहेत. `हिंडणारा सूर्य या त्यांच्या पुस्तकांतून हा लेख,  काही नामोल्लेख व  मजकूर वगळून  दिला आहे. जेव्हा मी `भारत' असा शब्द अुच्चारतो, तेव्हा माझ्या नजरेसमोर  माझ्या देशातील नद्या, खेडी, गावे, शहरे, जमीन, अवकाश , तारे, वारे, फुले, पर्वत किंवा निसर्ग नसतो; माझ्या दृष्टीने माझा भारत म्हणजे माझ्या देशात राहणारी सर्व जातीची व धर्माची, विविध भाषा बोलणारी सामान्य माणसे आहेत. या माणसांशिवाय `देश' हा शब्दच अर्थशून्य आहे. `देशभक्ती' म्हणजे जेथे आम्ही राहतो, तेथील सर्व माणसांच्या सुखाची आणि स्वप्नांची काळजी घेणे.. `देशभक्ती ' म्हणजे आपल्या देशात राहणाऱ्या सर्व माणसांवर प्रेम करणे, त्यांना आपल्यासारखीच माणसे समजणे आणि आपण सर्वांनी अेकमेकांसाठी जगणे. या देशात राहणाऱ्या माणसांच्या मूलभूत समस्यांचा विचार  न  करता लोक स्वत:च्या वर्चस्वासाठी फक्त देशभक्तीच्या कोरड्या गप्पा मारतात, आणि त्य