Skip to main content

7 May 2018

पुतळा अुभारणीचा पराक्रम 
`पुतळा' हा शब्दही आज भीती वाटण्याजोगा आहे. पुतळा अुभारणीचं काम तर जोखमीचं, आणि सामाजिक दृष्ट्या नाजूक. परंतु खूप पूर्वीच -म्हणजे १९६७ सालीच त्यानी पुतळा अुभारणीचं स्वप्न पाहिलं, तो पुतळाही भगवान् परशुरामाचा!
`ते' जर्मनीला अुच्च शिक्षणासाठी जायले निघाले, तेव्हा त्यांच्या आआीनं त्यांना लोटे परशुराम येथे भगवान परशुरामांच्या दर्शनासाठी नेलं हेातं. परशुरामांचं दर्शन, तिथलं वातावरण वगैरेचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव पडला. त्यांनी मनोमन ठरवून टाकलं, - अेक दिवस आपण पुणे आिथल्या हनुमान टेकडीवर परशुरामांचा चांगला १०फुटी पुतळा अुभाायचाच!
ही कल्पना वास्तवात आणण्याची वेळ पुढे आली, तेव्हा त्यांच्या लक्षात व्यवहारिक अडचण आली. हनुमान टेकडी सरकारी मालकीची आहे, तिच्यावर खाजगी पुतळा अुभा राहू शकत नाही. आणि त्यासाठी हनुमान टेकडी विकत घेणं शक्य नव्हतं.. मग त्यांनी कोकणात दापोलीपासून सुमारे १० किमी अंतरावर बुरोंडी गावाच्या टेकडीअुताराचा भाग विकत घेतला. आणि तिथे परशुरामांची चिरंजीव अशी चैतन्यभूमी निर्माण केली. १२ मीटर(४०फूट) व्यासाच्या फेरोक्रीटने बनविलेल्या अर्धगोल पृथ्वीवर साडेसहा मीटर(२१ फूट) अुंचीचा, सुमारे पाच टन वजनाचा फायबर ग्लासचा भव्य पुतळा त्यांनी अुभा केला.
तो अुभा करण्यासाठी, परशुराम दिसत कसे होते याची नेमकी कल्पना कशी करायची? परशुराम हे काही रामकृष्णांसारखे प्रचलित देव नाहीत. काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत  जिथे परशुरामांची देवळं आहेत असं कळेल तिथे जाअून त्यांनी तिथल्या मूर्ती बारकाआीनं पाहिल्या. जम्मूत दोन, भोपालमध्ये अेक, नाशिकला अेक अशी मोजकी परशुराम मंदिरं होती, ती बघायला मिळाली. त्यांवरून मग त्यांनीच मनानं अेक रुपडं ठरविलं. समुद्र मागे हटवून अपरान्त भूमी निर्माण करणारा म्हणून त्याची मूर्ती सागरसन्मुख असावी. पृथ्वीच्या प्रतिमेहून मोठी असावी, त्याची मुद्रा आक्रमक असावी... वगैरे तपशील ठरू लागले.
या कामासाठी महाराष्ट्नतल्या विख्यात शिल्पकारांशी त्यानी या कामाविषयी चर्चा केली. `मला जशी मूर्ती दिसते आहे तशीच ती घडवायची आहे' हे त्यांचे म्हणणे होते, पण  शिल्पकार त्यास तयार नव्हते; कारण कलाकाराचं आकलन शेवटी त्याच्या शिल्पात येणारच ना! ते म्हणायचे, अेकवेळ समुद्र मागे हटविता येआील पण कलाकाराला माघार घ्यायला कशी लावणार? बराच शोध घेअून त्यानी मग आपल्या कल्पनेतली मूर्ती घडविणारा शिल्पकार शोधून काढला आणि ते काम पूर्ण केलं. त्यासाठी पदरचा पैसा (तोही चेकने) ओतला. तरीही पावलापावलावर अडचणी होत्याच. सरकार दरबारी खेटे घालणं, वेगवेगळया खात्यांच्या परवानग्या काढणं... आिथंपासून, ती २१ फुटी मूर्ती पुण्यापासून बुरोंडीपर्यंत रस्त्यानं सुखरूप नेणं, आणि अेवढ्या अुंचीवर नेअून ती अुभी करणं आिथंपर्यंत सारी आव्हानं होती.
मूर्ती तिथं अुभी केली तरी तिची प्रतिस्थापना केलेली नाही. काहीतरी देवस्थान देअूळ अुभारावं, तीर्थक्षेत्र करावं, तिथं रोजचा पूजापाठ चालावा, नैमित्तिक अुत्सव चालावेत... अशी काही कल्पना या प्रकल्पामागे नाही. मूर्ती अेवढी भव्य की तिला सहजी कुणाला हार घालताही येणार नाही. भव्यतेचा तेजस्वीपणाचा अेक आदर्श लोकांपुढे कायमस्वरूपी अुभा राहावा म्हणून हा सारा खटाटोप!
बुरोंडीची परशुरामभूमी हे हळूहळू गर्दी खेचणारं पर्यटनस्थळ होत आहे. रिझॉर्ट आणि जत्रेतले पाळणे वगैरे मनोरंजनाची साधनंही तिथं आकर्षित होत आहेत. अेवढे पैसे खर्च करून पुतळाच का? त्याअैवजी शाळा रुग्णालय असं का नाही? -असे प्रश्न कुठून तरी येतात, तिकडे ते दुर्लक्ष करतात. त्यासाठी त्यांनी विदेशीच्या वाऱ्या किंवा आलीशान फार्महाअूस, असले मोह कधीच बाळगले नाहीत, पण ते त्यांचा अुच्चारही करत नाहीत. मात्र `संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर अेक विवेकानंदांचा पुतळा सोडला तर अेवढं भव्य शिल्प कोणतंही नाही' हे सांगताना त्यांचे डोळे अभिमानानं लकाकतात.
`ते' म्हणजे पुणे येथील अेक यशस्वी व्यवसायिक अनिल गोविंद गानू. त्यांचे पूर्वज अहल्याबाआी होळकर यांच्याकडं खाजगी सचिव होते. त्या काळापासून त्यांच्या घराण्यात पराक्रमाचं, तेजस्वितेचं आकर्षण असल्याचं ते सांगतात. त्यांच्या संग्रहात आजही आठ तलवारी, आणि बंदूक आहे. त्या हत्यारांसाठी अर्थातच अधिकृत परवाने आहेत. खांडेनवमीला त्या साऱ्या हत्यारांची मरम्मत करून त्यांची पूजा होते. त्या दिवशी घरी आल्या-गेल्यांना ती शस्त्रे कौतुकानं ते दाखवितात. त्यांच्यावर बंदूक वापरण्याचे काही प्रसंगही आले आहेत. मागे अेकदा पुण्याजवळ टाटांच्या `टेल्को' कारखान्याच्या परिसरात वाघ शिरला होता, आणि मुळशीजवळ भातपिकात डुकरांच्या टोळीने हैदोस घातला होता. त्या पाहुण्यांना जेरबंद करण्यासाठी तिथल्या पोलीस पाटलांनीही त्यांना हत्यारांसह मदत केली. या स्वभावाचे आजचे प्रत्यंतर म्हणजे बुरोंडीचा `तो' पुतळा.
अनिल गानू यांचा चष्मे तयार करण्याचा आणि नेत्रोपचाराचा व्यवसाय आहे, तो त्यांच्या पत्नी आश्विनी सांभाळतात.आिंजिनियरिंग अुद्योगातून आता सॅटेलाआीटचे स्पेक्ट्न्म भाड्याने घेअून त्या आधारे अनेक व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी  माहिती(डेटा) पुरविण्याचा नवा अुपक्रम त्यांनी सुरू केला अ्राहे.
(त्या ठिकाणच्या टेकडीवर तांबूस रंगाची भूमी आहे. तिचे प्रतिबिंब सागराच्या पाण्यात पडते त्यामुळे पाणी रक्तवर्णी आहे. आपल्या पराक्रमानंतर परशुरामानी येथे आपली शस्त्रे धुतली, म्हणून ते पाणी लाल झाले अशी आख्यायिका क्षणभर दूर ठेवली तरी, त्या ताम्रवर्णी पार्श्वभूमीवर, सागराकडे नजर रोखून अुभे राहिलेले तेजस्वी परशुरामाचे भव्य शिल्प आपले भान हरविते)
अनिल गानू यांचा पत्ता- ११३० सदाशिव पेठ, पुणे ३०. फोन (०२०)२४४७७३७३, ९८२२०२२२९४
(लेखिका-मंगला गोडबोले, पुणे ४  फोन : ९८२२४ ९८२२८)

साहित्य संमेलनातून काय साधते?
`असा' गणेशोत्सव आता बंद झाला तरी चालेल, अशी शिवजयंती कशासाठी? दडीहंडीला आजचे स्वरूप देणे किती योग्य? त्याच चालीवर - अशी साहित्य-संमेलने भरवून काय साधते; असा प्रश्न सर्वत्र मूळ धरू लागलाच आहे. परंतु बाकीच्या अुत्सवांचा आितरांच्या दैनंदिनीवर, स्वास्थ्यावर काही अनिष्ट परिणाम होतो, तसे  अजूनी साहित्य संमेलनांचे होत नाही; अेवढा तरी फरक मान्य करायला हरकत नाही. आजकाल आितक्या प्रकारची आितकी साहित्यसंमेलने होत असतात, परंतु मराठी साहित्य जिथल्या तिथेच रेंगाळते आहे यातही संशय नाही. सांगली येथे नुकतेच ३०वे सावरकर साहित्य संमेलन पार पडले ते पाहिल्यावर, न मिळे मौज अशी  पाहण्या नरा... असाच अेक अुत्सव झाला अेवढे म्हणता येआील.

सावरकर हे नाव अुच्चारण्याला काही निष्ठा भक्ती अभ्यास यांचे तपोबल असावे, आितके ते धगधगीत चेतनादायी नाव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेरकगानाच्या निमित्तानेे जमणारे आणि जमविणारेे सारेजण वेगळया रसरशीत विचारांचे असणार, आणि तसे होते हे तर गृहीत आहे. या संमेलनांत झालेली सत्रे आणि त्यातील व्याख्याने सावरकरभक्तीने भरलेली होती, भारलेली होती हेही वास्तव आहे. परंतु हे त्याचे अनपेक्षित वैशिष्ट्य नाही. आज जी अनेक प्रकारच्या नावांनी संमेलने होतात, त्यांचेही स्वरूप साधारणत: ते आणि तसेच काही असते. पण त्या त्या  संमेलनांतून त्या नावाला साजेल असे संयोजन नियोजन आाणि आिष्टफल साधले गेले पाहिजे ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही. त्याच निकषावर हे  प्रयत्न मोजले जायला हवेत. अेरवी त्यांना जत्रेचे स्वरूप येअू शकते, याची काळजी आहे.

अखिल भारतीय संमेलनात बेळगाव व सीमाभागचा अेक ठराव वर्षानुवर्षे होत असतो, त्याचा अुपयोग किती? त्याच चालीवर कामगारांच्या, अेखाद्या ज्ञातीच्या, प्रादेशिकतेच्या किंवा ग्रामीण स्तराच्या संमेलनांतून निरर्थक ठराव होत असतील. संमेलनातील ग्रंथदिंडी आणि पाडव्याला हल्ली सुरू झालेली शोभायात्रा यातला फरक ओळखू येत नाही. तरीही या निमित्ताने त्या त्या विषयांकडे काही लक्ष वेधले जाते, काही मंथन घडते, निदान वाआीट तर म्हणण्याजोगे काही नसते अेवढ्याचे समाधान करून घ्यायला हरकत नाही.

मग मुख्य मुद्दा येतो तो संयोजनाचा. तिथेही जर रामभरोसे चित्र दिसले तर मात्र त्याचा विचार आणि आठवण कुठेतरी टोचत राहते. अेवढा पैसा, वेळ आणि श्रम खर्च करून लढले कशासाठी आणि मिळवले काय हे कळेनासे होते. असे कार्यक्रम करणे सोपे नसते हे निर्विवाद खरे आहे. मनुष्यबळाची टंचाआी, आजकालच्या वाढत्या अहम्चे आणि तदनुषंगिक प्रतिष्ठेचे कंगोरे, आणि अेकंदरीच साऱ्यांबद्दल वाढत्या अपेक्षा यांतून असे प्रेरक अुत्सव पार पाडणे हे जिकिरीचेच असते. शिवाय आजकालच्या शहरांतील दळणवळणाचे प्रश्न, सुरक्षा, प्रसिद्धीतंत्रे, नेतेगिरी  आिथपासून अनेक व्यवधाने सांभाळणे भाग पडते. अेवम्च संयोजकांची कसोटी असते. परंतु याचबरोबर व्यावसायिक  रूपाने अनेक सुखसोयी सुविधा अुुपलब्धही होअू शकतात, त्यांचा फायदाही घेता यायला हवा, ती दृष्टीही विस्तारली पाहिजे.

सांगलीत जे सावरकर साहित्य संमेलन झाले  त्यास नावे ठेवण्याचे किंवा त्यावर टीका करण्याचे मुळीच कारण नाही. पण ते अेक अुदाहरण समजून काही बदल घडावा ही अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नसावी. कारण गणपतीच्या बुद्धी व कलांच्या अुत्सवात बीभत्सता जशी खटकते, दहीहंडीच्या गोपालक्रीडेत जशा पैशाच्या थैल्यांनी अस्वस्थता येते, अखिल भारतीय संमेलनांत जसे स्वागताध्यक्षाच्या तिजोरीची धग पोळते तसे काहीतरी, सावरकर नावाच्या साहित्योत्सवात होणे कुणाला क्लेशकारी ठरू शकेल! म्हणून ती काळजी स्वत:हून घ्यायला हवीच हवी.

सावरकर साहित्य संमेलनात त्यांच्या आत्मकठोरतेचे दर्शन व्हायला हवे होते.भाषा आणि लिपीच्या शुद्धतेसाठी सावरकर आग्रही होते, या संमेलनाच्या रंगीबेरंगी पत्रिकेतच अशुद्धता का असावी? संमेलनाची सुरुवात ९ला होणार, ती दीड तास अुशीरा झाली. हा सावरकर विचारांस विरोधाभास वाटतो. व्यासपीठावर भाजपा चे संघटक, स्थानिक आमदार खासदार यांचे अर्धरिंगण होते. भर अुन्हाचे दिवस, त्यात वरती कापडी छताचा मंडप. त्यात बसणे कठीण. प्रारंभीच अेका वक्त्यांनी बोलून दाखविले की, - सावरकरांनी अंदमानात दिवस काढले आणि आम्ही व्यासपीठावर पंख्याची सोय पाहावी? -हे खरे असले तरी सहन करण्याला सामान्य श्रोत्यांची मर्यादा पडणार. तसेच असेल तर मग डौलदार मंडप आणि पाण्याच्या बाटल्यांचेही कारण नव्हते. निवेदकाने वारंवार सांगूनही अुद्घाटन सत्रातील वक्त्यांना दिलेली वेळ कळत नसेल तर सावरकर कळले हे कसे म्हणावे?  दूर बडोद्याहून वयोवृद्ध तपस्वी दा.वि.नेने (दादूमिया) हे संमेलनाध्यक्ष म्हणून आदल्या दिवशी  आलेलेे हेाते. मग प्रारंभाला अुशीर का? त्यांनी सावरकरांसंबंधी काही माहिती देण्यासाठी पॉवर पॉआिंट प्रेझेंटेशनची तयारी ठेवली होती, भर १२च्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. त्यांचे भाषण सावरकर साहित्यावर नव्हते, सावरकर विचाराबद्दल होेते. संमेलनाध्यक्षाचे अुद्घाटनाचे भाषण  साहित्यचिंतनाचे असायला हवे होते. त्यांनी अैनवेळी भाषण बदलले असावे.

मंगेशकर भावंडांनी `स्वतंत्रतेचे स्तोत्र' गाताना `परवशतेच्या नभात तूची आकाशी होशी...' असे म्हटले, ते रूढ झाले. परंतु तिथे `परवशतेच्या तमात तूची-' अशी शब्दयोजना आहे. सावरकरांसारखा महाकवी `नभात तूची आकाशी-' हे कसे म्हणेल? -या प्रकारची साहित्य चर्चा अधिक घडायला हवी होती.

पुढची सत्रे अैन अुन्हात अैकण्यासाठी बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. सेनाधिकारी शेकटकर, शशिकांत पित्रे ही बडी नावे आहेत. त्यांनी सेना निर्णयांच्या संदर्भातील कठोर वास्तव कथन केले पण त्याचा साहित्यविचारांशी संबंध नव्हता. किशेार जावळे यांनी विज्ञानवादी सावरकर मांडताना आधुनिक वास्तव धोरणांना समजून घेण्याची निकड अुत्तम प्रकारे सांगितली, पण श्रोते फारच कमी होते. संमेलनासाठी योग्य ऋतुमान नव्हते.

वा.ना. उत्पात, भाऊ तोरसेकर वगैरे बहुतांश पाहुणे, श्रोत्यांना काही देऊन गेले. सचिन कानिटकर यांनी `आपले सावरकर' मांडले, ते सर्वोत्कृष्ठ भाषण. मंडपापासून हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या या वक्त्याने फड मारला, पण दूरदूरहून आलेल्या अन्य पाहुण्या विचारवंतास तितका न्याय देता आला नाही.

आपल्या घरचे अेकादे लग्न असल्यावर कितीही तयारी केली तरी व्हायचा तो गोंधळ होत असतो. याने अमूक बॅग कुठे ठेवली ते त्याला ठाअूक नसते, बँडवर काय वाजवायचे हे कोणीच ठरवत नाही, अुगाचच कोणीतरी रुसतो, कुणी उगा धांदरटपणे वावरत असतो... आितपत काही झाले  तरीही कार्य यथासांग पार पडले असे म्हटले जाते. हे ्रअसे सावरकर नावाच्या कोणत्याही कार्यक्रमाबाबत, अेरवी कर्तव्यकठोर आणि तळमळीच्या भक्तांकडून व्हायला नको, आितकाच हे लिहिण्यामागचा प्रामाणिक हेतू. बाकीच्या जगात सारे काही चालूच आहे. आिथे सावरकर विचारदर्शन आणि आचारदर्शनही साऱ्या समाजाला घडावे असे वाटत राहते. यांच्या ज्वलज्जहाल, काटेकोर पण मृदूकोमल अशा व्यक्तिमत्वाचे स्मरण अपरिहार्य असले पाहिजे. हे कार्यकर्ते कर्तबगार, निष्ठावंत सच्चरित आहेत, म्हणूनच त्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा राहते. त्यांनी किंवा इतरेजनांनी अशा कार्यक्रमांचा मांड मांडताना `की घेतले व्रत अम्ही नच अंधतेने-' असेच मानले पाहिजे. अन्यथा ते ज्याचे दर्शन घडवतील `तयासि तारे म्हणुनि ज्योतिषी भलेभले थकले-' असे होत राहील; ते इष्ट नाही.

अन्यायी न्यायव्यवस्था
`पिढ्यान्पिढ्याचं खटलं'ं हा कोल्हटकरांचा लेख आपल्या अंकात वाचला. सर्वसामान्यांचे खटले वर्षानुवर्षे चालतात, हे खरेच आहे. ते प्रामुख्याने दिवाणी दाव्याबद्दल चालते. पण बिहारचे अेके काळचे मुख्यमंत्री  ललित नारायण मिश्र यांच्या खुनाचा फौजदारी खटला तब्बल ३९वर्षे चालला, व त्यात गुन्हेगाराला जन्मठेप झाली. त्या शिक्षेला तरी काय अर्थ राहिला? न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाकारणे म्हणतात, त्यावर काही अुपाय तर शोधलाच पाहिजे. अन्यथा केवळ न्याय नाकारण्यापेक्षाही चेष्टा सुरू राहील, किंवा मग लोक आपापला न्याय करू लागतील. ते फार धोक्याचे आहे. सामान्यांना कायद्याचे फारसे ज्ञान नसते हेही योग्य नाही.
 -वा.मो.बर्वे, दापोली (जि.रत्नागिरी)    (फोन ९९७५० ९६४१६)

राजकीय पक्षांची काही जबाबदारी नाही काय?
`पिड्यान्पिढ्यांचं खटलं' हा कोल्हटकरांचा लेख वाचला. खटले निकाली काढण्यास होणारा अुशीर हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य बनले आहे. त्याची कार्यपद्धती (प्रोसीजर) हे त्याचे महत्वाचे कारण आहे. काही दावे तर न्यायालयात लोंबकळत राहून  मूळ वाद मिटू नये म्हणूनच दाखल केले जातात. वि वा शिरवाडकर यांचे `दिवाणी दावा' नावाचे अेक नाटक होते. त्याच्या तिसऱ्या अंकात अेक वृद्ध गृहस्थ त्याच्या नातवाला घेअून न्यायालयात येतो व म्हणतो, `न्यायाधीश महाराज, आमच्या जमिनीच्या दाव्याचा निकाल  माझ्या किंवा मुलाच्याही हयातीत लागणार नाही; किमान या नातवाच्या हयातीत तरी तो लागावा...'
आता जनतेनेही या प्रश्नासाठी विविध सनदशीर मार्गांनी आंदोलन अुभारावे लागेल, राजकीय पक्षांची आिच्छाशक्ती जागी होत नाही तोपर्यंत यात काही बदल संभवत नाही. ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ९० दिवसांत तक्रार निवारण होणे  बंधनकारक आहे (प्रत्यक्षात तो कायदाही पाळला जात नाही) तसे काहीतरी कायदे येणे आवश्यक आहे. नाहीतर प्रश्नांबद्दल नुसतेच बोलत राहायचे आणि त्यावर सबबी सांगत राहायचे हे चालत राहील. लोकांच्या मतांवर निवडून येणारे राजकीय पक्ष ही आपली जबाबदारी मानत नाहीत हे खेदाचे आहे.
-नारायण खरे,  पुणे ५१   फोन-९९७५३४४३०१

इथे विकास खुंटला?
`पिढ्यान् पिढ्याचं खटलं' हा लेख विचार करण्यासारखा आहे. खटले निर्माण होण्याचा वेग आणि निकालात निघण्याचा वेग सारखा असेल तर खटले तुंबणार नाहीत. तसं होत नाही, संशयित व्यक्ती तुरुंगात डांबल्या जातात. न्याययंत्रणा गोगलगायीच्या वेगानं काम करीत असल्यानं खटले लवकर निकालात निघत नाहीत. तुरुंगाच्या धारणशक्तीच्या चौपट पाचपट कैदी तुरुंगात खितपत पडले आहेत.
भ्रष्टाचारी कोण आहे हे सगळयांना माहीत असूनही, पुरावे सादर करण्यात वर्षानुवर्षे वाया जातात; आणि शिक्षाही सौम्य वाटतात. भारतानं अणुविज्ञान, अवकाशविज्ञान, आयटी क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती केली असताना, न्यायदान क्षेत्रच का मागे पडले आहे?
-गजानन वामनाचार्य, घाटकोपर(पू), मुंबई     फोन-८२९११४२५३९

प्रोत्साहनाची प्रेरणा
`आपले जग' चे अलीकडील सर्व अंक वाचनीय व मननीय आहेत. श्रीकृष्ण केळकर यांनी दिेलेला `चंचल लक्ष्मीचा अनुभव' खूप आवडला. लेखाच्या निवडीवरून ते शांत, समंजस, सुविचारी स्वभावाचे वाटले. दुसऱ्याला समजून घेऊन प्रेमळपणे प्रोत्साहन देणे याबद्दल त्यांचे अभिनंदन. मला अनेक प्रकारची हौस आहे; परंतु मध्यमवर्गी गृहिणीच्या मर्यादा पडतात. रेडीओवर मराठी कार्यक्रम, महिलांचे कार्यक्रम मी खूप ऐकते. आवडतील त्या कार्यक्रमांना आवर्जून अभिप्राय पाठवते. २००७ मध्ये वसंुधरा वर्ष सादर केले गेले. `ही पृथ्वी माझी आहे' हा बावन्न भागांचा कार्यक्रम झाला. प्रत्येक कार्यक्रमानंतर एक प्रश्न विचारला जाई. श्रोत्यांनी त्याचे उत्तर द्यायचे. अशा अडतीस कार्यक्रमांत माझे उत्तर बरोबर ठरले. त्याबद्दल बक्षिस म्हणून एक पुस्तक मला घरपोच मिळाले. असे कौतुक माझ्या ध्यानी मनी नव्हते. २००८ मध्ये खगोल शास्त्राचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाविषयीचे बक्षीसही मला अनपेक्षितपणे मिळाले. रेडीओ केंद्रावर येण्यासाठी फॉर्म पाठविला गेला होता; पण माझा स्वभाव आणि गृहिणीच्या जबाबदाऱ्या यामुळे जाणे शक्य नव्हते.  परंतु याप्रकारे अनपेक्षित बक्षिसातून मला प्रोत्सााहन मिळाले व घरापर्यंत लक्ष्मी चालत यावी इतका आनंद झाला. आपल्याला आवडणाऱ्या बाबतीत तसे कळविण्याची दिलदारी आवश्यक वाटते.
    -मालती दातार, बेळगंुदी   फोन- (०८३१) २४४४३२७

मदतीसाठी माझे प्रयत्न
`आपले जग'शी जेव्हापासून जोडलो गेलो आहे तेव्हापासून लेख आणि विशेष करून संपादकीय वाचणे हा एक वाचनसोहळा असतो.
नवीन पनवेल ब्राह्मणसभा या ज्ञातीसंस्थेचे काम आपण पाहिले आहे; ते दिवसेंदिवस वृद्धींगत होत आहे. २५६चा एक व ५०चा एक अशा दोन व्हाट्सअप ग्रुपचा मी अॅडमीन आहे आणि या गु्रपला लिहिण्यास प्रवृत्त करतो. गु्रपचा उपयोग व्यवसाय जाहिराती, काही सेवाविषयक, रोजगारविषयक माहिती तसेच कोणाही गरजू व्यक्तीस आपत्कालीन शैक्षणिक व वैद्यकीय मदतीसाठी करतो आहोत.
-शंकर दत्तात्रय आपटे, नवीन पनवेल

मुंगीचे साम्राज्य
मुंगी  माणसाच्या आयुष्यात सतत डोकावत असते. कधीतरी कडकडून चावलेली असते, कधीतरी आपल्यासमोर लागलेली मुंग्यांची रांग रंजन करते. त्या रांगेशी काहीतरी खेळ करण्यात मौज अनुभवता येते. लहानपणापासून चिअू-काअूबरोबरच मुंगीही गोष्टीतून येत राहिलेली असते; तर मोठेपणी `मुंगी अुडाली आकाशी' चे अप्रूप विचार करायला लावते. हे सारे असले तरी मुंग्यांविषयी शास्त्रीय माहिती आपण कधी घेत नाही. मुंग्यांचे वारूळ ही चीज तर आता पिचतच दिसेल. त्या बिळात नागोबा राहतो, असे म्हणतात, तेवढेच आपल्याला  माहीत. तसे समज-गैरसमज तर खूपच असतात. अुन्हाळयाच्या दिवसांत मुंग्यांच्या रांगा कुठेही तुुरतुरत असतात. सारख्या मुंग्या दिसू लागल्या तर पाअूस येणार म्हणतात.
तोंडात कसला तरी कण, मेलेले झुरळ किंवा लहान कीटक धरून कुठेही न थंाबता थकता  मुंग्या धावपळ करत असतात. लहान मुलांपासून कुणाचाही तो कुतुहलाचा विषय असतो.  काळया तांबड्या मुंग्या आपल्या नेहमीच्या पाहण्यात असतात.. त्यातल्या काळया मुंग्या धावऱ्या, आणि तांबड्या चावऱ्या असतात. पिचत हिरव्या मुंग्या दिसतात. काही मुंग्या चांगल्या मुंगळयाअेवढ्या दिसतात. मुंग्यांचे १२ हजार प्रकार आहेत असे शास्त्रज्ञ सांगतात. मुंगी तिच्या वजनाच्या २०पट वजन ओढत नेअू शकते. ज्या मुंगीला `निरुपयोगी' पंख  असतात, तिला राणी मुंगी म्हणतात. ती लाखो अंडी घालते.  मुंग्यांचे सरासरी आयुष्य २८वर्षे असते. राणी मुंगी ज्यास्तीची दोन वर्षे जगते. मुंग्यांना कान नसतात, अैकू येत नाही..पण जमिनीची कंपने जाणवतात, त्यावरून ती अंदाज घेते. मुंग्या आपसात भांडू लागल्या तर अेकीचा मृृत्यू होआीपर्यंत थांबत नाहीत.
मुंग्या अेकाच रांगेत चालतात, कारण त्यांच्यातून अेक स्राव होत राहतो, त्याचा वेध घेअून त्यांचे दळणवळण चालते. मुंग्यांच्या रांगेत मधेच ओले बोट फिरवले तर त्यांचा संपर्क तुटतो, आणि त्या चाचपडू लागतात. एखादी मुंगी किंवा बहुतांश कीटक मरतात, तेव्हा अेक रसायन बाहेर पडते, त्यावरून बाकीच्या मुंग्यांना कळते. अन्नाची साठवण करण्याची अक्कल माणसाप्रमाणे मुंग्यांना दिलेली आहे. मुंगीच्या शरीराची रचना अशी असते की तिला कितीही अुंचावरून खाली टाकले तरी ती मरत नाही. मुंग्या झोपत नाहीत. पाण्यात त्या बराच काळ -२४तासही जिवंत राहू शकतात. मुंग्यांना दोन पोटे असतात; अेक स्वत:साठी आणि दुसऱ्यातील अन्न दुसऱ्या मुंगीला देता येते. मुंग्यांचा आितिहास कळू येत नाही, पण डायनॉसोरच्या काळातही मुंग्या होत्याच ना!
मुंग्यांचे वारूळ हा अजबखाना असतो. त्यात धान्याची प्रचंड - काही वेळी टनभरही - साठवण आढळते. वारूळ पूर्णत: मातीचेच असते, पण पावसाळयात भोवती पाणी साठले तरी वारूळ आतून ओले होत नाही. वारुळाचे तापमान थंड आणि सगळया ऋतूंत समान असते. त्याची बांधणी आणि वाटा, कचरा आत  न  येण्याची रचना प्रेक्षणीय असते.
तासगावच्या हायस्कूलचे अेक विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्या शाळेच्या सीमेवरील अेका जुन्या चौथऱ्यावर दोन खोल्यांचे बांधकाम करायचे हेाते, त्यासाठी तिथे असणारे मोठे वारूळ काढून टाकायला हवे होते. त्यासाठी मजूरांचा शेाध सुरू असल्याचे  या गुरुजींना कळले. त्यांनी मुख्याध्यापकांकडे परवानगी मागितली आणि ते वारुळ मुलांकडून काढून देण्याचे ठरविले.  काही पालकांना विचारून तशी परवानगी देण्यात आली. या मास्तरानी वीस पंचवीस मुले भोवती अुभी केली. वारुळाचा अेकेक थर मुलांकडून हलके हलके अुतरवत नेला. वारुळाच्या आतील रचना मुलांना समजावून दिली. तापमान मोजायला लावले, धान्याचा साठा दाखविला.  मुलांना प्रात्यक्षिकांसह शिकवले. अर्थात त्यावेळचे शिक्षक पालक आणि मुलेही वेगळीच ना!!

गद्दी पे आते हैं, 
तो सारे बेआिमान होते है ।
मुंबआीची अेस बी जोशी अँड कंपनी ही बांधकाम क्षेत्रातील मोठी प्रसिध्द कंपनी. त्यात मी काम करत होतो. ओरिसातील ब्राह्मणी नदीवरील पुलाचे काम त्या कंपनीकडे होते, मी १९६२पासून त्या कामावर होतो.
१९६३ साली ओरिसातील भुवनेश्वरला काँग्रेसचे अधिवेशन हेाते, त्यासाठी मा.काकासाहेब गाडगीळ येणार होेते. ते अेस बी जोशी यांचे जवळच्या परिचयातील स्नेही होते. कंपनीचे ऑफीस कटकला होते, भुवनेश्वर ते कटक हे अंतर २० किमी आहे.  म्हणून काका गाडगीळ यांनी आमच्या कंपनीच्या विश्रामगृहात मुक्काम करण्याचे ठरविले, तिथून ते भुवनेश्वरला जात.
आमच्या कंपनीची ओरिसात त्या वेळी ४-५ ठिकाणी कामे सुरू होती. त्यातले अेक आमचे, ब्राह्मणी नदीच्या पुलाचे होते. कटकच्या मुक्कात काकासाहेबांनी त्या कामावर भेट द्यावी अशी विनंती जोशी यांनी केली, ती काकानी लगेच मान्य केली. भेटीचा दिवस ठरला, कार्यक्रम ठरला, आणि अर्थातच मला तसे कळविण्यात आले. पुलाच्या जागीच (साआीटवर) आमची (तात्पुरती) घरे होती. काकासाहेबांच्या जेवणाची व्यवस्था मी आमच्या त्या साआीटवरील घरीच केली. ठरल्याप्रमाणे ते कटकहून आले. मी त्यांना पुलावरती नेअून सारे काम दाखविले. नंतर जेवणासाठी ते आमच्या घरी आले. जेवताना त्यांनी आमच्या कामाचे कौतुक केले, गप्पा मारल्या. बोलता बोलता त्यांनी अेक गंमत सांगितली.
काकासाहेब जिथे अुतरले होते, ते आमचे विश्रामगृह होते कटकला चंडी रोडवरती.  तिथल्या फुटपाथवर छोटीछोटी दुकाने होती, त्यात केस कापायची सलून दोनतीन होती. अेके सकाळी काकानी तिथल्या अेका टपरीतल्या दुकानात दाढी करण्यासाठी भेट दिली. साधारणत: आपले काम करताना हाताबरोबरच तोंडाने गप्पा चालू करण्याची त्या कारागिरानां सवय आणि स्वाभाविक हौस असायची. त्यात राजकारणाचा विषय असेल तर त्यास बहर यायचाच.  तेथील राजकारण्यांचा विषय या कारागिराकडून सुरू झाला, आणि काकाही त्याच्याशी गप्पा मारू लागले. सामान्यांची प्रतिक्रिया कळण्यासाठी त्या गावगप्पा अुपयोगी असतात.  काकासाहेब तिथल्या अेकेका नेत्याविषयी विचारू लागले, आणि तोही मोकळेपणी जरा रंगात येअून ज्यादाच सांगू लागला. थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की, हा गृहस्थ ओरिसाचा तर वाटत नाही, हिंदी बोलतो आहे, पाव्हणा दिसतो. म्हणून त्याने चौकशी केली, कुठून आलात विचारलं.
काकानी अुगीच लपवाछपवी केली नाही.  सांगून टाकलं की, मी पंजाबातून आलोेय, पंजाबचा गव्हर्नर आहे. काँग्रेस अधिवेशनासाठी आलोय. हे अैकल्यावर न्हावीदादाला घाम फुटला. तो काकासाहेबांच्या हातापाया पडू लागला. माझी चूक झाली, पुन्हा असं बोलणार नाही, मला माहीत नव्हतं....वगैरे! काकांनी त्याला सांगितलं की, बाबा रे काळजी करू नका. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही.
आमच्याशी गप्पा मारताना काकानी ही गोष्ट सांगून पुढं म्हटलं की, मी ही गंमत लिहून वर्तमानपत्रात छापायला देणार आहे. पुढे त्यांनी मुंबआीच्या अेका वृत्तपत्रात लेखही लिहिला होता, त्यात राजकीय विश्लेषणाच्या संदर्भात ही गोष्ट समाविष्ट केली होती. लेखाचे शीर्षक होते, `गद्दी पे आतेही सारे बेआिमान होते है।'                                                                        -मुकुंद करमरकर, मुंबई

आठवांचे साठव
महाराज  :  हे आणि ते
आमचे गाव वृत्तपत्रीय किंवा वाङ्मयीन संबंधाने तसे आडवळणी म्हटले जायचे. अंकाच्या संदर्भात जी कौतुकपत्रे येत, त्यात बहुतेक वेळी `... तुम्ही पुण्यामुंबआीपासून दूर, आडवळणी गावात असूनही...' असा अुल्लेख -आजही येत असतो. अेका बसक्या कौलारू छपरात साध्या मशीनवर छापले जाणारे आमचे वृत्तपत्र महाराष्ट्नत सारीकडे जाते, हे अजब होते. पण ते पहिलेच नव्हते. किर्लोस्कर मासिके आधीच्या काळातही त्यापेक्षा मोठा पराक्रम करून आता पुण्यासारख्या राजधानीत गेलेली होती. पण त्यांना कारखान्याचा फार मोठा आधार होता, यंत्रणा होती; त्या मानाने आमचा जीव केवढा! पण प्रारंभापासून मोठमोठ्या लोकांचे लक्ष वेधले गेले होते यात अतिशयोक्ती नाही. १९८०सालच्या अेके दिवशी सकाळी मुकुंदराव किर्लोस्करांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, `किर्लोस्करवाडीत काही कामासाठी `आिंडिया टुडे' या आिंग्रजी मॅगेझिनचे कार्यकारी संपादक छोटू कराडिया आलेत, त्यांना तुला भेटायचेय, अंकाचे काम पाहायचेय.' त्याप्रमाणे मुकुंदरावांसोबत कराडिया आले. टर्रेबाज गाडी आमच्या झोपड्याशी  येण्याला बैलगाडीवाट होती, वेगळा धड रस्ता नव्हता. त्यांच्यासोबत फोटोग्राफर वगैरे सरंजाम. डोके थडकणाऱ्या बुटक्या चौकटीतून त्यांनी आमचा संपादकीय विभाग पाहिला. नंतर बाहेरच्या बाजूस पिंपरणीच्या झाडाखाली खाटल्यांवर चहापान झाले. त्या भल्या गृहस्थाने या साऱ्या पत्रकारितेचे मनापासून कौतुक केले..
अेका खास अंकाचे काम आमच्या प्रेसमध्ये सुरू करायचे होते. त्याच दिवशी आमच्या छोेट्या गावात सांगली अर्बन बँकेची शाखा सुरू व्हायची होती. त्यासाठी त्यावेळचे सहकारमंत्री अभयसिंहराजे भोसले यायचे होते. तो योग साधून आमच्याकडील त्या अंकाचाही मुहूर्त त्यांच्या हस्ते करण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांनी ती आनंदाने मान्य केली. त्या बँकेचा कार्यक्रम अुरकून अभयसिंहराजे आमच्या आिथे आले. रिवाजाप्रमाणे त्यांना सारेे `महाराज' म्हणत. मौजेचा भाग असा की, आमच्याकडे पांडू सुर्वे नावाचे अेक हरकामे होते. ते माळकरी वारकरी आणि भगत होते; आम्ही सारे त्यांना महाराज म्हणायचो. या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यंत्राची पूजा, प्रारंभ मजकुराची पूजा, नारळ... हे  चालू असताना आम्ही आपले  `महाराज, तो तांब्या आिकडं आणा', `महाराज, हे नीट पुसून घ्या' -असे सांगत होतो. प्रत्येक वेळी  `-महाराज..' म्हटले की अभयसिंह महाराज वळून पाहायचे. आम्ही `काडेपटी आणा...' म्हटले की मग त्यांच्या लक्षात यायचे की, ही आज्ञा आपल्यासाठी नव्हे. चारदोनदा तसे झाल्यावर साऱ्यांच्याच लक्षात आले आणि बापूसाहेब पुजारींनी खुलासा केला, `...अहो, आिथं आणखी अेक महाराज आहेत, त्यांना ते सांगताहेत. तुम्ही मोठे महाराज आहात...' सगळे हसले, त्यात अभयसिंह महाराजही सामील झाले. वृक्षमित्र धों म मोहिते हजर होते; ते म्हणाले, `...आमच्यासारख्याचं कायबी अैकणारा आणखी अेक महाराज आम्हाला सापडला...' मजेत कार्यक्रम पार पडला.
ज्या अेका मोठ्या संस्थेचा विशेषांक काढायचा होता, ते काम तसं प्रतिष्ठेचं होतं. पहिल्यापासून आमचे या भागात संबंध असल्यामुळं, आणि आिथं कोणी स्पर्धक नसल्यामुळं आम्हाला ते काम देण्यात येणार होतं. पण त्यासाठी दर सांगितल्यावर ते त्या संस्थेच्या मीटिंगपुढं ठेवायचे ठरले. मी हजर राहिलो होतोच. सारं तालेवार संचालक मंडळ, अध्यक्ष तर मोठे पुढारी. त्यांनी मला राअूंडात घेअून दर चेपवायला सुरुवात केली. मला  न  परवडणारे दर दबावानं मान्य करायला लावले. जरा नाराज होतो, पण मी डोकं चालवलं. प्रत्येक अंकाला अमूक किंमत, असा व्यवहार ठरला होता. प्रेसमधील गोची अशी असते की, प्राथमिक जुळवाजुळवीचा खर्च, मजकूर तयार करण्याचा, प्रुफे तपासण्याचा वगैरे जो काही खर्च असतो, तो सुरुवातीला अेकदा करावा लागतो. त्यानंतर फक्त कागदाची किंमत वाढत जाते. म्हणजे शंभर प्रतींस दोनशे रुपये लागले, तर अेका प्रतीस दोन रुपये होतात. पण हजार प्रतींना पाचशे रुपयांत भागते म्हणजे प्रतीमागे आठ आणे खर्च येतो. त्या थोर लोकांना मी त्या तिढ्यात अडकविले. प्रतीला अमूक रुपये असा दर ठरल्यावर मी साऱ्यांना म्हटले, `अहो, अेवढी मोठी तुमची संस्था, आपण अध्यक्षसाहेबांचा फोटो मुखपृष्ठावर छापणार, कित्येक लोक पाहणार. मग हजार प्रती पुरतील का?' तिढा बसला. शंभर-दोनशे-अडीचशे करत ज्यादा पाचशे प्रती लागणारच; त्यामुळे पंधराशे प्रती छापायचे ठरले. प्रत्येक प्रतीचा दर आधी ठरलेलाच होता. त्या दराने प्रती दीडपट वाढल्या आणि मी हसत हसत बाहेर पडलो. नंतर त्या कामाचा मुहूर्त थाटामाटात केला. आमच्या पथ्यात बसत नव्हते तरीही फटाके वगैरे अुडवले. ते पुढारी खूश... आम्हीही खूश!

-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी
फोन-९५६१३९०८९०


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन