Skip to main content

26-march 2018

पिढीचे पालकत्व
सुजाण पालकत्व हा जोडशब्द म्हणजे द्विरुक्ती आहे. पालकत्व हे सुजाणच असले पाहिजे, त्यात वेगळे काय सांगायचे? किंवा सु-जाण आल्याशिवाय पालकत्व घेताच कसे येआील? पण आजकाल हा जोडशब्द वदतो व्याघात बनला आहे. सुजाण आणि पालकत्व हे शब्द परस्पर विरोधीच वाटू लागले आहेत. सुजाण असेल तर तो पालक होणार नाही; आणि पालक झाला तर तो सुजाण असेल असे नाही! सुजाण पालकत्व सांगून शिकवून वेगळे बाणवावे लागावे अशी वेळ आली आहे, असे बहुतां सुजाण-जनांस वाटू लागले आहे असे दिसते. वास्तविक कोणतेही काम चांगले -सुजाण होण्यासाठी आणि ते स्वीकारले जाण्यासाठी  प्रशिक्षण आवश्यक असते. बसचा कंडक्टर किंवा बँकेतला शिपाआी म्हणून काम करायचे झाले तरी त्याला प्रशिक्षण दिले जाते, शिकवावे लागते. चांगले पालक होण्यासाठी कोण कधी कसले प्रशिक्षण घेतो? मुलगा आणि मुलगी वयात आली असे त्यांना व आितरांना वाटू लागले की त्यांच्या दोनाचे चार हात होतात, आणि काहीही विशेष  न  करता ते अेके मंगल घटिकेस आआीबाप होतात. वयात येणे म्हणजे शहाणे होणे असे मानून त्यांचे लग्न होते; आणि लग्न झाले म्हणजे त्यांना पालक हेाण्याचा परवाना मिळतो. ते पालक होतात. आता कंडक्टर किंवा बँकेतल्या शिपायालासुध्दा प्रशिक्षण द्यायला पाहिजे, -तर पालक होण्यासाठी प्रशिक्षण नको का? कंडक्टर प्रशिक्षित नसेल तर अेका बसगाडीचे नुकसान होआील; शिपाआी प्रशिक्षित नसेल तर त्या कार्यालयापुरते काम चुकेल; पण पालक जर प्रशिक्षित नसतील तर राष्ट्नच्या, समाजाच्या अक्ख्या पिढीचे नुकसान होणार! म्हणूनच आआीबाप होणे सोपे, पालक होणे कठीण असते.
माणसाचा अुद्गम आणि त्याच्या पिढ्यांचा विकास गेल्या हजारो वर्षांत होत आलेला आहे, मग आजकाल हा पालकत्वाचा प्रश्न का पुढे येत जातो? पुरातन काळापासून, मूल जन्माला आल्यानंतर त्याला `घडविण्यासाठी' पालक खटपट करीत होतेच की. मग आजही पालक मुलांना शाळेत घालतात, त्यांना चॉकोलेट पिझ्झा आणतात, फुगे बांधून केक कापून त्यांचे वाढदिवस साजरे करतात. खेडोपाड्यांतूनही हल्ली अेकदोन महिन्यांच्या बालकांच्या वाढदिवशी गावाच्या चौकात डिजिटल बॅनर लावून आपला पराक्रम सांगण्याची फ्याशन आली आहे. हे मुलाबाळांचे कौतुक चांगल्या पालकत्वाचे लक्षण नाही काय? फारशी मिळकत नसली तरी साधी साधी माणसं आपल्या पोरा पोरीला यासफ्यास करणाऱ्या टायबुटाच्या शाळेत घालत असलेली, आणि त्याला नेण्या-आणण्यासाठी पिवळया गाडीची वाट पाहात अुभारलेली आपण पाहतो आहोत. हा अेवढा खर्च, हा अेवढा त्रास, ही अेवढी कळकळ, हौस सर्वत्र दिसत असूनही पालकांच्या सुजाणत्वाबद्दल शंका का घेतली जाते?
त्याचे कारण असे की पालकत्व दिशाहीन होत चालले आहे, असे मोठे लोक, शास्त्रज्ञ विचारवंत म्हणत आहेत. त्याची जी कारणे असतील त्यांत मुख्य कारण कुटुंबे विस्कळीत होत गेली हे असावे. आर्थिक ओढ वाढत गेली, शहरीकरण वाढले, अपत्यांची संख्याही कमी कमी होत गेली. शेतीवरचे अवलंबित्व कमी झाले तसतशी कुटुंबे छोटी छोटी होत आकसत गेली. तीन पिढ्या आणि त्यांचा राबता असणारी घरे आता दोनतीन जणांच्या आटोपीत दोनतीन खोल्यांत सामावली गेली. त्यातही कर्ता पुरुष दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर, आणि त्याला आर्थिक मदत म्हणून घरची स्त्री कुठेतरी काम करण्यासाठी जाणारी असते. त्यांची अेक किंवा फारतर दोन अपत्ये घरी येतील राहतील तेव्हा त्यांना माणसांत राहण्याची सवय राहात नाही. मिळून मिसळून अेकभावे नांदण्यातून त्यांच्या मनाची घडण होत जाअू शकली असती, त्याला ती  दुरावली आहेत. नातवंडाला दुखलं खुपलं तर त्यावर हळूवार फुंकर घालत, घरच्या घरी अुपचार करणारी आजी, पूजापाठ करणारे किंवा नातवंडांना बाजारात घेअून जाणारे आजोबा, आणि कधीमधी  येणारी आत्या मामी, त्यांची समवयस्क पोरंबाळं हे दृश्य आपल्या घरांतून गायब झालं आहे. घरातल्या घरात आपोआप अेका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळणारे पालकत्वाचे धडे दुर्मीळ झाले, त्यामुळं मुलं कशी वाढवायची याबाबतींत पालकांचं प्रशिक्षण ही गोष्ट बाजूला पडली. आणि आता तीच गोष्ट योजून आवर्जून करणे फार गरजेचे ठरू लागले.
वसंत कानेटकरांच्या लेेकुरे अुदंड झाली  या नाटकाच्या जाहिरातीत अेक मिस्कील वाक्य असायचे. `मुलंच ती; त्यांना काय कळतंय? -ती व्हायचीच!' आितक्या सहज मिळणारं पालकत्वाचं पद जबाबदारीनं पेलणं मात्र सोपं नसतं. जसं जमेल तसं होआील, या पध्दतीनं पालकत्वाचा खेळ करणारे काहीजण असतात, तसेच आजची मुलं बिघडतच चालली आहेत असं मानून कालस्थितीवर करवादत राहणारेही पालक आहेत. या साऱ्यांपेक्षा आज मोठं प्रमाण आहे ते म्हणजे आपल्या मुलाबाळांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे असं वाटणारे, परंतु प्रत्यक्षात चुकीचं काहीतरी करणारे पालक; किंवा ते चांगलं करण्यासाठी पैसा पेरण्याची आपली जबाबदारी आहे असं समजून तेवढीच पार पाडून मुलाकडं दुर्लक्ष करणारे पालक. यातल्या कोणत्याच प्रकाराला सुजाण पालक म्हणता येत नाही.
साऱ्या सजीवांच्या बाबतीत अपत्य जन्माला घालणे हे अेक नैसर्गिक घटित असते. आितर सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत `आहार निद्रा भय मैथुनं च' हे तर जीवनातील सर्वमान्य आणि सर्वसामान्य लक्षण असते; पण माणसाला वेगळी काही जाण, आणि त्या संदर्भातील जबाबदारीही दिली आहे. माणसाला मन असल्यामुळे त्याला भावना आहेत, जिज्ञासा आहे, प्रयोगशीलता आहे, सुखाचा ध्यास आहे, त्यासाठी विकासाची ओढ आहे. हा विकास सर्वांगिण होण्याची त्याची धडपड असते. आपल्या मुलाने केवळ पैसाच मिळवावा असे कोणत्याही पालकाला वाटत नाही; तर त्याने खेळात पुढे असावे, नाटकात भाग घ्यावा, शंभर टक्के मार्क मिळवावेत ... थोडक्यात म्हणजे आपले पाल्य सगळया जगात सगळया क्षेत्रांत पहिल्याच क्रमांकावर असायला पाहिजे असा काहीतरी ध्यास प्रत्येक पालकाला असतो. त्यासाठी काय करायला हवे? -त्याचे अुत्तर त्यांच्या परीने त्यांनी सोपे केले आहे. ते म्हणजे त्याला गणित-संस्कृत-विज्ञानाचे क्लास जोडून द्यायचे; खेळण्यासाठी बूट-रॅकेट घेअून द्यायचे.... वगैरे! दुसऱ्या कुणाला जे मिळत नसेल ते त्याला पैशातून अुपलब्ध करून द्यायचे म्हणजेच त्याचे अुत्तम शिक्षण, अशी व्याख्या रूढ झाली आहे.
अलीकडे शिक्षण याविषयी नवे नवे संशोधन प्रगट होत असते. मानसशास्त्र, बालसंगोपनशास्त्र, बदलती सामाजिक स्थिती, भविष्यातील गरजा, मुलांची आकलनशक्ती, अुपलब्ध साधने, अशा साऱ्या बाजूंनी विचार मांडून मुलांच्या संवर्धनाचे नवे शास्त्र तयार होअू लागले आहे. पुढची पिढी घडविणे हे, सर्व सजीवांपैकी केवळ माणसालाच आपले कर्तव्य वाटत असते. आितर सजीव केवळ जन्म देतात, त्यांची पुढची पिढी निसर्गानुसार वाढत असते. पण त्यामुळेच त्यांच्या पिढ्या जिथे होत्या किंवा आहेत तिथेच राहतात. हत्ती किंवा कुत्रे कितीही हुशार असले तरी चारशे वर्षांपूर्वीचा आणि आजचा हत्ती बदललेला नाही. कुत्रे जसे महाभारतकाळी होते, तसेच आहे. पण माणूस मात्र कुठल्याकुठे बदलला. कारण त्याच्या मनातील स्पंदने आधीच्या पिढीच्या संस्कारातून आितिहासातून प्रेरणेतून जिज्ञासेतून बदलत गेली आहेत. तीच प्रक्रिया याही पुढच्या काळात चालू राहणार आहे. त्यामुळेच पुढच्या पिढ्यांच्या विकसनाच्या संदर्भात पालकांची कर्तव्ये आणि आचार विचार यांविषयी वादचर्चा सतत चालू राहिलेली असते.
नव्या शिक्षणपध्दतींनुसार मुलांना शिकविण्याची गरज नसते, ती शिकत असतात. नव्याची जिज्ञासा ही माणसाची अुपजत शक्ती असल्यामुळे बालक त्याच्या आवडीने व शक्तीबुध्दीने शिकतच असते. पालक मात्र आपल्या आवडी, आपल्या वेळच्या परिस्थितीच्या मर्यादा, आपल्या सामाजिक कल्पना यांच्या आधारे बालकांना `ठोकून घडविण्या'च्या  प्रयत्नांत असतात. त्यालाच पालक आपले कर्तव्य समजतात. मुलाला नृत्य आवडत असेल तर कित्येक बापांना ते लाजिरवाणे वाटते. शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होणार म्हणाला, किंवा कोण्या कन्येने शेतकरी नवरा हवा म्हटले तर  शेतकरी पालकांना चालत नाही. हे `लादणे' आजच्या बालकांची मोठी समस्या आहे. मौज अशी की त्या आवडीचाच नि:पात करणे म्हणजे `पाल्य घडविणे' असे पालकांना वाटते. त्याअुलट महाखर्चाने पोराला किंवा पोरीला सरकारी नोकर करणे हे त्यांना `घडविणे' वाटते. मुलांना शिकवू नका, त्यांना शिकूद्यात या सूत्रातील आशय पालकांनी अंगी बाणविण्याची फार गरज आहे. त्यांचा कल आवड पाहून शिकण्यायोग्य सुस्थिती, साधने व संवाद उपलब्ध करणे हे पालकत्व पुरेसे असते.
सामाजिक स्थितीही अशी बदलत चालली आहे की, माणसे आपापल्या कोषात अडकून राहण्यात सुख मानू लागली आहेत. माणूस हा समाजप्रिय प्राणी(कॉलोनिकल अॅनिमल) आहे, त्यामुळे समाजात राहणे त्यास मानवते. पण अेकटेपणाने स्वत:पुरते पाहण्याची दृष्टी बालकांत तयार करण्याचे प्रयत्न हल्लीचे पालक करीत असतात. `बाकीच्यांकडं लक्ष देअू नको' ही शिकवण काय सांगते? सहलीला पाठवितांना आपल्या पाल्यास ज्या `टिप्स' दिल्या जातात, त्यात `तुझ्या बाटलीतलं पाणी सगळयांना वाटत बसू नको', `तुझा खाअू दूर बसून खा', हे सांगण्यातून पालक काय शिकवतात? अेक तीळ सात जणांनी वाटून खावा हे आपलं कधी काळचं शिकवणं; प्रवासात आितरांकडे पाठ करून कुणाला आपली शिदोरी  न  दिसेल अशा रितीनं खाण्यापर्यंत गेलं आहे. यांतून मुलं शिकत असतात. हल्लीची मुलं अैकत नाहीत अशी पालकांची सार्वत्रिक तक्रार असते. ती निर्विवाद बरोबर आहे. कारण मुलं तुमचं `अैकत नसतात'; ती तुमचं वर्तन `पाहात असतात'. खोटं बोलू नये, व्यसनं करू नयेत, टीव्ही पाहू नये असं कानी कपाळी सांगणारे पालक सगळेच आहेत. तसं आचरण मुलांना दाखवून देणारे पालक किती हा प्रश्न अडचणीचा ठरेल.
म्हणूनच पालकांची मुलांच्या बाबतीत कर्तव्ये सांगणारे शिकवणी वर्ग चहूकडं सुरू आहेत. मातेच्या गर्भावस्थेपासून मुलांवरच्या संस्कारांचं स्तोम वाढविले जाते. पण शिक्षण बालकांना देण्याची तितकी गरज नाही, जितकी ती पालकांना आहे. पालकत्व योग्य होण्यासाठी पालकांना बदलावे लागेल. पुढच्या पिढीत चांगले बदल होणे अपेक्षित असेल तर पालकांना स्वत: बदलायला हवं. पुढे चांगले नागरिक घडविण्यासाठी आपण चांगले नागरिक व्हायला हवं. देवदयेने आआीबाप झालोच आहोत, आता चांगले पालक होण्याचे प्रयत्न करायला हवेत. त्याबाबतीत शिक्षक-पालक असाही भेद नसावा. पालक हा शिक्षक होअू शकतो, आणि शिक्षक हा तर पालक असायलाच हवा.
या संदर्भात डॉ अे पी जे कलाम यांची अेक कथा अैकली होती. कुलगुरूंच्या निवड समितीची बैठक होती. काही अुमेदवारांमधून विद्यापीठासाठी कुलगुरूची निवड करायची होती. त्यांची पात्रता, अर्हता सगळे यथायोग्य होतेच. त्यातल्या कुणाची निवड करायची असा प्रश्नच होता. कलाम म्हणाले, `त्यातल्या प्रत्येकाला विचारूया की त्याचे आआीवडील कुठे राहतात. -ज्याच्याजवळ त्याचे आआीवडील राहात असतील त्यास निवडूया.कारण जो स्वत:च्या आआीबापाला सांभाळत नसेल तो विद्यापीठातली दीडदोन लाख मुलं कशी सांभाळेल?'
आितिअलम्!
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी फोन-९५६१३९०८९०
(साताऱ्याच्या कौशिक प्रकाशनाच्या वतीने `पालकत्व' यासंबंधी लेखसंग्रह पुस्तकरूपात पुढच्या महिन्यात प्रकाशित होणार आहे. त्यात समावेश केलेला लेख)

इव्हेंट मॅनेजर
माझा शाळूसोबती परशा, परवा अचानक गावी आलेला मला भेटला. खूप वर्षांनी भेट झाली. शाळेतला परशा वृत्तीने फारसा बदलला नव्हता, तसाच धटिंगण रुबाब, चेहरा खुशीतला, बेफिकीर बोलणे वगैरे. शाळेत असताना पक्का टारगट बनेल वांड असलेल्या परशाला पुढे काही भविष्य नसेलच असे मी धरून चाललो होतो. कुठेतरी सामान्य चाकरी, फारतर कसलं तरी कंत्राट मजुरी श्रम हे त्याचं आयुष्य मला माझ्या शालान्त काळात दिसत होतं. आम्ही आपले शांत सुस्वभावी अभ्यासू गटातले. परीक्षेला आणि त्यातल्या अपयशाला भिअून पुस्तकात मान घालत बसायचो.
कालानुक्रमे आम्ही -म्हणजे मी आणि आमची सारी समविचारी तुकडी - शाळेतून बाहेर पडलो, मी तर आिंजीनियरिंगचा डिप्लोमा असलो तरी बाहेर आिंजिनियर म्हणून खपून गेलो. त्या दराने लग्न पार पडले. बायको, नोकरी, मुलं, भाडोत्री घर  असं सगळं फर्स्टक्लास करीयर चाललं होतं. अचानक अेके दिवशी हा बालमित्र टपकला. परशाला मी त्याच्या रुबाबावरून ओळखलाच नसता. अपेक्षाभंग झाला होता. कधी आलास, कुठं असतोस? सहज म्हणून या चौकशा झाल्या. त्याच्या भारी वागण्याचं कोडं होतं. घरी न्यावं की नको अशा संभ्रमात मी त्याला विचारलं `अुतराल कुठं?' त्यानं अुत्तर दिलं, `च्यायला साल्या तिरसिंग्या, हे आपलं गाव तसंच भटार राहिलंय रे! अेक फायू स्टार नाय गावात....मग त्याच त्या रेक्सहाआीट ला अुतरलोय...'
हा परसू कसला ? आता परशुरामराव म्हणायला पायजे. त्याला सारे कार्यकर्ते आणि त्याची माणसं `परसभाअू' म्हणतात हे त्यानं सांगितलं. त्याचं चाललंय काय हे कळण्यासाठी त्यानं माझ्या घरी येण्याचं मान्य केलं आणि त्याचे सोन्याचे पाय आमच्या सुदामागृहास लागले. त्याला पत्नीनं ओळखण्याचं कारणच नव्हतं. तिनं केवळ कोणीतरी बडं प्रस्थ आहे अेवढं ओळखून ठेवणीतल्या कपबशा काढल्या. चहा घेताना त्यानं आपली कारकिर्द सांगितली.
कुठल्या तरी अेका सामन्यात त्याच्यावर अन्याय झाला म्हणून त्यानं पंच असलेल्या दुसऱ्या शाळेच्या हेडमास्तरला ठोकला होता, त्यामुळं शाळेतून त्याला काढून टाकलं होतं. नंतरचा कथाभाग त्यानं सांगितला. शाळेतून काढल्यावर त्याच्या बापानं त्याला `जाअूदे बोंबलत..' म्हणून घरातनं हाकलल्यावर अेका राजकीय पुढाऱ्याने त्याला आपला कार्यकर्ता म्हणून ठेवून घेतलं. मतदारसंघातले प्रश्न सोडविण्यासाठी त्याचा वापर होअू लागला. कुणाला सरळ करणं, कुणाचं घर रिकामं करून देणं, कधी फार मोठ्या नेत्यासाठी माणसं गोळा करणं, मोर्चे वगैरे काढणं, बंद पुकारला तर टायरी जाळणं- बसच्या काचा फोडणंं अशा कार्यात हा परसू माहीर होता. तो त्याच्या साहेबाच्या अेकदम मनात बसला. वेगानं त्याची प्रगती झाली. बढती मिळून तो मुंबआीला मोठ्या कामात गेला, मोठ्या जबाबदाऱ्या घेअू लागला.
आता तो मोठ्या राजकीय पक्षाचा आिव्हेंट मॅनेजर म्हणून काम करतो. त्याचं भांडवल म्हणजे पंचवीस हजार कार्यकर्त्यांची फौज त्याच्याकडं आहे, शिवाय कडव्या बलदंड गणंगांची शिबंदी आहे. दुसऱ्या नेत्याचे लोक कधी आडवे येतील सांगता येत नाही, म्हणून हे फिल्डिंग लावावे लागते असे तो म्हणाला. हल्ली वातावरण त्याच्या धंद्यासाठी चांगलं आहे. हा अमूकच पार्टीचं काम असं बंधन पाळत नाही. कोणीही आपल्याला सांगावं, असा त्याचा होलशेल धंदा आहे. मोर्च्याला परवानगी, बंदोबस्त, मार्ग आखून द्यायचे, मोर्च्याला सामोरं जाण्यासाठी मंत्र्यांच्या अपॉआिंटमेंट ठरविणं, आिकडं ज्यांना आंदोलनं वगैरे करायची असतात त्यांना मंत्र्यांचे दौरे कळवणं वगैरे; असं हाय लेवल काम तो करतो. पोलीस अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे काम त्याची स्थानिक ब्रँच करते, पण डिपार्टमेंटशी चर्चा असेल तर त्याची मीटिंग होते.
मुंबआीत  त्याचं ऑफीस आहे. तिथं साऱ्या लोकांचे, डॉक्टरांचे, अँब्युलन्सचे, जिल्हा अधिकाऱ्यांचे फोन वगैरे आहेत. दरडोआी अमूक रुपये असे दर असतात, त्यातून साऱ्या वाटण्या वगैरे ठरतात. वाढदिवस अभिनंदन प्रचार वगैरे डिजिटल बोर्ड लावायचे वेगवेगळे दर असतात. बोर्ड कुठं लावायचा त्यावर ते ठरतं. बोर्ड लावायचं काम असतं, तसंच आपलं शहर विद्रूप होतं म्हणून आंदोलन करायलाही त्याचे लोक मिळतात. तुम्ही काहीही करायचं असलं तरी त्याची माणसं तयार असतात; आणि काही करू द्यायचं नसलं तरीही त्याची माणसं मिळतात. मोर्चे काढण्यासाठी मार्ग कोणता, गाव कोेणतं, कुणाविरोधात काढायचा, दगडफेक काचाफोड टायरजाळ करायची का, यांवर दरमाणशी पैसे ठरतात. मॅनेजमेंट चार्जेस घेअून बाकीचे पैसे त्या त्या कार्यकर्त्यांपर्यंत व साहेबांपर्यंत पोचविले जातात.
हल्ली तर त्याचा सेक्रेटरीही  मुंबआीत बसून ते करू शकतो, याच्यापर्यंत जावं लागत नाही. धंदा आता सेट झालाय, त्यामुळंच त्याला असं गावाकडं वगैरे येण्याला सवड मिळू लागली आहे.
हे सारं अैकताना माझा चहा जाग्यावरच निवून गेला होता. आम्ही आिंजिनियरींगच्या रेषा मारत राहिलो, त्याने सोशल आिंजिनियरिंगमध्ये करियर केलं. निवडणुका लवकरच लागणार असल्यामुळं पुन्हा लवकर यायला मिळणार नाही म्हणून तो जरा निवांत सवड काढून आला होता, देवधर्म - पैपाहुणे सारं अुरकेपर्यंत त्याला आिथं राहायचं होतं. पण त्याच्या सोयीचं हॉटेल गावात नव्हतं. माझ्या घरीच राहायला ये असं सांगण्याचं धाडस मला कुठून येणार? त्याची अेक मोठी आिच्छा होती. आपल्या शाळेला काहीतरी देणगी तो देणार होता. किती, हे विचारायचं कसं? देणगीदान करण्याचा भावी इव्हेंट मला डोळयांपुढं दिसू लागला.
                         -अशोक तेलंग, सांगली 
                          फोन : ९८६०६७५५७५

संघटनेचा आद्य प्रणेता!
शके १८८२च्या चैत्र शु. १रोजी नागपूर येथे एका गरीब भिक्षुकाच्या घरी `राष्ट्नीय स्वयंसेवक संघ' या विख्यात संघटनेचे जनक व संवर्धक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म झाला. वेदाभ्यास आणि भिक्षुकवृत्ती या संपत्तीच्या आधारावर, अत्यंत जुन्या व बाळबोध पद्धतीचे डॉक्टरांचे घराणे नागपुरात होते. लहानपणापासून मनाची बळकटी व चिकाटी हे गुण संपादित करून त्यांनी आपला विकास साध्य केला. नागपूर, यवतमाळ व पुणे येथे आरंभीचे शिक्षण संपल्यावर डॉक्टर कलकत्ता येथील नॅशनल मेडिकल कॉलेजमधून एल्.एम् अॅण्ड एस्.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. परंतु वैद्यकी व्यवसाय न करता १९२०-२१ साली असहकाराच्या चळवळीत भाग घेऊन डॉक्टरांनी आपल्या सार्वजनिक कार्याला सुरुवात केली.
शके १८४७च्या विजयादशमीला नागपूर येथील मोहित्यांच्या जुन्या वाड्यात राष्ट्नीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा ओनामा झाला. थोड्याच काळात या संस्थेचा विस्तार सबंध हिंदुस्थानभर झाला! भगवा ध्वज, लष्करी पद्धतीची शिस्त, बौद्धिक वर्ग, या मार्गांनी भारतात जागृती करण्याचे कार्य संघाने एकनिष्ठेने आणि त्यागवृत्तीने केले. भ्रान्त बनलेल्या भारतीयांना डॉक्टरांनी संघटनेचा महामंत्र दिला की, ``संघटनाशास्त्रात गर्वाला, फुशारकीला, जबरदस्तीला किंवा व्यक्तिगत महत्वाला जागाच असू शकत नाही. संघटन हा शब्द असेच ध्वनित करतो की, त्यात व्यक्तिेनष्ठा राहू शकत नाही.... परंतु संघटनेला आदर्श व्यक्तिमत्वाची मात्र अत्यंत आवश्यकता आहे. गुणांना दुसरीकडे किंमत येईल, कीर्तीच्या रूपाने मोबदलाही मिळेल, पण त्याच गुणांचे सार्थक संघटनेसाठी सर्वस्व खर्च केल्यानेच होणार आहे.'' ही त्यांची शिकवण होती.  त्यांच्या या संदेशाने भारतातील असंख्य तरुण मार्गप्रवृत्त झाले आहेत. रा.स्व.संघाच्या रूपाने डॉक्टर अजरामर झाले आहेत.

चंचल लक्ष्मीचा अनुभव
(जानेवारीच्या `विवेक' अंकात, दुबआीचे  मसाला किंग धनंजय दातार यांचा लेख आहे. `लक्ष्मीचा भरवसा धरी, तो येक मूर्ख' या शीर्षकाने त्यांनी अनुभव दिलेले आहेत. 
त्यातला काही भाग संकलित -) 
       अेकदा अेक बडा व्यापारी आमच्या दुकानात आला. मी दुकानात अुभा होतो. मला तो म्हणाला, `धनंजय, हे पाकीट तुझ्याकडं देअून ठेवतो. दुपारी अेकजण येआील, त्यास हे पाकीट दे.' तो बडा व्यापारी, - मी छोटा दुकानदार! मी बरं म्हणून मान हलवली. ते पाकीट कौंटरजवळच्या अेका कप्प्यात ठेवून दिले. दुपारी तो माणूस काही आला नाही. दुसऱ्या दिवशी मी माझ्या काही कामासाठी परगावी गेलो होतो. त्या दरम्यान तो माणूस ते पाकीट नेण्यासाठी आमच्या दुकानात येअून गेला होता. माझ्या गैरहजेरीत कामावर असणाऱ्या आमच्या माणसाला यातले काही ठाअूकच नव्हते. मी तसे सांगून गेलो नव्हतो हे खरे.
पुढच्या दिवशी तो बडा व्यापारी आमच्या दुकानात आला, तो पाय आपटत! मला अद्वातद्वा बोलू लागला. ``मला काय समजतोस? तुझं हे दुकान बंद करून दाखवीन मी. माझी ताकत तुला ठाअूक नाही.'' -मी आर्जवी भाषेत `ते पाकीट द्यायचं राहून गेलं, काय घडलं....' वगैरे खुलासा करू पाहात होतो, पण तो काही अैकूनच घेत नव्हता. ते पाकीट संबंधिताला नेअून देण्याची  मी तयारी दाखवली. मी काही दुरुत्तर न करता माफी मागत होतो, म्हणून त्याचा अहंकार सुखावला असावा, त्यामुळे मला तो पुन:पुन्हा बोल लावत होता. तो गेल्यावर आमचे कर्मचारी म्हणाले, `मालक, अेवढ्या क्षुल्लक कारणासाठी त्याच्या धमक्या अैकून घ्यायचं काय कारण होतं?' मीच त्यांना समजावले, ``बाबानो, या परमुलखात आपण धंदा करायला आलोय, भांडणं करायला नव्हे! शब्दानं शब्द वाढला असता, विकोपाला गेला असता. त्याच्या बोलण्यानं माझ्या अंगाला भोकं पडली थोडीच? अशा बोलण्याकडं दुर्लक्ष करायची मला सवय आहे. तुम्हीपण ते विसरून जा.''
त्या प्रसंगानंतर काही वर्षे गेली. माझ्या कंपनीने चांगला जोर धरला होता. मालाचा दर्जा अुंचावला होता. मोठे व्यापारी, निरनिराळी हॉटेल्स, विमानतळावरचे केटरर्स, हॉस्पिटल कंपन्या यांना मी माल पुरवू लागलो होतो. तिथल्या शासनाचा पुरस्कार मला मिळाला होता. मालाच्या अुत्तम दर्जामुळे काही कंपन्यांचे मालक मला आवर्जून चर्चेसाठी बोलावून घेत.
अशाच अेका कंपनीच्या मालकाच्या बोलावण्यावरून मी गेलो होतो. चर्चा संपवून बाहेर आल्यावर त्या मालकालाही अन्यत्र कुठेतरी बाहेर जायचे होते. त्याने गाडी बाहेर काढायला ड्नयव्हरला सांगितले. आम्ही दोघे मिळूनच त्याच्या गाडीपाशी आलो. ड्नयव्हरने त्याच्यासाठी अदबीने गाडीचे दार अुघडले. ड्नयव्हरकडे माझी सहज नजर गेली, मला आश्चर्याचा धक्काच बसला. मला अद्वातद्वा बोलून गेलेला `तो' व्यापारी या गाडीचा ड्नयव्हर झाला होता. घमेंडखोर स्वभावाने आणि संपत्तीच्या माजाने माझ्याप्रमाणे त्याने अनेकांना दुखावले होते, त्यामुळे त्याच्या धंद्याचे तीनतेरा वाजले, त्यावेळी मदतीला कोण येणार?
लक्ष्मी चंचल असते. ती क्षणात रंकाला राव करेल तसे रावाला रंकही करेल. समृध्दी आली तरी गर्व करू नये; अुतू नये मातू नये., विनयशील राहावे.
                     प्रेषक : श्रीकृष्ण माधव केळकर, पुणे
फोन-८४४६९०५५१७

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन