Skip to main content

Posts

Showing posts from November, 2013

11Nov.2013

बुजुर्गांची जबाबदारी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का हा विषय आता तसा खेड्यापाड्यांपर्यंत चर्चिला जाऊ लागला आहे. काँग्रेसच्या गेल्या दहा वर्षात, लोकांना साऱ्या अटळ स्थितीचा विलक्षण उबग आला आहे, हे कुणालाही - काँग्रेसनिष्ठांनाही - जाणवत असेल. मोदींची पात्रता किंवा क्षमता हा विषय नाही, पण काँग्रेसने देशाची दयनीय अवस्था केली त्यासाठीचा राग लोकांच्यात आहे हे नाकारण्यात अर्थच नाही. मोदींविषयीच्या आशाअपेक्षांपेक्षा काँग्रेसप्रणित सरकारने केलेली दारूण निराशा अधिक परिणाम करेल असे दिसते. काँग्रेसवरचा हा राग ग्रामीण भागात मनमोहनसिंगांवर निघतो, पण राहुल गांधींविषयी आकर्षण आहेच आहे. त्याउलट शहरी भागात मनमोहनसिंगांचा अनुभव आणि आर्थिक धोरण यांस काहीतरी वजन आहे, पण राहुलबाबाच्या अस्तन्या सावरण्याची खिल्ली उडवली जात आहे. एक गोष्ट वास्तव आहे की, देशाच्या वर्तमानाबद्दल खूप नाराजी आणि भविष्याबद्दल खूप चिंता सार्वत्रिक आहे. राहुल गांधींचा अनुभव, पोक्तपणा, राजकीय समज, मुत्सद्देगिरी अशा सर्वांगांनी ते परिपक्व वाटत नाहीत; तरीही त्यांचे नाव पुढचा पंतप्रधान म्हणून प्रत्यक्ष मनमोहनसिंगच कसे काय ठासून सांगू

28 Oct.2013 ank

फिक्सिंगसाठी पुरस्कार हवा `चकाकतं ते सारं सोनं नव्हे' अशी म्हण आहे. कोणत्याही चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी सहसा जीभ रेटत नाही, असा आपला मराठी स्वभाव आहे. त्याचं कारण, ती म्हण त्याला पक्की ठाऊक आहे. चांगलं म्हणून जे समोर येतं आहे, ते खरोखरीच चांगलं असेल का, असा संशय आपल्याला येत राहतो. ते पाणी किती खोल आहे, त्याचे अंतस्थ झरे किती निर्मळ आहेत हे नक्की समजून घेतल्याशिवाय आपण मराठी माणसं त्या पाण्यात उतरत नाही, ते पाणी वापरत नाही. पूर्वाश्रमी बेताच्या मिळकतीचा व्यवसाय करणारा एकजण अलीकडच्या काळात चांगला गब्बर झाला. त्याला असं वाटू लागलं की, पैसा रग्गड झाला हे खरं पण अजूनी आपल्याला तसं मोठेपण आलेलं नाही, प्रतिष्ठा आलेली नाही. आपण पैसेवाले झालो, पण उच्चभ्रू मान्यवर झालो नाही. मित्रमंडळींसमवेत चाललेल्या गप्पांतून त्याने हे बोलून दाखवलं. मोठ्या कार्यक्रमात आपल्याला बोलावलं पाहिजे, वृत्तपत्रांतून वारंवार नाव आलं पाहिजे, लब्धप्रतिष्ठितांची ये-जा वाढली पाहिजे. हे सगळं कसं साधेल याची इलम शोधण्यासाठी, त्यानं सगळया मित्रांना आवाहन केलं. कुणी सुचवलं चार पत्रकार हाताशी धर, त्यांच्याशी दोस्त