Skip to main content

11Nov.2013

बुजुर्गांची जबाबदारी
नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का हा विषय आता तसा खेड्यापाड्यांपर्यंत चर्चिला जाऊ लागला आहे. काँग्रेसच्या गेल्या दहा वर्षात, लोकांना साऱ्या अटळ स्थितीचा विलक्षण उबग आला आहे, हे कुणालाही - काँग्रेसनिष्ठांनाही - जाणवत असेल. मोदींची पात्रता किंवा क्षमता हा विषय नाही, पण काँग्रेसने देशाची दयनीय अवस्था केली त्यासाठीचा राग लोकांच्यात आहे हे नाकारण्यात अर्थच नाही. मोदींविषयीच्या आशाअपेक्षांपेक्षा काँग्रेसप्रणित सरकारने केलेली दारूण निराशा अधिक परिणाम करेल असे दिसते.

काँग्रेसवरचा हा राग ग्रामीण भागात मनमोहनसिंगांवर निघतो, पण राहुल गांधींविषयी आकर्षण आहेच आहे. त्याउलट शहरी भागात मनमोहनसिंगांचा अनुभव आणि आर्थिक धोरण यांस काहीतरी वजन आहे, पण राहुलबाबाच्या अस्तन्या सावरण्याची खिल्ली उडवली जात आहे.

एक गोष्ट वास्तव आहे की, देशाच्या वर्तमानाबद्दल खूप नाराजी आणि भविष्याबद्दल खूप चिंता सार्वत्रिक आहे. राहुल गांधींचा अनुभव, पोक्तपणा, राजकीय समज, मुत्सद्देगिरी अशा सर्वांगांनी ते परिपक्व वाटत नाहीत; तरीही त्यांचे नाव पुढचा पंतप्रधान म्हणून प्रत्यक्ष मनमोहनसिंगच कसे काय ठासून सांगू शकतात? जागतिक अर्थव्यवहार, आंतरराष्ट्नीय तिढेखोचा यांची उत्तम माहिती असणारे श्री सिंग हे राहुलजींची शिफारस करतात, त्यात त्यांचा निव्वळ लाचार तोंडपुजेपणा असू शकेल? त्यांच्या पक्षात प्रणव मुखर्जी, चिदंबरम्, कपिल सिब्बल वगैरे महारथी आहेत. त्यांच्याशी तुलना केली तर राहुल गांधी कुठे कसे पुरतील? हे सारेजण राहुलजींचे `नेतृत्त्व' मान्य करणारच असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु या देशाचा पंतप्रधान म्हणून राहुल, या महारथींना त्यांच्या स्वत:पेक्षा सरस वाटत असतील काय? तसे नसेलच! कारण त्यांची व्यक्तिगत अहंता दूर ठेवून वास्तवाचे नेमके भान असणारी प्रगल्भता या ज्येष्ठ नेत्यांच्यात आहेच आहे. मग देशाचा विचार बाजूला ठेवून राहुलपुढे लांगूलचालन ते करीत आहेत असे तरी कसे म्हणावे? तसेही वाटत नाही. यांपैकी कुणीही वरच्या पदावर जाणे इतरांस चालणार नाही? सर्वजण `होय' म्हणतील इतक्याच अल्प अपेक्षा बाळगून हे बुजुर्ग लोक हा पोरखेळ स्वीकारत असतील? इतके ते `हे' आहेत?
काहीही असो; त्यांच्या उद्देशांशी काही घेणे नाही, पण दैवाने उद्या राहुलना पंतप्रधान केले तर जे काही होईल, त्याची चिंता वाटण्याजोगी आहे. नेहमीचे आगभडकावू प्रश्न आहेत, त्यांचे काहीतरी होईल; त्यांची फार टोकाशी जाऊन चिंता वाहावी असेही नाही. म्हणजे आरक्षणाचा, राममंदिराचा, अन्नशाश्वतीचा, विद्यापीठांचा, झोपडपट्ट्यांचा, पर्यावरणाचा.... किंवा अगदी कायदा-सुव्यवस्थेचा.... बांग्लादेशींचा, हे सगळे प्रश्न एकांगी, किंवा अपरिपप् विचारांतून कदाचित चिघळतील असे धरून चालले तरी एकवेळ नाइलाज म्हणून भोगता येतील. पण यापेक्षाही जे प्रश्न प्रधानस्तराचे वाटतात त्यांचे काय होईल? अमेरिका-चीन-जर्मनी यांच्या सर्वोच्च नेत्यांशी राहुल गांधींशी तुलना केली तर काय वाटते? आजचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर, अणुआयोगाचे अध्यक्ष, संरक्षणदलांचे सेनापती, सर्वोच्च न्यायमूर्ती, औद्योगिक व व्यापार संघटनांचे (चेंबर) प्रमुख, विविध आयोगांचे अध्यक्ष, अशा सर्व उच्चस्तरीय, पंडित-तज्ज्ञांशी राहुलगांधी हे कसे वागतील? झोपडीत जाऊन गरीब मजुराबरोबर घास खाणे हे प्रसिद्धीपुरते ठीक आहे; पण खरोखरी या झोपडीत अन्न आणि प्रकाश पोचविण्यासाठी धान्य आणि पैसा वाटणे पुरेसे ठरेल काय? त्यांचा स्वत:चा असा काही पर्याय त्यांच्याजवळ असेल असे वाटते तरी का?

नरेंद्र मोदी किंवा त्यांचा पक्ष यांची बाजू घेऊन काँग्रेसला किंवा राहुल गांधीना दूषणे द्यावीत असा कोणताही रोख नाही - असण्याचे कारण नाही. मोदींचे विचार, वर्तन, कृती कुणाला पटो वा न पटो; त्यात एक ठोसपणा-निश्चय-स्पष्टता आहे. बोलण्यात तरी कुठे जातीयता-धार्मिकता नाही. गुजरातचा कारभार समक्ष जाऊन कुणी पाहू शकतात, निरीक्षण करू शकतात. त्यांचे ठेवलेले किंवा पाळलेले टीकाकार बरेच आहेत तसे स्तुतिपाठकही असतील. अनंतमूर्ती, तेंडुलकर अशांनी विखारी विरोध प्रकट केला, तसे लता मंगेशकरनी मोदींना नावाजलेही. हे चालणार, त्यातले चूक-बरोबर जनता ठरवेल. पण एक वास्तव आहे की, नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्रीपदाचे दमदार स्पर्धक आहेत. त्यांना तुल्यबळ तितकाच समर्थ असा स्पर्धक काँग्रेसने पुढे आणायला हवा होता. अगदी शरद पवार, नीतिशकुमार, तरुण पटनायक असे लोक आत घेण्यासाठी थोडी पडती घेण्यानेही फार बिघडले नसते. कारण हा कुणाच्या व्यक्तिगत मोठेपणाचा प्रश्न नसून भविष्यातील नेतृत्त्व देऊ शकण्याचा आहे. राहुल गांधींच्या वयापेक्षा त्यांचे नवखेपण धोकादायक आहे. प्रौढत्त्वापेक्षा त्यांच्यात भरकटलेपण आहे. आजवर पद घेतले नाही यात भले त्यांचा त्याग असेल; पण अनुभवाची जागा त्यागभावना घेऊ शकत नाही. एखाद्या उद्योगाचे प्रमुखपदही असे एकदम पोराच्या हाती सोपविले जात नाही. नव्या सहकार कायद्यात संस्थेचे संचालक कुणी व्हायचे किंवा कुणाला तज्ज्ञ म्हणून स्वीकारायचे याबद्दल कठोर निकष आहेत. आणि इथे तर तो कायदेशीर निकष लावणारेच, राहुलसारख्या निव्वळ बड्या घरचा बेटा, एकदम प्रधानमंत्री करू पाहात आहेत! काँग्रेसचे राज्य येणे म्हणजे राहुल गांधी पंतप्रधान होणे असे असेल तर ते खरे चिंताजनक आहे. राहुलना राज्यमंत्रीपद - फार तर स्वतंत्र कार्यभार-देऊन, त्यांची तयारी कशी होते, लोकांचा पाठिंबा कसा मिळतो, निर्णय कसे होतात हे पाहात जाऊन किमान १० वर्षे कड काढली पाहिजे. पुढचे पुढे!

आहे याच स्थितीत राहुल गांधी जर मोदींचे स्पर्धक राहिले तर काँग्रेसचे काही खरे नाही; आणि काँग्रेसच बहुमतात येऊन राहुल पंतप्रधान झाले तर वढेरा आणि दिग्विजयसिंग यांच्याशिवाय कुणाचेच खरे नाही! मोदी पंतप्रधान झाले तर चांगले तेच होईल असे नव्हे, पण राहुलच्या तुलनेत आशा-अपेक्षेला खूपच वाव राहील. काँग्रेसने तोलामोलाचा उमेदवार घोषित केला तर त्या आशा-अपेक्षा तरी समान होतील! राहुल आणि प्रियांकाचे राज्य आले तर इतकेच म्हणायचे की,
स्त्रियश्चरित्रं
पुरुषस्य भाग्यं
देवो न जानाति
कुतो मनुष्य:?




स्टेअरिंग सुटले; लेखणी धरली
लढवय्या चालकाचे समाजोपयोगी कथन
पस्तीस वर्षे विनाअपघात ड्नयव्हींग केले. मात्र पायाला झालेल्या छोट्या जखमेचे गँगरिन झाले आणि पाय गमवावा लागला. हातातले स्टेअरिंग सुटले. नकोनकोसा वाटणारा एकांत जगण्यात आला. या निवांत वेळेचा आणि आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा या हेतूने त्यांनी चक्क लेखणी होती धरली. ही कथा आहे प्रताप सारथी या लढवय्या चालकाची.
ज्याच्या भरवशावर अनेकांची आयुष्ये असतात असा कोणत्याही वाहनाचा चालक, आपल्याकडे दुर्लक्षित असतो. तुटपुंज्या पगारावर, वेळ काळाची पर्वा न करता चालक काम करीत असतात. प्रसाप सारथी त्यापैकी एक. आयुष्य कष्टात गेेले. अल्पशिक्षित कारचालक, वयाच्या अठराव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत त्यांनी निव्वळ ड्नयव्हींग केले. त्यानिमित्ताने शहरातील प्रतिष्ठितांशी संपर्क आला. एकाही गाडीला ओरखडा उठू दिला नाही. हजारो किलोमीटरचा प्रवास त्यांनी अनेकांच्या कुटुंबांसमवेत केला.
एकदा टाचेखाली रक्त साकळले आणि गँगरिन झाले. योग्य निदानाअभावी आणि उपचाराअभावी दोन वर्षांपूर्वी गुडघ्यातून पाय काढून टाकावा लागला. हे अनपेक्षित होते. अनेकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. हे दु:ख पाय कापल्यापेक्षाही मोठे, अधिक बोचणारे. जयपूर फूटच्या मदतीने ते चालू लागले. आयुष्याचे दुसरे पर्व सुरू झाले. त्यांनी चक्क लेखणी हाती धरली. काही लोकांमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले आणि `चालकांनो सावधान!!' हे पुस्तक प्रत्यक्षात आले.
सुमारे दीडशे पानांचे हे पुस्तक चांगले झाले आहे. सर्व स्तरातील व्यावसायिकांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले तरच भाषेला समृद्धी येऊ शकते. ड्नयव्हींगची शास्त्रशुद्ध माहिती देणारे पुस्तक मराठीत नाही. अनुभवांची जोड देत त्यांनी अनेक मुद्दे वाचनीय केले. चाकातील हवा, हमरस्ता, घाट, धुक्यातला प्रवास, गाडीची देखभाल, टायर पंक्चर... अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून हे पुस्तक शहाणे करून सोडते.
एखाद्याची व्यवसायाशी निष्ठा किती असावी, याची प्रचितीच सारथी यांच्या पुस्तकाद्वारे येते. आयुष्यभर ड्नयव्हिंग करणाऱ्या प्रताप यांनी आपले आडनावही व्यवसायाला साजेसे `सारथी' असे ठेवले. पुस्तकाच्या प्रसारासाठी प्रयत्न केले पाहिजेत. (पुस्तकाची छापील किंमत : रु.१३०/-)
संपर्क : प्रताप सारथी,
शंभर फुटी रोड, सांगली ४१६४१६
फोन : ९७६६०८२३६३, ८४२१०१६०५१

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन