Skip to main content

Posts

Showing posts from April, 2019

7 Feb. 2019

जुने, जुनाट, की पोक्त आपसूक पडलं न् दंडवत घडलं! -अगदी इतक्या सहज ही चाळीशी मागे पडली नाही, आणि `बुद्ध्याचि वाण धरिले करि हे सतीचे' इतके झोकून देणेही जमले नाही. परंतु हा अजब योग साधला हे मात्र खरे! सांगली जिल्ह्यातल्या -तशा एका आडभागातून विचारप्रसारण करीत राहण्यातून हे कार्य घडले. मनाच्या एका कोपऱ्यातलं सांगायचं तर, आमच्या शर्क्तिेंुद्धीच्या मानाने एवढे जीवितकार्य मानून समाधीसुद्धा घ्यायला हरकत नाही! केवळ मोजमापात बोलायचं तर, चाळीस वर्षांतले सरासरी चाळीस प्रमाणे सोळाशे इतके केवळ संपादकीय लेख म्हटले तर, पुस्तकाच्या आकारात चार-पाच हजार पृष्ठे होतील!! हे कसे घडले? घडले खरे!! -परंतु ही काही भावार्थदीपिका नव्हे. आहे साधी पणती. स्नेहरज्जूंची वात शाबूत आहे, आणि कठोर प्रयत्नांनी वाळूचे कण रगडिता तेलही गळे; अशी उमेद आहे तोवर ती पुढे तेवत ठेवायची आहे. येत्या काळात विभक्त कुटुंब पद्धतीचे, विकृत समाजमाध्यमांचे, संकुचितपणाचे तोटे आपल्या समाजाला कळू लागतील आणि पुन्हा एकत्र सहजीवनाकडे वळावे लागेल अशी शक्यता आहे. व्यक्तिेनष्ठ व प्रादेशिक अस्मितेच्या राजकीय पक्षांची मोजदादही कठीण झाली, अशा या