Skip to main content

Posts

Showing posts from January, 2015

12 - 19 Jan 2015

संगीतोपचार (म्युझिक थेरपी) नाहं वसामि वैकुंठे, योगीनां हृदये, रवौ, मद्भक्ता: यत्र गायन्ती, तत्र तिष्ठामि नारद ।। भगवंतांनी नारदांना सांगितले, ``माझे भक्त जिथे संगीत भजन करत असतील तिथे मी असतो. (मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात, सूर्यबिंबात असत नाही; तरी माझे भक्त जिथे गायन करत असतात तिथे मात्र मी निश्चित सापडेन.) मानवाच्या गळयाला गाण्याचा लळा मुळापासूनच होता, म्हणून त्याने ऋग्वेदाला सामवेदाचे माधुर्य प्राप्त करून दिले. महाराष्ट्नत जात्याच्या घरघरीसंगे गाणे उमटायचे, तेव्हा कुठे पहाट फुटायची. निरक्षरांच्या अंत:करणातूनही समयस्फूर्त अक्षरांच्या लडी उलगडायच्या. त्यांतून ओवी हा काव्याचा पहिला प्रकार उमटला.छंदोबद्ध काव्यरचना म्हणजे गीत. ओवी हे पहिले गीत, नंतर अभंग. ज्ञानेश्वरांच्या गीतप्रभेने उजळलेल्या कित्येक रचना, हरिपाठाचे अभंग, गौळणी, विराण्या इत्यादी प्रतिभासंपन्न संगीतकारांच्या नजरेस पडल्या. त्यातील आशयाचे मर्म त्यांना उलगडले. त्यावर अतिशय सहृदयतेने अनुरूप असा स्वरांचा साज त्यांना चढवता आला. परिणामी ही गीते कानाकानांतून मनामनांत जाऊन पोचली. संगीत हे दैवी पोषण आहे. त्यायोगे मानसि

5 Jan.2015

दि.२५ डिसेंबर २०१४ रोजी बलवडी (भाळवणी) ता.खानापूर येथे स्थानिक साहित्य संमेलन झाले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ.आ.ह.साळुंखे यांनी प्रगट केलेल्या मनोगताचे संकलन..... अनुभव घ्या, चिकित्सा करा येरळा नदीकाठच्या या संमेलनाविषयी माझ्या मनांत वेगळेच ममत्व आहे; कारण माझी वडिलोपार्जित शेती याच येरळेच्या काठी थोड्या अंतरावर आहे आणि या नदीचे पाणी पिऊनच माझे बालपण गेले आहे. जगाच्या पाठीवर अन्यत्र कोठेही काही सन्मान प्राप्त झाला तरी, स्वत:च्या घरातील कौतुकाचा सोहळा म्हणून मला आजच्या सन्मानाचा विशेष आनंद होत आहे. प्राचीन वाङ्मय सोडल्यास मधल्या प्रदीर्घ काळात ग्रामीण भागात अशिक्षितपणामुळे लिखित स्वरूपात साहित्यनिर्मिती झाली नसेल. शेकडो वर्षे ग्रामीण भागातील बहुजन समाज शाळेच्या शिक्षणापासून वंचित राहिला. पण त्याच्या अंत:करणातील ऊर्मी दडपून राहिली नाही. ती वेगळया माध्यमांतून प्रगट झालीच! कधी ती जात्यावरील ओव्यांच्या रूपाने प्रासादिक स्वरूपात प्रगटली, कधी मोटेवरच्या किंवा औतावरील गाण्याच्या रूपाने प्रगट झाली. ते खरेखुरे आणि अस्सल साहित्यच होते. लिखित स्वरूपात नसल्याने पाठांतरातून ते एका पिढीकडून