Skip to main content

Posts

Showing posts from May, 2019

15 & 22 April 2019

उदारमतवादी  हिंदू  विचार भारतातले बहुसंख्य लोक हिंदू आहेत. हिंदू हा रिलिजन या इंग्रजी शब्दाच्या अर्थाने `धर्म' नाही. सुप्रीम कोर्टाने हिंदू हा धर्म नसून जीवनपद्धती आहे, असा निर्णय दिला. धर्म या संस्कृत शब्दाचा अर्थही रिलिजन या शब्दापेक्षा वेगळा आहे. आपण सहजपणे म्हणतो, `सुगंध देणे हा फुलाचा धर्म आहे!' याचा अर्थ धर्म म्हणजे सहजपणे आणि नैसर्गिकरित्या वागणे असा आहे. आपल्याकडे देवांची अनेक रूपे आहेत, अनेक तीर्थक्षेत्रे आहेत आणि अनेक धार्मिक ग्रंथ आहेत. याचाच अर्थ असा की, आपल्या धर्मात कशा प्रकारे देवाची पूजा करावी, अध्यात्माचे पालन कसे करावे, याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. तसेच या धर्मामध्ये सहिष्णू आणि उदार विचारांची परंपरा आहे. त्यामुळे एकपत्नी व्रताचे पालन करणारा रामही आापला देव आहे, आणि युद्धानंतर एका विशिष्ट परिस्थितीत हजारो स्त्रियांचा पती होणारा कृष्णही आपला देव आहे. आपण आपल्या देवाला वेगवेगळया प्राण्यांच्या आणि झाडांच्या रूपातही पाहतो, त्यांचीही पूजा करतो. तसेच आपण दुसऱ्या धर्माचा आणि पूजा पद्धतींचा आदरही करतो. कारण आपल्याला आपल्या धर्मानेच तसे शिकवले आहे. िख्र्चाश्ॅनिटी