Skip to main content

Posts

Showing posts from October, 2017

16 Octo 2017

सायकल पर्वाच्या उंबरठ्यावर सायकल वापरणे हे आपल्या सोयी- गैरसोयीपेक्षा किंवा इतर फायद्यांपेक्षा अप्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले आहे. गावातल्या गावात पाच किलोमीटरपर्यंतचे अंतर कुणालाही सहज सायकलने जाता-येता कापता येते. तेवढ्याने साधारण धडधाकट स्त्री-पुरुषांना काहीही त्रास होत नाही, दमायला होत नाही. वेळही वेगळा जास्त लागत नाही खर्च तर नाहीच नाही. पण सायकलवरून जाण्यात कमीपणा मानला जातो हे खरे. `सायकलींचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात हल्ली सायकल दिसेनाशी झाली आहे. भाडोत्री सायकलींची दुकानेही संपली. रिक्षा किंवा स्कूटरसाठी पन्नास रुपये सहज फेकण्यामुळे सगळयांपुढे अनेक समस्या वाढतात. इतर देश त्या `मागासलेल्या सोयीकडे' पुन्हा वळले आहेत. आपण त्यांच्या तुलनेत जरा जास्तच शहाणे व `पुढारलेले' असल्यामुळे सायकलीच्या खटाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहोत. आज प्रचंड वेगाने आपली शहरे धावत आहेत. गती म्हणजेच सर्वकाही अशी मानसिकता असताना सायकल हाणत कामाच्या ठिकाणी येणे-जाणे, हे पचनी पडायला अंमळ जडच जाते. वेग पकडण्याशिवाय आपल्या कोणाला गत्यंतर नाही, असेही समजण्याचे कारण नाही. जगातील काही देशांनी

9 Octo 2017

  संपादकीय मर्यादांतून समानत्व दिसावे आजकाल घात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पण त्यामागील कारणांचा नीट अभ्यास करून त्यांवर मूलभूत अुपाययोजना करण्याअैवजी त्यात कुठलेही राजकारण ओढून त्या संबंधांतील वावड्या अुडवीत राहायची पध्दत पडली आहे. अपघातांचे आणि अनुचित घटनांचे प्रमाणही आटोक्यांत राहात नाही. बनारस हिंदू विद्यापीठात मुलींच्या आंदोलनावर पोलीसांनी लाठीमार केला त्याची कारणे शोधण्यात फारसा वेळ  न  घालवता, `मोदी सरकार बेटी बचाव ही नारेबाजी करते, पण प्रत्यक्षात मुलींवर अन्याय करते' असल्या भंपक प्रतिक्रिया फेकत ठेवल्या जातात. पोलीसी कारवाआी विद्यापीठात करावी लागते, अशी वेळ अलीकडे वारंवार येते. विद्यापीठात तर निवडणुकाही आता विद्यार्थ्यांचे लोकशाही प्रशिक्षण म्हणून कोणी करत नाही, तर तिथे राजकीय अड्डे बहरलेले असतात, हे ही आता लपून राहिेले नाही. त्यामुळे बनारसच्या मुलींनी आंदोलन करावे, त्यासाठी बंदोबस्त लावावा लागावा, पुढे लाठीमारही व्हावा हे सारे आश्चर्याचे नाही. पण त्या कारणाने येणाऱ्या मतलबी प्रतिक्रिया वाचून-ऐकून महिलांच्या समानतेचे काही मुद्दे विचारात घ्यावे लागतात. मुंबईतल्या पादचारी

2 Octo 2017

माझे बालपण २ ऑक्टोबरला साऱ्या जगभर गांधीजयंतीच्या निमित्ताने  त्यांचे स्मरण केले जाते. त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग  त्यांच्याच आत्मवृत्तामधून- गांधी-कुटुंब प्रथम तरी किराणा मालाचा व्यापार करणारे असावे असे समजते, परंतु माझ्या आजोबांपासून गेल्या तीन पिढ्या ते राज्यकारभार करीत आले आहे. उत्तमचंद गांधी उर्फ ओता गांधी दृढनिश्चयी असावेत. राज्यप्रकरणी लटपटीमुळे त्यांना पोरबंदर सोडावे लागले व त्यांनी जुनागढच्या राजाचा आश्रय घेतला. वडील कुटुंबप्रेमी, सत्यप्रिय, धीट, उदार पण रागीट असे होते. काही अंशी विषयासक्तही असावेत. त्यांचा शेवटचा विवाह चाळीसाव्या वर्षानंतर झाला होता. ते लाचेपासून दूर पळत, त्यामुळे शुद्ध न्याय देत अशी आमच्या कुटुंबात व बाहेरही बोलवा होती. संस्थान सरकारशी ते अत्यंत राजनिष्ठ असत. वडिलांनी द्रव्यसंचय करण्याचा लोभ कधीच धरला नव्हता; त्यामुळे आम्हा भावांसाठी ते थोडकीच मिळकत ठेवून गेले. वडिलांचे शिक्षण केवळ अनुभवजन्य होते. ज्याला आपण आज गुजराथी पाचव्या इयत्तेचे शिक्षण म्हणूू, तेवढे त्यांचे शिक्षण झाले असेल. इतिहास-भूगोलाचे ज्ञान तर विचारायलाच नको. असे असूनही व्यवहारज्ञान इ