Skip to main content

16 Octo 2017

सायकल पर्वाच्या उंबरठ्यावर
सायकल वापरणे हे आपल्या सोयी- गैरसोयीपेक्षा किंवा इतर फायद्यांपेक्षा अप्रतिष्ठेचे समजले जाऊ लागले आहे. गावातल्या गावात पाच किलोमीटरपर्यंतचे अंतर कुणालाही सहज सायकलने जाता-येता कापता येते. तेवढ्याने साधारण धडधाकट स्त्री-पुरुषांना काहीही त्रास होत नाही, दमायला होत नाही. वेळही वेगळा जास्त लागत नाही खर्च तर नाहीच नाही. पण सायकलवरून जाण्यात कमीपणा मानला जातो हे खरे. `सायकलींचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावात हल्ली सायकल दिसेनाशी झाली आहे. भाडोत्री सायकलींची दुकानेही संपली. रिक्षा किंवा स्कूटरसाठी पन्नास रुपये सहज फेकण्यामुळे सगळयांपुढे अनेक समस्या वाढतात. इतर देश त्या `मागासलेल्या सोयीकडे' पुन्हा वळले आहेत. आपण त्यांच्या तुलनेत जरा जास्तच शहाणे व `पुढारलेले' असल्यामुळे सायकलीच्या खटाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहोत.

आज प्रचंड वेगाने आपली शहरे धावत आहेत. गती म्हणजेच सर्वकाही अशी मानसिकता असताना सायकल हाणत कामाच्या ठिकाणी येणे-जाणे, हे पचनी पडायला अंमळ जडच जाते. वेग पकडण्याशिवाय आपल्या कोणाला गत्यंतर नाही, असेही समजण्याचे कारण नाही. जगातील काही देशांनी या भ्रामक वेगाला आवरायचे मनावर घेतले आहे. आपल्याकडे असे सायकलवरून जा-ये करणे शक्य आहे ना? प्रदूषण, अफाट लोकसंख्या, शहरांची बेबंद वाढ, अकार्यक्षम बससेवा असे प्रश्न इथे उभे आहेत. आपण जणू त्या गावचेच नाही, असे दाखवतो किंवा कुंपणावर बसून टीका तरी करतो. परंतु जगाच्या पाठीवर असे देश आहेत की ज्यांनी अशा व्यामिश्र प्रश्नांवर उतारा शोधण्याबरोबरच वसुंधरेला प्रदूषणापासून वाचवले आहे. शहरी समस्यांच्या त्या मालिकेला उत्तर दिले आहे ते चीन आणि अन्य काही देशांनी.
वाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर १९व्या शतकात सुरू झाला. बॅरोन कार्ल व्हॉन ड्न्ेस हे जर्मन गृहस्थ सायकलचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी `रनींग मशीन' चा शोध १८१७ साली लावला. पुढे त्या यंत्राचे स्वामित्वहक्क (पेटंट) घेतले. सायकलचा आकार, रचना, जडणघडण कालानुरूप बदलत गेली. सायकलींचे उत्पादन जगभरात सर्वाधिक करणारा देश असा भारताचा लौकिक आहे. वाहतुकीसाठी उत्तम पर्याय म्हणून अनेक देशांनी सायकलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. प्रदूषण, वाहतूकीची कोंडी, वाढती लोकसंख्या आणि आक्रसते रस्ते या समस्यांवर सायकलींचा वापर हा पर्याय असल्याने सायकलला नवसंजीवनी मिळालेली आहे.
चीन हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, आता सार्वजनिक वाहतुकीसाठी सायकलींचा वापर करण्याबातही या देशाने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. सायकलींचा वापर सार्वजनिक वाहतुकीसाठी चीनमध्ये सुरू झाला तो २०१५ साली. आधुनिक पद्धतीच्या सायकली तिथे उपलब्ध आहेत. या सायकली विकत घेण्याची गरज नाही. त्या भाड्याने मिळतात, भाडेसुद्धा अत्यल्प. सायकल ज्या ठिकाणाहून घेतली तिथेच परत केली पाहिजे असेही नाही. चीन सरकारने खास सायकलींसाठी मार्गिका (ट्न्ॅक) बनवल्या आहेत. सायकली भाड्याने देण्याची सुरुवात चीनमध्ये `ओफो' या कंपनीने केली. कंपनीच्या पिवळया रंगाच्या तब्बल अडीच लाख भाडोत्री सायकली आहेत. चीनमधील एकूण ५० शहरांमध्ये ही सेवा पुरवितात. `मोबाईक' नावाची दुसरी कंपनी. आता अनेक कंपन्या आहेत, विविध रंगाच्या सायकलींमुळे चिनी रस्त्यांवर इंद्रधनुष्य अवतरले आहे, असा भास होतो.
चीनमध्ये ७.५३ लाख इतक्या भाडोत्री सायकली आहेत. सायकली उत्तम प्रकारे वापरता याव्यात अशा सुविधा युरोपमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण केल्या आहेत. फ्रान्स(४३ हजार), स्पेन (२५हजार) हे देशही भाडोत्री सायकलींत -लोकसंख्येच्या मानाने, आघाडीवर आहेत. पॅरिसमध्ये सार्वजनिक सायकलींना `वेल्ब' म्हणतात. पहिल्या अर्धा तासासाठी सायकल मोफत दिली जाते. नंतर दर अर्ध्या तासासाठी एक युरो. एक दिवसाचा पासदेखील मिळतो. दिवसाला एक युरो, आठवड्याला पाच युरो आणि संपूर्ण वर्षासाठी २९ युरो याप्रमाणे तिथे दरआकारणी केली जाते. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये सायकलींचा वापर सर्वाधिक होतो. पर्यटकांप्रमाणेच निवासी नागरिकांचा भरही सायकल वापरण्यावरच आहे. सायकली वापरण्याबाबत नागरिकांना अनेक पर्याय आहेत. ब्रिटनमध्ये सायकल हे सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून प्रभावीपणे वापरले जाते. तिथे सायककलींची गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे. लंडनस्थित डरपींरपवशी उूलश्रशी या कंपनीच्या ११ हजार सायकली आहेत. तिथे पहिला अर्धा तास विनाशुल्क; मग पुढच्या प्रत्येक अर्ध्या तासासाठी दोन पाउंड शुल्क आहे.
२००१ साली जगातील मोजक्या चार शहरांमध्येच सार्वजनिक वाहतुकीसाठी सायकली वापरल्या जात. २०१४ सालादरम्यान तीच संख्या ८५० वर... आता २०१६ साली काही हजार शहरांत सायकली फिरतात.
एका नवीन पर्वाची ही सुरुवात आहे. भारतीय लोक इतर जगातल्याप्रमाणे `मागासलेले' कधी होणार?

 संपादकीय
मानवतेच्या ज्योतींचा उत्सव
व्यथा असेा आनंद असूदे, 
प्रकाश किंवा तिमिर असूदे....गातच मीही जाणे! 
-अशा तऱ्हेचे जीवनगाणे माणसाच्या आयुष्यात असावे लागते.तशी सहजात वृत्ती असेल तर दसरा दिवाळीचे सण आनंदाचे होतात. ज्यांना तो आनंद घ्यावासा वाटत नाही, त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या व्यथा वेदना आहेतच. त्यात कुढत राहाणाऱ्यांसाठी सारे आयुष्यच कमी पडते. त्या दुखण्यांच्या व्यथांच्या वेदना आपोआप कमी होत नाहीत, तर त्यावर सुखाची फुंकर घालून त्या कमी कराव्या लागतात. त्या फुंकरीने जखम लगेच भरून येते असे नाही, पण ते दुखणे कधीतरी बरे होआील तोपर्यंत धीर धरण्याचे मानस तयार होते. त्यासाठीच दिवाळीसारख्या सणांचा माणसाने अुपयोग करून घ्यायचा असतो. दु:खाच्या जखमेवर फुंकर घालणारी माणसेही जितकी जिव्हाळयाची, संख्येने जास्त, आणि अनुभवी असतील तितकी त्या फुंकरीची संवेदना त्या दु:खातही जास्त सुसह्य होत असते.

काही `विचारवंतां'ना मात्र अशा प्रसंगांतही कुठल्या तरी दु:खांचे कढ येतात, -आणि त्यांच्या त्या वेदनेत सभोवतीच्या साऱ्यांनी,  हे सांगतील तितके  रडत राहावे असे वाटत असते. मग अैन दिवाळीत नोटाबंदीने मार्केटात मंदी आल्याची ते आठवण करून देतात; काही ज्ञानवंतांचा खुनी अद्यापि सापडला नसल्याचे सरकारी अपयश सांगतात; सर्जिकल स्ट्नआीक झालाच नसावा असा संशय काढतात; किंवा चिनी मालावर बहिष्कार टाकण्यात काही अर्थ नाही असे बजावून चिनी फटाके फोडावेत असे सुचवितात. आपल्या रूढीने म्हटले की, नरकासुराचा वध झाला म्हणून  दीपेात्सव केला जातो. त्या नरकासुराला ज्या प्रकारे मारले गेले ते आजच्या मानवाधिकारास मान्य झाले असते की नाही कुणास ठाअूक! पण अेक गोष्ट बरी होती की जग फार मोठे होते, आणि दूरवरच्या दु:खद घटना कळतच नसल्यामुळे त्यांसाठी फार वेळ रडत राहण्याचे कारण पडत नव्हते. आजच्या काळात साऱ्या जगातल्या घटना क्षणात आपल्याशी येअून भिडतात, आणि मग साऱ्या जगांत केवळ अराजक आणि दु:खेच भरून राहिली आहेत की काय असा समज काहीजण करून घेतात.

आनंदाचा वर्षभरातला परमोत्कर्ष म्हणून दिवाळीचा सण आपल्याकडे मानतात, त्यास हल्ली काहीजण धर्मकारण जोडू लागले आहेत. कोणत्याही घटनेला धर्म किंवा निधर्मकारण जोडण्याची फ्याशन हल्ली माजली आहे. गौरी लंकेश नावाच्या कोणी पत्रकार कुणाच्या अमानुष गोळीला बळी पडल्या याचा संबंध हिंदुत्वाशी लावण्याचे अेरवी काही कारण होते काय? त्याच भडक भाषेत बोलायचे तर काही तथाकथित हिंदुत्ववाद्यांचेही खून झाले, तो फिटंफाट्टीचा सर्वधर्मसमभाव होता की काय? गौरी लंकेश या आजवर  सामान्य वाचकांच्या माहितीत नव्हत्या, साधारण कुवतीच्या सामान्य जनांस त्या माहिती नसाव्यात. अुगीच प्रस्तुतच्या अंकातील संपादकीय लेख  वाचून अँजेला मर्केल आणि व्लादिमीर पुतीन आपली धोरणे ठरवितात या म्हणण्याला अर्थ नाही. गौरी लंकेश यांची हत्या तर गंभीर मामला आहे, पत्रकर्त्री म्हणून चोख काम करणारी अेक व्यक्ती, या प्रकारे मारली जाणे हे सामाजिक अस्वास्थ्य वाढविणारे नक्कीच आहे. पण त्याचा कोणत्या धर्माशी संबंध नाही. ती घटनाच मुळी अधर्माची आहे. या प्रकारच्या घटना घडू नयेत, माणसांच्या मनांत असलाच तर असला अधर्म नाहीसा व्हावा यासाठी मनांतील किल्मिषे कस्पटे जाळू पाहाणारा हा दिवाळीचा सण मानवांचा आहे.; मानवतेच्या पूजनाचा आहे. म्हणून तो साजरा करायला हवा.. दीपज्योतीचे पूजन निधर्मीवाद्यांनीही करायला हवे. त्याचा हिंदुत्वाशी काही संबंध न जोडता तो आनंद घ्यावा.

म्हणून व्यथा असो, तिमिर असो -आनंद घेताना त्यांची आठवण पुसू पाहायची. मिट्ट काळोखात अुदबत्तीची अेक ठिणगीही माणसाला आश्वासक आधाराची वाटते; आिथे तर प्रकाशाचा अुत्सव करण्याची रीत आहे. प्रकाशाच्या अुत्सवाला झगमगाट असत नाही. ज्योतींचा प्रकाश  डोळयांना शांतावतो, झगमगाट डोळयांना खंतावतो. तो मंद प्रकाश साऱ्या वेदनांवर पडला तर तिथेही आनंदाचे काही आढळेल. दैन्य झाकण्याचे सामर्थ्यही ज्योतीकडे असते. तिथे मंगलमयता निर्माण होते. म्हणून `धुके दाटले हे अुदास अुदास' असे सुस्कारे सोडण्याचे थांबवून दिवाळीच्या या पर्वात आपल्याला आनंदाचे निधान गवसावे अशा शुभकामना देण्यातही मोठा आनंद आहे.

सुनेला नव्या घरी रुळण्यास  काही वेळ लागणारच की! 
आपल्या गेल्या अेका अंकात कर सल्लागार किशोर लुल्ला यांनी  जी अेस टी कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भात त्यांच्यापुढे आलेले प्रश्न मांडले आहेत. त्यांचा रोख असा आहे की, प्रशासकीय गोंेंधळामुळे जनतेला फारच त्रास होत आहे. वस्तुस्थिती तशी असेलही, परंतु त्याची दुसरी बाजू विचारात घेणेही आवश्यक वाटते.
स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात प्रशासनाला लागलेल्या सवयी आितक्या लवकर जातील असे नाही. कोणत्याही सरकारचा हेतू चांगला असला तरी शेवटी त्यांना त्याच प्रशासकीय सासूशी जुळवून घ्यायचे आहे. देशाची धोरणे आणि प्रणाली सरसकट ढासळत चालली होती, हे तर कोणीही मान्य करेल. त्यात आमूलाग्र बदल करणे आवश्यक होते. त्यांत मोदी सरकारच्या धडाकेबाज शैलीमुळे काही प्रमाणात घाआी होते, हेही खरे आहे. पण त्यांनी जर साऱ्यांच्या सोयीप्रमाणे सावकाश कारभार करू असे म्हटले तर किती काळ लागेल हे सांगवत नाही.
जीअेसटी ही पध्दत चालू करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या आधीपासून कितीतरी वर्षे विचाराधीन होता, तो कधीतरी अंमलात आणायचा होताच. लुल्लांच्या म्हणण्यानुसार आज त्याची घाआी झालेली असेल तर, त्याची योग्य वेळ कधी आली असती? दोन महिन्यांनी, दोन वर्षांनी? कधीही अंमल केला तरी कमीजास्ती गोंधळ होणारच होता. आहे त्या स्थितीत मुलगी मुलगा बघून तारतम्याने लगीन अुरकावे  लागते. मुलाचे सारे स्थिर होआीपर्यंत वाटच पाहायची म्हटले तर वाटच पाहात बसावे लागेल! पूर्ण विचार करून लग्न केल्यावर सारे काही सुनेला सुखाचेच होआील, हे लुल्ला सांगू शकतील का?
आपल्या देशात सत्तर वर्षांत अेक अैदी भोंगळ संस्कृती फोफावली आहे. तिच्याशी सामना करणे तसे कुणालाही कठीणच आहे. पण साऱ्या जगाच्या धावत्या स्थितीत आपण किती मागे पडलो! अेरवी आपल्यासारखी शहाणी माणसेही, भारताच्या  सगळयाच परिस्थितीत बदल होण्याची गरज सांगत होते. आपले घर मोडकळीला आले होते. त्याचे नूतनीकरण करण्याची, साफसफाआी करण्याची, नव्या सोयी आणण्याची गरज होती, हे लुल्लाही मान्य करतील. घर नुसते रंगवायला काढले तरी त्याचा काही दिवस त्रास होतो. आिथे तर आपल्या घरात बरेच नवे बांधकाम करायला हवे, दुरुस्त्या करून घ्यायला हव्यात. अशा काळात नीट स्वैपाक करता येत नाही, कपड्यांची रया जाते, काही वेळी बाहेरून जेवण आणावेे लागते, कोणतीही साधी वस्तू जागेवर सापडत नाही. पण कधीतरी हे घर चांगले होणार आहे, हे  माहीत असल्यामुळे त्याचा त्रास सुसह्य होत असतो.
सत्तर वर्षांत कोणता नवा कायदा आल्यावर तो अगदी हसतखेळत स्वीकारला गेला असेल तर त्यांनी सांगावे! कोणताही बदल करताना गोंधळ होत असतो, त्याचा हेतू आणि त्यामागची बुध्दी तपासून पाहायला हवी आणि ती जर अुचित वाटत असेल तर त्याबद्दल तक्रार न करता त्यासाठी परिपूर्ण सहकार्य कोणत्याही यंत्रणेला करायला हवे, हे सुजाण नागरिकांचे कर्तव्य नाही काय? स्वातंत्र्याच्या आंदोलनांतही आपल्या पूर्वज बापजाद्यांना त्रास झाला, त्याआधीची व्यवस्था अुत्तम होती  ती अुध्वस्त झाली; ती आपल्या पूर्वजांनी का सहन केली?गेल्या सत्तर वर्षांत आपल्या देशाच्या  यंत्रणेत काही त्रुटी निर्माण झालेल्या होत्या त्या दुरुस्त करायला हव्याच होत्या. जीएसटी कायदा नवीन रुळवायचा आहे. त्यात ज्या चुका होतील त्याही सुधारून घेण्याचा कल सरकारने ०६ ऑक्टोबरच्या आढावा बैठकीतून दाखविला आहे. त्याचा त्रास काही काळ साऱ्याच घटकांना होआील, पण तो सहन करायचा की नाही हे ठरवावे, अन्यथा हे सरकार दूर करावे; तो आपला अधिकारच आहे.
नोटाबंदीचा निर्णय फारच मोठा होता. १९६० साली आपण आंतरराष्ट्नीय दशमान पध्दती कायद्याने स्वीकारली. ते अुचित पाअूलच होते, पण त्याकाळात त्यामानाने कितीतरी गोंधळ माजला. जुन्या लोकांना नव्या पैशांचा हिशेब लागत नसे. आजही अमूक मिमि पाअूस म्हणजे किती आिंच; असे विचारतात व `तुमच्या या नव्या मापात फार गोंधळ आहे ..' असे म्हणतात.
सुनेला जाच करावा असा आजच्या सासऱ्याचा अुद्देश नाही, अुलट त्याने लक्ष्मी म्हणून या घरासाठी तिचे `कन्या'दान स्वीकारले आहे. तिनेही ते नाते लक्षात घ्यायलाच हवे. तिला येथे सुखाने लोळण्यासाठी करून घेतलेले नाही. या घराच्या सुखदु:खात तिने साथ संगत करावी अशी अपेक्षा आहे. लुल्लांसारख्या अुच्चभ्रू वर्गाकडून ती अपेक्षा आहेच आहे!! ती लक्षात  न  घेणारे खूप आहेत. पण पहिल्याच दिवसापासून सुखात लोळण्याची अपेक्षा सुनेने करून चालत नाही हे लुल्लांसारख्या पेशाने लक्षात घ्यायला हवे.
अेक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की, मी कोणत्याही पक्षाचा किंवा नेत्याचा विशेष चाहता नाही; तसा बाष्कळ टीकाकारही नाही. पुढे येणाऱ्या प्रत्येक स्थितीला समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या लिखाणातली सून सोज्वळ आहे हे मान्य केले तरी सासरही छळवादी आहे असे मुळीच नाही. सुनेने तसा गैरसमज घेअूनच या घरी नांदायला यायचे हे आजच्या काळात सर्वत्र घडतेच आहे. त्यामुळेच तर घरे मोडण्याची वेळ येते आहे.

अेका आिनोव्हेशनची गोष्ट
तो डेल्फ (ऊशश्रषीं ) गावी १९९४ साली जन्मलेला आहे. -म्हणजे आजचे वर २३ वर्षांचे. त्याचे आआी-वडील वेगळे राहतात. आआी आिंग्लिश आहे, अुच्चशिशित, नेदरलँड्स्मध्ये राहते. तिथे अनेक देशांतील विविध कंपन्यांनी अेकत्र येअून अेक संयुक्त कंपनी चालविली आहे. त्या कंपनीला लागणारे विविध कामांतील तज्ज्ञ लोक मिळण्यासाठी सल्लागार म्हणून ती महिला व्यवसाय करते. त्या कंपनीला त्यांच्या कामासाठी पर्यावरण तज्ज्ञही लागतात. तिचा तो तरुण मुलगा आता सागरांच्या स्वच्छतेचे काम करणार म्हणतो, आणि करतोही. त्या मुलाचे नाव स्लॅट.
तो अेका तांत्रिक शिक्षण विद्यापीठात शिकत होता. विद्यापीठाची पदवी मिळविण्यापेक्षा प्रत्यक्षातील काम करणे महत्वाचे, असे त्याला वाटले. झाले तेवढे शिक्षण पुरे झाले, असे म्हणून त्याने  विद्यापीठ सोडले आणि तो कामाला लागला.
आधी त्याने अेक छोटे साधन - म्हणून अेक मॉडेल बनवले. पाण्यावर तरंगणारा कचरा या प्रवाहातून त्या प्रवाहात असे करत समुद्रात जातो आणि मग साऱ्या जगभर फिरत राहतो. तो अेका जागी कुठंतरी गाोळा करणे शक्य होआील काय याचा विचार तो करू लागला. कचऱ्याच्या त्या फिरतीचाच फायदा करून घेता येआील काय? कसा? बंधाराच जर तरंगत ठेवला तर?  त्याने अेक मॉडेल बनवले, जाड प्लॅस्टिक चे व्ही आकाराचे. तसेच फुगे बनवले., ते केबलने जोडले. प्रत्येक फुग्याखाली खांबासारखा अेक प्लॅस्टिकचाच अडथळा. तो खाली वजनदार करून अुथळ पाण्यात स्थिर बसवायचा. त्या मॉडेलच्या फुग्यात खूप कचरा अडकून गोळा झाला. ते फुगे नंतर कंपनीकडे पाठविले. तिथे जाड प्लॅस्टिकच्या बाटल्यांत साठवून त्यांच्या हिरव्या प्लॅस्टिकच्या गोळया बनविल्या, व त्या प्लॅस्टिकच्या वस्तू बनविणाऱ्या अुत्पादकांकडे पाठविल्या . त्या पोराचे ते साधन यशस्वी झाले.
नंतर त्याने  स्वत:चीच अेक कंपनी काढली. `ना नफा  ना तोटा' या तत्वावर काम सुरू केले. कंपनीचे नाव  क्लीनअप ओशन -सागरसाफ कंपनी! समुद्रालाच स्वत:ची स्वच्छता करायला लावायची. तंत्रज्ञानच असे राबवायचे की, ते तरंगणारे सारे प्लॅस्टिक गोळा करेल. प्रथम आपल्या दारातला पॅसिफिक महासागर स्वच्छ करू. प्रारंभी हे तर अशक्य वाटणारच. अेक मोठा शास्त्रज्ञ म्हणायचा, -मला अेक मोठी तरफ आणि पृथ्वीच्या बाहेर अुभे राहण्यासाठी जागा द्या, म्हणजे मी पृथ्वी अुचलून दाखवतो. त्याला तरफेच्या ताकदीची कल्पना ठसवायची होती. त्यातलाच हा समुद्र सफाआीचा विचार!
कंपनीच्या लोकांनी अवकाशतून पाहिले आणि सागराच्या आत  ८०फुटांपर्यंत काय काय कचरा कुठे आहे त्याची पाहणी केली. त्यानुसार अेक मॉडेल बनवले. त्याची चाचणी घेतली. सुरुवात जपानपासून मोठ्या प्रमाणावर करण्याचे ठरले. अहोरात्र त्या तरुणाचे चिंतन सुरू होते. ..``अरे, तू स्वत:चे जीवन कधी जगणार आहेस?'' असे विचारल्यावर तो म्हणायचा, ``जोवर दुसरे कोणी हे काम अंगावर घेत नाही, तोवर ते मलाच करावे लागेल ना? ते तर मी करतच राहणार!''
आता त्या प्रयोगाचे चित्र त्याच्या मन:चक्षूपुढे दिसू लागले आहे. आता तो झोपण्यापूर्वी काही वाचन करतो, थोडे संगीतही अैकतो. त्याला खात्री आहे की, पाच अेक वर्षांत पॅसिफिक महासागर अर्धाअधिक स्वच्छ होआील..... आपण त्याला `तथास्तु' म्हणूया. ....पण मनात येअून जाते की, आपल्या तरुणांना या प्रकारचे काही अंगावर घेता येआील का? करता येआील का?

(संदर्भ : रीडर्स डायजेस्ट, सप्टेंबर २०१७)
-सतीश पटवर्धन,कागवाड (जि.बेळगाव)  फोन :०८३३९२६४७०५

कोण आहोत ते ठरवा एकदा
महाराष्ट्न् शासनाने दुकान आणि आस्थापना कायदा -मराठीत ज्याला `शॉप अॅक्ट' म्हणतात तो - १९४८ साली केला, त्यात अधूनमधून दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. अलीकडे म्हणजे ७ सप्टेंबरला  सुधारित कायद्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार त्या कायद्याखाली  -डॉक्टर, त्यांची रुग्णालये, शुश्रुषालये (नर्सिंग होम) यांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याविरोधात डॉक्टरांची संघटना (आिंडियन मेडिकल असोसिअेशन) न्यायालयात जाण्याच्या निर्णयावर आली आहे.
पूर्वी त्या कायद्यात `व्यापारी वापरासाठी' या व्याख्येत वकील आणि डॉक्टरांचा समावेश नव्हता, १९९७साली त्यात डॉक्टरांचा समावेश करण्यात आला. त्याविरोधात २०१४साली याचिका दाखल करण्यात आली व त्याचा निकाल डॉक्टरांच्या बाजूने लागला. आता नव्याने करण्यात येणाऱ्या बदलात डॉक्टर व वकीलांचे व्यवसाय शॉप अॅक्टखाली येअू घातले आहेत. डॉक्टरी संघटनेचे म्हणणे असे की, डॉक्टर हे वैद्यकीय सेवा देतात, म्हणून त्यांना `व्यापारी वापरा'चा कायदा लागू नसावा.
  कोणताही  कायदा आपल्याला लागू नसावा असेच प्रत्येकाला वाटत असते. पण त्यासाठी डॉक्टरांनी जे `सेवाभावा'चे कारण दिले आहे, ते आजच्या काळात आक्षेपार्ह धरले जाआील. कोणत्याही पेशाची संघटना आपापल्या आर्थिक लाभापुरताच विचार करते पण त्या त्या पेशाची नीतिमूल्ये आपल्या सभासदांनी पाळावीत यासाठी काहीही काळजी घेत नाही. शिक्षकांना पगार वाढविण्यासाठी प्रसंगी कामगार समजून संपही होतो, पण शिक्षकाच्या संदर्भात जी पथ्ये जरूरीची आहेत त्याविषयी चकार शब्द निघत नाही. तसेच डॉक्टरांच्या बाबतीत झाले आहे. डॉक्टरांचा व्यवसाय म्हणजे दोन श्वासांमधले अंतर असे मानले जाते; तो निर्विवाद सेवाभावी पेशा आहेच. परंतु सरसकट कट् प्रॅक्टिस चालते त्याबद्दल संघटना काही कारवाआी करते असे अैकण्यात नाही. अेकेकाळी डॉक्टर व वकील लोकांना जाहिरात करणे चालत नव्हते; आजकाल रुग्णालयांच्या आणि डॉक्टरांच्या  मोठमोठाल्या जाहिराती झळकतात, तो सेवाभाव  म्हणावा की धंदा?
१९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा आला, तेव्हाही डॉक्टरांच्या संघटनेने त्या कायद्यातून आपल्याला वगळावे म्हणून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाआी केली होती. त्या कायद्यात तर डॉक्टरांचा वेगळा अुल्लेखही नव्हता, पण `जो अनुचित व्यवहार करेल (अनफेअर डील) त्यास हा कायदा लागू व्हावा' असे म्हटले होते. अन्फेअर काही नसेल तर डॉक्टरांना त्याची भीती बाळगण्याचे काय कारण होते? त्या कायद्याचा दुरुपयोग होतो, हे खरे; पण ती शक्यता सगळयाच कायद्यांच्या बाबतीत असते. आपल्या सेवाभावातही लोक कृतघ्न होअून कायद्याने अन्यायच करतील, -हे मानून चालणे कितपत योग्य ठरेल? ज्यांनी धंदा चालविला आहे, त्यांनी धंद्याचे कायदे स्वीकारायला काय हरकत?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन