Skip to main content

9 Octo 2017

 संपादकीय
मर्यादांतून समानत्व दिसावे
आजकाल घात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. पण त्यामागील कारणांचा नीट अभ्यास करून त्यांवर मूलभूत अुपाययोजना करण्याअैवजी त्यात कुठलेही राजकारण ओढून त्या संबंधांतील वावड्या अुडवीत राहायची पध्दत पडली आहे. अपघातांचे आणि अनुचित घटनांचे प्रमाणही आटोक्यांत राहात नाही. बनारस हिंदू विद्यापीठात मुलींच्या आंदोलनावर पोलीसांनी लाठीमार केला त्याची कारणे शोधण्यात फारसा वेळ  न  घालवता, `मोदी सरकार बेटी बचाव ही नारेबाजी करते, पण प्रत्यक्षात मुलींवर अन्याय करते' असल्या भंपक प्रतिक्रिया फेकत ठेवल्या जातात. पोलीसी कारवाआी विद्यापीठात करावी लागते, अशी वेळ अलीकडे वारंवार येते. विद्यापीठात तर निवडणुकाही आता विद्यार्थ्यांचे लोकशाही प्रशिक्षण म्हणून कोणी करत नाही, तर तिथे राजकीय अड्डे बहरलेले असतात, हे ही आता लपून राहिेले नाही. त्यामुळे बनारसच्या मुलींनी आंदोलन करावे, त्यासाठी बंदोबस्त लावावा लागावा, पुढे लाठीमारही व्हावा हे सारे आश्चर्याचे नाही. पण त्या कारणाने येणाऱ्या मतलबी प्रतिक्रिया वाचून-ऐकून महिलांच्या समानतेचे काही मुद्दे विचारात घ्यावे लागतात. मुंबईतल्या पादचारी पुलावर दुर्दैवी चेंगराचेंगरी झाली, त्यात महिला जास्त होत्या, हा स्त्री विरोधी धोरणाचा परिणाम आहे; असे अजूनी कुठे ऐकले नाही हे नवलच म्हणावे!

स्त्री-पुरुष समानतेचे महत्व निर्विवाद असले तरी त्यासंबंधीच्या व्यावहारिक आचरणात मुळातच फरक असतो, असला पाहिजे. तशी  योजना देवानेच केलेली असते. महिलांनी पुरुषांची बरोबरी करावीशी कुणाला वाटणे, यातच पुरुषांचे वरचढपण मान्य केल्यासारखे होते. कोणत्याही स्त्रीला आपले स्वातंत्र्य मिरविण्यासाठी पँट शर्ट घालावासा वाटत असेल; तरीही तिच्या नवऱ्याने साडी नेसलेली तिला सहन होणे शक्य वाटत नाही.  कोणी मुली क्रिकेट खेळतात, काही कुस्ती खेळतात, काहीजणींच्या सैन्यप्रवेशाचेही कौतुक करावे; पण ते सारे अपवाद आहेत. सैन्यात पूरक कामे महिलांनी करण्याजोगी असतात, तरीही प्रत्यक्ष रणक्षेत्रावर सरसकट महिलांचे सैन्य अुतरवावे असे कोणी म्हणणार नाही. याला कोणीतरी आिरेसरीने अेखाद्दुसरे अुदाहरण फेकेल, झाशीवाली होअून गेली;  पण तोही अपवादच मानला पाहिजे. आज आपल्याकडची अेकूण परिस्थिती पाहता, ट्न्क चालविण्याचे काम पुरुषांनी करावे हे बरे. राज्य परिवहनमध्ये हल्ली काही महिला वाहक दिसत आहेत, त्या काम चांगले करतात; परंतु खेड्यात कुठेतरी मुक्कामाला जाणाऱ्या बसला महिला नेमत नाहीत. ते भान पाळावेच लागते. त्याचप्रमाणे बालवाडी व प्राथमिक वर्गांसाठी पुरुषांपेक्षा महिला शिक्षक असाव्यात हेही सर्वमान्य असते. मुद्दा असा की काही कामे पुरुषांनी व काही महिलांनी त्यांच्या देवदत्त क्षमतेनुसार वाटून करायची असतात, त्यात श्रेष्ठ-कनिष्ठत्व मानायचे नसते. रुग्णशुश्रूषा महिला जास्त चांगली करतात, हेही वास्तव आहे. एरवीचा स्वैपाक स्त्रीने करावा असे निश्चित असले तरी दोनशे पानांसाठी भात उकरण्यास पुरुषच हवा.

याच अनुरोधाने बनारसच्या कुलगुरूंनी काही सूचना मुलींना केल्या असतील तर त्याचा गहजब करण्याचे कारण कळत नाही. आज मोठ्या शहरांत वयातल्या लेकीबाळींनी सहज कधीही मुक्त फिरावे, अशी स्थिती नाही. मुलींचे सोडा, प्रौढ पुरुष अपरात्री  घरी पोचण्यासाठीसुध्दा  फिरण्याचे धाडस करीत नाही.  त्यास कायदा सुव्यवस्था खराब आहे हे तर कारण आहेच. पण कोणतेही सरकार,- ते जाअून हे आले म्हणून अेका रात्रीत समाजिक बदल होत नाही. त्यामुळे आपापल्या समोर जी स्थिती असेल तिच्या मर्यादा सांभाळून असावे आितकेच सुज्ञ माणूस करतो. बनारसच्या मुलींची कोण्या वात्रटाने छेड काढली त्याची तक्रार करण्यास मुली गेल्या, त्या तक्रारीसंबंधी काही कारवाआी  कुलगुरूनी केलीही असती, ती या मुलींना सांगायला हवी असे काही नाही. त्याचबरोबर या असल्या वातावरणात `आपल्या' मुलींना, बायानो जरा जपून राहा  हेही सांगितले गेले असेल तर तेही सामान्य पालकत्वाच्या दृष्टीतून  चूक नाही. परंतु त्या गुंड मुलांना शिक्षा करण्याअैवजी मुलींनाच आिशारा देण्यात आला, हाच अन्याय अन्याय म्हटले तर गोष्टी वाटेल तशा वळवता, घोळता, चिघळवता येतील. त्या मुलांना काही शिक्षा  न  करता मोकाट सोडलेले नाही. शिवाय दुसरी बाजू सांगते तसे बाहेरचे काही घटक विद्यापीठात घुसून हे अुद्योग करतात, तसे आिथे झाले काय, याचीही चौकशी व्हावी लागेल. कॉलेजच्या आवारातील कार्यक्रमांत हल्ली केवळ मुले मुलीच असतात असे मानून चालत नाही, शाळेच्या परीक्षा पार  न  केलेेले बाहेरचे अनेक अुद्योगी घटक नको तितके लक्ष कॉलेजांत देत असतात.

मुलींना मुक्तपणे वावरता यायला हवे, आणि कोणत्याही कामासाठी त्यांना आडकाठी करू नये हा विचार योग्यच आहे; त्याचबरोबर हेही निर्विवाद खरे आहे की, निसर्गाने दिलेल्या मर्यादा नैसर्गिकपणे सांभाळायला हव्यात. कोणतेही जोडपे प्रवासाला निघाले तर तान्हे पोर स्त्रीच्या काखोटीला, आणि ओझ्याचे बोचके पुरुषाच्या डोक्यावर.... हा साधा व्यवहार आणि सोय आहे; त्यात कुणाच्या पुरुषत्वाचा फणा निघू नये आणि स्त्रीत्वाचा दुबळेपणाही कुरवाळू  नये. महिला आजकाल पुरुषी खेळ खेळतात, पोलीसखात्यात जातात हे सारे खरे असले तरी श्रावणातले खेळ आणि देवीचा जागर त्यांनीच करावा हे सामाजिक दृष्टीला पचते. तिथे जर पुरुषांनी झिम्मा फेर सुरू केला तर तेा अगोचरपणा समानतेला पोषक नाही हे समजून घ्यायला हवे.

मुली कार्यालयांतून काम करतील, हेही पन्नास शंभर वर्षांपूर्वी शक्य वाटत नव्हते. आता त्यात काही नवल राहिलेले नाही. किंबहुना कार्यालयांतल्या कामासाठी मुलीच जास्त क्षमता दाखवतात असेही आज म्हटले जाते. तरीही त्याची काही मर्यादा राहतेच राहते. देशाची राष्ट्न्पती महिला होणे, संरक्षणमंत्री महिला होणे, युनोमध्ये शत्रूला जरब देणाऱ्या भाषेत स्त्री-प्रतिनिधीने बोलणे, मोठ्या बँकांची धुरा वाहणे अशा बाबतीत आता महिलांना स्थान आहे, ते त्यांनी  `भूषविले' आहे. पण स्पेशल पॅरा फोर्स किंवा आपल्याकडचा ट्न्क ड्नयव्हर ही क्षेत्रे महिलांच्या सोयीची नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या अेका अशिक्षित महिलेने सभोवारच्या गावांतून नापिताचे काम सुरू केले, आणि पडता संसार सावरला. ती तिची जिद्द कौतुकास्पद आहेच, पण त्या कौतुकाचाच अर्थ, तो सन्मान्य असला तरी अपवाद आहे.

मुलगा मुलगी दोन्ही समान, या घोषणेचा हा प्रतिवाद आहे असे नाही. ती समानता अेकतेआितकी अेकरूप झाली तर त्याचा आनंद आहे. आपल्याकडे अर्ध नारी नटेश्वर ही पूजनीय प्रतिमा असते. परंतु त्यात नारीचे समसमानत्व, अेकरूपत्व असते, -अभिन्नत्व नव्हे. मुलींच्या बाबतीत आजच्या समाजात तितके मुक्त व शुध्द वातावरण आलेले नाही, पण तसा प्रयत्न तर करत राहायला हवे. त्यांस अनुसरून कालसापेक्ष आचारही रूढ करायला हवेत. युद्ध्यमान काळात `अष्टपुत्रा' असण्याला महत्व होते; आज तो आशीर्वाद कोणी मजेनेही अुच्चारत नाही. स्त्रीचा तो `अुपयोग' होता असे कधी कोणी मानत नव्हते. तसे  मानसिक किडकेपण समाजात अस्तित्वात आहे तोवर मुलांपेक्षा मुलींनी जरा सांभाळून असावे हे योग्य आहे. अुगीच समानतेच्या आवेशाने स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी शनीशिंगणापूरला प्रदक्षिणा घालण्याने सामान्य कुवतीच्या महिलासुध्दा त्या समानतेच्याच विरोधात जातात हे नाकारण्यात काय अर्थ?

उच्छाद वृत्तवाहिन्यांचा
दूरचित्रवाणीला `इडियट बॉक्स' असे म्हटले जाते. याचा अर्थ असा आहे की दूरचित्रवाणीवर दाखवले जाणारे कार्यक्रम हे `इडियट' किंवा `कमी बुद्ध्यांक' असणाऱ्या माणसांसाठी असतात; हे मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी म्हटले गेले होते.
नंतर दूरचित्रवाणीवर चोवीस तास बातम्या हा प्रकार सुरू झाला. अनेक भाषांतून अनेक वृत्तवाहिन्या सुरू झाल्या. ताबडतोब बातम्या, जागेवर जाऊन घेतलेली दृश्ये, त्यावरच्या प्रतिक्रिया यांमुळे वृत्तवाहिन्या सुरुवातीला आकर्षक वाटल्या. वृत्तवाहिन्यांचे पत्रकार तयार झाले आणि वृत्तवाहिन्याही आपल्या जीवनाचा एक भाग बनल्या.
गेल्या काही वर्षांत मात्र वृत्तवाहिन्यांनी विकृत वळण घेतले आहे. बातमी देण्यामागचे गांभीर्य कधीच संपले आहे. पत्रकारितेची निष्ठा ही गोष्टही आता इतिहासजमा झाली आहे. आजकाल बातमी देण्याच्या नावाखाली वृत्तवाहिन्यांवर नुसता धुडगूस चाललेला असतो. जोरजोरात वाजणारे कर्कश्श पार्श्वसंगीत, निवेदकाचा आरडाओरडा, सतत बदलणारी आणि दिशाभूल करणारी सनसनाटी शीर्षके आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्याही दिल्या जातात. काही चॅनेलवर नोटाबंदीच्या काळात दोन हजाराच्या नोटेमध्ये इलेक्ट्नॅनिक्स चिप आहे, यावर मोठा कार्य्रक्रम करण्यात आला. नंतर अशी कुठलीही चिप नसल्याचे उघड झाले तरीही वाहिनीने माफी मागितली नाही.
प्रत्येक वृत्तवाहिनी एका विशिष्ट पक्षाला आणि विचारसरणीला बांधलेली आहे. नि:पक्षपाती पत्रकारिता आता पिचतच आहे. त्यामुळे काही वाहिन्या सरकारची भलावण करताना दिसतात; तर काही सरकारवर सतत टीका करतात. प्रत्येक बातमी त्या चॅनलच्या विचारसरणीप्रमाणे वाकवली व तोडली मोडली जाते. नोटाबंदीच्या काळात हे प्रकर्षाने जाणवत होते. त्या काळात काही वाहिन्या, हे पाऊल म्हणजे `क्रांतिकारी सुधारणा' म्हणत होते. तर काही वाहिन्या याला `संपूर्ण विनाशकारी योजना' असे भासवत होत्या. सत्य अर्थातच या दोन्हींच्या मध्ये होते पण ते सांगण्याचे कष्ट कुठल्याही वाहिनीने घेतले नाहीत.
वृत्तवाहिन्यांवर रात्री नऊ ते अकरा या `प्राईम टाईम'मध्ये चर्चेचा कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम बघणे ही प्रेक्षकांसाठी मोठी शिक्षाच आहे. या कार्यक्रमासाठी काही `तज्ज्ञ' मंडळी प्रत्येक विषयावर बोलू शकतात; काही मंडळी आलटून पालटून वेगवेगळया वाहिन्यांवर दिसतात. या मंडळीची विचारसरणी ठरलेली असते. त्यामुळे विषयाचा अन्वयार्थ ही मंडळी आपल्या विचारसरणीप्रमाणे लावतात. अशा लोकांना बोलावून त्यांची झुंज लावणे असे या कार्यक्रमांचे स्वरूप झाले आहे. काही सार्थ चर्चा होण्याची वा काही विधायक संवाद होण्याची सुतराम शक्यता नसते. यातले अनेक तथाकथित `तज्ज्ञ' आणि `मान्यवर पाहुणे' अतिशय आक्रमकतेने आरडाओरडा करतात. जोरजोरात ओरडून बोलणे, दुसरा बोलत असताना त्याच्यावर वरताण आवाज काढून आपला मुद्दा पुढे रेटणे, `तुम्ही जरा गप्प बसा हो' किंवा `यू जस्ट शट् अप इडियट' अशा तुच्छतेने इतरांना रागावणे, असे प्रकार हे लोक टी.व्ही.वर करतात. त्यात कार्यक्रमाचे सूत्रधारही सामील झाले आहेत. बऱ्याच कार्यक्रमात सूत्रधार वक्त्याला आपले म्हणणे पूर्ण करू देत नाही, स्वत:च बोलत राहतो. काहीवेळा इतका आरडाओरडा होतो की, कोण काय बोलतंय कळत नाही. अशा कार्यक्रमांनी ध्वनीप्रदूषणात भरपूर वाढ होत असली पाहिजे.
पूर्वीच्या काळी पत्रकारिता हे सामाजिक बांधिलकीचे व्रत होते. आजकाल हा एक धंदा झाला आहे. न्यूज वा बातमी हे एक `प्रॉडक्ट' वा उत्पादन' झाले आहे आणि सर्व वृत्तवाहिन्या हे उत्पादन विकण्याची दुकाने झाली आहेत. ज्या बातमीने आपला फायदा वाढेल तीच खरी बातमी, असे आजचे चित्र आहे. सर्व वृत्तवाहिन्यांचे मालक उद्योगपती आहेत आणि सर्व पत्रकार हे आता `न्यूज प्रोफेशनल्स' आहेत. `सामाजिक बांधीलकी' ही वृत्तवाहिन्यांची प्रेरणा नसून `शुद्ध व्यावसायिक नफा' हेच त्यांचे अंतिम लक्ष्य आहे. त्यामुळे या वृत्तवाहिन्यांकडून अर्थपूर्ण, स्वतंत्र, निष्पक्ष आणि नैतिकतेवर आधारित पत्रकारितेची आशा करणे व्यर्थ आहे.
-(मराठी साहित्य मंडळ, कलबुरगी(गुलबर्गा) यांच्या `भाव-अनुबंध' च्या संपादकीयातून)

वारी - परदेशाची. का, कशासाठी?
हल्ली या त्या देशांना फिरवून आणणाऱ्या सहल कंपन्यांच्या जडजंबाल जाहिराती फुटत असतात. किती लोक फिरायला हिंडायला विदेशी जातात न कळे. कामाधंद्याला, शिकायला, शिकवायला, मुत्सद्देगिरीसाठी विदेशी प्रवास करावा लागणाऱ्यांबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण अुगीच हिंडायला, मजेखातर, तो देश पाहायला म्हणून परदेशी जाणाऱ्यांच्या हौसेची मला गंमतच वाटते. त्यांच्याकडे पैसे आहेत, हौस आहे, यांना जायचेच आहे.... जावोत बापडे. पण त्यांचा असा काही तोरा असतो की  जन्माच्या कर्माला आल्यासारखं ते देश अेकदा पाहून यायलाच हवं; नाहीतर मग हा नरजन्म फोल मानावा! मला त्यांच्याबद्दल जरा आश्चर्यच आहे.
सांप्रत माणशी लाखभर रुपये खर्च करून युरोप प्लस अमेरिका दर्शन अुरकून कृतकृत्य होणारे अनेक लोक दिसतात. त्यांच्या दृष्टीने तसे जाअून  न  येणारे लोक मागासलेले, दरिद्री नाहीतर अरसिक गणले जातात.अेका आठवडाभरात विमानात, अैश गाडीत चढअुतार करीत आणि पंचतारांकित हॉटेलांत त्याच त्या काटे चमच्यांनी घास नाचवत ते काय सांैदर्यदर्शन करतात, त्यांना कोणता अलभ्य लाभ घडतो, हे त्यांचे त्यांनाच ठाअूक!
माझ्या भारतभूमीमध्ये सौंदर्याची अद्भूतरम्यतेची अेवढी दर्शने अुपलब्ध आहेत की त्यांना तोड नाही; अंत नाही.  किती भाषा, त्यांच्या असंख्य पोटभाषा, भिन्न सांस्कृतिक छटा छबिना, खाद्ये-पदार्थ, सणवार, व्रतेवैकल्ये,... संगीत तर अगणित अंगांनी आविष्कृत झालेले, तो दिव्य अद्भूत चमत्कारच. नुसत्या मराठी मुलखात पाहिले तर आर्या, आरत्या, गौळणी, लावणी, पोवाडे, तमाशा, बतावण्या, पिंगळा, कटाव, रागदारी, भजने कवने भारुडे....  न संपणारा खजिना आहे. हिमालय दर्शन, योगीदर्शन, यागयोग, दिव्यौषधी, नद्यांची खोरी, देवळं, दंतकथा, लोककथा, आख्यायिका... कित्येक जन्म घेअून हे दर्शन संपणार नाही. पाहायचेच असेल, अैकायचेच असेल, खायचेच असेल तर अेवढी विविधता असे रुचीसोहळे फक्त आिथेच मिळतील. तेही आिथले सारे आपल्याला कळणारे, तिथे तर नुसते हूं हूं म्हणून यायचे; आपल्याला त्यातले कितीसे कळणार? आिथे नुसते पायी हिंडलो तर महा महायात्रा घडेल. आपण आपला देश अजून पाहिलेलाच नाही, आणि लाखभर रुपये खर्चून  `ते' पाहून आलो म्हणण्यात काय सुख असेल? आितरत्र आढळणार नाहीत असे अनेक साक्षात्कार आिथे आणि आिथेच होतील ना!!
-म.वि.कोल्हटकर, जीवनछाया सोसा, सातारा
फोन-(०२१६२)२३२५०४

जळळं ते तोंड!
भाषा समृध्द कशामुळे होते? -तर सगळया शब्दांमुळे, त्यांच्या अभिव्यक्तींमुळे , त्यामागच्या भावभावनांमुळेही ती समृध्द होते. त्यात म्हणी-वाक्प्रचार असतात, सुभाषिते असतात, शब्दार्थालंकार, शब्दसौष्ठव असते, मग त्यासाठी व्याकरण बनते...हे सारे असायला हवे...आणि त्यात शिव्या टिंगल टवाळी हेसुध्दा असायला हवेच. आपल्या भाषेत शिव्याच नसतील तर सारा मामला नीरस हेाअून जाआील. ती भाषा बोलावीशी आणि अैकावीशीच वाटणार नाही. शिवराळ भाषाही डौलदार असू शकते. अर्वाच्च शिव्या सभ्य जीवनात द्यायच्या नसतात हे खरे, पण कुणी शिवी दिली तर ती शिवी आहे हे तरी कळले पाहिजेच ना!
शिव्या याच विषयावर अेक ख्यातनाम मराठी वक्ते छान भाषण देत असत. त्यांच्या भाषणात अेकही शिवी नसायची, पण शिव्यांचे मानसशास्त्र ते मांडत असत. अेकाच शब्दबिंदूमध्ये विचारांचा महासागर (ओशन ऑफ थॉट्स आिन अ ड्नॅप ऑफ वर्ड) - अशी ते शिवीची व्याख्या सांगत; ती खरीच वाटते. शब्द तरी कशाला, मुठी वळून ओठ दुमडले तर नुसती पुटपुटसुध्दा जे सांगायचे ते सांगू शकते.
आपल्याला कधी शिव्याच अैकायला लागू नयेत हे केवळ वरकरणी म्हणणे झाले; प्रत्यक्षात कुठे जर कडाक्याचे भांडण लागले तर तिथे जो शिव्यांचा वर्षाव चालतो, तो अैकायला पुष्कळजण थांबून राहतात. जरी कोणतीही आआी आपल्या लेकराला, शिव्या देणाऱ्या पोरांच्यात मिसळू नये असे सांगत असली तरी, त्या पोराला  यथाकाळी शिव्यांचे ज्ञान होतच असते. पु लं चा रावसाहेब दर वाक्यात चारदोन शिव्या गुंफत असला तरी त्या भाषेला कुणी अश्लील-मार्तंडाने नावे ठेवल्याचे अैकले नाही; अुलट तो रावसाहेब मराठी जगतात कमालीची लोकप्रियता मिळवून गेला.
हे शिव्या पुराण लावायचे कारण अेका बातमीकडे जाते. अेखाद्या गावाने शिव्याच देण्यावर बंदी घालणे हे जरा अतीच घडले. बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या कानडीमाळी नावाच्या गावात गावकऱ्यांनी शिवी बंदी अभियान राबविले आहे. किरकोळ कारणांवरून शिवी हासडल्यामुळे पेटलेली भांडणे पार डोके-फोडीपर्यंत गेली; हे अनुभवल्यावर या गावातील अेक तरुण, विश्वास राअूत यांनी  काही सवंगड्यांना शिवीबंदी अभियानाची कल्पना सुचविली. सरपंच राजेंद्र राअूत यांनी ती मनावर घेतली, आणि बऱ्याच गावकऱ्यांचे त्यास पाठबळ मिळाले. आता म्हणे त्या गावात  कुणी शिवी दिली तर त्यास धपाटा मिळतो किंवा दंड केला जातो.
या बातमीने अनेक शंका मनात येअू लागल्या. पुष्कळदा अमूक शब्द ही शिवी आहे, हे भल्याभल्या भ..ना माहीत नसते. `च्यायला, स्साला,'  हे शिवीत मेाजायचे का, हे कळले नाही. कोल्हापुरी भाषेत तर `रांडंच्या' हे `गुड मॉर्निंग'अैवजी म्हणतात असे कोणी म्हणतात. कोणी मातेने `मर मेल्या' असे लाडाने म्हटले तर त्याचा अर्थ `लेकरा, पुष्कळ वर्षे जग' असा असतो ना; तसेच बापांच्या तोंडी `काटर््यानो..' आले तर ते मायेचे समजायचे की अपशब्द मानायचा? तान्ह्या बाळाला, `अरे लब्बाडा'पासून तसले काही अैकवण्यात काय रम्यता आहे. पण त्यातली मजाच कळली नाही, किंवा त्यांचा अतिरेक झाला तर त्या गावात डोकी फुटतात, त्याला तरी काय अर्थ आहे!
अेकूणात या अभियानाचे नियम कानावर आलेले नाहीत. त्यामुळे जर कधी त्या गावी गेलो तर सहज बोलताना आपल्याकडून नियमभंग होणार, त्यावेळी आपण त्या गावचेच नाही हे पटवून द्यावे लागणार, अन्यथा धपाटा खाण्याची वेळ. तो खाल्ला तरी पुन्हा आपले बहुप्रसवा तोंड बंद राहील काय? तिथून काही  मौक्तिके बाहेर पडणार.... त्यापेक्षा नकोच त्या गावाचा रस्ता!!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन