Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

24 April 2017

  भारतीय सौर कालगणना भारतात आजकाल जी दिनदर्शिका(क्रॅलेंडर)साधारणत: वापरली जाते, ती  ग्रेगरियन कालदर्शिका म्हणतात. तथापि शालीवाहन शक, विक्रम संवत, शिवशक, युगाब्द, हिजरी, शहेनशाही अशाही प्रकारच्या काही गणना चालू असतात. त्यामुळे  अेखादी खगोलशास्त्रीय किंवा अैतिहासिक घटना कोणत्या प्रकाराने नोंदवायची याबाबत गोंधळ होत असतो. आपला वाढदिवसही अेरवी तारखेनुसार करणारे लोक साठीशांत मात्र तिथीप्रमाणे करतात. ग्रेगरियन पध्दतीत `कालविभाग'(टाआीमझोन्स) वेगवेगळे वापरले जातात.  भारतात आणि गेल्या शतकात  ब्रिटिश राजवटीतील देश अेकाच कालविभाग पध्दतीचा अवलंब करतात. पण टिळक पंचांग आणि दाते पंचांग सौर पध्दतीने बनविलेले असते. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर बऱ्याच बाबींची नवी रचना करण्याचे मोठे काम सुरू झाले, त्यात कालमापन हाही विषय होता.राष्ट्नीय कालगणना करण्यामुळे अस्मिता आणि अेकात्मता वाढेल; तसेच राष्ट्नीय सुट्या ठरविण्याच्या किरकोळ बाबतीतही त्याचा  अुपयोग होआील असा हेतू होता. नेहरूंच्या सल्ल्याने भारताच्या वैज्ञानिक व औद्योगिक मंडळाने या विषयाचा अभ्यास करण्यासाठी  १९५२मध्ये `क्रॅलेंडर सुधार समिती'

17 April 2017

घनपाठी वैदिक - कृष्ण गोविंद आर्वीकर, नागपूर (पुणे वेदपाठशाळेचे माजी विद्यार्थी, वेदभवनचे विश्वस्त) स्व.विनायकभट्ट घैसास यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारतात त्र्यंबकेश्वर, काशी, उज्जैन, हरद्वार, गया, प्रयाग, कांची, गोकर्ण, गोवा, इत्यादी   विविध पुण्यक्षेत्री १०८हून जास्त महोत्सवी वेदपारायणे यथासांग झाली. त्यांच्या सांगतेनिमित्त नागपूर येथे राष्ट्नीय वेदसंमेलन पार पडले.  या बृहत्संकल्प सिद्धीच्या मुळाशी असलेल्या वेदमूर्तीचे हे स्मरण. जगात अनेक धर्मग्रंथ आहेत. या धर्मग्रंथांसंबंधी पावित्र्य त्या त्या धर्माच्या अनुयायांकडे असते. धर्मग्रंथांचे रचनाकार निरनिराळे आहेत. सनातन वैदिक धर्म-(हिंदू धर्म) भारतात सर्वाधिक प्रचारात आहे. वैदिक धर्माचे स्थान कोणते? वैदिक धर्माचे वैशिष्ट्य कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. वेद हे ज्याधर्माचे ग्रंथ म्हणूनच त्याला वैदिक धर्म हे नाव मिळाले. इतर धर्मांचे ग्रंथ हे त्या त्या धर्माच्या संस्थापकाच्या नावावर ओळखले जातात. वैदिक धर्माचे ग्रंथ कोणा एका व्यक्तीचे कर्तृत्व नाही. वेदांना `अपौरुषेय' मानले गेले, म्हणजे कोणाही एका व्यक्तीने ते रचले ना

3-4-2017

घटप्रभेचा अमृतघट  -महादेवशास्त्री जोशी बेळगाव जिल्ह्यातील घटप्रभा(नदीकाठी) गावात कर्नाटक आरोग्यधाम (हेल्थ इन्स्टिट्यूट) हे विस्तृत रुग्णालय आणि विविधांगी संस्थासंस्कृतीचे केंद्र आहे.  त्याचे संस्थापक माधव कृष्ण वैद्य हे शल्यविशारद. त्यांची जन्मशताब्दी दि.०२ एप्रिल २०१७ पासून सुरू होत आहे.  त्या व्यक्तिमत्वाबद्दल गौरव लेख, वैद्य डॉक्टरांच्या ५०व्या वाढदिवसाला प्रकाशित झाला होता; तो येथे शताब्दीनिमित्तानेे पुनर्मुद्रित. निवासी शिकाऊ डॉक्टरांचा संप नुकताच घडून आला. त्यादरम्यान रुग्णसेवा-वैद्यक व्यवसाय-कायदा-शासकीय मर्यादा-रुग्णांचा रोष-आणि त्या सर्वांतून खदखदणारी सामाजिक अस्वस्थता इत्यादींसंबंधी चर्चा व प्रतिक्रिया व्यक्त होत राहिल्या. त्या पृष्ठभूमीवरती या अमृतपुत्राचे सेवाभावी दीनबंधुत्व वेगळे उठून दिसेल; आणि या धन्वंतरीचे स्मरण करून उचित बोध घेतल्यास त्या क्षेत्राला वेगळी दिशा मिळू शकेल. कर्नाटक आरोग्यधामाचे शिल्पकार माधव कृष्ण वैद्य यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेस समर्पण केले. माधवराव वैद्य यांनी ५  दशके अविरत रुग्णसेवा केली. रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असे ते मानीत. आपल्या कामावर अपा

27-3-17

सरहद्दीवरचे  दळणवळण भारतीय अुपखंडाच्या वायव्येचा सरहद्द प्रांत काराकोरम किंवा खैबर खिंडीच्या अुल्लेखामुळे शाळेच्या वयापासून आपल्या परिचयात असतो. महाभारतातला गंधार  हा शकुनीमामाचा देश म्हणजे आजचे अफगाणिस्तान. व्याकरणकार पाणिनी हा तिथला पठाण म्हणायचा. तक्षशिलेचे विद्याकेंद्र त्या भागात होते, अलीकडच्या काळात त्या ठिकाणी पाकिस्तानातले अबोटाबाद शहर आहे. तिथे अमेरिकेने लादेनवर हल्ला करून त्याला मारले. त्याच्या दक्षिणेला आताचे कराची शहर. त्याच्या जवळपास रानटी टोळया असत त्यांनी महाभारत युध्दात भाग घेतला होता. बलुचिस्तान हे  त्याकाळी अुदरावती होते. भूमीच्या पोटात लपता येआील अशा गुहा त्या प्रांतात होत्या, म्हणून ते अुदरावती, त्याचे बदलाअूत आणि पुढे बलोच झाले. सिंध प्रांतात अुदेरोलाल हा लढवय्या आक्रमकांशी झुंजला त्याच्या नावाशी हे साधर्म्य दिसते. बलुची लोक संख्येने अेकूण १कोटि असून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान व आिराण येथे विखुरलेले आहेत. पाकिस्तानात सर्वाधिक म्हणजे ७०लाख आहेत. त्यांचा अुत्पन्नाचा स्रोत म्हणजे ग्वादार बंदर. हे बंदर विकसित करण्यासाठी चीनने हल्ली खूप मदत केली आहे. पाकव्याप्त काश