Skip to main content

17 April 2017

घनपाठी वैदिक
- कृष्ण गोविंद आर्वीकर, नागपूर (पुणे वेदपाठशाळेचे माजी विद्यार्थी, वेदभवनचे विश्वस्त)
स्व.विनायकभट्ट घैसास यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने भारतात त्र्यंबकेश्वर, काशी, उज्जैन, हरद्वार, गया, प्रयाग, कांची, गोकर्ण, गोवा, इत्यादी  विविध पुण्यक्षेत्री १०८हून जास्त महोत्सवी वेदपारायणे यथासांग झाली. त्यांच्या सांगतेनिमित्त नागपूर येथे राष्ट्नीय वेदसंमेलन पार पडले. या बृहत्संकल्प सिद्धीच्या मुळाशी असलेल्या वेदमूर्तीचे हे स्मरण.
जगात अनेक धर्मग्रंथ आहेत. या धर्मग्रंथांसंबंधी पावित्र्य त्या त्या धर्माच्या अनुयायांकडे असते. धर्मग्रंथांचे रचनाकार निरनिराळे आहेत. सनातन वैदिक धर्म-(हिंदू धर्म) भारतात सर्वाधिक प्रचारात आहे. वैदिक धर्माचे स्थान कोणते? वैदिक धर्माचे वैशिष्ट्य कोणाच्याही लक्षात येण्यासारखे आहे. वेद हे ज्याधर्माचे ग्रंथ म्हणूनच त्याला वैदिक धर्म हे नाव मिळाले.
इतर धर्मांचे ग्रंथ हे त्या त्या धर्माच्या संस्थापकाच्या नावावर ओळखले जातात. वैदिक धर्माचे ग्रंथ कोणा एका व्यक्तीचे कर्तृत्व नाही. वेदांना `अपौरुषेय' मानले गेले, म्हणजे कोणाही एका व्यक्तीने ते रचले नाहीत; तर मंत्रांचे ऋषींना दर्शन झाले असा वैदिक सिद्धांत आहे. वेद हे भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील प्राचीन वाङ्मय मानले गेले आहे. वेद या जगात केव्हा अवतरले या घटनेचा काळ निश्चित करता येत नाही म्हणून त्यांना `अनादि' म्हटले आहे.
वेदांची शुद्धता मुखोद्गत परंपरेने राखली. अनादि कालापासून वेद हे शुद्ध स्वरूपात टिकून आहेत. मुखोद््गत परंपरेमुळे व अष्टविकृतींच्या पठणामुळे वेदांमध्ये अक्षरे, काना, मात्रा, स्वर, यांमध्ये फरक होऊ शकला नाही, प्राचीन वैदिकांनी आपले वेद ग्रंथ मुखोद्गत परंपरेने जतन करून ठेवले. गुरूकडून शिष्याकडे अथवा पित्याकडून पुत्राकडे; अशा परंपरेने पठणशक्तीच्या साह्याने वेद रक्षण केले गेले. वेदांचे संरक्षण मुखोद्गत पद्धतीने होईलच, आणखी शुद्धता राहाण्यासाठी वेद-विकृती निर्माण झाल्या, त्याचे कारण वेदांच्या शुद्धतेवर जास्त भर होता. मूळ पाठात शास्त्रीय पद्धतीने वेदांचे निरनिराळे पाठ म्हणजे पद, क्रम त्याबरोबर जटा, माला, शिखा, रेखा, ध्वजा, दण्डो, रथो, घना या विकृतींमुळे वेदांचे आजही संरक्षण झाले आहे.
वेदांचे मुखोद्गत जतन करण्याची परंपरा भारतामध्ये ऋषींनी, आचार्यांनी वैदिकांनी गुरू-शिष्य परंपरेतून प्राणपणाने जपली आहे. चार वेद, सहा शास्त्रे, उपनिषदे, पुराणे, व अर्वाचीन काळात संतसाहित्य यांनी ही परंपरा सामान्य माणसापर्यंत त्या त्या कालातील बोलीभाषेप्रमाणे सोप्या भाषेत आणून पोहचविण्याचे कार्य केले. उपनिषदे, पुराणे व सकल संत गाथेतून, मठ-मंदिरांतून या साहित्याचे विश्लेषण केले गेले. हेच कार्य वेदपाठशाळेच्या माध्यमातून वेदमहर्षी कै.घैसास गुरुजींनी केले.
घैसास गुरुजी यांचा जन्म १२ जानेवारी १९१७ रोजी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पौष वद्य संकष्टी चतुर्थीस झाला. घैसास घराणे मूळचे वैदिक परंपरेतील. वेदमहर्षींचे वडील हरभट्ट घैसास, आईचे नाव जानकी. विनायक भटजींच्या मातोश्रींचे वडील नाशिक येथील वे.मू. अप्पाभट लेले हे पंचग्रंथी कृष्ण यजुर्वेदी वैदिक होते. नेपाळ सरकारकडून त्याकाळी त्यांना दोनशे रुपये वार्षिक मानधन मिळत होते. परिवारातील एक मुलगा दशग्रंथी घनपाठी व्हावा अशी उभयतांची मनापासून इच्छा होती, म्हणून त्यांनी `निष्कारणेन षडंगो वेदो अध्येतव्य: ज्ञेयश्च' या न्यायाप्रमाणे चि.विनायक याला त्र्यंबकेश्वर येथील अग्निहोत्री सोमनाथदाजी घैसास यांच्या वेदपाठशाळेत घातले. पुढील अध्ययनासाठी त्यांना त्र्यंबकेश्वर सोडावे लागले. त्यांनी आई वडिलांच्या विचारांनी त्यावेळचे विद्येचे माहेरघर म्हणून मानले गेलेले पुणे गाठले. त्याकाळी पुण्यामध्ये कै.गोविंदभट्ट फाटक गुरुजी यांची वेदपाठशाळा प्रसिद्ध होती, त्यांनी त्या वेदपाठशाळेत प्रवेश घेतला. वैदिकाश्रमात ते राहावयास होते. त्यांचे अध्ययन पूर्ण होईपर्यंत त्यांना वे.मू. प्रभुणे, वे.मू बापूभट्ट ताम्हणकर व वे.मू. गोपाळभट, इ.वैदिकांनी सहकार्य केले. वेदशास्त्रोत्तेजक सभेची परीक्षा देऊन `वेदकोविद' ही पदवी त्यांनी मिळविली.

वेदविद्या प्रसाराला प्रारंभ
वेदविद्येचे महत्व समाजाच्या लक्षात यावे व तिचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी वेदपारायणाचा मार्ग स्वीकारला. महाराष्ट्नतील निरनिराळया शहरांतून वेद पारायणे करून जनमानसातील वेदवाङ्मयाविषयी आदर वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये पहिले पारायण ठाणे येथील कोपिनेश्वर मंदिरात केले, १९५१ साली बडोदा येथे व १९५२ साली पुण्यास जटा पारायणे केली. त्यावेळचे शंकराचार्य शिरोळकर स्वामी यांनी त्यांना `वेदमार्तंड' ही पदवी दिली. पुढे त्यांनी अनेक ठिकाणी आेंकारपूर्वक `क्रम' पारायणे केली. या सर्व ठिकाणी या निमित्ताने व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत होते.

वेदपाठशाळेची स्थापना
मनामध्ये अध्यापनाची जी तळमळ होती ती स्वस्थ बसू देत नव्हती. वेदविद्येची, वेदाध्ययनाची परंपरा चालू राहावी म्हणून त्यांनी स्वत:च्या घरात एका खोलीत वेदपाठशाळा स्थापन केली. वेदविद्येचे अध्यापन निरलसपणे व गुरुकुल पद्धतीने सुरू केले. या कामाला जागेची तीव्र अडचण भासत होती; कारण स्वत:चा संसार, पत्नी, मुले, यांमुळे कामाला मर्यादा होती. तरीसुद्धा त्यांनी आपल्या घरात विद्यार्थी ठेवून दशग्रंथ अध्ययन करणारी वेदपाठशाळा सुरू केली. प्रारंभी तीन विद्यार्थी अध्ययनास आले, नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना नित्य कर्मे करता यावीत यासाठी वेदपाठशाळेत अध्यापन केले, यामध्ये संध्या, पुरुषसूक्त, पूजा, वैश्वदेव, इ. लहान लहान गोष्टी ते शिकवीत. नवीन उपनयन झालेल्या मुलांसाठी मे महिन्यामध्ये संध्येचा वर्ग घेत असत. छोटे छोटे विषय शिकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १५००पर्यंत आहे. समाजातील मोठमोठ्या व्यक्तींना वेदपाठशाळेची माहिती व्हावी म्हणून ते त्यांना वेदपाठशाळेत निमंत्रित करीत असत. यामध्ये जगद्गुरू शंकराचार्य जेरेस्वामी, द्वारका शंकराचार्य, शृंगेरी शंकराचार्य, चारही पीठाधीश्वर निरंजन देवतीर्थ, तत्कालीन उपराष्ट्न्पती शंकरदयाळ शर्मा, न.वि.गाडगीळ, हरीभाऊ पाटसकर, दत्तो वामन पोतदार, रामभाऊ म्हाळगी, अटलबिहारी वाजपेयी, गोळवलकर गुरुजी, बाबासाहेब पुरंदरे अशांचा समावेश होतो.
मनामध्ये वेदपाठशाळेविषयी अनेक कल्पना होत्या, भारताच्या स्वातंत्र्यानंतर वेदशास्त्राचे अध्ययन करणारे स्वतंत्र विद्यापीठ असावे, त्या ठिकाणी वेद, वेदांचे व शास्त्रांचे पारंपरिक पद्धतीने अध्ययन व संशोधन होईल. यासाठी त्यांनी सरकार दरबारी अनेक प्रयत्न केले, केंद्र शासनाशी संपर्क केले, अनेकांच्या गाठीभेटी, पत्रव्यवहार केले. या कामासाठी जनमत, लोकमत उभे राहणे गरजेचे होते म्हणून त्यांनी फाटक गुरुजींच्या विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी अनुष्ठान मंडळ सुरू केले. या मंडळाच्या माध्यमातून पुणे शहरातील खुन्या मुरलीधर मंदिरात २८ वर्षे ऋग्वेद संहिता महायज्ञ व त्या काळातल्या वेद अभ्यासकांच्या व्याख्यानांचे आयोजन केले. श्रीमद् जगदगुरू शंकराचार्य जेरे स्वामी, अण्णाशास्त्री पंढरपुरे, श्रीपादशास्त्री किंजवडेकर, व. ग. राहूरकर, डॉ. म.त्र्यं. सहस्त्रबुद्धे, पं.दत्तायत्रशास्त्री कवीश्वर, डॉ. दि. ब. केरूर, पं. अप्रबुद्ध, बाळशास्त्री हरदास, जयंतशास्त्री जोशी, इ.अनेक मान्यवरांनी या वैदिक व्याख्यानमाला गुंफल्या. या पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य विनायकभट्ट घैसास यांनी केले.

वैदिक महाविद्यालयाची कल्पना
भारत स्वतंत्र झाल्यावर नवनवीन विद्यापीठे भारतामध्ये सुरू झाली. केंद्र शासनातर्फे त्र्यंबकेश्वर येथे एक वैदिक महाविद्यालय व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी एक योजना तयार केली. या वैदिक महाविद्यालयात चारही वेदांच्या सांग अध्ययनाची व्यवस्था; त्याचबरोबर वेदांचे चार उपवेद, आयुर्वेद, धनुर्वेद, गंाधर्व वेद, अर्थवेद, तसेच उपनिषदे व पुराणे यांच्यावर चिकित्सक पद्धतीने संशोधन; न्याय, वेदांत, मीमांसा, व्याकरण, साहित्य, अशा शास्त्रांवर या ठिकाणी अभ्यास व्हावा; अशी ती योजना होती. वेद केवळ भारताचे नसून विश्वाच्या कल्याणाचा संदेश देणारे आहेत. यासाठी त्यांनी त्यावेळच्या केंद्र शासनाकडे प्रयत्न केले. त्यांच्या या कल्पनेला यश मिळाले नाही, पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

वेदभवन
आपला मुलगा मोरेश्वर याला त्यांनी वेदाध्ययनातच घातले होते. त्याला गुरुजींच्या मनातील या पाठशाळेबद्दल माहिती होती. वेदपाठशाळा कशी असावी हे त्यांनी गुरुजींकडून ऐकले होते. त्याचे ऋग्वेद, दशग्रंथ, क्रमान्त व जटापाठाचे अध्ययन झाल्यानंतर गुरुजींच्या मनातील वेदपाठशाळा प्रत्यक्ष साकार होण्यासाठी संस्था नोंदणीकृत असणे गरजेचे, म्हणून १९८० साली गुरुजींच्या नेतृत्वाखाली, मोरेश्वर घैसासने `करतो' असे सांगून त्यांचा आशीर्वाद घेतला. शासन दरबारी `वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा' नोंदणी(रजिस्टर) केली. त्यानंतर `वेदभवन' नावाचा प्रकल्प तयार करून शासनाकडे जागेसाठी प्रयत्न सुरू केले. पुण्यामध्ये कोथरूड भागात स.के.खांडेकर, डी.एम.फाटक, व्ही.डी.पिटकर यांच्या सहकार्यामुळे वेदभवनासाठी दोन एकरचा भूखंड प्राप्त झाला. दि.१५ ऑक्टोबर १९८९ रोजी वेदमहर्षींच्या मनातील गुरुकुल प्रत्यक्षात साकारले. वेदमहर्षींनी या नव्या वेदभवनामध्ये सुमारे ९ वर्षे अध्यापनाचे कार्य केले.
वेदभवनात मुले ५.३० वाजता उठून अभ्यास सुरू करतात. आनुषंगिक विधि नित्यकर्मेे व ८-१० तास अध्ययन असते. विद्यार्थ्याला किमान १२ वर्षे अध्ययनासाठी वेदभवनात राहावे लागते. शिक्षण, निवास, भोजन, इ. सुविधा विनामूल्य दिल्या जातात. ऋग्वेद संहिता, ऐतरेय ब्राह्मण, आरण्यके, उपग्रंथ, पद, क्रम या अभ्यासक्रमाला किमान १२ वर्षे लागतात. हे सर्व कार्य लोकांच्या सक्रिय सहकार्र्यावरती सुरू आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारचे अनुदान वेदविद्येला नाही, परंतु नागरिकांची वेदांवर असलेली श्रद्धा यामुळेच हे कार्य अव्याहत चालू आहे.

ठामपणासाठी शांतपणा हवा
शांतपणे काम करीत राहण्यासाठी  वेगळीच तपश्चर्या लागते हे खरे आहे. आपली बाजू खरी  व प्रामाणिक असली तरी विरोधाचे सूर इतके कर्कश्श व आक्रस्ताळे येत आहेत की, आपल्या तर्कशुध्द मांडणीचा तेथे निभाव लागत नाही. कारण भले तो प्रांजळ सूर  अगदी पोटातून ओठात येत असला तरी  ऐकणाऱ्याला त्याचे काहीही सोयर सुतक नसेल तर ते सूर व्यर्थ जातात; तेही एकवेळ ठीक म्हणता येईल, पण त्या सुरांच्या आळवणीत अर्वाच्य  धिंगाणा घालणाऱ्यांची  सध्या चलती असल्याचे दिसत आहे.  मग समोर विनवून सांगणारा कोणी संत महंत असो, कोणी मोठा अंमलदार असो, अगर कोणी मुख्यमंत्री असो. त्याचे काही ऐकून घेण्याच्या  मन:स्थितीत  आज सहसा कोणी दिसत नाही. तरीही आपापला कारभार रेटत राहून  उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवावे लागतात.

राज्य किंवा केंद्रस्थानीची सभागृहे शब्दश: आखाडे बनलेली आहेत. त्याचे पावित्र्य हे तिथल्या वातावरणावर खूपसे अवलंबून असते. एखाद्या विषयाच्या संदर्भात कोणा प्रतिनिधीची आत्यंतिक तळमळ असणे समजू शकते, त्या भावनांच्या भरात कोण्या सभासदाचा तोल ढळू शकतो. वास्तविक तेही चूकच आहे, आणि त्याचे समर्थन करताही येणार नाही. पण तरीसुध्दा असा अपवादात्मक भावनांचा आवेग क्षणभरासाठी दूर ठेवता येतो व अर्थातच सभासदांच्या त्या भावना  तेवढ्या तारतम्याने घ्यायच्या असतात हे अध्यक्षही समजून चालतात. त्यामुळेच पिचत कधी त्या सभागृहातील प्रतिनिधींनी  अध्यक्षांसमोर येऊन ओरडणे, त्यांचे न ऐकणे, कामकाज बंद पाडणे हे अत्यंत अपवादात्मक म्हणून मान्य. अलीकडे हा अपवादच नियम होऊन बसला आहे. त्यामुळे या प्रतिष्ठित सभागृहात रोजच वांडपणा चालत राहिला आहे.

अशा स्थितीत  एखाद्या प्रश्णावर मुद्दाम आडमुठेपणाने आरोप करीत सुटणे हाही कामकाजाचा एक भाग बनला आहे. भारत माता की जय म्हणण्यावरून विधिमंडळात जो गदारोळ होतो, तो तेथील प्रथेचाच भाग म्हणावा लागेल. पण त्यावरून मुख्यमंत्र्यानी जी चढ्या आवाजाची आक्रस्ताळी पट्टी लावली, ती तडफदारीची न वाटता  केविलवाणी वाटली. पारतंत्र्याच्या काळापासून भारतात आपल्या मातृभूमीचा जयजयकार करणाऱ्या घोषणा घुमत आलेल्या आहेत. त्यांत अमान्य होण्यासारखे  कोणालाच काही नव्हते. पण कुणी तसे म्हटले नाही म्हणून तरी काय बिघडणार आहे ? मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान मोठ्या वीर रसाने तसे म्हणत असतील तर त्याला तरी कोणाची हरकत असणार आहे? पण तो ओेवेसी बाबा त्याच्या गळयावर सुरी फिरली तरी भारत माता म्हणणार नाही , त्याच आविर्भावात मुख्यमंत्र्यानी आपले पद इरेला घालून, ते सोडावे लागले तरी बेहत्तर, पण भारत माता म्हणणार असे करकचून ओरडणे नक्कीच शेाभादायक नव्हे. विरोधकांच्या चिडवाचिडवीला मुख्यमंत्री बळी पडले असेच म्हणावे लागेल.

मुळात कोणताही घोेष,कोणतीही प्रार्थना, कोणतीही घोषणा, नामजप, शपथ इत्यादी सक्तीचे तर होऊच शकत नाही. `इस देशमे रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा' ही कित्ेयकांंची अपेक्षा असते, पण अशा बाबतीत सक्ती करता येणारच नाही. सकाळी उठल्यावर आई वडिलांना नमस्कार करावा हा एक संस्कार जरूर आहे. कोणे एके काळी कित्येक घरची तरुण मुले तसे करून घराबाहेर पडत असत. पण म्हणून कोणी फतवा काढला नाही आणि या घरात राहायचेच असेल तर `माते, तुजप्रत प्रणााम असो' अशा आविर्भावात नमस्कार केला पाहिजे असे आजकाल म्हणत नाहीत. याचा अर्थ त्या तरुण पोराला त्याच्या आईबद्दल आदर नाही असे नव्हे. संघाच्या संस्कारात अशा क्रियांना व आचरणाला विशेष महत्व आहे, असायला बाहेच्या कोणाची हरकत कशाला असेल? पण त्याच आचरणपध्दती केवळ योग्य, आणि बाकी सारे पाखंडी असे मानायचे कारण नाही.

मुख्यमंत्री त्यांच्या आवेशपूर्ण भाषणात जरा जास्तच त्वेष आणतात तो योग्य नाही. त्यांना डिवचण्याची संधी विरोधक तर घेणारच, पण एरवी त्याची मुद्देसूद दखल घेऊन जशास तसे उत्तर देणारे मुख्यमंत्री भारत माता की जय वरून पदत्याग करण्याची भाषा करतात हे पटण्याजोगे नाही. क्रियाकर्मांतरातून भावनांचा अतिरेक आपोआप अंगी भिनतो आणि त्याचे पर्यवसान अविवेकात होते म्हणतात, त्या सिध्दांताला मुख्यमंत्र्यांच्या त्वेषाने बळकटी दिली आहे. एखादा कर्मठ माणूस जसा आपला आचार हा आणि हाच केवळ धर्माचार आहे असे मानतो, तसे सर्वसमावेशक असलेल्या भारतीय तत्वाने चालणाऱ्या शासनकर्त्याने करायला नको आहे. देवळात आरतीला उभे राहिले तर सामुदायिकपणे आरती म्हणावी हा संकेत आहे; पण सगळेजण आरत्या म्हणतात असे नाही. जोरजोराने आरत्या ओरडणारा कोणीतरी असतो, त्याची भक्ती जास्त आहे असे आपण मानत नाही, आणि आरती येत असून ती म्हणणाऱ्यालाच या देवळात थांबण्याचा अधिकार आहे असेही कोणी म्हणत नाही. तिथेच थांबून कुणी त्या देवाला शिव्याशाप द्यायला लागला तर             त्याची संभावना होईल. वास्तविक तसेही करण्याचे कारण नाही, पण तो सामुदायिक शिष्टाचाराचा भाग असल्याने त्याचेही पालन करण्याची एक रीत आहे; त्याच्याशी देव मानण्याचा संबंध नाही.

ज्याची बाजू लंगडी असते त्याला आपली बाजू पटविण्यासाठी जास्त ओरडावे लागते असे म्हणतात, त्याचा प्रत्यय मुख्यमंत्र्यांसारख्या प्रगल्भ व्यक्तीने देण्याचे कारण नाही. इतर अनेक प्रश्न असे आहेत की त्यांनी त्यांच्याच प्रशासनावर त्याच त्वेषाने संतापायला हवे. एरवी शांतणे आपले काम दृढपणे केले तर ते लोकांना अधिक भावेल. कु णी कसल्या घोषणा कराव्यात, कोणत्या शपथा घ्याव्यात, कोणत्या प्रार्थना गाव्यात याचे निर्णय लोकांना आपापले करूद्यात. मात्र कोणत्या घोषणा करायच्या नाहीत, कोणाचा जयकार करायचा नाही एवढे पाहिले तर काम भागेल. त्यामुळे प्रत्येकाला आपापले काम करत राहता येईल आणि हकनाक सामाजिक तेढही वाढणार नाही.

आपल्याकडे एखादा सामना जिंकला की त्याचा ओरडा होतो ते स्वाभाविकच असते, पण त्याचबरोबर सामना हरलो तर त्या खेळाडूंची खैर नसते. याला खिलाडू वृत्ती म्हणत नाहीत. विधिमंडळात त्याच प्रकारचे वातावरण अलीकडे दिसते आहे. त्याला आटोक्यात ठेवणे मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. पण त्यांच्यापुरती त्यांनी काळजी घेतली तर ते जाणकारांच्या आदरास अधिक पात्र होतील. संसदपटुत्वासाठी आक्रस्ताळा त्वेष गरजेचा नसतो. तशी तुलना करणे योग्य होईल असे नाही पण त्या संदर्भात वर्षभरापूर्वी संसदेत स्मृती इराणी यांनी विरोधकांना दिलेले प्रत्युत्तर आठवून पाहायला हरकत नाही.

कर्जतमधील दुर्दैवी नाट्यगृह
नाटककार राम गणेश गडकरी यांच्या पदस्पर्शाने पावन झालल्या कर्जत नगरपालिकेने १९९५ साली खुल्या नाट्यगृहाचे काम सुरू केले. ५२ लाख रुपये खर्च अपेक्षित होता. त्यापैकी कर्जत नगरपालिकेने २२ लाख रुपये कर्ज घेतले. ९५ टक्के काम झाल्यानंतर ते तशाच अवस्थेत पडून आहे. शासनाने अनुदान  दिलेले ३० लाख रुपये पाण्यात गेले. कर्जतच्या नागरिकांचे लाखो रुपये कर्ज आणि त्यावर व्याजही फुकट गेले. सध्या येथे नगरपालिकेची अडगळ  ठेवली आहे.
महाराष्ट्न् शासनाने याबाबत लक्ष घालून हे नाट्यगृह २३ जानेवारी २०१८ पूर्वी सुरू करण्यास भाग पाडावे. नाटककार राम गणेश गडकरी यांची २३ जानेवारी २०१९ रोजी १००वी पुण्यतिथी आहे. कर्जत शहरात राम गणेश गडकरी यांचे वास्तव्य होते, कर्जतच्या शाळेत त्यांच्या मराठी शिक्षणाचा पाया घातला गेला. एखादा चौक अथवा रस्ता, अथवा एखाद्या हॉलला राम गणेश गडकरी यांचे नाव द्यावे. तसेच खुले नाट्यगृह बांधून त्याला ``राम गणेश गडकरी नाट्यगृह'' असे नाव द्यावे.
-दिलीप प्र.गडकरी, कर्जत  
मो.नं. ९९७०१९७६६६

भावनांक आणि संवाद
                                                       -अजिंक्य गोडसे
सध्याच्या तांत्रिक युगातील समस्या वेगळया आहेत. काहीजणांना आपल्यापुढच्या समस्या, कदाचित वाघासमोर उभे ठाकण्यापेक्षा मोठ्या वाटतील. आदिमानवाजवळ वाघासमोरून पळून जाण्याचा एक तात्पुरता पर्याय होता; तसा पळून जाण्याच्या पर्यायाचा आजच्या समस्यांसाठी काही उपयोग नाही. या युगात समस्येची उकल करण्यासाठी बौद्धिक लढा हाच योग्य पर्याय असतो. घडलेल्या घटनेपेक्षा त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोण, आपल्या मनाची स्थिती आणि समस्येची तीव्रता ठरवतो. खोलवर विचार केला तर असं लक्षात येईल की, बहुतेकदा समस्या दृष्टिकोणामुळे निर्माण होते. तसंच - किंबहुना त्यापेक्षा जास्ती, आपण परिस्थितीला दिलेला प्रतिसाद, आपले वर्तन या गोष्टीच समस्या निर्माण करत असतात. निर्माण होणाऱ्या समस्येशी लढा देण्यापेक्षा, समोर घडणाऱ्या परिस्थितीला आपल्या सोयीचा ठरणारा प्रतिसाद देणं यातच खरं शहाणपण आहे. मानसशास्त्राच्या भाषेत या शहाणपणालाच `भावनांक'(इमोशनल कोशंट : इ.क्यू) असं म्हणतात. काहीजण `भावनिक बुद्ध्यांक' असा शब्दप्रयोग करतात.
भावनांक म्हणजे भावनिक सजगता; आपल्या सर्व भावनांचा आपल्या विकासासाठी वापर करून घेण्याची कला, -जी तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणात ठेवते; तुमचा आनंद आणि समाधान वाढविण्याचे कारण ठरते! सामान्य भाषेत सांगायचे झाल्यास भावनांक म्हणजे चांगले आणि वाईट यांतील फरक कळणे, आणि वाईटाकडून चांगल्याकडे जाणे. सर्वांचा बुद्ध्यांक सर्वसाधारणपणे सरासरीने चांगला असतो. असे असूनसुद्धा एखादी व्यक्ती यशस्वी होते, तर एखादी अयशस्वी! कारण प्रत्येक व्यक्तीचा भावनांक त्याच्या यशापयशाचे कारण ठरते. जीवनात यशस्वी होण्यासाठी २०% बुद्ध्यांक आणि ८०% भावनांक  महत्वाचे ठरतात. बुद्ध्यांक हा बहुतेकदा अनुवांशिक असतो. त्याचा विकास हा साधारणपणे वयाच्या पाच वर्षापर्यंत होतो. याउलट भावनांक हा अनुवांशिक नसतो. त्याचा विकास वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शक्य आहे. हा दोहोंमध्ये महत्वाचा फरक आहे. भावनांकाचा विकास करणे म्हणजेच मानसिक कौशल्यांचा विकास करणे. विकसित मानसिक कौशल्यांचा एकत्रित झालेला परिणाम म्हणजेच भावनांकाचा विकास.
सुसंवाद, प्रभावी संवाद हे त्यापैकीच एक महत्वाचे मानसिक कौशल्य. आपण सगळेचजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत संवाद करत असतो. इतकंच काय झोपेत पडणारी स्वप्नं आपल्याला काहीतरी सांगत असतात, आपल्याशी संवाद साधत असतात. आपण दिवसभर इतरांशी, स्वत:शी संवाद साधत असतो. आपले विचार मांडण्यासाठी, एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी संवाद साधणं महत्वाचं असतं. बोलूनच संवाद साधतो असं काही नाही. केवळ हावभाव आणि हालचाली हेेही संवाद साधण्याची माध्यमं आहेत. आवाजातील चढउतारसुद्धा तितकाच महत्वाचा. घरातल्या वडीलधाऱ्यांनी आपल्या एखाद्या प्रश्नावर दिलेला हुंकार आपल्याला त्यांच्या मनातलं सांगतो. लहान मुलालासुद्धा संवादाचं महत्व समजतं. त्याचं काही चुकलं तर त्याची आई कधीकधी त्याच्याशी काही वेळापुरता बोलणं तोडून, संवाद थांबवून त्याला त्याच्या चुकीची जाणीव करून देते. तिच्या या कृत्यामुळे लहान मूल पुन्हा तशी चूक करत नाही. कारण पुन्हा आई बोलणं बंद करेल याची त्याला भीती असते. योग्य तिथं मुलाशी संवाद थांबवून, आई त्याला योग्य संदेश देते. पण जर आई सतत हेच करत राहिली तर मात्र ते बाळ हळूहळू तिच्या या कृतीला महत्व देणं बंद करतं. संवाद ही दुधारी तलवार आहे. योग्य त्या पद्धतीनं संवाद साधण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. प्रभावी संवाद आणि सुसंवाद याबद्दल नीट समजून घ्यायलाच हवं.
-अजिंक्य गोडसे, इचलकरंजी  फो.नं. ९६३७७४१८६५

आिचलकरंजीचे आपटे वाचन मंदीर
महाराष्ट्नत जी ख्यातनाम व दीर्घायुषी ग्रंथालये-वाचनालये आहेत, त्यांत आिचलकरंजीचे आपटे वाचन मंदीर अग्रगण्य आहे. साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रात या ग्रंथालयाचे मोठे योगदान आहे. हे ग्रंथालय दीडशेव्या वर्षाच्या घरात पोचले आहे. आिचलकरंजीच्या जहागिरी काळी हे वाचनालय स्थापन झालेले आहे.
आिचलकरंजीकर घोरपडे सरकार म्हणजे मूळचे जोशी आडनावाचे चित्पावन ब्राह्मण घराणे. ते लढाआी आणि मुलुखगिरीत सहभागी होते. संताजी घोरपड्यांच्या सेनापतीत्वाखाली त्यांनी लढाया केल्या. संताजीच्या मृत्यूनंतर आत्यंतिक स्वामीनिष्ठेखातर त्यांनी आपले नाव `घोरपडे' घेतले.
आिचलकरंजीचे जहागीरदार श्रीमंत गोविंदराव आबासाहेब यांच्या प्रेरणेने रामभाअू आपटे या वकीलांनी  नेटीव्ह जनरल लायब्ररी सुरू केली, ते साल १८७०. या ग्रंथालयासाठी आपटे वकीलानी स्वत:च्या जागेत आिमारत बांधण्याचे ठरविले. तथापि त्यांच्या हयातीत ती आिमारत पूर्ण झाली नाही. पुढे तत्कालीन जहागीरदार नारायणराव बाबासाहेब घोरपडे यानी ते बांधकाम पूर्ण केले. आपटे वकिलांचे योगदान लक्षात घेअून त्या संस्थेला  `आपटे वाचन मंदीर' असे नाव देण्यात आले. जहागीरदारांनीही त्या संस्थेला आपला ग्रंथसंग्रह आणि दुर्मीळ चित्रे दिली. १९९६मध्ये  नव्या आिमारतीत काम सुरू झाले. आता तिथे आपटे वाचन मंदिराची ३मजली आिमारत आहे. ग्रंथसंख्या सुमारे ७८हजार आहे. शिवाय दुर्मीळ चित्रसंग्रह आहे. वसंत व्याख्यानमाला, पुरस्कार, कलादालन, वाचन संस्कार शिबिर, संगीत साधना .. असे अन्य अुपक्रम संस्था आयोजित करते.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन