Skip to main content

27-3-17

सरहद्दीवरचे  दळणवळण
भारतीय अुपखंडाच्या वायव्येचा सरहद्द प्रांत काराकोरम किंवा खैबर खिंडीच्या अुल्लेखामुळे शाळेच्या वयापासून आपल्या परिचयात असतो. महाभारतातला गंधार  हा शकुनीमामाचा देश म्हणजे आजचे अफगाणिस्तान. व्याकरणकार पाणिनी हा तिथला पठाण म्हणायचा. तक्षशिलेचे विद्याकेंद्र त्या भागात होते, अलीकडच्या काळात त्या ठिकाणी पाकिस्तानातले अबोटाबाद शहर आहे. तिथे अमेरिकेने लादेनवर हल्ला करून त्याला मारले. त्याच्या दक्षिणेला आताचे कराची शहर. त्याच्या जवळपास रानटी टोळया असत त्यांनी महाभारत युध्दात भाग घेतला होता. बलुचिस्तान हे  त्याकाळी अुदरावती होते. भूमीच्या पोटात लपता येआील अशा गुहा त्या प्रांतात होत्या, म्हणून ते अुदरावती, त्याचे बदलाअूत आणि पुढे बलोच झाले. सिंध प्रांतात अुदेरोलाल हा लढवय्या आक्रमकांशी झुंजला त्याच्या नावाशी हे साधर्म्य दिसते.
बलुची लोक संख्येने अेकूण १कोटि असून ते पाकिस्तान, अफगाणिस्तान व आिराण येथे विखुरलेले आहेत. पाकिस्तानात सर्वाधिक म्हणजे ७०लाख आहेत. त्यांचा अुत्पन्नाचा स्रोत म्हणजे ग्वादार बंदर. हे बंदर विकसित करण्यासाठी चीनने हल्ली खूप मदत केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधून चीनने हिमालयाच्या कडेने महामार्ग बांधला आहे. त्या बंदरातून त्याचा व्यापार पश्चिमेशी होआील, आणि भारतावरही लक्ष ठेवता येआील. अेकूणात ते प्रकरण आपल्याला धोक्याचे, म्हणून त्याचा विचार करायचा.
बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत आहे. १६६६पर्यंत तो भाग अर्थातच हिंदूबहुल होता. तिकडून परकी आक्रमणे झाल्यावर धर्मांतरे सुरू झाली.१८व्या शतकात तेथील शासक नसीरखान हा बलुच होता. त्याला नूरी नसीर म्हणत. १८३९मध्ये आिंग्रजांनी हल्ला करून मकरान आणि लासबेला ही नगरे ताब्यात घेतली, तेव्हापासून बलुचिस्तानात आिंग्रजी राज्य आले, पण ते स्वतंत्र राज्य मानले जाआी. १९४७मध्ये भारताबरोबरच पाकिस्तान व  बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घेाषणा झाली, त्याकाळी बलुचिस्तानची दोन स्वतंत्र संसद सभागृृहे होती. पाकिस्तानने भारतात घुसखोरी करून काश्मीरचा काही भाग बळकावला, ते आक्रमण रोखले गेल्यावर त्याने २७मार्च१९४८ला बलुचिस्तानवर आक्रमण केले. तेव्हापासून बलुचिस्तानचा स्वातंत्र्यसंग्राम सुरू आहे. १९९६पासून पाकिस्तानच्या आितर प्रांतांतून घुसखोरी आरंभिली आहे. अेव्हाना बलुची लोकांच्या ३०हजार हत्त्या, आणि २४हजार लोक गायब झाले आहेत.
भारताच्या काश्मिरबद्दल पाक सतत दावे करत असतो, आणि तिकडे अरुणाचलवर चीन दावा सांगत असतो. पाकिस्तानकडून दहशती हल्ले सुरू ठेवण्यामुळे अस्वस्थता निर्माण होते, त्या भागाचा विकास होत नाही, संचार करण्यास अडथळे येतात; तेवढाच पाकिस्तानचा अुद्देश अुघड असतो. भारताशी प्रत्यक्ष लढाआीला अुतरणे त्याला शक्यच नाही. याला अुपायही प्रत्यक्ष लढाआीचा नाही. पाकिस्तानवर भारताने हल्ला करून तो देश जिंकून घ्यावा, अशी काहीतरी रोमांचकारी कल्पना आपल्या बऱ्याच लोकांची असते, ती पूर्णपणे अव्यवहार्य! त्यावर कायमचा ठरू शकेल असा अुपाय राजनैतिकच असला पाहिजे. मोदी सरकारने तो गेल्या साली प्रत्यक्षात आणण्याला प्रारंभ केला आहे.
आिराण सीमेवर असलेले छबहर बंदर विकसित करण्याचे काम भारताने अंगावर घेतले आहे. सध्या आिराण आणि अफगाण ही दोन्ही  भारताची दोस्तराष्ट्न्े आहेत. त्यांच्याशी सामंजस्य करार करून काही प्रकल्प कार्यान्वित करण्याने दोन फायदे होतील. अेकतर छब्भर (चबाहर) बंदर हे बलुचिस्तानातील चीनप्रणित ग्वादार बंदरापासून अगदी जवळ आहे. तिथून अफगाण हद्दीतून सरळ रशियापर्यंत महामार्गाने वाहतूक होअू शकते. आणि बलुचिस्तानातही काही मदत -निदान रोजगाराच्या निमित्ताने देता येआील.
या निमित्ताने बलुचिस्तानला आधार किंवा पाठबळ देण्याचे कारण पाकिस्तानला व चीनला शह देणे हेच आहे. त्याच्याच धोरणाने त्याला डोकेदुखी निर्माण करण्याची ही मुत्सद्दी खेळी आहे. पाकिस्तान आणि चीनच्या युतीमुळे बलुचिस्तानचा श्वास कोंडू लागला आहे. त्याला पाठबळ देण्याने भारताची त्या भागातून होणारी केंाडी फुटण्यास मदत होअू शकेल. पश्चिम आशियात अरबस्तानच्या व आिजिप्त-जॉर्डन अशा तेलराष्ट्नंच्या वेढ्यात अमेरिकेने जसा आिस्रायल `तयार' केला आहे, तसाच आपल्या दृष्टीने बलुचिस्तान होआील. चीनप्रणित ग्वादार बंदर पूर्ण झाले असून गेल्या १३ नोव्हेंबरला तिथून चाचणीचे पहिले जहाज चीन व पाकिस्तानचा माल घेअून श्रीलंकेमार्गे बांगलाकडे रवाना झाले. आता आपल्यालाही तशा गतीने छाब्भर बंदरासाठी काम करावे लागेल.
तशीच स्थिती  पूर्वांचलात रेल्वेमार्गांनी होणार आहे. आसाममध्ये आगरतळा-सबरूम या रेल्वेमार्गाचं अुद्घाटन सुरेश प्रभूनी केलं. २०१९पर्यंत तो मार्ग प्रत्यक्ष वापरात येईल. सबरूम हे भारताचे गाव बांगलाच्या चितगाव बंदरापासून फार जवळ (७५किमी) आहे. आपल्या आगरतळापासून बांगलातील अखअूरा अशी रेल्वे टाकली जात आहे. म्यानमार-भूतान-बांगला या सीमेवर आपल्या रेल्वेचे जाळे असणे हा तेथील लोकांच्या व संरक्षणाच्या दृष्टीने जिव्हाळयाचा विषय आहे. गंगेच्या खोऱ्यात सपाट सलग भूमीवर रेल्वेचे जाळे आहे, तसे आजवर सीमावर्ती दुर्गम भागात झालेले नाही. तो भाग दुर्लक्षित राहिला त्यातून अनेक प्रकारच्या कटकटी निर्माण झाल्या आणि त्या अुर्वरित भारतासही पुरून अुरल्या आहेत.
रेल्वे बंदरे आणि रस्ते ही दळणवळणाची साधने जेवढी विस्तार पावतील तितकी व्यापाराची वृध्दी होते, रोजगार वाढतो, लोकांना स्थैर्य येते, संपत्ती वाढते. आणि दहशतीकडे वळणारे लेाक `संसारा'ला लागतात. त्या दृष्टीने मोदी सरकारने शेजारी देशांशी सलोखा राखण्याबरोबरच, तिथे आपल्या फायद्याची गुंतवणूक करणे, सीमाभागात दळवळण वाढविणे, पाकिस्तानच्या बलुच भागाला पाठिंबा भासवून राजनैतिक दबाव निर्माण करणे आणि परदेशांशी व्यापार व्यवहार करण्यासाठी जवळचे मार्ग तयार करून आपल्या आयात निर्यातीला वाव देणे अशी अनेकांगी धोरणे राबवायला प्रारंभ केला आहे.
देशाचा विकास म्हणजे शाळा कॉलेजे-कारखाने-स्वच्छता वगैरे तर असतेच; पण सीमावर्ती भागापर्यंत जाअून भिडावे लागते. ते या सरकारने  सुरू केल्याचे दिसते. त्याचे परिणामही काही काळाने दिसू लागतील. त्यासाठी मोदी तर पाहिजेतच. पण कोणत्याही कारणाने ते जरी मागे पडले तरी  तितक्याच तडफेचे सरकार देशाला गरजेचे आहे. हे काम दीर्घकाळाचे असते. कोण्या पक्षाचे सरकार असले तरी ते तसेच खमक्या धोरणाचे पाहिजेे; तरच येत्या काळात भारताची धडगत राहील. तूर्त बलुचिस्तानची चळवळ आणि छब्बरचे बंदर बांधणी हे विषय आपण समजून घेअून त्यास अनुकूल राहण्याची  गरज आहे. काही असमंजस राजकीय नेते, `अफगाणिस्तान आिराणला मदत कसली देता? - आधी आपलं बघा..'; किंवा `तिकडं जंगलात रेल्वे कशाला बांधायची, आधी मुंबआीतल्या  गर्दीचं बघा..' अशी मुक्ताफळं अुधळतात, त्यांस किती महत्व द्यायचे हे  सुजाण भारतीयांनी ठरवायला हवे.

कर्जमाफीची स्वस्त मागणी
राज्याचा अर्थसंकल्प जाहीर झाला की त्यावर राज्यकर्त्या पक्षाबाहेरच्या लोकांनी टीकाच केली पाहिजे असा अेक पायंडा पडला आहे. टीकाकारांमध्ये राजकीय विरोधी पक्ष असतो. त्यातल्या कोणी त्या संकल्पाचा अभ्यास करून त्याची आर्थिक चिकित्सा केली तर ती राज्यातल्या सुशिक्षित जनतेला हवी असते. पण त्यावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्यात निव्वळ राजकीय स्तुती किंवा निंदा अेवढेच आढळून येते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने ते फार घातक आहे. देशाच्या संसदेत असो की राज्य विधानसभेत असो, अर्थसंकल्पाचे भाषण ही फार गंभीर गोष्ट असते. पण ते अैकूनसुध्दा न घेता गाढवगोंधळ घालण्याची प्रथा कशासाठी? महाराष्ट्नत शोतीची अवस्था बिकट आहेे, असे काहींच्या अभ्यासातून जाणवत असेल तर त्यावर काही अुपाय सुचविले पाहिजेत, त्यासाठी तर ते सभागृह असते. पण शेतकऱ्यांचा अनाठायी ढोंगी कळवळा आणून कोणाबाबतही अवमानकारक वागणे निषेधार्ह आहे.

अनेक आमदारांना त्यांच्या बेतास वागण्यासाठी निलंबित करावे लागले यात कसली शोभा झाली? सभागृहात पराभूत मनाने हजर राहण्यापेक्षा हा निर्णय ओढवून घेणे बहुधा सोयीचे वाटले असावे.

राज्याच्या स्थितीवर टीका करताना `हे राज्य दिवाळखोरीकडे चालले आहे' असे कर्कश विधान करणारे नेते शेतकऱ्यांना ३०हजार कोटिंची कर्जमाफी मागतात, यात कोणता तर्क आहे? शेती हा तर राज्याचा प्रमुख व्यवसाय आहे, पण त्यात रोजगाराला अुतरण्याअैवजी त्यातून बाहेर पडण्याचा सल्ला जाणता राजा देतो, आणि त्यांची री ओढणारा हंगामा सर्वत्र केला जातो. शेतकऱ्याला अुभा करण्यासाठी त्याला कर्जमाफीची दया नको आहे, तर शेतीला प्रतिष्ठा हवी आहे. घरांतील शहाणी आणि चलाख पोरं वाळू ठेके, टोलठेके, सहकार संस्था, पंचायती, आिंग्रजी शाळा, ढाबे-वाढदिवस असल्या अुद्योगांत रमली आहेत. त्यात गैर काही नाही, कारण त्यात जास्त पैसे मिळतात, नेतेगिरी करायला मिळते. पण त्यांनीच जर शेतीच्या नावाखाली कर्जमाफीचे मागणे लावून धरले तर त्यातील हेतू कोणाच्या लक्षात येत नाही असे थोडेच आहे?

अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर टीका करायचीच, किंवा स्तुती करायचीच असे ठरवून बसल्याप्रमाणे जी विधाने येतात त्यांतून कोणतेही लोकशिक्षण घडत नाही. पूर्वी अेका काळी केंद्रीय अर्थसंकल्पानंतर  नानी पालखीवाला यांचे व्याख्यान मुंबआीत होत असे, आणि ते अैकण्यासाठी मोठमोठे अर्थतज्ज्ञ, अुद्योगपती असा वर्ग येत असे. नानींचे विश्लेषण अैकण्याला भाग्य मानले जाआी. साक्षात अर्थमंत्रीही त्या व्याख्यानाकडे कान लावून बसत, असा तो दबदबा होता. त्या पार्श्वभूमीवरती आजच्या काळात अेकू येणाऱ्या आणि सभागृहात पाहायला मिळणाऱ्या प्रतिक्रियांच्या दशावतारांचे काय वर्णन करावे?

आपल्याकडे काही विषय तर न बोलेल तो पापी, अशी स्थिती झाली आहे. मायावती जसे केवळ दलित कळवळयाचे पत्ते पिसून साधायचे ते साधतात, तसे आपल्या राज्यात शेतकरी हा विषय आहे. शेतीसाठी कोणताही राजकीय पक्ष किंचितमात्र गंभीर नाही, विधानसभेत जो धिंगाणा चालू आहे, तो शेतकऱ्यंासाठी  नाही तर तो राजकीय पराभूत मन:स्थितीतून आलेला त्रागा आहे. त्याच पक्षांनी आजवर  राज्य केलेले आहे. त्यानी शेतकऱ्यांचे साखर कारखाने व शेतकऱ्यांच्या बँका बुडवल्या आहेत. शेतीसाठी  नव्या संशेाधनाकडे दुर्लक्ष केले आहे. पणन मंडळे व बाजार समित्या दलालांना विकल्या आहेत. तीच मंडळी आज विरोधी पक्षात आल्यामुळे, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करण्यासाठी पायऱ्यांवर घोषणा देत बसतात, यात किमान सभ्यताही नाही.

ज्याला अर्थ व्यवहारांची किमान जाण असते असा कोणीही माणूस कधीही कर्जमाफीचे समर्थन करणार नाही. दुकानदाराची अुधारी बुडविण्याचा तो प्रकार आहे. आत्यंतिक अपवादाच्या प्रसंगी त्या आत्यंतिक टोकाच्या पर्यायाचा विचार होअू शकतो. त्यातही काहीतरी तारतम्य हवे. पुन्हा तशी वेळ येणार नाही हे पाहायला हवे, आणि त्यापेक्षाही लाभार्थींना त्याचा हक्क आणि आनंद वाटता कामा नये. त्यांनी खजिल होअू नये अशी काळजी  आितरांनी घ्यायला हवी. आिथे समजा कर्जमाफीचा निर्णय झालाच तर त्याच्या श्रेयासाठी  भांडण जुंपेल, आणि गावोगावी फटाके फोडून अुत्सव होआील. आपण कर्ज काढले होते, ते हरप्रयत्न करून फेडता आले नाही याची  कर्जदाराच्या मनाला झळ लागली पाहिजे. तशी झळ खऱ्या कर्जदाराला लागते, तो कर्जमाफीची अपेक्षा करतही नाही, पण ती माफी देणे हे राज्यकर्त्यांचे कर्तव्य असते.

आिथे सारा अुलटा आणि दांभिक प्रकार चालू आहे. शेतकरी जसा अडचणीत येअू नये, तसा कोणताच घटक येअू नये. सरकारने करमाफी करावी, कर्जमाफी करावी, शिल्लक खजिन्याला हात लावू नये.. तरीही अंगणवाडीच्या बायकांना पगारवाढ हवी, मुलांना फी माफ हवी, नोकरांना सातव्या आयोगाची वाढ हवी, ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन हवी, बालकांना सकस आहार मोफत हवा, वारकऱ्यांना आरोग्य सेवा हवी, औषधे मोफत हवीत.... यासाठी अर्थसंकल्प कशाला हवा? विरोधकांच्या दारी कल्पवृक्ष असेल तर तो शोधावा. ते अधिक सोपे ठरेल. पण तसे घडत नसते.

आर्थिक शिस्त केाणत्याही  व्यक्तीला. संस्थेला, आणि सरकारलाही पाळावी लागते. अुत्तर प्रदेशाच्या निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची घोषणा झाली ती अयोग्यच आहे. पण तिथे ते घडते म्हणून आिथेही घडावे असे महाराष्ट्नतल्या आमदारांना वाटत असेल तर पंजाबच्या नव्या सरकारने लाल दिव्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत, त्याचे अनुकरण करण्याचा आग्रह धरावा. तिथे व्हीआयपी संस्कृती संपविण्याचा निर्णय झाला, तो आिथे - सर्वत्रच - लागू करावा. विधानसभेतील सदस्यांना विशेषाधिकार असतो, तो काढून टाकावा. त्यांनी शेतकऱ्यांच्या बरोबरीला यावे, आमदार निवासातून बाहेर यावे. ते होणार नाही, आपले अस्तित्व दाखविण्याचा अेक फंडा म्हणून अर्थसंकल्पासारख्या  न  कळणाऱ्या विषयांवर रस्त्यातील व सस्त्यातील आंदोलन करणे सोपे ठरते.

सहृदय माणुसकीने प्रश्न सुटेल.
अरुण राजहंस सातारा यांनी त्यांना आलेले अंत्यविधीच्या संबंधातील काही विदारक अनुभव मार्च पहिल्या आठवड्याच्या अंकात दिले आहेत. माणूस जातो तेव्हा त्याचे नातलग दु:खी अुदास असतात, त्यावेळी दक्षिणा विचारून घासाघीस कुणी करीत नाहीत. कुणी बोलण्याच्या मन:स्थितीत नसतो. शिवाय हे विधी करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. मागणी आणि पुरवठा यांत अंतर पडत जाते तसे दर कमी जास्त होणारच. काही भटजी तर तेरा दिवसांचे (पॅकेज) २५हजार घेतात. त्याची ना पावती, ना टॅक्स. आिंदूर-अुज्जयिनीस और्ध्वदैहिक मंडळ आहे, तिथे साऱ्या कार्याचे नाममात्र काही पैसे घेतात. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीनेही सर्व धार्मिक संस्कार केले जातात. धर्ममंडळाच्या निर्णयानुसार त्यांचे पुरोहित ते काम करतात. देणगी-दक्षिणेचे दर माफक आहेत. त्याचे छापील दरपत्रक आहे. त्याची पावती दिली जाते. अेखाद्या गरिबाने अैच्छिक काही दिले अथवा नाही दिले तरी चालते. समाजाची श्रध्दा नाहीशी होअू नये, पण त्यात धर्मशास्त्र जपून गैरप्रकार टळावेत असा त्यांचा चांगला हेतू आहे. कोल्हापूर  पुणे या नगरपालिका अशा कार्यांसाठी शुल्क घेत नाहीत असे वाटते.
आपल्यातल्या कोणीही ते विधी शिकून घेअून ते आपापल्या ठिकाणी करता येतील. कर्ज काढून अंत्यविधीचे - किंवा कुठलेच संस्कार करावेत असे नाही. पण माणसाला आपण होअून त्या चक्रात का गुंतावेसे वाटते हा प्रश्नच आहे. गावोगावी  यासाठी  काही संघटित व्यवस्था करता येणे शक्य आहे.
याची दुसरी बाजू लक्षात घ्यायला हवी. ती अशी की, वकील, डॉक्टर किंवा हल्ली क्लासवाले- ही  मंडळी आपल्या सेवांचे किती पैसे घेतात, त्याला तरी कुठे मर्यादा आहे? वकील फीचे दर न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळतात, त्यात भागत नाही. वकील लोक सांगतील ती फी!  सक्सेशन सर्टिफिकेटसाठी अेका वकिलाने १०हजार घेतले. अेका सनदी लेखापालास आयकर रिटर्न भरण्यासाठी विचारले, त्याने तोंडाला आला तो आकडा -५हजार -सांगितला. अेका हिशेबनिसाकडून ३००रुपयांत भरून घेतले. आपण जाणते स्वावलंबी संघटित व्हायला हवे हाच त्याला पर्याय आहे. श्रध्देचा विषय पैशाने ठरविता येत नाही. श्रध्दा म्हटले की माणूस हळवा होतो, मग त्याच्याकडून काढून घेणे सोपे. त्यात दोष कुणाचा? आपला विचार आपण केला पाहिजे.
       -शैलेंद्र केशव म्हसकर,पुणे ३०       फो नं. (०२०) २४४५१३१९

कडमडते आयुष्य 
माझ्या वयाची कोणी कधी चौकशी केली तर मी न लाजता सांगतो. आतापर्यंत तरी साखर मीठ घोटे गुढगे अशी काही काळजी निर्माण झालेली नाही. त्यातही अेक गंमत म्हणजे मला आतापर्यंत भरमसाठ लागालागी, आिजा झाल्या आहेत. वाहनांचे अपघात असे की, ती वाहने नंतर पाहिल्यावर त्यात सापडलेला मी जिवंत कसा (आणि कशाला?), असे वाटावे.
आम्ही कुटुंबीय अेकदा श्रीवर्धनहून महाबळेश्वरमार्गे साताऱ्याकडे येत होतो. महाबळेश्वर सेाडून ५किमी आलो, गाडी अुतारघाटाला लागली, आणि ब्रेक पूर्ण निकामी झाले. `ओ ओ%% ' म्हणून ओरडेपर्यंत अँबॅसेडर गाडी अुजव्या बाजूच्या नालीत कुशीवर पडली. नालीच्या वरच अुंच टेकाड होते, आणि डाव्या हाताला खोलखोल दरी. नशीबाने आम्ही अुजव्या बाजूला पडायला गेलो. गाडीचं दार अुघडून आम्ही - मी-बायको-दोन पोरं आणि नात्यातली षोडशवर्षी  नात - बाहेर आलो. कुणाला काहीही खरचटलंही नव्हतं. हा अपघात घडताच पुढून अेक फटफटीवाला आला, आणि आमचं पाहून तिथं थांबू गेला, तर तोच सटपटून पडला. ते पाहून आमची पोरं फ्यॅ फ्यॅ करून त्याला हसू लागली. अेवढ्या मजेत हा अपघात साऱ्यांनी घेतला.
पुढं तर सारं निस्तरणं भागच होतं. चारू माझा मोठा मुलगा, तो आणि मी तिथं थांबलो. मी पुन्हा महाबळेश्वरला वर गेलो. मेक्रॅनिक शोधला. त्यास घेअून येआीपर्यंत तीन्हीसांजा झाल्या होत्या, थंडी अुतरू लागली होती. जंगलझाडीत श्वापदाची भीती होती, म्हणून काटक्या गोळा करून जाळ करावा असे मनांत येत होते. तोवर नेमकी आमच्याच भागातून पोरांची अेक टोळी टेंपोतून घाट चढत वर येत होती. आमची अवस्था बघून ती पोरं थांबली. त्यातल्या कुणीतरी आमच्या ड्नयव्हरला ओळखलं. `अरं ल्येका अण्ण्या, हिकडं कुठं?' असं म्हणत ती सगळी पोरं त्यांच्या गाडीतून अुतरली. आम्हाला त्यांनी अेरवीही मदतीचा हात दिलाच असता, पण आता तर ओळखीमुळं त्यांचं ते कामच होअून बसलं! गाडीभोवती त्यांनी अेक वेढा घातला, आणि निर्णय घेतला. पोरं त्या नालीत अुतरली. हाताला लागेल तिथं गाडी धरली, आणि `है हप्प..' असं ओरडत ताकत लावून आमची गाडी रस्त्यावर चार पायी अुभी केली. अेवढी टोळी आडवळणी आमच्या बाजूला असल्यामुळं मेक्रॅनिकही  नम्र वागला असावा. त्यानं गाडी चालती केली, आणि अगदी हळूहळू आम्ही रात्री २ला आमच्या घरी पोचलो. ती पोरं कोण हे मला आज सांगताही येणार नाही.
-तर हे असले अपघात! लहानपणापासून झाडांवरून पडणं, खेळताना पडणं वगैरे तर  काहीच  नव्हे. पण हात पाय प्लॅस्टरमध्ये अडकल्याचं कधीच माहीत नाही.  पाचसात वर्षांपूर्वी  घराजवळच्या सीमेंट गटारीत पाय गेला, आणि काट्कन् आवाजच आला. पावलापाशी घोळ झाल्याचं मला वाटलं. जेवण करून मग स्कूटरवरून अेकटाच मराठे डॉक्टरांकडं गेलो. क्ष किरणातून हाड मोडल्याचं दिसलं. डॉक्टर म्हणाले की, नीट  काळजी  घेणार असाल तर प्लॅस्टर टाळता येआील. नुसतं कापडी पट्ट्यात पाअूल बांधून मी घरी आलो. सारे व्यवहार नेमस्तपणे सुरू होते. बांधलेल्या पावलावर मोजे घालून वर पट्ट्याचं सँडल घातलं की कुणाला कळतही नव्हतं. सभा समारंभही तसे केले. रात्री झोपताना पाय सोडायचा, सकाळी अुठल्यावर बांधायचा. या काळात बऱ्याच आप्तांना कळलं, त्यांनी प्लॅस्टर न घाल्याबद्दल येड्यात काढलं. तीनेक आठवड्यांनी पुन्हा पाऊल चाचपल्यावर `क्ष किरणातून पाहालाही नको', असं डॉक्टर म्हणाले. त्यांनी अुंबऱ्यावर पाअूल दाबायला लावलं, आणि हाड जुळल्याचं सांगितलं. प्लॅस्टर वाचलं, आणि मुख्य म्हणजे बरेच पैसे वाचले. पाय मोडल्याबद्दलचं कौतुक आणि बाकी बरंच काही करून घेण्याचं मला सुचलं नाही.
शाळेत पाचवीला असताना शाळेच्या मागच्या काटेरी कुंपणावरून अुडी टाकून मी शाळा जवळ करीत असे. पण अेकदा अुडी पडताना अुजव्या हातात तारेचा काटा अडकला आणि तळहात फाटला. तसा घरच्या कुत्र्याने अेकदा हात फाडला होता. मुकुंदराव किर्लोस्कर तेव्हा घरी आले होते, आमच्या घरचे बाकी सारे आिंदूरला गेले होते, मी अेकटाच. नंतर मुकुंदराव त्यांच्या पत्रांतूनही `आिंजेक्शने घेतली का?' अशी तंबी देत राहिले. तसाच अेकदा अहमदाबादच्या वाटेवर असताना हाताचं बोट रेल्वेडब्याच्या भिंतीवर आपटून दुखावलं. रात्रभर ठणकलं, पण केाणतंही काम न थांबवता मी जरा सोसलं. नंतर महिन्यानी शंका आली म्हणून डॉक्टरकडं गेलोे. तर म्हणाले, हाड बारीक चिरकले आहे. पण आता खूप अुशीर झाला, जरा चोळून चोळून ठीक होआील. तसं झालं. तीसाव्या वर्षी फुटबॉल खेळताना पायाचा अंगठा दुमडला, तेाही चार दिवस नुसत्या कण्हण्यावर ठीक झाला. असली दुखणी म्हणजे ती दुखणीच नव्हेत!
पाच सात वर्षांचा असताना मला गोवर झाल्याचं आठवतं. त्यानंतर मोठी दुखणी माझ्या वाट्याला अजून तरी आलेली नाहीत. अनेकदा मोठमोठ्या दवाखान्यात गेलो, पण ते दुसऱ्या कुणासाठी तरी! केवळ आमचे दोस्तीतले डॉक्टर आणि त्यांच्या चारदोन पुड्या अेवढ्यावर माझे आतापर्यंत भागले आहे. येथून पुढे किती मोठा खड्डा कुठं आहे ते कसं सांगणार?

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन