Skip to main content

Posts

Showing posts from July, 2015

27July2015

हे कसले प्रतिनिधी! तिकडे संसदेचे आणि इकडे विधानसभेचे अधिवेशन सध्या सुरू आहे. त्या उच्च सभागृहांचे कामकाज पाहिल्यानंतर सुजाण मतदाराला उबग यावा असे चित्र आहे. उद्याच्या स्वातंत्र्यदिनास, व एरवीही वर्षातून चार वेळा ग्रामपातळीवर ग्रामस्थांच्या सभा होतात. एक सोपस्कार म्हणून तो उरकला जातो, त्या गोंधळगाड्यातून नागरिकांना काय मिळते; हा प्रश्न विचारू नये. लोकशाही कार्यपद्धतीत चर्चा व विचारमंथन यांचा सराव होण्यासाठी तो अगदी प्राथमिक पातळीचा प्रयोग, निरुपयोगी असला तरी चालू ठेवणे श्रेयस्कर आहे. तथापि उच्चस्तरीय सभागृहांत आपण निवडून दिलेले प्रतिनिधी जे आणि जसे वागत आहेत, त्यावरून त्यांना ग्रामसभेइतकेही गांभीर्य व परिस्थितीचे भान नाही असे लक्षात येते. चाळीतल्या कजाग बायांचे भांडण तिथे दिसू लागले आहे. सरकार पक्षाचा कारभार व धोरणे सर्वमंगल आहेत असे कुणी म्हणणार नाही. भा.ज.पक्षाचे सरकार केंद्रात आणि बऱ्याच राज्यांत सत्तेवर आहे; त्याचप्रमाणे केरळ-पूर्वांचल-बंगाल-ओरिसा-तामीळनाकेंद्धं-र्त्त्ूद्धॅिींज्ञ््-र्थ्ंगी्-ओर्र्द्धीं%ी-र्डीमुंर्ण्ी वगैरे राज्यांत काँग्रेस किंवा इतर पक्षांचीही सत्ता आहे. काही अप

20 July 2015

ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस भौतिक विकास आणि विज्ञानाची प्रगती होत असतानाही आज मानव समाज समाधानी व सुरक्षित वाटत नाही. त्याचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी वैश्विक मानवता जागी केली पाहिजे. ज्ञानाचा बोध व विज्ञानाचा शोध ह्याचा वापर सामान्य जनतेच्या हितासाठी झाला पाहिजे. जीवनप्रवाहात किंवा भवसागरात भरकट चाललेली नाव संतांच्या जीवनरूपी दीपस्तंभाकडे पाहून पार करता येईल. कारण त्यांच्या जीवनदर्शनात वैयक्तिक साधना आणि सामाजिक धारणा या दोन्हींचा समन्वय दिसतो. महाराष्ट्न् ही अशा संतांची भूमी आहे. भागवत धर्माचा प्रसार आणि वारकरी संप्रदाय निर्मिती या संतांमुळे झाली. जया भक्तीची येतुली प्राप्ती जे कैवल्याते परौते सर म्हणती, जयाचिये लीलेमाजी नीति जियाली दिसे वारकरी पंथात भक्ती हे मोक्षाचे आणि आत्मसुखाचे साधन मानले आहे. (त्याला पंचम पुरुषार्थही म्हणतात.) वारकरी पंथाने भक्तीतत्वाचे मोठेपण स्वीकारले पण भक्तीच्या कर्मकांडाला महत्त्व दिले नाही. भक्ती ही वैयक्तिक स्वरूपात न राहता सार्वजनिक स्वरूपात अस्वीकृत होते, तेव्हाच वारकरी संकल्पना दृढ होते. नामसंकीर्तन प्रसाराबरोबरच अंत:शुद्धी, कर्तव

13 July 2015

सामुदायिकतेचा कायदा करावा महंमद युनूस या बांगलादेशी अर्थतज्ज्ञाने सूक्ष्म आर्थिक व्यवहारांच्या तत्वावर प्रचंड मोठ्या बँकेची उभारणी केली. मायक्रो फायनान्सिंग या नावाने ती अभिनव कल्पना प्रत्यक्षात आली. भारताने त्याचा अंगिकार केला. खेड्यांपर्यंत काम करू लागलेले बचतगट हे त्याचेच एक रूप आहे. पंतप्रधान मोदींची जनधन योजना यशस्वी होईल, कारण अशा छोट्या छोट्या थेंबांनी तळे साचू शकते. अर्थातच त्या तळयातील साठ्याचा लाभही छोट्या थेंबकऱ्यांना तितका मिळायला हवा अशी काळजी घेण्याची जबाबदारी असतेच. भाजीवाल्या-भांडीवाल्या बायांपासून सगळीकडे भिशी चालू असते. क्वचित कुठे एखादी लफंगेगिरी घडते, पण सहसा ही सर्व जबाबदारी नीट पार पाडली जाते असे चित्र दिसते. बचतगटाची कार्यपद्धती अशी की १०-१५-२० जणांचा, किंवा जणींचा एक गट कोणत्याही कारणासाठी एकत्र येतो; त्यांना बँक कर्जरूपाने पैसे देते; त्याची परतफेड ही सामुदायिक जबाबदारी असते.  हा गट समजा काही खाद्यपदार्थ किंवा कपडे वगैरे तयार करत असेल तर ते उत्पादन करणे-विकणे-त्यातून होणारा फायदा.... हे सर्व त्या गटाचे एकत्रितपणे होते. त्यातील एका सदस्याने चुकारपणा केला तर ते

06 July 2015

स्वार्थरहित कर्म हेच तत्व - धनंजय कीर ८ जून १९१४ रोजी लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटले. त्याची कुठे वाच्यता होऊ न देता, त्यांना थेट पुण्यात आणून पोचविण्यात आले. बंदिवासातील टिळकांचे महत्कार्य म्हणजे `गीतारहस्य'. या ग्रंथाचे हस्तलिखित तयार होते. पण हा विषय सर्वसामान्यांस कळावा म्हणून त्यांनी गणेशोत्सवात चार व्याख्याने दिली. त्यानंतर छपाई होऊन जून १९१५ मध्ये `गीतारहस्य' लोकांसमोर आले. त्यास आता शंभर वर्षे झाली. गीतारहस्याच्या शताब्दीनिमित्ताने आणि २३ जुलै (१८५६) या टिळकांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या कर्मयोगी भूमिकेविषयी... जीवन, नीती आणि धर्म यांचे हिंदू तत्त्वज्ञान सांगणाऱ्या `गीतारहस्य' या ग्रंथाचे मुद्रण सुरू झाले होते. हे काम योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही ते पाहण्यास टिळक रोज सकाळी छापखान्यात जात. या ग्रंथासाठी स्वदेशी कागद वापरला जाईल यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले होते. त्या लेखनाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टीचा मागोवा घेत ते म्हणाले, ``माझ्या लहानपणी मोठी माणसे नेहमी सांगत की, पूर्णत: धार्मिक आणि खरे तत्त्वाधिष्ठित जीवन