Skip to main content

Posts

Showing posts from 2018

17-24 Dec 2018

माझा विदेशी नाताळ  यंदाचा नाताळ क्रॅनडात साजरा करायला मिळणार म्हणून मी खूश होतो. आता इतके मित्र-मैत्रिणी झालेत म्हणजे चार-पाच ठिकाणी तरी जेवणाची आमंत्रणं मिळणार म्हणून मी आधीपासूनच दात घासून बसलो होतो. पण कसचं काय! िख्रास्मसमध्ये (म्हणे) इथं लांबच्या माणसांना फारसं जवळ करत नाहीत. म्हणजे `तसं' जवळ करतात. भरपूर गळामिठ्या आणि पाप्यांसह मला शुभेच्छा मिळाल्या. पण गळयात दोन हात टाकले तरी घरापासून मात्र आपल्याला चार हात लांब टाकतात. एकतर माझे बरेच मित्र-मैत्रिणी सडेफटिंग राहात होते, त्यामुळे तेच कुठे ना कुठे - बहुतांशी आईवडिलांच्या किंवा बायकोच्या गावाला जाणार होते. आणि तसाही नाताळ हा प्रामुख्यानं कुटुंबीय आणि गट्टीतल्या फॅमिली फ्रेंडस्बरोबर साजरा केला जातो. त्याउलट पुढच्या आठवड्यात येणारी वर्षाखेर हा सार्वजनिक उत्सव असतो. रोषणाई, आतषबाजी, एकमेकांकडे येणं-जाणं वगैरे. तेव्हा नाताळमध्ये फक्त आईवडील, बहीणभाऊ - मुलं - नातवंडं एवढंच! एरवी चार दिशांना तोंडं असल्यामुळं त्यांना ह्या कौटुंबिक संमेलनाचंही अप्रुप असतं. आपल्याकडच्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मला इथला नाताळ अगदीच `सुना सुना' व

10 Dec 2018

वाङ्मय विकास  ही सर्वांची जबाबदारी! कै.नारायण हरी आपटे हे १ व २ डिसेंबर १९३३ला बडोदा येथे भरलेल्या मराठी वाङ्मय परिषद, तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी  ८५ वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजही समयोचित बोधप्रद आहेत, येत्या मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भाने त्या भाषणाचा गोषवारा- मराठी वाङ्मयाची सध्याची प्रकृती व परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. या अनावस्थेची कारणे अनेक आहेत. त्यांपैकी प्रमुख कारण म्हणजे वाङ्मय-प्रसारासंबंधी आमचे प्रयत्न जितके साक्षेपाने व्हावयास पाहिजेत, तितके ते होत नाहीत. कोणत्याही वाङ्मयाचा उत्कर्ष दोन गोष्टींवर अवलंबून असतो. उत्कृष्ट वाङ्मय निर्माण होणे, आणि वाङ्मयाचा सत्वर व सर्वत्र प्रसार होणे. या दोन्ही गोष्टी परस्परावलंबी आहेत. आम्ही पाररतंत्र्यात असल्याने ही दुर्दैवी परिस्थिती ओढवली आहे. गेल्या शतका-दीडशतकात इंग्रजी लोकांचे साम्राज्य अवघ्या भूमंडलावर पसरल्यामुळे त्यांच्या भाषेला परम भाग्याचे दिवस लाभले आहेत. जगातील सारस्वतांमध्ये इंग्रजी वाङ्मय सर्वोच्च स्थानी विराजमान असून मानवजातीच्या ज्ञानात त्याने विलक्षण व महत्वाची भर घातली आहे. अशा सर्वांगस

3 Dec 2018

मी लोकांचा सांगाती! -संपतराव पवार माझ्या आयुष्याला बालपणापासूनच स्वातंत्र्य चळवळीतील ध्येयवाद आणि राष्ट्न्उभारणीच्या प्रखर प्रेरणेची किनार मिळत गेली. शालेय जीवनात पुरोगामी विद्यार्थी संघटना आणि शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जनचळवळीत सक्रिय राहिलो. १९७२ साली विधानसभेची निवडणूक लढवण्याची जबाबदारी अंगावर आली. काही प्रश्न निर्णायकरित्या लढवले. काही प्रश्नांबाबत शासनाला धोरण बदलावे लागले. पन्नास वर्षांहून अधिक काळ सातत्याने झुंजत राहिलो. चळवळ हे माझे एकट्याचे काम नाही. जे काही घडत गेले त्यामध्ये कार्यकर्त्यांचा उल्लेखनीय सहभाग होता. चळवळीतील खरीखुरी शक्ती तीच होती. या चळवळीचा वृत्तांत लोकांपुढे सादर करावा, काय चुकलं ते शोधावं, या उद्देशाने लिहिलेला प्रवास `मी लोकांचा सांगाती' या नावाने प्रकाशित झाला आहे. या प्रवासात एखाद्या पक्षाशी, विचाराशी एकनिष्ठ राहून उभे आयुष्य पणाला लावणाऱ्या, अखेरच्या श्वासापर्यंत विचार जोपासणाऱ्या,  तत्वनिष्ठ त्यागी माणसांचा सहवास लाभला. तीच माझी प्रेरणा होती. बळीराजा धरण पूर्ण झाल्यावर धरणाची सिंचनव्यवस्था उभी राहिली. नंतर पाणीवाटपाचा एक कार्

23 july 2018

असाच एक दिवस `त्या अेके दिवशी' काय घडलं ते आितरांना आपण सांगत असतो. त्याच त्या घटनांचे तसेच प्रसंग अैकणाऱ्यालाही आठवू लागतात. अेकमेकांस त्या प्रसंगांनी काय वाटतं त्यालाही गती मिळते.  त्याच हेतूने हा अेक दिवस लिहिला आहे. त्यातला मी म्हणजे कोणीही  -तुम्हीसुद्धा! प्रसंग सगळयांच्याच आयुष्यात येणारे; सांगितले यासाठी की, जसं आपण घरी येअून जरा विचारांत पडतो, काहीतरी प्रतिक्रिया अुमटते..... तितकंच व्हावं. त्यात कोणी चूक बरोबर योग्यायोग्य काहीही नाही. -मनुष्यस्वभावाचे नमुने आणि प्रसंग पाहायचे, इतकंच! तर त्या दिवशी सकाळी अेका परिचित  घरातून फोन आला, त्या घरच्या महिलेनं फोनवर सांगितलं की, तिच्या सासूबाआी कसंतरी करू लागल्यात, डोळे निस्तेज वाटतात, बोलायचं बंद झाल्यात. लग्गेच या. त्या बाआींचे पती काही कामासाठी परगावी शहरात सकाळीच गेले होते. फोनवर या बाआींचा निरोप येताच हातातलं काम टाकून झट्कन निघालो. वाटेतूनच निकट परिचयातल्या अेका डॉक्टरला फोन केला. तो तर आमच्या मित्र-परिवारातलाच होता; फार तज्ज्ञ बडा डॉक्टर नव्हे, पण चांगलं प्रॅक्टीस आणि मुख्यत: सामाजिक जाण असलेला. कुणाच्याही मदतीला शब्

16 July 2018

मध्ययुगीन हिंदुस्थानातील  पथिक-गृहे आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पाहतो. सध्याच्या इंटरनेट युगात हे काम एका `क्लिक'सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल बुक करून निश्चिंत होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का? हिंदुस्थानाबाहेरून जे लोक (परदेशी प्रवासी) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे? मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतांतून माहिती मिळते. १७व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. व्यापारासाठी, डॉक्टर म्हणून, सैनिक म्हणून, आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून, साहस करण्याच्या ओढीपायी, -तर काही केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. यांपैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो, कसा प्रवास केला, येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे. त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच, शिवाय या प्रवासवृत्तांतामधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात