Skip to main content

23 july 2018

असाच एक दिवस
`त्या अेके दिवशी' काय घडलं ते आितरांना आपण सांगत असतो. त्याच त्या घटनांचे तसेच प्रसंग अैकणाऱ्यालाही आठवू लागतात. अेकमेकांस त्या प्रसंगांनी काय वाटतं त्यालाही गती मिळते.
 त्याच हेतूने हा अेक दिवस लिहिला आहे. त्यातला मी म्हणजे कोणीही  -तुम्हीसुद्धा! प्रसंग सगळयांच्याच आयुष्यात येणारे; सांगितले यासाठी की, जसं आपण घरी येअून जरा विचारांत पडतो,
काहीतरी प्रतिक्रिया अुमटते..... तितकंच व्हावं. त्यात कोणी चूक बरोबर योग्यायोग्य काहीही नाही. -मनुष्यस्वभावाचे नमुने आणि प्रसंग पाहायचे, इतकंच!
तर त्या दिवशी सकाळी अेका परिचित  घरातून फोन आला, त्या घरच्या महिलेनं फोनवर सांगितलं की, तिच्या सासूबाआी कसंतरी करू लागल्यात, डोळे निस्तेज वाटतात, बोलायचं बंद झाल्यात. लग्गेच या. त्या बाआींचे पती काही कामासाठी परगावी शहरात सकाळीच गेले होते. फोनवर या बाआींचा निरोप येताच हातातलं काम टाकून झट्कन निघालो.
वाटेतूनच निकट परिचयातल्या अेका डॉक्टरला फोन केला. तो तर आमच्या मित्र-परिवारातलाच होता; फार तज्ज्ञ बडा डॉक्टर नव्हे, पण चांगलं प्रॅक्टीस आणि मुख्यत: सामाजिक जाण असलेला. कुणाच्याही मदतीला शब्दश: धावून जाणारा. या बाआींच्या घरी पोचलो. अंथरुणावर निजवलेली ती रुग्ण स्त्री अुसासत होती. तिला भान असावं, पण बोलता येत नव्हतं. श्वास धपापत होता. थोड्याच वेळापूर्वी ही स्त्री नेहमीप्रमाणे चालत बोलत होती. तशी तर ती गेल्या चारदोन वर्षांपासून ठणठणीत नव्हतीच. वयही अैंशी ओलांडून पुढं तीनचार वर्षांचं. त्यामुळं तिचं आजारपण घरच्यांच्या सरावाचं होतं.तरीही आजची लक्षणं जरा काळजी वाढविणारीच होती.
जरा चौकशी आणि काहीतरी अुपाय यांची धांदल चालू करेतोवरच तो डॉक्टर मित्र आला. नाडी वगैरे पाहिली. या स्त्रीच्या मुलाला, म्हणजे घरच्या कर्त्या पुरुषाला फोनवरून कल्पना दिली. अेव्हाना आिकडे आणखी अेकदोघांनी रुग्ण तपासून जाहीर केलं की, तातडीनं मोठ्या शहरी रुग्णालयात गेलं पाहिजे. बाकीची तयारी तातडीनं सुरू केली. परिचयातील अेका नर्र्सबाआीनी सांगितलं की १०८ नंबरच्या फोनवरून सरकारी रुग्णवाही गाडी मिळते. तो प्रयत्न केला.
सरकारी योजनेतून आपल्यासाठी काही सोय होणं हे आजवरच्या समजुतीप्रमाणं कठीणच वाटत होतं, पण सुखद धक्का होता. तो नंबर फिरविताच तिकडून नाव पत्ता स्थान, कुठं जायचं वगैरे जुजबी माहिती भराभर विचारून घेतली गेली. दोन तीन मिनिटं फोनवरच थांबवून तिकडून सांगण्यात  आलं की अर्ध्या पाअूण तासात गाडी येआील. हे कितपत खरं मानावं अशी शंका वैरी मन चिंतीत होतं. पण त्या योजनेशी संबंधी लोक त्याविषयी निश्चिंत होते. बऱ्याच ठिकाणी अशा रुग्णवाहिका सरकारी योजनेप्र्रमाणं तयार ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यातल्या त्यात त्यातल्या जवळच्या ठिकाणाहून गाडी पाठविण्यात आली होती.
वेळ अुलटत चालली म्हणून पुन्हा त्या १०८ नंबरला फोन केला. तो त्या गाडीच्या चालकानेच घेतला. म्हणजे आमचा फोन नंबर तिकडून त्याच्याकडं आलेला होता. त्यानं सांगितलं की जवळच्या वाटेनं येत होतो, पण पावसानं वाटेत अेक झाड पडलं होतं. त्यामुळं फिरून दूरच्या रस्त्यानं यावं लागतंय्. आणखी अर्धा तास लागेल. नाआिलाज. खरोखरीच अर्ध्या तासात पुन्हा त्या चालकाचाच फोन आला.  त्याला घराशी आणलं. त्या गाडीतून अेक तरुणी अुतरली, ती शिकाअू डॉक्टर असावी. तिनं स्थिती पाहिली. चालकासह साऱ्यांनी मदत केली आणि रुग्णाला गाडीत घालून आम्ही शहराकडं निघालो. आमच्यासोबत कुणीतरी बाआीमाणूस हवं म्हणून, नात्यागोत्याचा संबंध नसलेली काँप्यूटरवर काम करणारी अेक तरुण कर्मचारी अैनवेळी आपण होअून पुढं सरसावली. शेजारचा अेक अुद्योजक तरुण पट्कन गाडीत सोबतीला बसला. चारदोन मिनिटांतच गाडी मार्गी लागली. गाडीत मॉनिटर, फोन, प्राणवायूची सोय, वातानुकूलन, सलाआीनची सोय, सगळं होतं. सोबतच्या त्या `डॉक्टरणी'नं घाआी सुरू केली. रुग्ण अत्यवस्थ असल्याचं सांगितलं. सरकारी मदतीची अशी तत्परता असेल तर आपण नागरिकांनी कृतज्ञ राहायला हवं.
रस्त्याला जे पाहिलं ते मात्र अनपेक्षित होतं. रुग्णवाहिका पाहून कुणीही दूर होत नव्हतं. अरुंद रस्त्याशी समोरून मुरुमाचा अेक डंपर आला त्यानंही आमची रुग्णवाही गाडी रोखली, आणि आम्हालाच रस्त्याकडेला दाबत आपला गाडा पुढं नेला. वाटेत अेका खेडेगावात वर्दळ होती. मुलांच्या शाळेची वेळ. रस्त्यात पोरांच्या सायकली, वैरणवाले, अेक बस, चहावाले सगळा पसारा होता. पण कुणालाही या रुग्णवाहीची दखल नव्हती. सोबतीच्या त्या डॉक्टरणीनं सांगितलं की रोजचा हाच अनुभव आहे. कुणीही प्राधान्य तर राहोच, वाट देत नाही. वाटेत अेक रेल्वे फाटक लागलं, ते बंद. रेल्वे गेल्यावर फाटकातून आधी पुढं जाण्यासाठी  ही% गर्दी अुसळली, त्यात आितर साऱ्यांची धांदल. रुग्णाआितकाच आमचाही जीव काळजीनं खालवर होत होता, पण रस्त्याच्या वाहनांना त्याचे काही नव्हते. शहर जवळ आलं तशी ट्न्क दुरुस्तीची गॅरेज लागली. तिथं गाड्या वेड्यावाकड्या अुभ्या होत्या. काही रस्त्यातच खोलून दुरुस्ती सुरू होती. चिखल पाअूस असल्यामुळं कोणतीही चालती गाडी कडेला घेता येणार नव्हती. मग गाडी नेण्यावरून भांडाभांडी सुरू झाली. त्यात आमच्या चालकाशीही जुंपली. आमच्या रुग्णवाहीला आधी जाअू देण्याचे तर राहोच, पण त्या चालकाशी पंगा सुरू झाला.
रुग्णालयाशी पोचलो.आधी कल्पना दिल्यामुळं आणि ते डॉक्टरही परिचयातील असल्यामुळं तातडीनं  हालचाली झाल्या आणि अुपचार सुरू झाले. थोडी स्वस्थता, आणि अुत्कंठा, काळजी. दरम्यान त्या सरकारी गाडीतल्या डॉक्टरणीनं सह्या वगैरे पूर्तता केली आणि ती गाडी गेली. सरकारच्या या कमालीच्या तत्पर सेवेसाठी कोणतेही शुल्क नाही, हे अैकून मी हळवा झालो.
रुग्णालयाच्या दारात चपलांचा मोठा अस्ताव्यस्त पसारा. बाजूच्या भिंतीशी अेक लोखंडी फडताळ होते, त्यावर `पादत्राणे येथे ठेवा' असा फलक होता. पण तो कुणीही वाचला नसावा. अद्ययावत् रुग्णालयाच्या अुत्तम दर्शनी दारात लोकांनी ही गलिच्छ आरास मांडली  होती. तिथे मुकाट अुभे राहून काय करणार म्हणून मी त्या चपला नीट लावून ठेवायला सुरुवात केली. बरेच जोड लावून  झाले पण दोन चपला अेकेरीच होत्या. त्यांच्या जोडीच्या मिळेनात. त्या शोधताना तिथल्या शिपायाने सांगितले  की, काहीजण मुद्दाम अेक चप्पल आिकडं आणि दुसरी लां%ब तिकडं ठेवतात. हेतू असा की कुणी चोरून न्यावी म्हटलं तर त्याला अेकाच पायाची चप्पल दिसते, तो नेत नाही. मला तिथेही हे नवीन शिकायला मिळाले.
आमच्या पळापळीला यश आलं नाही. स्त्री रुग्ण तासाभरात गेली. आता पुढची जुळणी. त्या स्त्रीचा दुसरा सुपुत्र त्याच शहरी राहात असे. म्हणून मग त्याच्या घरी नेण्याचा निर्णय झाला. तोही अशा वेळी आितर अनेकांच्या गरजेला धावून जात असल्यामुळं त्यांचा अेक गट  पुढच्या कामासाठी तयार होता. ते सारं कार्य वास्तविक पुढच्या अेकदोन तासांत आवरता आलं असतं, पण तसं चालत नाही. प्रश्ण भावनिक असतो. दरम्यान काही नातलगांना कळविण्यात आलं, त्यातल्या निकटच्या अेकानी `थांबायला' सांगितलं. हो - नाही - बघू - विचारतो-  काय करावं - असं करत;  हे लोक त्यांच्या  परगावाहून येआीतोवर थांबायचा निर्णय झाला.
हे अंतर अेरवी चार तासांचं. पण तसं मोजता येत नाही. `चला चला', `ही येणार, तो येणार', `त्याला तिकडं जाअून घ्यायचं' ....असं म्हणत तास दोनतास सटकतात. प्रत्यक्ष निघायलाच तितका अुशीर; त्यातही पुन्हा पाअूस, रस्त्याची चालू कामं, तीन्हीसांजेची वेळ टळल्यावर वाहनांचे चकाकणारे दिवेे, वाटेवरच्या दोन शहरांत तुंबलेली रहदारी.... या साऱ्यांतून पोचायला आणखी वेळ. `थांबून' राहिलेली माणसं चढत्या रात्रीनं कातरलेली. आिथून निघायचं कधी, पाचसात मैलांवरच्या घाटावर जायचं कधी, घरी परतायला मध्यरात्र अुलटणार!! अुभं राहून ताटकळलेले घोळके अधूनमधून कुठंतरी बूड टेकत होते. काहीतरी विषय गप्पांसाठी पुरवत होते. कुणीतरी भेटायला येत असल्यानं घरचे दोघे कर्ते धर्ते कुठं बसू शकत नव्हते. त्यांनाही सकाळपासूनचा वेळ ताण-तणावात काढावा लागला होता, पण आता आणखी थोडं साहिलं पाहिजे.
त्यांच्यावर ताण होता, तो येणं स्वाभाविकच होतं. पण जर रुग्ण न दगावता तर, आताच्या क्षणी दवाखान्यात केाणत्या अवस्थेत असता? आसन्नमरण स्थितीच नक्की होती. मग त्या स्थितीतला यांच्यावरचा ताण कमी राहिला असता  की जास्त असता? जास्तच असणार होता. दवाखान्यात जाग्रण करत थांबणे अटळ होते. त्याचा ताण भयंकरच ना! रुग्णाचं वय, त्याचं आजारपण, गेल्या काही दिवसांत आलेली क्षीणता यांतून धडधाकट बरं होणं कठीणच होतं. त्यापेक्षा आताचा ताण तुलनेनं कमीच ना! पण हे सत्य असलं तरी  तसं म्हणायचं नसतं. का?  -ते माहीत नाही, पण तसं म्हणणं सभ्यतेचं नसावं. सभ्यता दांभिक असते? ती सत्याला घाबरते? असेल!! .... विचार करण्याची ही वेळ नव्हे!
वाट पाहायला लावणारी ती मंडळी आली. मग काही स्वाभाविक अुमाळे. आितक्या जवळचं माणूस असं अचानक गेल्यामुळं दाटून येणाऱ्या आठवणी, आणि आजवर हसतखेळत समोर विहरणारी व्यक्ती  समोर अशुभ भीतीच्या लपेट्यात झोपलेली. काळजाचं पाणी होणारच. पण ते पाणी निपटत राहायला आता वेळ नव्हता. चला चला चला म्हणत साऱ्यांनी पार्थिवाला हात घातला. काही आकांत अुठला, आणि महायात्रा निघाली.
दूर जायचं होतं. रस्त्याला दारूण खड्डे, पावसाची पिरपिर, रस्त्याला रेंदा, चढत्या रात्रीची अंधारी वेळ. नदीच्या घाटाशी पोचलो. विद्युतदाहिनीला कुणाचा विरोध नव्हता, पण ती अुपलब्ध नव्हती. डिझेलदाहिनी होती, पण ती या स्थानीच्या रहिवाशांना मिळणार नव्हती, कारण ते महापालिका क्षेत्राच्या बाहेरचे होते. हद्दीतील लोकांना त्यासाठी सवलत दर असेल, पण ही मंडळी बाजारदर द्यायलाही तयार होती. परंतु त्याचा गैरवापर झाला तर? लोक कसल्याही भानगडी गुंडाळण्यासाठी त्या दाहिनीचा वापर करतील, त्याची कुठे नोंद केलेली असणार नाही. मग त्यातून काही भलत्या गोष्टी होतील. माणूस काय काय चांगलं करतो, आणि त्यातूनही वाआीटाचा कायकाय विचारही करू शकतो!!!
लाकडं पावसामुळं दमट होती. त्याचवेळी तिथं आणखी अेक यात्रा येअून पोचली. अंत्यविधीचे भटजी अेकच होते. मग आमचं होआीपर्यंत त्यांना थांबावं लागलं. नदीकाठी भन्नाट पावसाळी वारा होता. नदी भरलेली होती. शिवाय मृताच्या पुत्राचे धर्मकृत्यानुसार सव्यापसव्य समोर चालू होते. मंत्राग्नी दिल्यावर चिता धडाडत पेटेना. लाकडं ओलावलेली. रॉकेल शिंपडायचं तर नेहमीच्या कोट्याप्रमाणं अेकच बाटली आणलेलं. मग ती दुसरी यात्रा जी आली होती, त्यांचे धर्मविधी होआीपर्यंत त्यांनी आणलेलं रॉकेल अुसनं घेतलं. दोघे कार्यकर्ते रॉकेल आणायला गेले. त्यांनी लांब जाअून कुठूनसं आणलेलं दुप्पट रॉकेल अुसनवारी परत केलं, त्यांनाही ते जास्तीचं लागणारच होतं.
आता पावसाचाही जोर वाढला होता. दोनही यात्रा आटोपून अेकमेकांच्या गट्टीपट्टीतली अुरलेली सारीजण रिक्तपणी परत निघाली. मघाशी आणलेली शववाहिका गावात परत जाण्यासाठी वापरावी लागणारच होती, कारण पावसापाण्यात दुचाकीवरून जाण्यापेक्षा ते सोयीचं. त्या मोठ्या गाडीतही तशी दाटीवाटी झाली, पण त्याचं कुणाला काही वाटणार नव्हतं. कधीतरी कोणावरही काहीही प्रसंग येतोच ना! अेकमेकांशी जमवून घेतलं तर कोणतीही यात्रा सुफळ संपूर्ण होते, नाहीतर मग जात्या जिवालाही अडविणारी रहदारी  कुणाची फिकीरही करत नाही!! ही तर माणसं; आणि तीही माणसंच की!!!
***
 संपादकीय
झारच्या जागी लोकशाहीच्या नावाने राज्य आले म्हणून अन्याय दूर होआील असे नाही. तुरुंगातील कैद्यांना जेलर निवडण्याचा अधिकार दिला तर त्यांची सुटका होणार नाही; फक्त तुरुंगाधिकारी बदलेल. -लिओ टॉलस्टॉय
लोकशाही प्रगल्भ म्हणावी का?
जिथे लोकांच्या हितासाठी विविध विषयांवर चर्चा करायची, लोकहिताचे निर्णय घ्यायचे, लोकांच्या अनहितासाठी कठोर कायदे करायचे, ते राबविण्यात सरकार पक्षाला साहाय्य करायचे त्या कायदेमंडळात अलीकडे जो आततायी प्रकार चालला आहे, त्याचा अुबग येअू लागला आहे. देशाची संसद काय आणि राज्याचे विधिमंडळ काय; काहीही काम होअूच  न देण्याआितका हंगामा विरोधकांनी चालविलेला आहे. या लोकांना त्याच त्या आरोपांचा आणि धुडगूस घालण्याचा कंटाळा कसा येत नाही? लहान मुलेसुध्दा काही काळ दंगा केल्यावर मुकाट्याने शांत होतात, या आमदार-खासदारांनी कसले पौष्टिक खाल्ले आहे? त्यांना असे वाटते काय की, आपण कमालीच्या लोकहितासाठीच तडफडत असूून सरकारच्या भिकार कारभारावर संतप्त आहोत, म्हणून मने थाऱ्यावर  न  राहता हा दंगा त्यांच्याही मनाविरुद्ध आपसूकच घडतो असे लोकांनी मानावे? तसे वाटत असेल तर त्यांची चूक होत आहे; आणि ते खरेच असेल तरीही ते कदापि क्षम्य नाही.

त्यांना लोकांचे प्रतिनिधित्व दिलेले आहे. या प्रकारे वागत राहून लोकांचे कल्याण साधणे शक्य होणार नाही हे त्यांनाही ठाअूक नसेल काय? या चुकीचे समर्थन म्हणून कोणत्याही सभेतील आजचे विरोधक असे सांगतात की, आजचा राज्यकर्ता पक्ष जेव्हा विरोधात होता, तेव्हा त्यांनीही याच प्रकारे गोंधळ घातला होता आणि त्याचे बेपर्वा समर्थन केले होते. याचा अर्थ त्यांनी मूर्खपणा केला म्हणून आम्हीही करणार असा होतो. त्या काळच्या विरोधकांनी धुडगूस घालून काम बंद पाडले आणि तरीही त्यांना लोकांनी सत्तेवर आणले. त्याचे कारण त्यांचा धुडगूस लोकांना पसंत होता असे नव्हे, -तर त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार नापसंत होता. आपल्या आजवरच्या अधिकांश निवडणुकांतून जे कोणी विजयी झाले आहेत, त्यांच्यावर लोकांचा विश्वास म्हणून नव्हे, -तर दुसऱ्या पक्षावर ठाम अविश्वास म्हणून त्यांना विजय मिळालेला आहे. म्हणजेच नकारात्मक मतदानाने सत्ता मिळत आली आहे.

याचे सर्वात स्पष्ट आणि ढळढळीत अुदाहरण म्हणजे आणीबाणी निखालस नापसंत म्हणून लोकांनी आिंदिराबाआींना पार ढकलून दिले, आणि त्यानंतरच्या जनता सरकारमध्ये अेकापेक्षा अेक समर्थ संसदपटु आणि सचोटीचे देशभक्त असूनही त्यांचा कर्मदरिद्री कारभार झिडकारून टाकला. दोनही वेळेस स्पष्ट नकाराचे मतदान झाले. चार वर्षांपूर्वी मोदी सत्तेवर आले त्यांच्यासाठी आितर बरीच कारणे घडली, त्या सर्वांत  मोठे कारण म्हणजे आधीच्या सरकार पक्षाचा भिकार कारभार आणि बालिश नेतृत्व! त्या अर्थाने काँग्रेसनेच मोदीना मदत केली असे म्हटले जाते. आजच्या विरोधकांना त्याचे भान नाही असे मानावे लागते. आपल्या चुकीला लोकांचे समर्थन मिळेल असे कदापि नाही. जर आजच्या विरोधकांना मते मिळालीच तर ती त्यांच्या आततायी संसदपटुत्वाला दाद नसेल, तर सरकार पक्षाला नापसंती असेल. ती नापसंती वाढावी आणि त्यात आपले साधावे असा संकुचित विचार आजच्या विरोधी पक्षाचा आहे, म्हणूनच तो निषेधार्ह आहे.

आपल्या संविधानाबद्दल भलत्याच हळवेपणी सगळेजण बोलत असतात. कुणी `राज्यघटना' -असा शब्द जरी अुच्चारला तरी त्याविरोधात राणा भीमदेवी गर्जना आणि रस्त्यावरची जाळपोळ सुरू होते. राज्यघटनेचे पावित्र्य मान्य केलेच पाहिजे. तरीही त्यासंदर्भात आपल्या पूर्वसूरींनी ज्या सावधगिरी सांगितल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. ही राज्यघटना परिपूर्ण तयार करून झाल्यावर ती कुणा व्यक्तीला अगर देशालाही समर्पित केलेली नाही, तर ती लोकांनी आपल्याचप्रति समर्पित केलेली आहे. याचा अर्थ ती सांभाळण्याचे काम नागरिक म्हणून प्रत्येकाचे आहेच. ते कुणा अेका पक्षाचे वा नेत्याचे असल्याचा कांगावा करण्यात काही अर्थ नसतो. जे गैरप्रकार लोकप्रतिनिधींकडूनही सर्रास चालू आहेत ते त्या राज्यघटनेची किती बूज ठेवतात हाच तर चिंतेचा विषय आहे.

 या लोकशाहीला धोके कोणकोणत्या गोष्टींपासून आहेत याची चर्चा होत असते. जागरूक सुजाण नागरिक असतील तर त्यांच्यासाठी प्रगल्भ लोकशाही ही चांगली व्यवस्था असते. लोक जर अुदासीन असतील तर ते बाहेरच्या शत्रूसैन्याहून अधिक धोकादायी असतात असे म्हणतात. पण तसे अुदासीन परवडले म्हणायची अेखादी  वेळ येते. व्यक्तीचे कर्तव्य आणि जबाबदारी यांवर समुदायाची लोकशाही अवलंबून असते. त्याचबरोबरीने चांगल्या लोकशाही राज्यव्यवस्थेने लोकांना अधिकार आणि हक्क दिलेले असतात. तथापि `लोकशाही'त ते हक्क आणि अधिकार `लोकांं'साठी असतात; म्हणजे हक्क अधिकार सामुदायिक असतात, व्यक्तिगत नव्हे! याअुलट कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या व्यक्तिगत असतात. आपल्याकडे अुलट चालते. रस्त्यात घाण फेकण्याचा आपण व्यक्तिगत अधिकार मानतो, स्वच्छता ठेवण्याचे कर्तव्य समुदायाकडे सोपवितो; आणि लोकशाहीत कशी घाण माजते असे म्हणतो. याचा वस्तुपाठ आपल्या प्रतिनिधींनी घालून देण्याचे काम चालविले आहे. ते स्वत: जेवढे दोषी आहेत त्या मानाने नागरिक आणि मतदार कमी दोषी आहेत. लोकशाहीला व्यक्तिगत कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अपेक्षित असतात, आणि त्यायोगे जे हक्क आणि अधिकार प्राप्त होतात ते मात्र `लोकां'चे असतात.

नागरिक नळावर किंवा जमिनींच्या वादात बेफिकीर हाणामाऱ्या करतात, ते त्यांचे प्रश्ण सोडविण्यासाठी विधिमंडळ असते, तिथे हे नेते म्हणविणारे तितक्याच बेेफिकीर हाणामाऱ्या प्रशासकीय बंदोबस्तात, व्यक्तिगत हक्काचे भत्ते खाअून करीत असतात. नळावर किंवा आपापल्या जमिनीत भांडणारेही काही काळाने कंटाळून शांत होतात. हे लोकप्रतिनिधी तर प्रत्येक अधिवेशनात तितक्याच बेमुर्वत दंग्याने सारा वेळ फुकट घालवितात. नागपूरला पावसाळी अधिवेशन यापूर्वीही झाले आहे..तसे ते गेल्या पंधरवड्यात घेतले, आणि अनपेक्षित पावसाने मोठा व्यत्यय आणला. तो दिवस फुकट गेला म्हणून लगेच विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली; पाअूस पडला नसता तर जसे काही हे शांतपणे चर्चा करणारच होते!

या प्रकारंाना खरे तर सभ्य सामान्य जनता विटली आहे. कधीतरी संताप येणे, कधीतरी अनावर होणे वगैरे समजू शकते; पण अधिवेशनाच्या काळात असेच सतत चालू राहणार असेल तर लोकशाहीलाच नव्हे तर सामान्य माणूसधर्मालाही ते सुसंगत नाही. केवळ निवडणुकांची विटकी मोहीम चालवून लोकांच्या शिरावर हा भार देण्याने आपली लोकशाही महान ठरेल असे नाही. लोकप्रतिनिधींना तेवढे तरी भान यावे ही साऱ्या संविधान समितीच्या स्वर्गस्थ आत्म्यांकडेे प्रार्थना!!

वीर महिलेचे योग्य स्मरण
आपल्या अंकात अरुणा असफअली यांच्यावरील लेेख वाचला. विस्मृतीत जात असलेल्या जाज्ज्वल्य देशभक्त व क्रांतिकारक महिलेचे जीवन आजच्या पिढीसमोर मांडले याबद्दल समाधान वाटले. पत्रमहर्षी बापूराव लेले यांनी पन्नास साठ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख स्मरणपूर्वक वापरला; त्यामुळे लेले व अरुणाजी या दोघांचेही स्मरण व्यक्त झाले आहे
आवर्जून यासाठी लिहिले की, १९४२-४५ या काळात महाराष्ट्नत  -विशेषत: सातारा सांगली कोल्हापूर या भागात जो स्वातंत्र्यलढा झाला, त्यामागे अरुणा असफअली आणि अच्युतराव पटवर्धन हे दोन मुख्य आधार होते.  ८ऑगस्टच्या रात्री महात्माजी व अन्य नेत्यांना अटक झाल्यावर, पुढचा लढा अहिंसक की सशस्त्र असणार या संभ्रमातून स्वातंत्र्यसैनिकांना त्या दोन तडफदार नेत्यांनी  बाहेर काढले. `अहिंसक की सशस्त्र हा वाद बाजूला ठेवा आणि मिळेल त्या मार्गाने क्रांतीचा लढा चालू ठेवा' असा स्पष्ट आदेश अरुणाजींनी दिला. त्यामुळेच महाराष्ट्नत १९४२चा लढा क्रांतीकारक झाला. अरुणाजींचे पुण्यस्मरण म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरमहिलेचे पुण्यस्मरण आहे. अरुणाजी व बापूराव लेले या दोघांच्या आठवणीमुळे संपादकीय कौशल्य प्रकट झाले आहे.
-बा.भाा.पुजारी, `आशीर्वाद', राजवाडा, सांगली
फोन-०२३३-२३७५८७२

स्वरांची शताब्दी
महाराष्ट्नचे श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म २५ जुलै १९१९चा. यंदाचे वर्ष म्हणजे त्यांची शताब्दी. त्यांचा जन्म कोल्हापूरचा, मूळचे नाव राम. त्यांनी अेच अेम व्ही ग्रामोफोन कंपनीसाठी पहिले गीत १९४१ला केले तेव्हा सुधीर हे नाव घेतले, तेच कायम झाले. वामनराव पाध्ये हे त्यांचे पहिले गुरू. प्रभात कंपनीसाठी त्यानी १९४६ला संगीत दिग्दर्शक म्हणून काम केले.
ग दि माडगूळकरांच्या गीतरामायणाचे संगीत आणि गायन यांमुळे ते अजरामर झाले. देशापरदेशांत त्यांचे सुमारे दोन हजार कार्यक्रम झाले. त्याशिवाय अनेक हिंदी मराठी गीतांनी त्यांना घरांघरांत स्थान मिळाले. शेवटच्या टप्प्यात त्यांनी सावरकरांच्या जीवनावरचा चित्रपट मोठ्या प्रयत्नांनी पूर्ण केला. प्रारंभापासून ते रा स्व संघाचे स्वयंसेवक होते. अमेरिकेत आिंडिया हेरिटेज् फाअूंडेशन चे संस्थापक सदस्य होते. २९ जुलै २००२ला त्यांचे निधन झाले. आजचे संगीतकार श्रीधर फडके हे त्यांचे सुपुत्र होत.

रानडे दूध डेअरी -यवतमाळ
-चंद्रकांत रानडे
आमचे दोन मोठे बंधू दादा आणि आप्पा नोकरीला लागले होते. मी आणि एक बंधू शरदचंद्र मॅटि्न्क झालो आणि आपण नोकरी न करता काही तरी वेगळा उद्योग करावा, असा विचार आमच्या दोघांच्या मनात दृढ होऊ लागला. दोन्ही वडीलबंधूंनी तो उचलून धरून पाठिंबा दिला. घरी २-३ म्हशी ठेवून दुधाचा व्यवसाय १९७३ सालापासून सुरू होता. हाच व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्याचा निश्चय केला. १९८८ साली यवतमाळमध्ये आमची डेअरी सुरू झाली. स्वत:च्या म्हशी घेऊन शेतावर स्वयंपूर्ण केंद्र सुरू केले. खेड्यांतील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित करून, त्यांना व्यवसायाची प्रत्यक्ष माहिती व स्पष्ट कल्पना यावी, त्यांनी जोडधंदा करून आपली सांपत्तिक स्थिती सुधारावी, तसे वातावरण निर्माण करावे हा आमचा प्रयत्न होता. केंद्राची क्षमता कमी पडू लागली म्हणून पिंपरीचे केंद्र बंद करून यवतमाळ येथे अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रसामग्री बसवून रोज तीस हजार लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेली डेअरी सुरू केली.
आज आमच्या डेअरीच्या प्रशस्त हॉलमध्ये पांढऱ्या शुभ्र स्टेनलेस स्टीलच्या साठवणुकीच्या टाक्या, पाईप, पॅकिंग मशीन, आलेले दूध प्रक्रिया करण्यासाठी साठवण टाक्या आहेत. स्निग्धतेची मोजणी होऊन टाकीत पडलेले दूध ७५ ते ८०से. अंशापर्यंत तापवले जाऊन एकदम २-४ अंश से.पर्यंत थंड करून स्टीलच्या मोठ्या बंद टाक्यांत साठवले जाते. नंतर पाव, अर्धा व एक  लिटरच्या प्लास्टिकच्या पिशव्यामध्ये सीलबंद केले जाते. सध्या रोज ५ ते ७ हजार लिटर गायीचे व २४ ते २५ हजार लिटर म्हशीचे दूध प्रक्रियेसाठी जमा होते. यवतमाळ-वाशिम जिल्ह्यांत असलेल्या २० स्वयंपूर्ण व संगणकीकृत केंद्रातून रोज ३० लिटर दूध जमा होते. काम वाढले व विक्री व्यवस्थेची जबाबदारी वाढल्याने श्री.शरदचंद्र यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली व माझ्याकडे उत्पादन व यांत्रिकी विभागाची जबाबदारी आली.
आमचे स्वत:चे तीन स्टील टँकर आहेत. त्यातून दूध आणले जाते. गायीचे आणि म्हशीचे दूध वेगवेगळे आणून वेगवेगळे पिशवीत बंद केले जाते. म्हशीच्या दुधातील स्निग्धांश(फॅट) गायीच्या दुधापेक्षा ३ ते ३.५ टक्के जास्त असतो. उत्पादकाला त्याच्या दुधातील स्निग्धांशानुसार लिटरला ३७ ते ४२रु भाव देतो. दिवसा संकलन, प्रक्रिया व रात्री विक्रीकरता पिशव्या पाठवणे, असे काम असते. डेअरीत १२५ कर्मचारी असून त्या सर्वांचा अपघाती विमा आहे.
दही, तूप, लोणी, चक्का व श्रीखंड हे पदार्थ व पेढे, बर्फी व दुधापासून मिठाई करणे सुरू केले असून त्याला उत्तम प्रतिसाद आहे. यवतमाळमध्ये आमची स्वत:ची दोन विक्री केंद्रे आहेत. त्यांचा कारभार आम्ही बंधू व पुढील पिढी पाहते. २० केंद्रांची यंत्रसामग्री, वाहने व इमारत सगळे मिळून १० कोटिंची गुंतवणूक आहे. भविष्यात विस्तार करत आहे. जसजसे दूध जास्त संकलित होईल तशी वाढ करण्याची योजना आहे. रोज ८० हजार ते १ लाख लिटर दूध जरी संकलित झाले तरी तितकी यंत्रसामग्री व इतर पायाभूत गोष्टी उपलब्ध करू, असा विश्वास आहे.
तरुणांनी या क्षेत्रात प्रवेश करण्याबाबत खूप वाव आहे. जे दूध उत्पादक वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करू शकतील त्यांना भररपूर संधी आहे. आपल्या दुधाचा दर्जा कायम सांभाळून डेअरीशी संबंध टिकवणे महत्वाचे असते. असे संबंध टिकवून कित्येक वर्षांपासून आमच्या डेअरीलाच दूध देणारे खूप उत्पादक आमच्याकडे आहेत. धंद्यात येणाऱ्या अडचणींचा आमच्या डेअरीत प्रत्यक्ष परिणाम झालेला नाही. पण शासनाच्या अन्न सुरक्षा योजनेमुळे खेड्यांतील दूध उत्पादकाकडे कामाला मजूर येत नसल्याने उत्पादनात घट होत असल्याचे दिसते. ही तक्रार सर्वच क्षेत्रांतून ऐकू येत आहे.
आमच्या डेअरीत तुम्हाला माशा दिसणार नाहीत, किंवा डेअरीत दूध सांडल्याने एक प्रकारचा विशिष्ट वास असतो, तो नाही. याला कारण अॅफ्ल्युएंट ट्नीटमेंट प्लँट आहे. डेअरीत सांडलेल्या पाण्याचा व दुधाचा प्रत्येक थेंब तिथे गोळा होऊन ते पाणी शुद्ध करून बगीचा व गाड्या धुण्यासाठी ते वापरले जाते.

आठवांचे साठव
मुलांचा आश्रम
१९६६ला मंगलोरी कौलांच्या अेजन्सीने माझ्या `करियर'ची सुरुवात झाली तरी स्वत:चा व्यवसाय तर करायचाच होता. आमची स्वत:ची मोठी जागा असल्यामुळे आपल्या जागेत धंदा आणायचा विचार मी केला. अेजन्सीच्या कौलांचा डेपो भाडोत्री जागेत होता, त्याचे भाडे डेक्कन ट्न्ेिंडग कंपनीकडून गोसलिया शेडजी देत असत. तेच भाडे त्यांचा माल ठेवल्याबद्दल आम्हाला मिळायला हरकत नव्हती. पण व्यवहारिक अडचण अशी होती की, आमच्या दूर गावाबाहेरच्या, आजवरच्या या  शेतजागेत व्यापारधंदा होणार का? आिथं तर गाडीवाटही धड नव्हती. पाअूस झाला तर चालायचं अवघड, तिथं मालमोटार तरी कशी यायची? पण त्या मोठ्या अडचणीकडं मी चक्क दुर्लक्ष केलं. आमच्याकडं ग्राहक वळेल ही खात्री बाळगून आम्ही तो कौलांचा डेपो आमच्या आवारात हलवला.
कामचलाअू कुंपण, गेट वगैरे अुभं केलं. आतल्या बाजूला विहीर, पिंपरणीचं मोठं झाड गार सावलीला अुपयोगी होतं. कामचलाअू ऑफीस म्हणून कच्च्या मातीत अेक छप्पर घातलं., त्यालाच अेक पडवी ठेवली. पुढंमागं लगेच लोखंडी मालाचं दुकान काढायचं डोक्यात ठेवून भिंतीला आडवी चौकट टाकून काअूंटर केलं. झोपडपट्टीत टपरी असते, तसं हे आमचं बिझिनेस सेंटर!! सभोती सारी शेतीभाती. कुठंकुठं प्लॉट्समध्ये घरं अुभारू लागली होती.
अेका घरात भाडेकरू म्हणून प्रसिद्ध दूध व्यापारी डी आर पाटील हे येअून राहिले होते. त्यांचा मुलगा विनायक, त्याला आम्ही सारे पोपट म्हणायचो. ते अलीकडच्या काळात राज्य सहकारी दूधसंघा(महानंद)चे चेअरमन होते. तो, विनू कोल्हटकर म्हणून त्याचा अेक सुदामा मित्र, आणि आमच्या शेजारचा बाळू फाळके असे आमच्या ऑफीसच्या पडवीत झोपायला असायचो. माझा भाअू शिक्षक, आणि ती पोरं त्याचे विद्यार्थी होते. पण ती माझ्या गट्टीत असायची. त्यांच्या घरजागा तशा अडचणीच्या होत्या, आणि आिथं जरा वात्रट धुडगूस करायला मिळायचा. या जागेत वीज नव्हती, कंदील लावलेला असे.
या काळात माझा मोठा भाअू -आम्हा भावंडांसह सारा परिसर त्याला भाअूच म्हणायचा  -हा शिक्षक म्हणून काम करायचा. १९६७ च्या अखेरीस त्याला फणफणून ताप आला, तो मुदतीच्या तापावर गेला. आमचं सारं घर सैरभैर झालं. त्यातच त्याची शुध्द हरपली. त्याला तातडीनं मिरजेला मिशन हॉस्पीटलात नेण्यास सांगण्यात आलं. यापूर्वी १९५२साली त्याच्यापेक्षा अेक मोठा भाअू शाम म्हणून होता, तो अपेंडिक्सने आजारी होता, त्याला मिरजेला नेलं होेतं, तो त्यात गेला. याही कर्त्या मुलाच्या बाबतीत तोच नाआिलाज झाल्यानं आआी वडील खचून गेल्यासारखे झाले. मी जेमतेम १७ वर्षांचा होतो, पण कॉलेज वगैरे सोडून आल्यामुळं तसा त्यांच्या हाताशी होतो. गावातली अेकमेव मोटार भाड्याने ठरवून भाअूला रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर आमच्या आिथं आधी केलेला डॉक्टरी अुपाय योग्य नव्हता, अॅलोपथिक औषधांचे प्रमाण चुकीचे झाले होते, हे आम्हाला तिथं मिरजेच्या डॉक्टरांकडून कळलं.सुमारे अठरा दिवसांनी त्याला दवाखान्यातून सोडलं. घरी आल्यावर त्याला कमालीचा अशक्तपणा होता, त्याच्या शुश्रुषेत माझा काही काळ गेला.
साधारण त्याच सुमारास आमच्या कौलाच्या व्यवसायाचे स्थलांतर आमच्या आडवळणी जागेत झाले.  याआधी भाअूच्या बरोबरीचे खूप मित्र आमच्या घरी अभ्यासाला म्हणून यायचे. विट्ठल सावंत आणि लाला जाधव हे तर पुढे कित्येक वर्षे येत राहिले होते. माझ्या शाळकरी वयात माझ्या सोबतची कितीतरी मुलं अभ्यासाच्या नावाखाली हुंदडायलाच यायची. शेतामळयात शेंगा-आंबे चिकू चरायला मिळायचं आणि गाणी सूरपारंब्या ते क्रिकेट हुतूतू असे चालायचे. अभ्यास तितपतच. पण ती परंपरा या १९६७ सालीही सुरू राहिली होती. आता माझ्याबरोबरीची मुलं कॉलेजात वगैरे गेली होती, त्यामुळं ही नंतरची पिढी आमच्याकडं झोपायला म्हणून यायची. अशा अनेक पोरांचा आश्रम म्हणजे आमचं `वाल्मिकि'!
-वसंत आपटे, किर्लोस्करवाडी

जाणता अजाणता ...
पाहता पाहता मुलं मोठी होतात ते लक्षात येतं, पण त्याचवेळी आपण म्हातारे होतो ते लक्षात येत नाही. आपल्या लक्षात येत नसलं तरी आितराच्या येतंच की. कधीतरी अेक अनुभव वाचला होता, मी (म्हणजे तो लेखक) अेकदा बसच्या रांगेत अुभा होतो. मला तशी जाण्याची घाआी नव्हती, त्यामुळं बसथांब्यावरून आिकडंतिकडं गंमती पाहात निवांत अुभा होतो. काही तरुण मुली रांगेत होत्या, त्या तशा चुणचुणीत आणि असायच्या तितक्या छानच होत्या. अेक बस भरून आली, आमच्यातल्या चारदोनजणांस घेअून गेली. मला अुगीच वाटलं की, या पोरींच्याच बसमध्ये आपल्याला जागा मिळायला हवी. नंतर अेक बस जराशी मोकळी आली. त्यात मी म्हटल्यासारखं आम्हा साऱ्यांनाच घेतलं. तरीही मला अुभं राहावं लागणार हे नक्की झालं. अुभं राहायचं तर त्यातल्या त्यात बरी जागा पाहावी म्हणून मी अेक `जागा' निवडली. वरच्या दांडीला धरून अुभारलो. तिथंच मी कंबर टेकवली, त्या बाकावर अेक तरुणी बसलेली. भल्या घरची चांगली मुलगी वाटली. बस चालली; आणि त्या पोरीचं लक्ष माझ्याकडं गेलं. ती पट्कन् अुभी राहिली अन् मला म्हणाली, ``काका, तुम्ही बसा आिथं. मी राहीन अुभी.'' -त्यावर काही बोलायचं  न  सुचता मी मुकाट्यानं तिनं दिलेल्या जागी बसलो. ती मुलगी कधी अुतरून गेली कळलं नाही. घरी आलो तरी मी बैचैन होतो.
माय डे%ज् आर ओव्हर हे म्हणायला धाडस लागतं. मी अजूनही करू शकतो, मी काही कुणावर विसंबून नाही, माझा मी समर्थ आहे.... ही वाक्यं तरुण मुलं जितकी वापरत नाहीत तितकी वयस्कर माणसं वापरतात. त्यांना तसं म्हणावं लागतं, सांगावं लागतं याचाच अर्थ - डेज् आर ओव्हर! आपल्या परोक्ष किंवा अपरोक्ष आपल्या वयाची जाणीव करून देणारे प्रसंग येत असतात. `कृतांतकटकामलध्वज जरा दिसो लागली' हे आपल्याला कळत नसलं तरी आितरांना कळतं.
ओळखीचे अेक गृहस्थ भेटले, त्यांचं मुंडण केलेलं. शंका घेअून दुसऱ्यानं विचारलं, `घरचे सारे ठीक आहेत ना?' ते गृहस्थ म्हणाले, `बरं आहे, मध्यंतरी आजी गेल्या.' मग पुढचा प्रश्ण, `अरेरे, काय वय होतं?' त्यांचं अुत्तर अैकल्यावर आत ओरखडा अुठला. ते म्हणाले, ``तसं कमी वय नव्हतं, तुमच्याअेवढंच असेल.'' अजून यौवनात मी असं समजत होतो, पण यानं तर माझं वय जाण्याचंच ठरवून टाकलं. त्यापुढं `तुम्ही कधी जाताय्...' असं म्हणाला नाही हे नशीब. परंतु आपण आता जाण्याच्या वयाचे झालो हे त्याच्याकडून कळल्यावर काय झालं असेल!!
कधीतरी नातवंडासोबत बड्या मॉलमध्ये गेलो. काहीतरी वस्तू तश्शीच पाहिजे म्हणून वरच्या मजल्यावर जायचं होतं. सर्वांबरोबर मी सरकत्या जिन्यापाशी गेलो, तर तिथला कर्मचारी म्हणाला, ``काका, या आिथं लिफ्टपण आहे.'' तुम्हाला सरकत्या जिन्याचं जमायचं नाही हे त्यानं लक्षात आणून का दिलं असेल?  अेका खाजगी मोठ्या दवाखान्यात अेकाला `पाहायला' गेलो; तर तिथं दारातच स्वागतिकेनं विचारलं, `सर, व्हील चेअर?' मी तर माझ्या पायानं तेजतर्रार आत आलेला होतो; मग या भवानीला माझी चाल दुबळी का वाटली हे मला कळेना.
कुठं लग्नाकार्यात जेवायला जावं तर तिथं बरंच अगत्य आणि नम्रता दिसू लागते; पण ती मनाला सहन होत नाही. बरेचजण वाकून नमस्कार काय करतात; हाताला धरून खुर्चीत काय बसवतात; आपण येताना दिसलो तर पट्कन अुठून जागा काय देतात...! या त्यांच्या सद्भावनांत  सन्मान समजायचा की सरत्या वयाची जाणीव? ताटली वाढून घेण्यासाठी समोरचे रंगतदार पदार्थ निरखत रांगेत अुभारलो तर `काका, तुम्ही बसा. मी आणून देतो.' हे पुढ्यात येतं. नुसतं तेवढंच नाही, ताटली हातात देताना `तुम्हाला चावतील चालतील असेच पदार्थ आणलेत..' हेही अैकून घ्यावं लागतं. घरच्या फडताळाशी चढून पुस्तक काढू म्हटलं तरी `तुम्ही नका चढू. अुगीच काहीच्या बाही व्हायचं..' ही सूचना येते. वास्तविक ते काम दुसऱ्या कुणाला जमत नाही, पण आपण करायचं म्हटलं तर करू देत नाहीत. आणि खरं सांगायचं तर कुणी नसताना ते करण्याची आपल्यालाही जरा भीती असतेच.
मध्यंतरी मतदार पडताळणीची माणसं घरी आली. जरा निवांत म्हणून त्यांना विचारलं, `गेल्या वेळच्या याद्या असतात ना? मग ही पडताळणी कशासाठी करता बाबानो?' तो बाब्या अुत्तरला, `यादी आमच्या हातात आहेच, त्यातलं कोणकोण शिल्लक राहिलंय ते पाहावं लागतं ना? नाहीतर मग दुसरंच कुणीतरी त्या नावावर मतदान करतं...'  आपल्याला समक्ष `असलेलं' पाहून त्याला बरं वाटलं की वाआीट, हे सांगता येणार नाही. आपण अजून `असल्याची' जाणीव तरी किती लोकांना असेल? मग वाटायला लागलं, हल्ली आपल्याला येणारी पत्रं फोन भेटी फारच कमी झाल्यात ना? कुणी फारसं मोजत नाही का? कुणा स्नेहीजनांस चहाजेवायला बोलावलं तरी येण्याचं टाळतात, त्याचं कारण आपण नको असतो असं काही नाही. पण त्यांनाही वयामुळं येणं जिकिरीचं झालेलं असणार. सकाळी त्यांचाही पूजापाठ असतो, नातवंडांना शाळेत पोचवायचं असतं त्यामुळं त्यांना जमत नाही. दुपारी वामकुक्षी आवश्यकच असते, अून सोसत नाही. आणि रात्री पथ्यं सांभाळणं असतं, वेळेत घरी यायचं असतं! जास्तीचा वेळ झाला तर सुना-मुलांनी न्यायला यावं लागतं.
निराशावादी लोक म्हणतात, `आज आपला शेवटचा दिवस आहे असं समजून जगावं.' आणि आशावादी लोक म्हणतात, `आज आपला पहिलाच दिवस आहे असं समजावं.' दोघांचंही खरंच म्हणायचं, कारण आता वादविवाद तरी कुठं घालावेसे वाटतात? पुलाच्या जवळ आलो तरी पावलं टाकत राहायची, पूलही ओलांडता येतोच ना! पण आपण कितीही विश्वासानं पुलावर पोचलो तरी सोबतीचा कुणीतरी `सावकाश हं, जपून....' असं काळजीपोटी सांगतं. तेव्हा ओळखावं की आपल्या सेटची बॅटरी डाअून होत आहे, बाकीचे आपल्याला सांभाळून घेतील. परंतु बॅटरी रीचार्ज होआीलच असे नाही.
***
येरळा संस्थेचा वर्धापनदिन
  सांगली जिल्ह्यात आपल्या मूलभूत सामाजिक कार्यक्रमांनी नावारूपाला आलेल्या येरळा प्रोजेक्ट्स सोेसायटीने आपली बेचाळीस वर्षे पूर्ण करून ४३व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने अेक विशेष कार्यक्रम आयोजित केला होता. संस्थेच्या जालीहाळ प्रकल्पाच्या परिसरात `घरोघरी देवराआी' ही अभिनव योजना त्या दिवशी सुरू करण्यात आली. त्या योजने अंतर्गत जालीहाळ (ता.जत) भोवतीच्या २२ गावांतील शेतकरी व रहिवासी यांनी आपल्या घराभोवती मोकळया जागेत, बांधावर, झाडांची रोपे लावायची आहेत. ५हजार अेकरावर प्रत्येकी २०० झाडे अशी दहा लाख रोपे लावण्याचे अुद्दिष्ट असून त्याचा प्रारंभ शेतकऱ्यांनी केला. अंबा, चिंच, जांभूळ, कवठ, बेलफळ, आवळा, पिंपळ वगैरे देशी झाडांची रोपे संस्थेने अुपलब्ध करून दिली आहेत. शिवाय अॅबझॉरबर, गांडूळखत यांचेही वाटप करण्यात आले आहे.
घराभोवती वा शेतात आपल्या आिष्टदेवतेच्या स्मरणाने वृक्षारोपण करण्यात येआील व देवराआी म्हणून त्याचे जतन करण्यात येआील. या कार्यक्रमात कृषितज्ज्ञ प्रा.जमदग्नी, निवृत्त वनअधिकारी तानाजीराव मोरे, क्रांंतिवनाचे निर्माते संपतराव पवार, पत्रकार जयसिंगराव कुंभार आित्यादी मान्यवर समभागी झाले होते. संस्थेच्या प्रयत्नांतून तयार झालेली `ड्न्ॅगनफळा'ची बाग हे मोठेच आकर्षण ठरले आहे. दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारे हे पीक शेतकऱ्यांनी संमत केले असून त्याची लागवड मोठ्या प्रमाणात होअू शकेल. संस्थेचे डिजिटल स्कूल, क्युरीऑसिटी सेंटर, शेेतीविषयक प्रयोग, स्वयंचलित रेडिओ केंद्र, आणि अन्य सामाजिक अुपक्रम पाहून साऱ्या पाहुण्यांनी खूप समाधान व्यक्त केले.
ही संस्था कमळापूर ता खानापूर येथे १९७६ला स्थापन झाली, त्याखेरीज आता जालीहाळ, चांदोली, पुणे याही परिसरात अेकात्मिक विकासाचे कार्यक्रम राबवीत आहे. हुपरी, विटा, कुपवाड येथेही संस्थेने प्रकल्पाधारित काम केले; या कार्यक्षेत्रात अेक वर्षात जन्मणाऱ्या मुलींच्या पालकांना संस्थेच्या वतीने प्रत्येकी ११ रोपे केशर आंब्याची भेट म्हणून देण्यात येतात. संस्थेचे अध्यक्ष नामदेव पाटील, कार्याध्यक्ष प्रा.सप्तसागर, सेक्रेटरी राजाभाअू देशपांडे आणि त्यांचे सारे सहकारी मोठ्या तळमळीने हे प्रकल्प राबवीत आहेत. दूरवरच्या खेड्यांतील सामान्य लोकांचे आशीर्वाद आणि सदीच्छा त्यांना मिळत असल्याचे तेथील लोकांच्या डोळयांतून जाणवते.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन