Skip to main content

Posts

Showing posts from September, 2013

16 Sept.2013 - Apale Jag

अजून ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद कशाला? - अरुण गोडबोले एके काळी ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादामुळे महाराष्ट्न् - विशेषत: पश्चिम महाराष्ट्न् आणि मराठवाडा - खूपच विघटित झाला होता. महाराष्ट्नच्या प्रगतीला आणि एकात्मतेला बाधा आणणाऱ्या त्या काळापासून आता आपण खूप पुढे आलो आहोत. वादाचे जुने कंगोरे काळाच्या ऐरणीवर घासून ठोकून खूपसे झिजलेले आहेत. धार्मिकतेचा पाया, आता पुरेसा ठिसूळ झालेला आहे. तरीही राजकीय स्वार्थाकरिता तो वाद पुन्हा धुमसत राहावा असे प्रयत्न राजकीय वा तथाकथित नेते अधूनमधून का होईना, पण जाणीवपूर्वक करताना दिसतात, त्याचा खेद वाटतो. वि.द.घाटे यांचे `दिवस असे होते' हे आत्मचरित्र वाचनात आले. शिक्षण क्षेत्रातील विचारवंत, प्रतिभावंत साहित्यिक म्हणून ते गणमान्य होते. त्यांनी त्यांच्या तरुणपणी मराठा समाज संघटित होण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी या वादांवर आपल्या आत्मचरित्रांत दोन स्वतंत्र प्रकरणे लिहिली आहेत. महात्मा फुले यांना मानाचा मुजरा करून घाटे यांनी त्यांच्या कामगिरीचे `अलौकिक' असे वर्णन केले आहे, `फुल्यांची चळवळ ब्राह्मणांच्या विरोधात नव्हती, तर जातीसंस्थेच्या विर

2 sept..2013 - Apale jag

न्यायव्यवस्थेची अन्याय्य वेदना दिल्लीची भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि त्या जवळपास पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. बातम्या आणि चित्रफिती लोकांनी सादर करून त्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केल्यावर न्यायालयाने वारंवार निर्देश देऊनही दिल्ली महापालिका दखल घेत नव्हती. पाण्यामुळे मोठी वित्तहानी झाली. काही उपाययोजनाच न करण्याबद्दल अधिकाऱ्यांना न्यायालयाने खडसावले की, `इथे काही न्यायालयीन व्यवस्था शिल्लक आहे म्हणून तुम्ही येथवर आलात, अन्यथा लोकांच्या रोषापुढे तुमची खैर नव्हती. न्यायालयाचा आदेश गंभीरपणे घ्या, आणि काम करा. तुम्ही तुमचे काम गंभीरपणे केले नाही तर लोक तुम्हाला चोपतील.' `कायदा आणि सुव्यवस्था' या नावाची एक भोंगळगिरी सध्या आपल्या देशात नांदत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. सामान्य नागरीकसुद्धा बेकायदा-अनैतिक भ्रष्ट वागतो, पण पुष्कळदा त्याचा तो नाइलाज असतो हे खरेच आहे. सामान्य माणसाला समोरच्या अरेराव बेफिकीर चुकार माणसाची मानगूट पकडून मुस्कटात द्यावी असे जितक्या वेळा वाटते, तितक्या प्रत्येक वेळी तो तसे वागत नाही. ही सामुदायिक वर्तणुकीची किमान सभ्यता सांभाळली ज