Skip to main content

Posts

Showing posts from March, 2018

5 March 2018

अवसायन आणि दिवाळखोरी  (इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी) कोणत्या ना कोणत्या कारणापायी व्यवसायामध्ये अपयश आलेल्या कंपनीला तोटा येऊ लागला की, वित्तीय समीकरण विस्कटून जाते. कर्जउभारणी केलेली असेल तर परिस्थिती बिकट बनते. हप्ते आणि मुद्दलाची परतफेड थकायला लागते. असा थकबाकीदार कारखाना अगर कंपनी अवसायनात(इन्सॉल्व्हन्सी) काढणे भाग पडते. नवीन मालक अथवा चालकाहाती सूत्रे सोपवली की आशा पल्लवित होतात. तेही नाहीच जमले तर कंपनीची दिवाळखोरी (बॅन्क्रप्टसी) जाहीर करून ती बंद करण्याखेरीज पर्यायच राहात नाही. घायकुतीला आलेल्या कंपनीची मालमत्ता विकून टाकून थकित रक्कमेची वसूली करायची, एवढाच पर्याय उरतो. ते पाऊल उचलावे लागणारच असेल तर सारी प्रक्रिया शास्त्रशुद्ध व पारदर्शकपणे पार पडावी. `इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी कोड'नामक संहितेची योजना याच कार्यासाठी झालेली आहे. विख्यात अमेरिकी कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या कादंबरीतील एका वाक्याची आठवण होते- ``तुझे दिवाळे निघाले तरी कसे?'' असा प्रश्न एक पात्र विचारते, त्यावर तो संबंधित उत्तर देतो -``प्रथम हळूहळू निघाले आणि मग एकदमच दिवाळे