Skip to main content

5 March 2018

अवसायन आणि दिवाळखोरी 

(इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी)

कोणत्या ना कोणत्या कारणापायी व्यवसायामध्ये अपयश आलेल्या कंपनीला तोटा येऊ लागला की, वित्तीय समीकरण विस्कटून जाते. कर्जउभारणी केलेली असेल तर परिस्थिती बिकट बनते. हप्ते आणि मुद्दलाची परतफेड थकायला लागते. असा थकबाकीदार कारखाना अगर कंपनी अवसायनात(इन्सॉल्व्हन्सी) काढणे भाग पडते. नवीन मालक अथवा चालकाहाती सूत्रे सोपवली की आशा पल्लवित होतात. तेही नाहीच जमले तर कंपनीची दिवाळखोरी (बॅन्क्रप्टसी) जाहीर करून ती बंद करण्याखेरीज पर्यायच राहात नाही. घायकुतीला आलेल्या कंपनीची मालमत्ता विकून टाकून थकित रक्कमेची वसूली करायची, एवढाच पर्याय उरतो. ते पाऊल उचलावे लागणारच असेल तर सारी प्रक्रिया शास्त्रशुद्ध व पारदर्शकपणे पार पडावी.
`इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी कोड'नामक संहितेची योजना याच कार्यासाठी झालेली आहे. विख्यात अमेरिकी कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या कादंबरीतील एका वाक्याची आठवण होते- ``तुझे दिवाळे निघाले तरी कसे?'' असा प्रश्न एक पात्र विचारते, त्यावर तो संबंधित उत्तर देतो -``प्रथम हळूहळू निघाले आणि मग एकदमच दिवाळे वाजले!'' अडचणीत आलेले उद्योग अवसायनात वा नादारीत काढण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्याच्या दिशेने आपल्या देशात १९९२ सालापासून पावले उचलली जात होती. २०१५ सालापर्यंत काही घडले नाही. जे काही झाले ते त्यानंतरच.
सुविहित कायदा अस्तित्वात आणण्यासाठी २०१५ सालातील डिसेंबर महिन्यात एक विधेयक मांडण्यात आले. मे २०१६ मध्ये `इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी'कायदा अस्तित्त्वात आला. खुलेपणाचा माहौल नांदायला लागल्यानंतर व्यवसायउद्योगांना तीन प्रकारच्या स्वातंत्र्याची अपेक्षा असते. पाहिजे त्या व पचेल त्या व्यवसायक्षेत्रात उद्योगधंदा स्थापन करण्याचे स्वातंत्र्य; मनाजोगता व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य; आणि मनासारखा धंदा नाहीच जमला तर आपले चंबूगबाळे उचलून बाहेर पकडण्याचे स्वातंत्र्य.
स्वातंत्र्यानंतर पाच दशके भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये परवाने-परमिटांचे साम्राज्य नांदले. ज्या कोणाला व्यवसायक्षेत्रात कारभार थाटावा असे वाटेल त्याला प्रथम परवाने व परमिटे घेण्याची शर्यत करावी लागत असे. म्हणजेच, पाहिजे त्या व्यवसायक्षेत्रात प्रवेश करण्याचे खुले स्वातंत्र्य नव्हते. १९९०च्या प्रारंभी हे पहिले स्वातंत्र्य उद्योजकांना दिले गेले. २००० सालानंतर व्यवसाय मनाजोगता चालवण्यासंदर्भात दुसरे स्वातंत्र्य उद्योजकांच्या पदरी आले. मात्र प्रसंगी कारखाना बंद करून बाहेर पडण्याचे तिसरे स्वातंत्र्य काही त्यावेळी त्यांना नव्हते. अपयश आल्यानंतर संबंधित उद्योजकाला बाहेर पडण्याची कार्यप्रणाली सिद्ध करण्यासाठी आेंकार गोस्वामी समितीने तिचा अहवाल १९९३ सालीच सादर केलेला होता. परंतु, व्यवसाय बंद करून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य मिळालेले नव्हते. `इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी कोड'ची निर्मिती त्यासाठीच करण्यात आलेली आहे. कारखान्याच्या, कंपनीच्या अथवा उद्योगाच्या कर्जांची परतफेड करत असताना, पहिलीवहिली थकबाकी चढेल त्याच वेळी नादारीसाठी अथवा अवसायनात काढण्यासाठी कार्यप्रक्रिया चालू करण्याची तरतूद या संहितेमध्ये आहे. परतफेडीचा हप्ता पहिल्यांदा थकेल त्याचवेळी कायदेविषयक तरतूदींची पूर्तता करून आणि व्यवस्थापकीय मंडळ बरखास्त करून, व्यवस्थापन व त्याचे नियंत्रण दुसऱ्या व्यक्तीकडे अथवा व्यवस्थेकडे सोपविले जावे, अशी कार्यपद्धती नमूद करण्यात आलेली आहे. शक्यतो थकबाकी उद्भवूच नये अशा पद्धतीने कारखाना चालवण्याची ऊर्मी, मालक अथवा प्रवर्तकांच्या मनीमानसी जागती असावी हे अपेक्षित आहे. थकबाकी चढली आणि असा उद्योग अवसायनात काढण्याबाबत अर्ज दाखल झाला की, संबंधित उद्योगाचे नियंत्रण धनकोंकडे जाते, ही यातील कळीची तरतूद होय. त्या उद्योगासंदर्भात काय निर्णय घ्यावयाचा ते ठरविण्याचे अधिकारही मग धनकोंच्याच हाती राहतात.
कोणत्याही देशाचा आर्थिक वाढविकास तीन बाबींवर अवलंबून राहतो. अर्थव्यवस्थेत असणारे उत्पादन घटक, साधनसामग्री,  संस्थात्मक जीवन ही पहिली बाब. दुसरे म्हणजे बाजारपेठीय स्पर्धा; आणि सर्जनशीलता आणि सर्जकशक्ती ही तिसरी महत्वाची बाब. स्पर्धात्मकतेला वाव जितका अधिक, तितके अकार्यक्षम उद्योगव्यवसाय हद्दपार होण्याचे प्रमाण अधिक. अशी चाळणी लागून गेल्यानंतर कार्यरत कार्यक्षम उद्योग सरस उत्पादनघटकांचा वापर घडवून आणतात. उत्पादनवाढीचा वेग दमदार बनवतात. विकसित देशांमध्ये आर्थिक वाढविकासातील ८०टक्के वाढ, स्पर्धा आणि नवसर्जन या दोन घटकांद्वारे घडून येत असते. विकसनशील देशांमध्ये मात्र याच्या नेमका उलटा प्रकार दिसतो. विकसनशील देशांमध्ये स्पर्धा आणि नवसर्जन या दोन घटकांचे योगदान अवघे ४० टक्क्यांच्या आसपास आहे. वाढविकासाचा दर उंचावयाचा असेल तर स्पर्धात्मकतेचे आणि नवसर्जनशीलतेचे सक्षमीकरण जारी राखणे अनिवार्यच ठरते.
स्पर्धा आणि नवसर्जन यांना पूरक वातावरण लाभायला लागले की, लाभहानीचे चक्र गतिमान बनते. अकार्यक्षम उद्योगधंद्यांचा टिकाव लागत नाही. नवसर्जनाने बाळसे धरले की जुने उत्पादनघटक, जुनी यंत्रे व तंत्रे कालबाह्य ठरतात. त्यांच्या पुरवठादारांवर संक्रात येते. हे चक्र फिरतच राहते. जितकी स्पर्धा अधिक, नवसर्जन जितके अधिक तितके अपयशाचे प्रमाणही अधिक; असे समीकरण स्थिरावू लागते. अर्थव्यवस्थेतील गतिमानता टिकवून धरण्यात आणखी एक घटक म्हणजे अर्थकारणातील स्वातंत्र्य. अपयश पदरी पडले तर गाशा गुंडाळून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य. ते उद्योगांना लाभणे हे व्यापक हिताच्या दृष्टीनेही कळीचे ठरते. अडचणीत सापडलेल्या कारखाने व कंपन्यांना निवृत्त होण्यास अनुकूल प्रणाली निर्माण करणेच उपकारक ठरते.
हलाखीत गेलेल्या मालकांनी कंपन्या अवसायनात काढल्या अथवा नादारी जाहीर केली तर कुंठित उद्योगांमध्ये गुंतून पडलेल्या उत्पादनघटकांचा वापर अन्य सक्षम उद्योगधंद्यांना करता येतो. म्हणजेच पुरेपूर वापराअभावी उत्पादनघटकांचा अपव्यय थांबतो. असे उत्पादनघटक सक्षम क्षेत्रांकडे वळवले जातात. त्यांद्वारे उत्पादकतेची कमान उंचावते. `इन्सॉल्व्हन्सी अॅन्ड बॅन्क्रप्टसी कोड' हे असे आर्थिक स्वातंत्र्य विस्तारणारे पाऊल ठरू शकेल.
(`अर्थविज्ञान वर्धिनी'च्या २०१७ मधील प्रसार लेखा वरून संक्षिप्त)-डॉ.एस.एम.साहू 

 संपादकीय
नेत्यांना आरक्षणाची गरज
गेल्या पंधरवड्यात दूरचित्रवाणी च्या झी चॅनलवर झालेली अेक मुलाखत बरीच गाजली, गाजत आहे. महाराष्ट्नतील  सर्वार्थाने हेवीवेट नेते शरद पवार यांना राज ठाकरे यांनी प्रश्न विचारले; त्यांची अुत्तरे मा.पवार यांनी बोटचेपत्या शब्दात दिली. कारण स्पष्ट मते व्यक्त करणे राजकीय नेतेपदाला तसे कठीणच असते; आणि शरदराव पवार यांना  ते जमण्यासारखे नाहीच. `आता विषयच काढलात म्हणून स्पष्टच सांगतो...' असे म्हणूनही त्यांनी अुत्तर असे दिले की मूळ प्रश्न बाजूलाच राहिला, आणि अुत्तर मात्र घोळात घोळत राहिले. अेके काळी अशा छापाची भोंगळ मतमतांतरेही  मुत्सद्देगिरी म्हणून खपत होती; आताच्या काळात तसे होत नाही. सर्व प्रकारची माध्यमे मुक्त झाल्यामुळे त्यांची चिकित्सा होेअून चहूअंगी मूल्यांकन होत जाते. राज ठाकरे यांनी `फास्ट ट्न्ॅक' म्हणून अेका शब्दात अुत्तरे देण्याच्या प्रश्नांना पवार यांनी लांबड लावली. पण त्यांच्या मनांतील काही अुत्तरे वॉट्स अॅप नावाच्या चव्हाट्यावर येत होती. त्यातले श्री.पवार यांचे अेक काल्पनिक अुत्तर मार्मिक होते, ते गुळमुळीत नव्हते, पुरेसे स्पष्ट होते. प्रश्न होता, `राहुल की मोदी?' - पवारांचे अुत्तर होते, `जो पंतप्रधान  होआील तो!'

प्रत्येक नेत्याचे स्तुतिपाठक आणि द्वेषपाठक असतातच. जे पवारांचे चाहते असतील त्यांना पवारांची मुलाखत फारच सुसंस्कृत, वेगळया अुंचीची आणि राष्ट्नला वेगळी दिशा देणारी वगैरे वाटली असण्यात वेगळे काही नाही. पण त्यांच्या काही अुत्तरांनी लोकांच्या मनांत प्रश्न अुभे केले त्याची दखल निदान पवारांच्या स्तुतिपाठकांनी नव्हे तर हितचिंतकांनी घ्यायला हवी. श्री पवार हे त्यांच्याच म्हणण्यानुसार दिल्लीत `ग्रेट किंवा पॉवरफुल मराठा लीडर' म्हणून ओळखले जातात, आणि तसे ते आहेत. विद्यमान  महाराष्ट्नतील मोेठ्या नेत्यांची नावे घ्यायची तर पवारांना अग्रक्रम मिळेल हे निर्विवाद खरे आहे. त्यामुळेच त्यांची अुत्तरे अैकल्यावर जे प्रश्न सुरू होतात ते निदान त्यांच्या चाहत्यांनी तरी मनावर घ्यायला हवेत.

`यशवंतराव चव्हाण की आिंदिरा गांधी?' यावर चव्हाणांच्या या शिष्याने थेट चव्हाणांचे नाव घेण्याअैवजी आिंदिरांजींचा जुना किस्सा अैकविण्याचा वळसाघास का घेतला? बुलेट ट्न्ेन मुंबआी ते अहमदाबाद अशी होणार आहे. त्याला राज ठाकरे यांचा विरोध अेक वेळ ठीक, कारण तो विनाकारण असू शकतो. पण पवारांचा विरोध का; -तर अहमदाबादहून मुंबआीत लोक येतील पण मुंबआीतून अहमदाबादला जाणार नाहीत; त्यामुळे मुंबआीत गुजरात्यांचा भरणा वाढेल. हाच न्याय लावायचा तर बारामतीहून पुण्याला रेल्वे झाल्यावर पुण्याचे लोक बारामतीला  न  येता, बारामतीचे लोक पुण्यात वाढत गेले. पुणेकरांवर त्यामुळे अन्याय झाला का? बुलेट ट्न्ेेन मुख्यत: आधुनिक व्यवसायवाढीसाठी आहे, अविकसित भाग म्हणून ती बिहार किंवा झारखंड किंवा बुलडाण्यास करावी का? जपान ती करून देआील का? यात गुंतणाऱ्या भांडवलावर नगण्य व्याजदर आहे, मुदत भरपूर आहे म्हणून ते साहाय्य करणारे जपानही सारासार विचार करणार, फायदा बघणार. त्यात आपलेही बरेच साधून जात असेल तर ते का करायचे नाही? काँग्रेसनेच तर तो टप्पा त्यांच्या कारकिर्दीत सुचविलेला होता, मोदींनी नाही. वसआी विरार या गुजरातशी सलग्न भागात हल्ली गुजराती पाट्या दिसू लागल्यात हे पवारांनी धोक्याचे म्हणून नोंदले. मुंबआीवर गुजराती अतिक्रमण होण्याचे षडयंत्र म्हणून त्यांनी अुल्लेख केला. त्याचबरोबर ते असेही म्हणाले की, मुंबआी महाराष्ट्नपासून बाजूला करणारा वरतून जरी कोेणी आला तरी त्याला ते शक्य नाही! ही दोन्ही विधाने परस्परविरोधी आहेत. त्यातले खरे कोणते? गुजराती (काल्पनिक) षडयंत्र निकामी करण्याचे फुकाचे श्रेय घेण्यातला तो भाग असू शकेल का? ती ताकत असेलच तर मग बेळगाव टांगणीला का राहिले? ते तर त्या समितीचे अध्यक्षच! क्रॅलिफोर्नियामध्ये आपले लोक वाढले, तिथे पिचत फलक मराठी दिसू लागल्याचे अैकण्यात आहे, त्याबद्दल आपण आनंद मानायचा की ट्न्ंपसाहेबांनी ते मराठी षडयंत्र म्हणून फलक फोडायचे? सांगली जिल्ह्यातील खेडोपाडीची बरीच तरुण मंडळी चांदीसोन्याच्या गलाआीधंद्यात आितर राज्यांत जातात, त्याबद्दल पवारांनी काही कार्यक्रमांत कौतुक गायिले होते; मग अुत्तर भारतीयांच्या मुंबआी पुणे प्रवेशाला विरोध कोणत्या तत्वात बसवायचा? भा ज पक्षाला अेकमेव पर्याय म्हणून काँग्रेसच आहे, आणि राहुलजींच्यात हल्ली खूपच चांगला बदल दिसतो असे ते म्हणतात, मग त्यांचे सारे राष्ट्न्वादी पठ्ठे काँग्रेसमध्ये विलीन का होत नाहीत? जास्तीत जास्त काही पदरी पडावे अेवढाच अुद्देश आहे का? दिल्लीत मराठी नेतृत्व पुढे येअू  न  देणारी काही माणसे प्रभावी ठरत असतात असे ते म्हणाले. मग तो अडथळा नितिन गडकरी, प्रमोद महाजन, प्रतिभा पाटील या अुच्चपदी गेलेल्यांस का झाला नाही? पवारांना का झाला?

विविध प्रश्नांची बरीच अुत्तरे असा गोंधळ व द्विधा वाढविणारी होती. परंतु अेक अुत्तर मात्र खरोखरीच स्पष्ट आणि नेमके होते. ते म्हणजे जातीधर्मावर आधारित आरक्षण  न  देता ते आर्थिक निकषावर दिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. वास्तविक हे अुत्तर राजकीय लाभांच्या विचाराला विरोधी, परंतु महाराष्ट्नच्या वैचारिक पुरोगामी संस्कृतीला साजेसे होते. ते दिल्यामुळे बाकीच्या अुत्तरांतील `पवारशैली' बाजूला टाकण्याजोगी होती. तरीही ते अुत्तर जागोजागी वाद पेटविणार अशी सार्थ भीती होती. मराठा समाजाच्या त्या मागणीला पवारांचा पाठिंबा व्यक्त होत असला तरी, त्यांच्या स्वभावात ते बसत नसावे असे अनेकांना आजवर वाटत राहिले होते. त्यामुळे आजच्या स्पष्ट  न  बोलण्याच्या काळात ते मत व्यक्त झाले. त्याबद्दलचा अंदाज असला तरीही पवारांसारख्या समर्थ नेत्याने अशी स्पष्ट भूमिका घेण्याने समाजजीवनाला आणि नव्या युगाच्या जागतिक संदर्भालाही अेक नवी दिशा मिळू शकली असती. पण त्यावर विरोधी प्रतिक्रिया अुमटू लागल्यावर मा.पवार यांनी, आता साऱ्या शेतकऱ्यांनाच आरक्षण देण्याची अफलातून भूमिका मांडली आहे.बहुधा ही मागणी कधी मान्य होण्याची शक्यता नसल्यामुळे पवारांनी आधीच्या विरोधाची तीव्रता कमी करण्यासाठी ती  मांडली असेल. आता शेतकरी कोण, त्यांची वर्गवारी कशी, किती अेकराचे धनी, त्यात अुच्चवर्णीय शेतकरी बसतील का, ते आितरांस चालेल का वगैरे मुद्द्यावर वाग्युध्दे सुरू होतील. चकवा देअून वादळातून बाहेर पडण्याचा पवार साहेबांचा अुद्देश सफल होआील. राजकारणी असा असतो, असायला हवा. आजकाल ज्यांना आारक्षणाची खरोखरी नितांत गरज आहे असा वर्ग थोडा आहे. पण बहुसंख्य नेतेगिरीला आरक्षणाचे तापते तवे आपापल्या पोळया भाजण्यासाठी गरजेचे वाटतात.

पवारांना व त्यांच्या पक्षाला कोणते धोरण तारेल याचा अंदाज आलेला नसावा, असे मात्र मुलाखतीचा विचार केल्यावर वाटू लागते. महाराष्ट्नवर प्रभाव टाकणाऱ्या नेतृत्वाने असे अतार्किक गोंधळाचे समर्थन करणे महाराष्ट्नच्या जनतेलाही अवघड होणार आहे. तो गेांधळ जागता ठेवणे अेवढाच त्यांचा अुद्देश असल्यास  न  कळे!

मत-मतांतरेे
व्याप कुणाचा ताप कुणा
पुन्हा अेकदा  बँक घोटाळयाची सुनामी आली आहे. माल्या, नीरव मोदी यांसारखे ठग बँकांना बुडवून राजरोस पळून जातात, आणि तिकडे चैनीत राहतात. आिकडे आपल्या बँका मात्र नुकसानीने घाआीला येतात. त्या नुकसानीचा खामीयाजा बँकांच्या ग्राहकांवर आम्हा ठेवीदारांना भुगतावा लागतो. बँकांच्या ठेवीवर मिळणारे व्याज दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे, वरिष्ठ नागरिक बँकेच्या व्याजावर निर्वाह करीत असतात, त्यांचे मात्र हाल होत असतात. त्या ठगांची देशाविदेशांतील संपत्ती निलामी करून सारी रक्कम वसूल करायला हवी. अन्यथा हा खेळ तसाच चालू राहील.

काश्मीर सीमेवर रोजच्या रोज आपले जवान शहीद होत आहेत, हे बलिदान आणखी किती दिवस चालणार? घोषित युद्धापेक्षाही शहीद होणाऱ्यांची संख्या जास्त होत आहे. युद्ध दोघांनाही परवडणारे नाही; परंतु केवळ दबाव आणल्याने पाकिस्तान थांबेल हेही शक्य वाटत नाही. तरीपण किमान आपल्या हातात आहेत ते उपाय करावेत. देशाच्या जेलमधील सर्व आतंकी प्रलंबित खटले निकालात काढून, जन्माची जरब बसेल अशी कडक शिक्षा द्यावी. कायदे वेळकाढू असल्याने हे लोक जेलमध्ये आरामात राहतात. जी शिक्षा आतंकवादींना तेवढीच त्यांना मदत करणाऱ्यांनाही दिली जावी. या सर्वांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. शत्रूवर धाक कसा हवा याचे उत्तम उदाहरण म्हणजे इस्राईल. आतंकवादी जगात कुठेही स्फोट घडवतात पण इस्राईलला स्पर्श करण्याची हिम्मत होत नाही; कारण परिणामांची जाणीव त्यांना आहे.
-सुरेश आपटे, आिंदोर (म.प्र)  फोन-९८९३९९६७५६

तारतम्याचा अभाव दिसला
`न्यायाधीश सामान्य होऊ नयेत` या संपादकीय लेखातील आपले भाष्य वाचनीय व प्रबोधनपर आहे. न्यायाधीशांनी मांडलेली तक्रार  त्यांना काम मिळण्याबाबतची आहे. त्यांत काही सुधारणा व बदल करण्याचे काम अंतर्गत व्यवस्थेकडे असते. पत्रकार परिषद घेअून त्याविषयी बभ्रा करण्याचे कारण नव्हते. राष्ट्न्पतींची खास भेट घेअून त्यांवर तोडगा काढता आला असता. त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांनीसुध्दा त्यांना मिळालेल्या कोणत्या माहितीची `बातमी' करायची याचेही तारतम्य आणि विवेक ठेवायला हवा.
               -नारायण खरे, पुणे ५१  फोन-(०२०) २४३५५९१४

सुभाषित रत्ने
सुभाषिते हा संस्कृतातील अुत्तम वाङ्मयप्रकार आहे. बोधप्रद सांगायचं, ते चार दोन ओळींच्या काव्यात मांडलं जातं, आशयानं ते सार्वकालिक सर्वसमावेशक असतं.

रे रे चातक सावधानमनसा मित्रक्षणं श्रूयतां ।
अंभोदा बहवोहि संंति गगने सर्वेपि नैकादृशा: ।
केचित्् वृष्टिभि: आर्द्रयन्ति धरणीं गर्जंति केचिद् वृथा ।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरत: मा ब्रूहि दीनं वच: ।।

होई सावध चातका, क्षणभरी मित्रा विचारा करी ।
आकाशी जरि मेघ खूप दिसती ते सारखे ना परी ।
काही वर्षति गर्जतात दुसरे ना ते कधी वर्षती ।
जे जे पाहसि अंबरी ढग तयां तू याचना ना करी ।।
-प्रेषक : रामशास्त्री अर्जुनवाडकर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे-३०

अन्नपूर्णा सर्किट टेक
या हिमालयीन यात्रेमध्ये बिकट वाटा आणि दमछाक  अनुभवत २ आठवडे संचार केला. त्यातील काही स्मरणीय नोंदी-
हिमालयातील अन्नपूर्णा सर्किट ट्न्ेक चा नंबर पहिला पाचात लागतो. ही भ्रमंती नेपाळमधील अन्नपूर्णा शिखराभोवती घड्याळाच्या उलट दिशेने होते. या ट्न्ेकमध्ये भाग घेण्याची संधी मला मिळाली. ग्रुप लीडर होते चारू जोगळेकर आणि राजाभाऊ पाटणकर. सतरा जणांचा आमचा चमू होता.

ट्न्ेकच्या आरंभी शिवाजी महाराजांच्या जयजयकार केला. ट्न्ेकच्या सुरुवातीलाच सर्व वाहनांशी संबंध संपला. पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. चढण पार केल्यावर हॉटेलला जाण्यासाठी चाळीसेक पायऱ्या चढताना देव आठवत होता. संध्याकाळी मुक्कामी पोचलो तेव्हा गुडघे बोलायला लागले होते. थोडं फिवरीश वाटत होतं. पहिल्याच दिवशी अशी अवस्था असेल तर ट्न्ेक कसा होणार असं वाटायला लागलं. पहाटे जाग आली. दुखणं थांबलं होतं!
वाटेत रस्त्याची कामं चालू असल्यानं कामगारांची ये जा होती. कष्टाची कामं बघूनच अंगावर काटा आला. अरुंद पायवाटेवर आम्ही एक एक पाऊल जपून टाकत होतो. पूर्ण लांबीचा विजेचा खांब खांद्यावर घेऊन दरीकडे पाठ करून पाऊल वाटेने एकेक कामगार चालला होता. अरुंद वाट आणि लांब खांब म्हणून तो आडवा चालत होता, डोंगराकडे तोंड आणि दरीकडे पाठ, दुसरा त्याला मार्गदर्शन करत होता. पाठीवर गॅसचे सिलेंडर घेऊन जाणारे मजूर दिसले. एका ठिकाणी तर छोटा फ्रीज पाठीवर बांधून घेऊन डोंगरवाटा तुडवणारा माणूस बघितल्यावर आपली आपल्यालाच लाज वाटते.

ताल हे गाव होतं. नेपाळी प्रथेनुसार स्वागत कमान लागली. छोटंसं पण स्वच्छ गाव. बाजूला प्रचंड पहाडाची भिंत. हॉटेलच्या मागे एक मोठा धबधबा कोसळत होता. त्यावर वीज निर्मिती चालू होती. काही ठिकाणी चक्की बसवली आहे. काही ठिकाणी वीज निर्मिती होते.

अन्नपूर्णा आणि मानासलु ट्न्ेकचे मार्ग धारापानी इथे एकत्र येतात. ट्न्ेकचे नियम खूप कडक आहेत. प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर कठोर निर्बंध आहेत. त्यासाठी परमिटची तपासणी होते. एक पाटी दिसली. वर जाण्याचा रस्ता होता, त्याठिकाणी पुरातन गुहा असल्याचे पाटीवर दर्शविले होते. सर्वानुमते ही ऐतिहासिक गुहा बघून पुढं जायचं ठरलं पायऱ्या चढायला सुरुवात केली. पठार लागलं तरी गुहेचा कुठे मागमूस नाही. कोणाला विचारावं तर नजरेच्या टप्प्यात मनुष्य नाही. थोड्या सावलीत थांबून आपला कसा `पोपट' झाला हे समजून हसत सुटलो.

कोटो हे ठिकाण २६४० मीटर्स उंचीवर आहे. या ठिकाणी छोटी बाजारपेठ आहे. काम झाल्यावर वजन कमी करण्यासाठी किंवा पैसे मिळविण्यासाठी अनेक विदेशी ट्न्ेकर्स आपल्या जवळचे सामान डीस्पोज करतात, ते इथे विक्रीला असते. यात बऱ्याच चांगल्या वस्तू मिळून जातात. मलाही एक चांगले कोलंबियाचे जाकेट मिळाले. इथल्या हॉटेल्सचं वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छ बेड्स आणि प्रसाधनगृहं. मुक्कामाच्या ठिकाणी गरम पाण्याने आंघोळ करायला मिळणं म्हणजे सुखाची परमावधीच.
हुमदे हे एक छोटं गाव आहे पण इथं विमानतळ आहे. काठमांडूहून इथं छोटी विमानं येतात. मुख्यत: विदेशी ट्न्ेकर्स याचा वापर करतात. बचावकार्यासाठी हेलीकॉप्टर्स इथून उड्डाण करतात. आमच्या हॉटेल समोर विमानतळ, छोटी धावपट्टी होती.

मनांग ३३५० मीटर्स या ठिकाणी आंतरराष्ट्नीय वैद्यकीय संस्थेतर्फे उंचीवरच्या आजार/शारीरिक अडचणींवर मार्गदर्शनपर व्याख्यान असतं. ब्रागा गावात नेट क्रॅफे आहेत. देशी विदेशी मद्य उपलब्ध आहे. इथल्या बेकरीत मालकाचा छोटा तीन वर्षांचा गोड मुलगा खेळत होता. त्याला हॅलो म्हटल्यावर त्यानं, हॅलो , हेु वे र्ूेी वे! असं म्हणून आमची वाचा बंद केली. त्याला कामचलाऊ इंग्रजी येत होतं!

अनेक ठिकाणी घसरणीची पायवाट होती. हिरवाई नसल्यामुळे माती सैल. नुसते दगडांचे कपचे. दर अर्ध्या तासानी आठवणीने घोट घोट पाणी पीत होतो. प्राणवायूच्या कमतरतेमुळे दम लवकर लागतो त्यावेळी श्वास फुलू न देता विश्रांतीही शक्यतो उभ्याने घ्यायची. श्वास नॉर्मलला आला कि पुन: लेफ्ट राईट सुरू. मनांग ते याक खारका अंतर ७ कि.मी, एवढं अंतर पार करायला साडेतीन तास लागले. हाईट गेन ७५० मीटर्स. या उंचीवर स्वैरपणे उडणारा सर्पगरुड दिसला. उंचीवरचा एक परिणाम म्हणजे भूक आणि झोप कमी होतात. पण नियमाप्रमाणे उपाशी झोपायचं नसतं, म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी योग्य राहते. असेच चालत, पडत सर्वोच्च ठिकाणी, थोरांगला इथं पोचलो. सर्व बाजूंनी हिमालयाची शिखरं दिसत होती. समोर उतार. खाली दूरवर गंडकी नदीचं खोरं दिसत होतं.  आमच्या ग्रुप लीडर चारू जोगळेकरची तर ही पाचवी वेळ, या ठिकाणी जास्त वेळ थांबणे धोक्याचे असते, कारण हवा कोणत्याही क्षणी बदलते. असा समज असतो की चढ अवघड आणि उतार सोपा, खरं धोका उतरतानाच असतो. उतार लागला तो घसरणीचा, वाळू पसरलेली होती, त्यामुळे चालताना वेग येत नव्हता. उताराचा पायावर परिणाम झाला होता. पायांना फोड आले होते.

मुक्तीनाथ मंदीर सुरेख आहे श्री विष्णूची धातूची पद्मासनातील मूर्ती आहे. प्रदक्षिणेच्या मार्गावर १०८ पाण्याच्या धारा आहेत. इथं हेलीपॅड आहे. जोम्सोम आणि काठमांडू इथून हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध आहे. इथे बौद्ध मठ आहे. त्या ठिकाणी नैसर्गिक अखंड ज्योत आहे. भूगर्भातून वायू येतो
एकालेबोटी या ठिकाणी केवळ एकाचं घर होतं, आता थोडीशी वस्ती वाढली आहे. हे गाव गंडकी नदीच्या कोरड्या पात्रात आहे. नदीच्या पात्रात शाळीग्राम मिळतात. दगड घ्यायचा, फोडून बघायचं, अनेक दगडांमध्ये फोसिल्स आढळतात. त्यात कुणी ओम शोधतो तर कुणी शिवपिंड. शाळीग्राम काही मिळाला नाही पण पाठीचे टाके मात्र ढिले.
                              -आप्पाजी आपटे,पुणे-३७  फोन-९८२२०१८२४५
                       ***
त्रिस्थळी
खानेखानान आिम्रान यांची तिसरी बाअूंड्नी 
पाकिस्तानातील मोठे क्रिकेटपटू आणि अलीकडे अेक राजकीय पक्षप्रमुख जनाब आिम्रानखान यांनी त्यांच्या वयाच्या ६५व्या वर्षी तिसरे लग्न केले आहे. त्यांंची नवी पत्नी बुशेरा  ही आिम्रानजींच्या सांगण्यावरून त्यांची `आध्यात्मिक सल्लागार' आहे. चाळीशीतील या वधूला आधीच्या विवाहातून पाच मुले आहेत. आिम्रान यांचा पहिला विवाह जेमिमा गोल्डस्मिथ या ब्रिटिश अब्जाधीशकन्येशी झाला, तोे नअू वर्षे टिकला. त्यातून दोन मुलगे आहेत. दूरचित्रवाणीवर काम करणारी रहेमखान ही दुसरी पत्नी, ती दहाच महिने टिकली. आता `मोठी आध्यात्मिक शक्ती असणाऱ्या' या बुशेरा बेगम, आिम्रानलाही आध्यात्मिक  विवेक शिकवतील अशी शुभेच्छा आपण देअूया.

विकास साठ्ये - आिन क्रॅमेरा
चित्रपटनिर्मितीमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशेाधनाच्या माध्यमातून नावीन्य आणणाऱ्या संशेाधकांचा आणि अभियंत्यांचा सन्मान  जगप्रसिध्द `ऑस्कर'च्या वतीने केला जातो.  त्यांत या वर्षी विकास साठ्ये या अभियंत्याचा समावेश आहे.  त्यांनी तयार केलेल्या अुपकरणामध्ये वेगळी क्रॅमेरा सिस्टिम असून त्यात सहा अक्षांचा क्रॅमेरा ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे, त्याच्या साहाय्याने अुंचावरून खाली सरळ रेषेत चित्रीकरण करता येअू शकेल. त्या तंत्रज्ञानाचा वापर काही चित्रपटांसाठी करण्यातही आला आहे, त्यांत `डंकर्क', `गार्डियन्स ऑफ गॅलेक्सी २', `काँग - स्कल आयलँड' या चित्रपटांचा समावेश आहे.
विकास साठ्ये हे मूळचे पुण्यातले. त्यांचे बालपण मुलुंड (मुंबआी)ला गेले. तिथे त्यांचे १०वीपर्यंत शिक्षण झाले. ठाण्यातून त्यांनी आिंन्ट्रूमेटेशनमध्ये डिप्लोमा केला. पुण्याच्या व्ही आय टी मध्ये आिलेक्ट्नॅनिक्स  आिंजिनियरिंग केल्यावर बंगलोरच्या इंडियन आिन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून अेम टेक झाले. पुण्यातल्या कमीन्स कॉलेज ऑफ आिंजिनियरिंगमध्ये सात वर्षे त्यांनी अध्यापन केले. नंतर न्यूझीलंडमध्ये पीन्सटाअून येथे २००२ मध्ये ते नोकरीला गेले. तिथे `शॉटओव्हर क्रॅमेरा सिस्टिम' या कंपनीत ते होते. या कंपनीत अवोआी चित्रीकरणासाठी क्रॅमेरा तयार करण्यात आला त्यात ते सहभागी होते. सध्या ते अस्ट्न्ेिलॉयातील अॅडलेड येथील आर अेफ आिंडस्ट्नीज् मध्ये काम करतात.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन