Skip to main content

Posts

Showing posts from June, 2017

26 june 2017

अणुऊर्जा  भारतीय वैज्ञानिक संस्थांमधील एक अव्वल यशस्वी संस्था असलेल्या भाभा अणुसंशोधन केंद्राच्या आत नेमके काय चालते याची उत्सुकता सर्वांच्या मनात असते. त्याचे कथन या यशाचे साक्षीदार असलेले आल्हाद आपटे हे नेमकेपणाबरोबरच अधिकारवाणीने करू शकतात. अणुकार्यक्रमाचा इतिहास त्यांनी संबंधित मानवी कंगोरे, निगडित परिस्थितीचा संदर्भ, आनुषंगिक मनोरंजक व चित्तवेधक गोष्टी यांनी सजवून सुस्पष्टपणे, रंजकपणे प्रस्तुत केला आहे. भाभा अणुसंशोधन केंद्राचे दार किलकिले करून आतील वैज्ञानिक विश्वाचे दर्शन घडविणारा मराठीतील हा पहिलाच ग्रंथ. लेखकाने या पुस्तकाच्या संबंधाने म्हटले आहे की, `डॉ. होमी भाभा या बुद्धिमान व द्रष्ट्या व्यक्तीने मुंबईच्या तुर्भे येथे कुशलतेने निर्माण केलेल्या या संस्थेची कथा एकरेषीय वाटचालीची नाही, तर तीमध्ये विज्ञानजगताची विविध कथानके व उपकथानके एखाद्या महाकाव्यासारखी गुंफली जाऊन त्यांचे एक सुंदर बहुरंगी चित्र बनले आहे. चाळीस वर्षे संस्थेचा, पर्यायाने या चित्राचा, एक भाग म्हणून अनुभव घेतला असल्याने, या कथेचे विविध पदर उलगडून दाखविण्याचे आव्हानात्मक कार्य हाती घेतल्यावर माझ्या दृष्टीने

19-6-2017

राज्ये फुटली तरी गावगाडा अबाधित : शरद जोशी शेतीचा शोध ही फार मोठी क्रांती होती.पंचमहाभूतांच्या लक्षावधी वर्षांच्या साठलेल्या ऊर्जा माणसाच्या श्रमांचा स्पर्श होताच गुणाकार करीत फळाला येतात. एका दाण्यातून शंभर दाणे होण्याचा चमत्कार शेतीतच होतो. उपभोग्य वस्तूंचा गुणाकार करणारा हा एकमेव व्यवसाय. व्यापार, वाहतूक, कारखानदारी यांसारख्या अन्य कुठल्याही व्यवसायात तसे घडत नाही. तिथे फक्त वस्तूंची देवाण-घेवाण होते, देवघेवीच्या मूल्याची (शुलहरपसश र्ींरर्श्रीश ची) वृद्धी होते. ज्या दिवशी हा गुणाकार माणसाच्या लक्षात आला, त्या दिवसापासून संस्कृतीची रुजवात व्हायला सुरुवात झाली. जगातील पहिला व्यवसाय शेती हाच आहे. प्रकृती आणि माणूस एकत्र आल्यानंतर केव्हातरी दहा-बारा हजार वर्षांपूर्वी तो निर्माण झाला. हळूहळू अन्न शिजवायचा शोध लागला. खाण्यापिण्याची रेलचेल झाली. बायबलमध्ये वर्णन केलेल्या इडन गार्डनमध्ये स्वर्गसदृश परिस्थिती तयार झाली. मानवी समाजाला प्रथमत: स्थैर्य प्राप्त झाले; शिकार करण्यासाठी वा झाडांवरची फळे गोळा करण्यासाठी रानोमाळ भटकण्याची त्याची गरज संपुष्टात आली. आपले एकमेकांशी असलेले नाते, प

1 june 2017

मोडीत चाललेली मूल्यवान लिपी बाराव्या शतकातील यादवांच्या साम्राज्यापासून  पुढे बहामनी काळ, शिवकाळ, पेशवेकाळ आणि आंग्ल काळ या साऱ्या कालखंडांत; आणि अगदी आपल्या आजोबा-पणजोबांच्या कारकीर्दीपर्यंतही केवळ महाराष्ट्न्भरात नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानात मोडी लिपीने अधिराज्य गाजविले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र १९५० साली तत्कालीन मुंबआी सरकारने -बाळासाहेब खेरांच्या पहिल्याच मंत्रीमंडळाने - कोणताही साधक बाधक विचार न करता तडकाफडकी ती लिपी कालबाह्य ठरवली. आणि अेकदम मोडी लिपी मोडीत निघाली. तोपावेतो शाळाशाळांतून मोडी लिखाण शिकवले जात असे. तेथपासून मात्र मोडी वाचनाची प्रक्रिया बंद पडली. आज ज्यांचे वय ८०-८५ आहे, अशांतील काही मोजक्या लोकांस चाचपडत मोडी वाचता येते. पण त्यांची वाचनक्षमताही तितकी राहिलेली नाही. मोडी चांगल्या रीतीने वाचता येणारी माणसे आता अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील. तथापि त्या लिपीची गरज संपलेली आहे असे मुळीच नाही.  स्वातंत्र्यानंतर त्या लिपीचे आधुनिकीकरण तसेच किमान गरजेआितका प्रचार प्रसार व संवर्धन करायला हवे होते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. महत्वाची अैतिहासिक माहिती, कागदपत्

29 may 2017

विजापूर ते विजयपूर : मराठीचा पाया पूर्वी विजापूर, नंतर बीजापूर, आणि आता विजयपूर असे नामांतर झालेले `गोलघुमटप्रसिध्द' शहर, १४व्या शतकात आदिलशाहीच्या राजधानीचे ठिकाण झाले. मराठेशाहीच्या अुदयाचेही ते केंद्र म्हणता येआील; कारण शहाजीराजानी निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशाहीची सरदारकी पत्करली; व सुरुवातीचा काही काळ ते जिजाअू व शिवाजीसह विजापुरात अेकत्र होते. वसआी(मुंबआी), पुणे, गोवा, बेंगलुरू या प्रांतांची राजधानी मध्ययुगीन काळात विजापूर होती. शिवाजी छत्रपतींच्या निधनानंतर १६८७मध्ये औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही जिंकली व ते मोगलशाहीला जोडले गेले.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर १७०७मध्ये हैदराबादेत निजामशाही सुरू झाली व विजापूर निजामी राज्यात गेले. १७६७ला पेशव्यांनी निजामाचा पराभव केला, व विजापूर हे पेशव्यांच्या ताब्यात आले. १८१८ला पेशवाआी संपली आणि ते आिंग्रजांकडे गेले. ब्रिटिश काळात विजापूर मुंबआी आिलाख्यात होते. १९५०मध्ये भारतातल्या राज्यांची रचना झाली तेव्हा विजापूर हे पुणे विभागास जोडण्यात आले; नंतर १९६०मध्ये म्हैसूर राज्यात आणि आता ते कर्नाटकात आहे. आितक्या वेळा या शहराचे हस्तान्तर झ

15 may 2017

राष्ट्न्पतींची निवडणूक आपल्या देशात घटनेप्रमाणे संसदीय प्रातिनिधिक लोकशाही राज्यपध्दती आहे. राज्यावर कोणी यायचे हे, लोक आपल्या मतदानातून ठरवतात. लोकांचे ते प्रतिनिधी काही अुच्च पदाधिकारी निवडून देत असतात. पंतप्रधानाची निवड लोक करत नाहीत, तर त्यांनी निवडून दिलेले खासदार करत असतात. आपल्या देशाचे सर्वाधिकारी राष्ट्न्पती असतात. त्यांची निवड कोणी अेकच अेक गट करत नाही, तर आपले प्रतिनिधी त्यांची निवड करत असतात. त्यांच्या मतांचे मूल्य ठरते, व त्या मतांची बेरीज करून राष्ट्न्पतींची निवड घोषित होते. हे मतांचे मूल्य आपल्या सामान्य मतदाराप्रमाणे `अेक मतदार-अेक मत' असे नसते. राष्ट्न्पतीपदाच्या निवडणुकीसाठी मताचे मूल्य ठरविण्यासाठी १९७१ची  जनगणना आधारभूत धरलेली आहे. त्यानुसार त्या त्या राज्याची लोकसंख्या लक्षात घेअून, त्याचा दर हजारी हिस्सा(प्रमाण) ठरतो, व त्याला भागिले त्या राज्याच्या विधानसभेतील आमदारांची संख्या; हे त्या अेका आमदाराच्या मताचे मूल्य असते. महाराष्ट्नची लोकसंख्या १९७१ साली ५.०४ कोटि होती. त्याचा हजार हिस्सा म्हणजे ५०४०० हे महाराष्ट्नच्या विधानसभेचे अेकूण मतमूल्य. तिथे २८८आमदा