Skip to main content

1 may 2017

मरगळलेले मराठी युवक व भविष्याची चिंता
१ मे हा महाराष्ट्न् दिन. आपले राज्य स्थापन होअून ५७वर्षे झाली. कोणे अेके काळी हे `महा'राष्ट्न् होते, आजची स्थिती कशी आहे? 
आपले राज्य शेतीला फार अनुकूल आहे. तरुणाआीची शक्ती मोठी आहे. पण आिथले प्रश्न तर भेसूर होत चालले आहेत. तरुण पिढीला रोजगार आणि अुत्तम जीवन शेतीच्या माध्यमातून मिळू शकते, पण त्याचे नियोजन करण्याअैवजी नस्ती आंदोलने आणि मंत्रचळेपणा करण्यात आपल्या राज्याची शक्ती वाया चालली आहे. शेती, पशूपालन आणि ग्रामीण व्यवस्था या क्षेत्रांत दीर्घकाळ काम केलेल्या अेका अधिकाऱ्याचे हे प्रकट चिंतन.
डॉ. स्वाभीनाथन यांनी भारतामध्ये  दुसऱ्या हरित क्रांतीसाठी नवीन तंत्रज्ञान, खते व उत्कृष्ट बियाणे वापरून उपलब्ध मनुष्यबळ वापरून भरपूर उत्पन्न निर्माण करण्याची गरज प्रतिपादन केली आहे. कौशल्य विकास योजनेद्वारा योग्य दिशेने बदल झाला तर त्याचा फायदा होईल. मी चाळीस वर्षांपूर्वी सावंतवाडीजवळ सरकारी फार्मवर अधीक्षक म्हणून काम करीत होतो. माझ्या फार्मवर ४० कामगार होते. त्या फार्मवर परत जाण्याचा योग निवृत्तीनंतर आला. मी त्या फार्मवर चौकशी केली तर, फक्त एक स्त्री कामगार जिवंत आहे असे समजले. सर्व कामगार नवटाक दारू पिऊन मेले, असे कळले.
पूर्वीची शेती व आजची शेती यांमध्ये फार फरक झाला आहे. संपूर्ण शेती आता लागवडीखाली आणीत नाहीत. नवीन जे भाताचे बियाणे आले आहे, त्यापासून थोड्या जागेत भरपूर पीक मिळते. मग घरच्यापुरते भात पिकवतात, व अर्धी शेती कसत नाहीत. शेतीला मजूरी परवडत नाही. चांगली मजूरी दिल्यावरसुद्धा मजूर काम करीत नाहीत. त्यामुळे कोकणातील अर्धी शेती आता ओसाड रानामध्ये रूपांतर झाली आहे. सर्वत्र गवत माजते, हे गवत काढण्यास कोणी येत नाही. त्या गवतामुळे वणवे लागून आंब्याच्या बागा, काजूची झाडे जळून जातात.
लाखो हेक्टर जमीन कोकणात पडीक आहे. परिणामी महाराष्ट्नबाहेरचे काही धनाढ्य लोक शेती विकत घेऊन, कलमे लावतात. कोकणात आता महाराष्ट्नच्या बाहेरील माणसे येणार हे नक्कीच. कोकणातील युवा पिढी असे का वागते,? त्यांना कोणत्याही प्रकारची ईर्ष्या नाही, ध्येय नाही? आपण उद्योजक व्हावे, उत्तम शेती करावी व भरपूर पैसे मिळवून श्रीमंत व्हावे असे त्यांना कधीच वाटत नव्हते; पुढेसुद्धा वाटणार नाही का?
कोकण रेल्वे आली त्यावेळी कामावर सर्व मजूर कोकणातील नव्हते. आता कोकणामधून जाणारा मुंबई-गोवा मार्ग चार पदरी होणार आहे. कोकण रेल्वे चार पदरी होणार आहे त्यासाठी लागणारे सर्व मजूर कोकणातील नसणार ते बाहेरचेच असतील त्यात शंका नाही.
मुंबईतील कॉलनीमध्ये कोकणातील महिला घरकाम करतात. त्यांची मुले काय करतात? दहावी पास, फार तर बी कॉम! किंवा दहावी नापास असेल तर घरीच आहेत, किंवा कुठल्या तरी सोसायटीमध्ये शिपाई! मुंबईत १५ लाख रिक्षा आहेत, १ लाख टॅक्सी आहेत, १० लाख मोटारी आहेत. मुंबईतील रिक्षाचालक २०००/-रु दररोज कमावतात. टॅक्सी ड्नयव्हरसुद्धा इतकेच पैसे कमवतात. मराठी मुले टॅक्सी किंवा रिक्षा का चालवत नाहीत? याचा विचार `मराठी मराठी' टाहो फोडणारे राजकीय पक्ष करतात काय?
मुंबईतील जवळ जवळ ४ हजार राष्ट्नीयकृत बँकेमध्ये नवीन भरती झालेले सर्व कर्मचारी बिहारी-उत्तर भारतीय, काही दक्षिण भारतातील लोक आहेत. महाराष्ट्नतील नेते काय करतात? मराठी मुलांनी घराच्या बाहेर पडून कौशल्य विकासाची शिकवणी घ्यावी लागेल. मुंबईतील सुतार, प्लम्बर, गवंडी, इलेक्ट्नीक व वेल्डींगची कामे करणारे सर्व मजूर बिगर मराठी आहेत. ही माणसे कशी मुंबईत येतात? आपली मुले मागे का आहेत? त्यांना बाहेर काढून कौशल्य विकासाच्या शिकवण्या घ्याव्या लागतील. या मुलांना मोफत ड्नयव्हिंग शिकवावे लागेल. महाराष्ट्नचे परिवहन मंत्री मुंबईत रिक्षा ड्नयव्हर मराठी भाषक असावे म्हणून प्रयत्न करतात. काही मराठी माणसे कर्ज काढून रिक्षा विकत घेतात, पण स्वत: रिक्षा चालवत नाहीत तर उत्तर भारतीय याची रिक्षा भाड्याने चालविण्यासाठी घेतो व पैसे मिळवतो. त्यांना बँकेत किंवा कॉलेजमध्ये किंवा महानगर पालिकेत शिपाई म्हणून काम करणे आवडते, पण कष्टाची कामे करून भरघोस पैसे मिळवण्याची आच नाही.
न्यूयॉर्क शहरात मी टॅक्सीमधून प्रवास केला. तो ड्नयव्हर बंगाली होता, तो न्यूयॉर्कमध्ये टॅक्सी चालवतो. बरेच बंगाली अमेरिकेत टॅक्सी ड्नयव्हर आहेत. मराठी माणूस बाहेर जाण्यास तयार नाही. कोकणातील मुले कोकणात काम करीत नाहीत. मुंबईसारख्या शहरांमध्ये झोपड्यांत जगत आहेत, कोकणात लाखो हेक्टर जमीन ओस पडली आहे. ओस पडलेली जमीन कोणत्याही देशास परवडणारी नाही. यासाठी कोकण विकास योजनेअंतर्गत कोकणातील मुलांना शेतीधंद्यात गुंतवावे लागेल. संस्था अशा निर्माण कराव्यात की शेतकऱ्याच्या मुलांना भरपूर रोजगार मिळेल. त्यामुळे कोकणातील मुले शेतीमध्ये रमतील. सर्व देशास पुरेल इतका चारा कोकणात दरवर्षी तयार होतो पण हा सर्व चारा पाऊस संपल्यावर वाळून जातो. योग्य वेळी कापून सबंध देशास उपयोगी पडेल. कोकणात २हजार मिमी (८० इंच) पाऊस पडतो. हे पावसाचे पाणी ठिकठिकाणी तळी ओहोळ व नद्या अडवून बागायती करता येईल, पण तसे प्रयत्न होत नाहीत. रिकाम्या जागेवर सागाची प्रचंड लागवड करावी लागेल. आपल्या देशात सागाची लाकडे आयात करावी लागतात. रबीच्या मोसमात वाल, कडधान्ये, हरभरा व तुरीचे पीक कोकणात उत्तम येते ते पण घ्यावे. राष्ट्नची संपत्ती युवा शक्ती आहे. या युवकाची शक्ती अशी पिके घेण्यास उपयोगी पडेल.
सेंद्रीय खते वापरून पीक भरघोस येते. हे सेंद्रीय खत निर्माण करण्यास गाई म्हशी मेंढ्या व देशी कोंबड्या पाळणे जरूरीचे आहे. कोकणात देशी कोंबड्यापालन उत्तम तऱ्हेने करता येते कारण तेथील हवामान देशी कोंबड्यांना मानवते. शहरांमध्ये देशी कोंबड्यांना व त्याच्या अंड्यांना बरीच मागणी आहे व दरही चांगला मिळतो. देशी कोंबड्या पालनाचे तंत्र व मंत्र महिलांना शिकवण्याची गरज आहे. सध्या कोकणात गाई म्हशींची संख्या पण कमी झाली आहे. कोकणात दूध, कोल्हापूर-मिरज-कऱ्हाडमधून येते.
`मेक इन इंडिया' ही योजना सरकारनी आणली आहे. जिल्हा ग्रामीण विकास योजनेमार्फत ट्नयसेम म्हणून एक योजना राबवली जात होती. त्यामध्ये शिवणकाम, भरतकाम, सुतार, गवंडी, प्लम्बर, मोटार मॅकेनीक हे कोर्स होते. एक शिवणकाम सोडून इतर कोर्सचे शिक्षक तरबेज नव्हते. आता शिक्षकांना प्रथम आपल्या विषयात तरबेज करावे लागेल, तरच `मेक इन इंडिया' ही योजना यशस्वी होईल. कौशल्य विकास करण्यासाठी मुलांना एस.टी.च्या गॅरेजमध्ये मोटार मॅकेनिकच्या कोर्ससाठी पाठवावे लागेल. इतर कौशल्य शिकण्यासाठी उदा. गवंडी, प्लम्बर यासाठी खाजगी घरबांधणी व्यवसायिकाकडे योग्य शिक्षण मिळेल. पनवेल ख.ढ.ख. व पुणे ख.ढ.ख. संस्था बाजूच्या औद्योगिक कंपन्यांना संलग्न करणार आहेत अशी बातमी ऐकली. सरकारनी हा निर्णय योग्य घेतला आहे. अमेरिकेच्या सरकारनी ज्या युवकाकडे कौशल्य आहे, त्यांनाच तिथला व्हीसा मिळणार असे म्हटले. भारतात कौशल्य नसलेली युवा पिढी आता राहणार नाही हे पहावे लागेल.
आपल्या मुलुखात तर आजकाल कोणत्याही गावात कोणत्याही व्यवसायात परप्रांतीय लोक काम करतात. सुतार गवंडी अशी कामे तर ते लोक करतातच, पण शेतीतही ते लोक राबताना दिसतात. कोकणात आंब्याच्या बागायतीत नेपाळातील गुरखे दिसतात, आितकेच नव्हे तर ज्यांनी कधी त्यांच्या बापजन्मी समुद्र पाहिलेला नाही असे गुरखे मासेमारीच्या होड्यात काम करू लागल्याचे दिसते. पशूपालनात काही गोठ्यांतून भय्ये लोक आहेत. शिवाय मसाल्याचे पदार्थ विकणे, आआीस्क्रीम व कुल्फी तयार करून विकणे, भेळ-आमलेट विकणे, डोसे-आिडली तयार करून विकणे असे कितीतरी अुद्योग परप्रांतीय लोक मराठी मुलखात गावोगावी करत आहेत. महाराष्ट्नत रोजगारसंधी नाहीत असे कसे मानायचे? हेच अुद्योग चांगल्या प्रकारे चांगल्या व्यवस्थापनाच्या कौशल्याने केले तर महाराष्ट्नचे चित्र झपाट्याने बदलेल.
-डॉ.राम नेने, गोरेगाव(प),मुंबई-६२
फो.नं.(०२२)-२८७३२९९०

आपला पंचा दुसऱ्याच्या दोरीवर
कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडल्यावर सरकारने समुद्रकाठी  काय काय काळजी घ्यायला हवी, याविषयी वादचर्चा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे झारखंडमध्ये सुरक्षादलावर हल्ला करून अतिरेक्यांनी  पोलीस जवानांना मारले, त्यानंतर सरकारने कसा बंदोबस्त ठेवायला हवा, याविषयी सूचना येअू लागल्या आहेत. रेल्वे किंवा मोटर अपघात झाला, अथवा दूषित दारू पिण्याने काही लोक मेले की त्यानंतर त्याविषयी कोणता बंदोबस्त सरकारने केला पाहिजे हे सगळेजण सांगतात. असा काही भीषण प्रकार घडतो, तो सर्वांची मने अस्वस्थ करतो, आणि त्या आवेगाच्या भरात काही तरी सांगणे-सुचविणे घडते; यात चुकीचे काही मानावे असे नाही. पण तो आवेग ओसरल्यावर आपण शहाणे नागरिक म्हणून कसे वागतो ते फार महत्वाचे आहे.

प्रत्येक वेळी सरकारची चूक असते असे नाही; केवळ सरकारनेच काही करावे आणि त्या व्यवस्थेच्या खांद्यावर मान टाकून आपण निश्चिंत राहावे अशी काही स्थिती नाही. ती कुठल्याच देशात नसते. ज्या देशात सार्वजनिक किंवा शासकीय व्यवस्था अुत्तम आहेत असे आपण म्हणतो, तिथे नागरिक जागरूक असतात हे मात्र आपण सोयिस्करपणे दूर टाकतो. आपल्याकडे तर सरकारला त्याच्याच शर्टाचे ओझे झाले आहे, ते सरकार आपली काळजी काय आणि कशी घेणार? त्यात भरीस भर म्हणजे आपण नागरिक म्हणूनही कोणती जबाबदारी पार पाडतो, याचा विचार कोणालाही खाली मान घालायला लावेल. अुत्तम सार्वजनिक यंत्रणा असण्यासाठी सरकार आणि नागरिक या दोघांची जबाबदारी असते. त्याचे प्रमाण निम्मे निम्मे असते असे मानले तर नागरिकांनी त्यांची बाजू चोख ठेवली तर निदान पन्नास टक्के फरक पडू शकतो असे म्हणायला हरकत नाही.

समुद्रात बुडून जाण्याच्या घटना बऱ्याचदा घडतात. आपल्याकडे समुद्रात मासेमारीसाठी दररोज होडीतून जाणारे कितीतरी लोक असतात, त्यांच्यातील कोणी या प्रकारे सहसा बुडत नाहीत. त्यांची जबाबदारी सरकारने घेतलेली नसते. तरीही काही वादळवारे येण्याचा संभव असेल तेव्हा धोक्याचे आिशारे दिले जातात, अंदाज दिले जातात. आितपत काळजी ठीकच आहे. याअुपर कुणी केाळयाने सागरात नाव लोटली आणि काही बरेवाआीट झाले तर सरकारने काय करावे? आपल्याला सुंदर सागर किनारा लाभला आहे. तिथे सहल काढण्याची मौज असते. पण तिथे सरकारने सतत डोळयांत तेल घालून लक्ष ठेवावे, अशी अपेक्षा कशी करता येआील? जिथे पर्यटकांची वर्दळ जास्त असते, तिथे काही सूचना असतातच. पण सरकारच्या सूचना गांभिर्याने घ्यायच्याच नसतात अशी आपल्याला सवय लागली आहे.

सरकारने मोटर चालविण्यासाठी परवाना द्यायचा  असतो. तो कसा दिला जातो हा आणखी वेगळा भाग. पण तो तरी परवाना घेअून किंवा तो वेळेत नूतनीकरण करून गाडी चालविणारे कमीच असतात. अुलट `मी दहापंधरा वर्षं परवाना नसताना गाडी चालवतोय, मला आजवर कुणी विचारलेलंच नाही...' अशी फुशारकी मारणारे कितीतरी भेटतात. यात परवाना न तपासणारी यंत्रणा दोषी म्हणावी की परवाना न घेता गाडी चालविणारा शहाणा म्हणावा? चांगल्या घरांतली किशोरवयीन मुले दुचाकी गाडी चालविताना आपण पाहतो. त्यांना गाडी चालविता येते, यात घरच्यांना आनंद वाटतो. त्यांना जवळपासच्या अंतरांत गाडी घेअून जाण्यास घरचेच लोक सांगतात. शिवाय `त्या चौकातून जाअू नको, तिथे पोलीस असेल; बोळातून जा..' अशी सूचना देण्यात येते. अशा प्रवृत्तींमुळे जो कायद्यांविषयी बेफिेकरपणा वाढत जातो, त्याचे दुष्परिणाम साऱ्या ठिकाणी दिसतात, त्यांना सरकार जबाबदार नसते. प्रत्येक शेंबड्या पोरासाठी सरकारने पोलीस ठेवायचा म्हटले तर ते शक्य नाही. त्या पोरांना कोणी सुजाण माणसाने रोखले तर त्याला कोणी जुमानत नाही. `आमच्या पोराला झाला अपघात, तर होअूदे..' अशी अरेराव भाषा येते. यांना कायदा आणि योग्यायोग्य कळत नाही असे थोडेच आहे?

समुद्रात बुडालेल्या तरुणाआीच्या बाबतीत या साऱ्याचा विचार फार महत्वाचा ठरतो. याआधी नुकताच असा अेक प्रकार घडला तेव्हा लोकांनी कॉलेजच्या व्यवस्थापनास बेजबाबदार ठरविले होते. या ताज्या घटनेत तर ते कोणी प्राध्यापक आणि त्यांच्यासोबतची मुले कॉलेजला कल्पनाही न देता सहलीस गेली होती. त्यांच्या पालकांना तरी तशी कल्पना असायला हवी होती, पण हल्लीच्या जगात आितक्या सहज तरुण मुले आणि त्यांचे पालक बेालत नसतात. त्या कारणावर अुपचार करण्यापेक्षा सरकारी यंत्रणेवर टोपरण ठेवून मोकळे होणे कधीही आणि कोणत्याही कारणाने श्रेयस्कर! अपघात हा शेवटी अपघातच असतो, बेफिेकरपणा नव्व्याण्णअू वेळेस खपून जातो, म्हणून तोच चालवत ठेवण्याने कधीतरी दुर्दैव वाट्यास येणारच. आिथे सरकार दोषी म्हणावे? कधीतरी झोपडपट्टीतील लोक विषारी दारू पिअून मरतात, मग पोलीसांच्या नावाने ओरडा होतो. लोक त्यांच्या कर्माने दारू पितात. त्यांच्यावर बंदी घातली तर ती जुमानत नाहीत. बिहार सरकारने पूर्ण दारूबंदी केली तर ते राज्य टीकेचे धनी होते. आपल्याकडे बारबालांवर बंदी घातली तर कोर्टापर्यंत जाअूनही ती बंदी टिकली नाही. बारबाला ही जर गरज असेल तर ती भागविण्यास कुणाची हरकत असणार? पण मग तरुणांच्यावर वाआीट परिणाम होतो म्हणून रडगाणे गाण्यात अर्थ नाही. सध्याच्या भीषण अुन्हाळयात ज्या पथ्याने राहायला हवे, तसे कोणी राहताना दिसत नाही. वाहने, प्रदूषण, खाणे यांवर कसलाही धरबंध नाही. खेड्यापाड्यांतून जत्रांच्या निमित्ताने बेदरकारी चालते आहे. अशांना बंदी घालायची नाही. -तर मग काही अघटित घडले तर सरकार कसे जबाबदार? नंतर मात्र  त्या अपराध्यांना परवानगी कशी दिली, असा प्रश्न करून इतरांना झोडपण्यास आपण तयार!

या गोष्टी कुणी कुणाला शिकवायच्या नाहीत, तर त्या आपल्या आपण सांभाळायच्या असतात.  रस्त्याने चालायचे शिक्षण देअून ते गांभिर्याने आचरण करण्याची अेक नैतिक जबाबदारी समाजाने घ्यायची असते. कर्ज आपण काढायचे, आणि सरकारने फेडावे म्हणायचे, हा अजब न्याय आहे. कधीतरी अपवाद म्हणून तसा विचार होअू शकतो, पण ती प्रथा पडणे फार घातक आहे. तसेच आपल्या साऱ्या समाज जीवनाचे झाले आहे. मोर्चा काढायचा तर त्यासाठी फुकट प्रवास करायचा हेच शिकवले जाते. रस्त्यात खरेदी करायची, रस्त्यात गाडी थांबवायची, रस्त्यांत लग्नाचा मांडव घालायचा, रस्त्यातच भांडी घासायची ... तर मग आपल्याला प्रशस्त सुंदर निवान्त रस्ते कोण कसे देणार आहे? आपली पात्रता तितकीच रस्त्यावरची राहणार.

जे लोक अपघातात सापडतात, त्यांच्याबद्दल करुणा जरुर आहे. परंतु त्यापासून पुढच्यांनी काही बोध घेतला नाही तर त्यांना आलेला अनुभव सर्वांना सर्वकाळी येतच राहणार आहे. कधीतरी आपल्यावर तशीच पाळी येअू शकते. त्यावेळी हळहळायचे की जबाबदारीच्या पालनासाठी सरकारवर न विसंबता आपण शहाण्यासारखे आजपासूनच वागायचे, हे ठरविण्याची वेळ आहे.

पाठांतर आवश्यकच.
हल्ली पुष्कळ ठिकाणी संस्कृत पाठांतर स्पर्धा घेतल्या जातात. मी काही ठिकाणी परीक्षक म्हणून जातो, त्यावरून माझे मत सांगावेसे वाटते.
पाठान्तरामध्ये आवाज, गेयता,अुच्चारण, शुध्दता, पदच्छेद, आरोह-अवरोह, भावमयता हे पाहायला हवे. पठणाचा श्रोत्यांवर प्रभावी परिणाम झाला पाहिजे. तसेच त्यात माधुर्य हवे. कोणताही (गद्य-पद्य) अुतारा श्रध्देने, निष्ठेने, आवडीने सादर केला जातो का हे, महत्वाचे असते. स्पर्धेच्या दृष्टीने हे आवश्यक आहेच; पण मुळात पाठान्तर कशासाठी करावे? - मुखोद्गतं किमर्थम्?
पाठान्तर ही अेक शक्ती आहे. ती लहानपणात जास्त असते. त्या शक्तीचा विकास घडवून आणावा लागतो. त्यायोगे आत्मविश्वास वाढतो.स्मरणशक्तीचा आणि त्यातून बुध्दीचा विकासही साधतो. हल्लीच्या पध्दतीत पाठांतर टाळले जाते. मनाच्या शक्तीचा तो अपव्यय मानला जातो. `कंठस्थ केले जाणारे पठण म्हणजे बेडकाचे ओरडणे'(मुखोद्गतं प्रियमाणं पठनं नाम मण्डूकानां रटनम्') अशी टवाळी पूर्वीही काहीजण करीत. पाठांतरामुळे होणाऱ्या फायद्यांना आजची मुले मुकतात हे दिसत आहे. मुलांची `पाठ्यशक्ती' नाहीशी होण्याच्या बदली दुसरा कोणता गुण प्राप्त केल्याचे अैकिवात नाही.
पाठान्तराला अभ्यास लागतो. पुन्हा पुन्हा तीच गोष्ट करणे, त्याची आवर्तने करणे. त्यातून अनेक विषय कळू लागतात. शब्दसंपत्ती वाढते. दुसरा महत्वाचा लाभ म्हणजे वाणी शुध्द होते. कोणत्याही प्रसंगी योग्य गोष्टी सुचतात. प्रत्येक विषयाच्या विविध बाजू लक्षात येतात. खूप पाठांतर असेल तर अेकांतात चिंतन करणे सुलभ जाते. `पुस्तकात असलेली विद्या म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेली संपत्ती' असे म्हणतात; ती आपल्याला प्राप्त होण्यासाठी पाठांतर करायला हवे. बालपणी केलेले पाठांतर मोठेपणी, वृध्दपणीही साहाय्यकारी ठरते. म्हणून बालपणापासून पाठांंतराची सवय लावून घेणे आवश्यक आहे. केवळ पाठांतर म्हणजे घोकंपट्टी हा विपर्यास झाला. या लिखाणाचा आशय समजून घेतला तर त्याचे महत्व कळेल.
 (संदर्भ : पुरुषोत्तम वा.देअूसकर यांचा `कुशाग्रसिंधू'लेख. फोन: ९४२०३०८८३५)

आमचे लाड नकोत, पण अन्याय का?
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत सध्या निव्वळ राजकारण्यांची ढोंगबाजी चालू आहे. शेतकऱ्यांची दु:खे आम्हालाही कळतात, आम्ही ग्रामीण भागातच जन्मलो आणि वाढलो. या राजकारण्यांसारखे मुंबआीत फ्लॅटबंगले बांधून तिथे राहात नाही. पण शेेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी करताना आितर घटकांसाठी ती का नाही, असे म्हटले तर?
मी स्वत: आणि माझ्या बरोबरीच्या सोबतीच्या, तीस चाळीस वर्षांपूर्वीच्या काळातील तरुणांनी स्वत:च्या हिंमतीवर अुद्योग चालू केले. आम्ही शिकले सवरलेेेले होतो. थोड्या प्रयत्नांनी नोकरी मिळाली असती. पण काही विचाराने ध्येयाने स्वयंरोजगार अुभा केला, आमच्या मगदुराप्रमाणे त्याही काळात काही लोकांना आम्ही नोकऱ्या दिल्या. त्या काळात बँक कर्जाचा व्याजदर  साधारण १८टक्के होता, शिवाय त्यावर सरचार्ज, विमा वगैरे मिळून तो २१टक्क्यांच्या घरात जात होता. तरीही मी कधी थकबाकीदार झालो नाही. सामान्य घरात भांडवलाची ताकत नव्हतीच, त्यामुळे  वारंवार कर्ज काढावे लागले. घरात चैनखोरी शक्यच नव्हती, कारण बँका डोक्यावर होत्या. शासकीय अनुदानांच्या योजना होत्या, ते पैसे कधीच वेळेत मिळाले नाहीत. त्यामुळे शब्दश: जीव रडकुंडीला  यायचा. तरीही भविष्याची तरतूद करणेही भाग होते.
माझ्यापुरते मी अेकच सांगतो की, माझा मुलगा तेव्हाच्या १२वीला गुणवत्ता यादीत आलेला होता, पण त्याला कॉमर्सला घालावे लागले कारण मोठी आर्थिक ताकत नव्हती, कोणतीही सवलत नव्हती. तरीही मिळेल त्या क्षेत्रात तो चमकेल ही खात्री होती, तसे झालेही! हा मोठेपणा नव्हे, साधा व्यवहार आहे. शेतकऱ्यांनीही तो सांभाळला पाहिजे.
त्या काळात २१ टक्के दराने कर्ज काढून केलेल्या व्यवसायांतून आम्ही म्हातारपणासाठी केलेल्या बचतीवर आता जेमतेम ८टक्के व्याज मिळते. पेन्शन वगैरे काही नाही. शेती आणि शेतकरी  यांबद्दल  कणव आणणाऱ्या राजकारण्यांना लघुअुद्योजकांचे दुखणे का दिसत नाही? तो घटक महत्वाचा नाही का? पण हे अुद्योजक व्यवहार आणि स्थिती जाणतात. कोणतेही कर्ज माफ करणे हा समाजाचा अपराध आहे हे त्यांच्या नीतीने शिकविले आहे. कोणी अडचणीत आला तर त्याला मदतीचा हात देण्याचे काम त्याने त्याच्या परीने आयुष्यभर केलेले असते. पण तशी काही अुभारी देण्यासाठी मदत करणे वेगळे, आणि अूठसूट कर्जवाटप करून ते माफ करणे वेगळे.
स्टेट बँकेच्या अध्यक्षानी त्याबद्दल नाराजी दाखवली म्हणून हे अुद्या त्यांचे पुतळे जाळत सुटतील, पण देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने कोणालाही  कर्ज माफ करू नये. ती प्रथा घातक आहे. त्या पैशात मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात, त्यांतून त्यांना कर्जफेडीचे बळ मिळेल.
तंत्रज्ञानामुळे वेगाने बदलणाऱ्या ज्ञानयुगात विकासासाठी दरवर्षी अर्थसंकल्प मांडला जातो, त्याप्रमाणे देशातील तरुण पिढीला स्पर्धेच्या जगात आत्मविश्वासाने उभे करण्यासाठी दरवर्षी देशाचा ज्ञानसंकल्प मांडण्याची गरज काळानुरूप झाली आहे. सरकारने आता दरवर्षी असा ज्ञानसंकल्प सादर केलाच पाहिजे.
अर्थसंकल्पातील वित्तीय तूट म्हणजेच ज्ञानसंकल्पातील अज्ञानाचा अंधकार होय. हा अंधकार दूर करण्याचे आव्हान पेलण्यासाठी राष्ट्नीय सकल ज्ञानाचे मोजमापन आणि विश्लेषण करून त्यातील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. आपल्या देशाला चैतन्यस्वरूप वेदांची परंपरा आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेले ज्ञान आपण समाजात किती दूरवर पोचवू शकलो याचे परीक्षण म्हणून दरवर्षी सरकारनेच ज्ञानसंकल्प सादर करण्याची गरज आहे. रेडिओचा शोध लागल्यानंतर तो पाच कोटि लोकांपर्यंत पोचण्यासाठी ३८ वर्षांचा कालावधी लागला. युक्रेनच्या साध्या कामगाराने शोधलेले ट्वीटर तेवढ्याच लोकांपर्यंत पाच महिन्यात पोचले. इतक्या प्रचंड वेगाने वाटचाल सुरू आहे.
आपल्या देशात ज्ञानाचा प्रसार नीट न झाल्यामुळे आज समाजात विषमता आणि असंतोष वाढताना दिसत आहे. हा असंतोष आणि विषमता कमी करण्यासाठी ज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी शिक्षण हवे. महिला सक्षमीकरण - म्हणजेच मातृशक्तीची पुनर्स्थापना, मानव विकास, पर्यावरणाबद्दल जागरूकता आणि ज्ञानाधारित समाजाची निर्मिती या मुद्द्यांवर विशेषत्वाने भर देऊन त्यात काम केल्यास समाजातील शेवटच्या माणसाला सक्षम करण्याचे आव्हान पेलणे सहज शक्य होईल. त्यात मुलांच्या संकल्पनांना सुविधा द्याव्या लागतील. माहीत नसलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.
आपल्या देशात एखाद्या व्यक्तीला संपवायचे असेल तर त्याचे पुतळे उभारण्याचे काम केले जाते. पुतळे समुद्रात उभारा किंवा गडावर उभारा, असे पुतळे बांधून वारसे निर्माण होत नाहीत. महात्मा गांधी यानीच १९२३ साली लिहून ठेवले आहे की, `त्याग केल्याशिवाय पूजा होत नसते.' त्यांनीच पुढे म्हटल्याप्रमाणे तत्वहीन राजनीती श्रमाविना संपत्ती, विवेकाविना उपभोग, शील-चारित्र्याविना ज्ञान, अनीतीने केलेला व्यापार आणि मानवरहित विज्ञान हे समाजाला घातक आहे. याच गोष्टींचा आपण अंगिकार सध्या जास्त प्रमाणात करत असल्याने नैतिकतेचा ऱ्हास होत चाललेला दिसतो आणि याचेही आव्हान ज्ञानापुढे आहे.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या आपल्या संस्कृतीचा विसर पडून आपण चंगळवाद आणि ओरबाडण्याच्या वृत्तीमुळे  `ओव्हर शूट डे-चे संकट आपण तयार करत आहोत. समाजात ज्ञानाची लालसा निर्माण करण्यास कमी पडत आहोत. तरुणांच्यातील कौशल्ये विकसित केली नाहीत, शिक्षणाकडे दुर्लक्ष करून आपण ज्ञाननिर्मिती व ज्ञानप्रदान केंद्राची दुरवस्था करून टाकली आहे. साठ टक्के शाळा आजही एकशिक्षकी आहेत. अवघे दीड टक्के तरुण तांत्रिक शिक्षण घेत आहेत. असलेल्या शिक्षण पद्धतीतून अनुत्पादक फौजा निर्माण होत असल्याने असंतोष वाढत आहेत.
आयटी, म्हणजे `इंडियाज टुमारो' असावा, असे वाटत असेल तर ज्ञानाशिवाय पर्याय नाही. जगात पाच प्रकारच्या व्यक्ती असतात. त्रस्त, व्यस्त, सुस्त, स्वस्त आणि मस्त. यातील मस्त व्यक्ती या काही चांगले करण्याचा प्रयत्न करत असतात, अडचणींवर मात करण्यासाठी संघर्ष करत असतात. त्यांची संख्या फक्त पाच टक्के असते आणि याच पाच टक्क्यांवर देश चालत असतो. आपल्या देशातील कल्पनादारिद््रय ते वैचारिक श्रीमंती - अशी मोठी दरी असून ती कमी करण्यासाठी ज्ञानाचे भांडार असलेल्या पुस्तकांनी घरातील कपाट भरा, त्यांच्या संस्कारातून ज्ञानलालसा वाढेल.
-उदय निरगुडकर (`वेदभवन'वार्ता) (वेदपारायणांच्या सांगता समारंभातील मनोगत)

सिनेमाचे दिवस
किर्लोस्करवाडीचा कारखाना आणि स्टेशन यांंच्यामुळे आजूबाजूच्या गावांसाठी हे ठिकाण मध्यवर्ती होते. या ठिकाणी लोकवसती फारशी नव्हती पण सभोवारच्या गावांसाठी सिनेमाचा तंबू किंवा करमणुकीचे खेळ आिथेच चालायचे. कुंडल रस्त्यालगत सिनेमाचा तंबू असायचा. तासगावच्या आपटे मंडळींचा तो होता. हे आपटे आमच्यातले कुणी नव्हेत, पण नामसाधर्म्यामुळे ते आम्हाला फुकट सिनेमा दाखवत. संध्याकाळच्या खेळाला जायचे तर पाच वाजता जेवणे अुरकून घ्यावी लागत. वीज नव्हती, त्यामुळे अेरवीही तो प्रघात होताच, पण सिनेमाला जाण्यासाठी तयारी करण्यासाठी आणखी लवकर जेवण करायचे. मग नेहमीसारखी आपापली ताटंवाट्या धुवायची, मधे काहीतरी खायला म्हणून शेंगा-भडंग-कणसं असं काहीतरी घ्यायचं. तंबूत जमिनीवर बसायचं तर सतरंजी आवश्यक. खाद्य पसरण्यासाठी कागद पाहिजेत. चपला-स्वेटर  नव्हतेच. असेल तो सिनेमा खेळ पाहून साडेनअूच्या अंधारात घरची वाट चालताना झोपेनं खाल्लेलं असायचं. परतीचं दीडदोन किमी अंतर संपता संपत नसे. नंतरचे चार सहा दिवस त्या सिनेमांतील डायलॉगवर जायचे. `मेरी झांसी नही दूँगी' किंवा `मेरे सामने तेरी ये हिंमत?..' असं म्हटलं की मग `क्रॅडगट् क्रॅडगट् क्रॅडगट्' अशा घोड्यांच्या टापा तोंडानं वाजायच्या. जेवणासाठी पानावर येतानासुध्दा `आअूसाहेब, भाकरीसंगं  घोरपड कच्ची खाअू आम्ही..' असली वाक्यं यायची.
नंतरच्या काळात वाटव्यांचा तंबू बराच काळ रेंगाळायचा. वादळ वाऱ्याची शक्यता त्या दिवसांत असल्यामुळं  वरती छपराचा तंबू काढून नुसती सभोवारची कनात ठेवत. त्यामुळं चांदण्याच्या दिवसांत सिनेमा जरा फिकट दिसे, पण ते हवेशीर वाटायचं. तंबूचे मालक वाटवे हे आमचे लांबचे नातलग होते. त्यांचा पुतण्या शरद हा सुटीत आमच्यासोबत अुंडारायला यायचा. त्याला आमच्या विहिरीत आम्ही पोरांनी पोहायला शिकवलं. त्याच्याबरोबर सिनेमाच्या टूरिंगमध्ये काही तरी काम करण्यात आमची संध्याकाळ जायची. खेळाच्या आधी काही गाणी लावायची, अधेमधे फिल्मची रिळं गुंडाळायची. ती अुलटी गुंडाळली जाअू नयेत अशी काळजी घ्यावी लागे. पिचत कधी त्या पेटाऱ्यातले रीळ मागेपुढे दाखवले जायचे; त्यामुळे त्या सिनेमातल्या जोडप्याच्या मुलाची मुंज झाल्यानंतर मग त्यांच्या लग्नाचा सीन पडद्यावर यायचा. प्रेक्षक जरा बावचळायचे, पण ते समजून घ्यायचे. कलेच्या बाबतीत  तेवढी सहिष्णुता त्या काळाला होती.
सिनेमा आवडला नाही तर बाजूची कनात वर करून घरी निघून येण्यात कमीपणा नव्हता. अेखादे गाणे रटाळ असले किंवा नायक अुगीच नायिकेच्या मागेमागे फिरू लागला तर, तेवढ्यात बाहेर जाअून शू करून यायचं. त्यात महिला पुरुष मुले सगळी असत. पुष्कळदा अशा रटाळ गाण्याला `शू%चं गाणं' म्हटले जाआी. सिनेमाचं नाव जर आधी गाजलं असलं तर चांगली गर्दी व्हायची. `मानिनी' या सिनेमाचे खेळ महिनाभर तुफान चालले. दुसऱ्या खेळाला तर गर्दी आवरायची नाही, म्हणून मग भोवतीची कनात काढून टाकली होती. पुष्कळदा सिनेमाला जाताना कोणता सिनेमा लागला आहे तेही आम्ही पाहात नव्हतो. अेकदा नेताजी पालकर लागलाय म्हणून आम्ही गेलो. नेहमीप्रमाणं मागच्या मोटारीपासून आत शिरलो, प्रवेशद्वाराशी असणारा फलक पाहण्याचा प्रश्नच नव्हता. सिनेमा सुरू झाला, बराच वेळ गेला  पण पडद्यावर वेगळंच काहीतरी चालू होतं. प्रारंभीचं `आिंडियन न्यूज' असेल म्हणून आम्ही कड काढला; पण नेताजी पालकर दिसेना. `मरूद्यात तिकडं' म्हणून आम्ही अुठून आता पडद्याच्या बाजूनं बाहेर आलो. तिथं फलक दिसला `चिनी जादूगर'!
काही काळानंतर सिनेमाची ती क्रेझ संपली. तंबूही गेले. गावात थिअेटर झालं. तिथं मात्र मी अेकही सिनेमा आजवर पाहिलेला नाही. सिनेमाची भूक बालपणीच भागली हे त्याचं कारण असेल. शहरांत कितीतरी फिरलो, पण सिनेमाकडं ढुंकून पाहिलं जात नाही. हल्ली सिनेमाचं तिकिट दोनशे तीनशेचं असतं म्हणतात. मी तरी आयुष्यात खूप सिनेमे पाहिले, पण गिन्नीचा खर्च केला नाही. सिनेमाचा काही कुसंस्कार बालमनावर होतो म्हणतात, तो माझ्यावर झालेला नाही.

तंट्या भिल्लाची करामत
पुराण काळातील काही अफाट शक्तीच्या अचाट कथा आपल्याला ठाअूक असतात. गाडाभर अन्न खाणारा बकासुर, शक्तिमान भीम, कालियामर्दन करणारा बालकृष्ण वगैरे विक्रमवीर आपल्या अैकिवात आहेत. त्यांवर पुष्कळदा विश्वास बसत नाही. पण हल्लीच्या काळातही असे काही विक्रमवीर असतात. कुणी हातानी फरशी फोडतो, कुणी काचा खातो, कुणी गुणाकार भागाकार क्षणात करून दाखवतो; आपल्याला ते काही वेळी खोटं वाटतं, पण त्यांची नोंद गिनीज् बुकात होते. आितिहास काळातही अशी काही माणसं होतीच की. अफजलखान हातानं पहार वाकवायचा म्हणतात. अशाच अेका विक्रमवीराची कथा मी लहानपणी अैकली आहे.
पेशव्यांच्या अुत्तरकाळात मावळ भागात तंट्या भिल्ल नावाचा अफाट माणूस होता. ब्रिटिशांविरुध्दच्या लढ्यात तो सामील होता, अशी नोंद आहे. त्याच्या विक्रमांची कथा आम्हाला लहानपणी सांगत असत. तंट्या त्याच्या गावातील अनेक लोकांना आपल्या शक्तीचा अुपयोग करून देत असे. चिखलात फसलेली बैलगाडी काढून देणे, देअूळ किंवा घरासाठी मोठे दगड वाहून आणणे, चुन्याची घाणी काढून देणे अशी कामे तो करायचा. कुस्तीच्या फडात तो अेक फेरी मारायचा, पण त्याला जोड मिळत नसे. त्यामुळे नुसत्या फेरीवर तो बक्षिस घेअून येत असे. ग्रामदेवतेचा रथ तो अेकट्याने ओढत असे, तर जमिनीवर ठेवलेली अेक अेक मणाची पोती दोन्ही बगलेत मारून तो अुठत असे. या प्रचंड ताकतीच्या भिल्लाची ख्याती पेशव्यांच्या कानी गेली. त्यांनी त्याला बोलावून त्याच्या वर जोखमीची कामे सोपविली.
पंढरपूरच्या आषाढी वारीत विट्ठलाची पूजा आज मंत्री करतात, तशी तेव्हा पेशवे करीत. त्याचा सरंजाम पुण्याहून जात असे. घागरी, पातेली, घंगाळे, समया वगैरे भांडी चांदीची; आणि त्याशिवाय अनेक चीजवस्तू असत. खाशी मंडळी वाहनातून नंतर जात. तंट्या अेकटाच ही जोेखीम भल्या मोठ्या गाठेाड्यात बांधून  डोक्यावरून नेअू लागला. अेकदा त्याला पंढरीच्या वाटेवर चोरांच्या टोळक्याने अडवले, आणि ते त्याच्याकडं पाहून जरा बावरूनच त्याला दम देअू लागले. तंट्या डोक्यावरचं ओझं तसंच पेलत जरा खाली वाकला, आणि भुआीवरचा अेक गोल गुंडा दगड त्यानं अुचलला. तो दगड अशा ताकतीनं समोरच्या अेका झाडाच्या बुंध्यावर मारला की तो त्या बुंध्यात रुतून बसला. तंट्या त्या टोळक्याला म्हणाला,`आता हिंमत असेल तर गाठोड्याला हात लावा.'  -चोर कशाला थांबतात!
असा हा विक्रमवीर!!


Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन