Skip to main content

8 may 2017

राजा आहे; त्यास दुर्बळ ठरवू नये
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी संघर्षयात्रा चालू आहे. ती सलगपणी  न होता टप्प्या टप्प्याने सोयी सवडीने चालू आहे. त्यातूनच त्याचे गांभिर्य किती आहे ते कळतेे. पाचसहा दिवस प्रवास झाल्यावर थोडी विश्रांती घ्यावी लागते. आितर कामे करावी लागतात. आपापल्या ठिकाणी आितर राजकारणे, सभासत्कार, लग्नकार्ये तुंबलेली असतात त्यांचाही निपटारा करावा लागतो. तो अुरकला की मग पुन्हा संघर्ष यात्रेला `जॉआिन' व्हायचे.

शेतीची सारी कर्मयोगी कार्यसंस्कृती असल्या बोलघेवड्या आणि दिखाअू कळवळयाने धोक्यात आणली आहे.भारताला लाभलेल्या संपन्न निसर्गचक्रामुळे आणि संपन्न परंपरेमुळे  शेती  ही या देशाची जीवनदृष्टी बनलेली आहे. तिथल्या शहरी लोकांनाही  शेतीचे महत्व वेगळे सांगावे लागत नाही. परंन्तु आितर कोणत्याही अुद्योगाप्रमाणे शेतीधंद्यातही  लक्ष घालून काम करणाऱ्या पिढ्यामागून पिढ्या तयार झालेल्या असल्या पाहिजेत. त्यांनी शेतीची निगा, पाणी-जमीन यांचे नियोजन, त्यातून निघणारे अुत्पादन, त्याचे वितरण-विपणन, आर्थिक व्यवहार, आणि संशोधन आित्यादी साऱ्या बाबींवर लक्ष द्यायला हवे. ते देण्यासाठी  हुशार, जिज्ञासू आणि कष्टाळू  शेतकऱ्यांची गरज असते. आपल्याकडे गेल्या काही वर्षांपासून अशा लोकांचा शेतीत तुटवडा आहे. चार बुके शिकला की तो मुलगा शहरगावात नोकरीला पळणार; आणि ज्याला तितकेही शिक्षण जमत नाही त्याने नाआिलाज म्हणून शेतीत मरावे, असल्या दळभद्री मानसिकतेने शेतीचे फार नुकसान केले आहे. शेतीला दुर्बळता त्या  चुकीमुळे आलेली आहे. चांगल्या घरच्या तरुणांनी  शिक्षकी पेशाकडे पाठ फिरवायची, आणि मग चांगले शिक्षण मिळत नाही म्हणून त्यात नाआिलाजाने येणाऱ्यांच्या नावाने गळे काढायचे, असाच तो प्रकार आहे.

आपले शास्त्र सांगते की, जगात दोन प्रयोगशाळा खऱ्या महत्वाच्या आहेत; अेक आहे स्वैपाकघर आणि दुसरी शेती. या दोन ठिकाणी सतत प्रयोग करता येतात, तिथे वाट्टेल ते नवे निर्माण करता येते. माणसाला अुत्तम जगण्यासाठी तिथे  संशोधनाला भरपूर वाव असतो. परंतु त्या बाबतीत दैव देते आणि कर्म नेते अशी स्थिती आहे. आपल्याकडे या दोन्ही प्रयोगशाळा अुपलब्ध असून आणि त्या कृतिशील असूनही त्या क्षेत्रांत आपण नव्या पिढीतील शहाणी मुले अुतरविली नाहीत, त्यांना त्या प्रयोगशाळांपासूनच दूर ठेवले. अुत्तम स्वैपाक आणि गृहकृत्ये  करणारी महिला `घरकोंबडी' ठरवून, जरा शिकलेल्या मुलींने नोकरी केली तरच तिच्या शिक्षणाचा अुपयोग झाला असे मानण्याची चूक झाली. अडाणी ठोंब्या महिलेकडे घर-स्वैपाकघर आणि अडाणी ठोंब्या पुरुषांकडे शेती गावकी असा समज झाला. परिणामी या दोन्ही बाबतींत अकारण अ्रप्रतिष्ठा आणि दुर्बळता आली आहे.

ती दुर्बळता आणि चूक झाकण्यासाठी  त्या दोन्ही घटकांना फुकाचे भावनिक मोठेपण देण्याची प्रथा आली. घरांत अडकलेल्या ठोंब्या महिलेला मातृशक्ती  म्हणायचे, अन्नपूर्णा म्हणायचे. त्याचप्रमाणे शेतामळयावर विसंबून राहिलेल्या पण फारसे कर्तृत्व नसलेल्या पुरुषाला बळीराजा म्हणायचे, अन्नदाता म्हणायचे!  भिक्षुकी करणाऱ्या आेंगळ ब्राह्मणाला `वेदशास्त्रसंपन्न' म्हणण्याचाच तो प्रकार. त्या त्या घटकाला हीन मुळीच लेखू नये. अशी साधी सामान्य माणसे टाकाअू नसतात, त्यांचेही काही महत्व, काही कामगिरी नक्कीच असते. त्यांचाही अुपयोग करून घेतला गेला पाहिजे. त्यांना सोयी सुविधा, शिक्षण, व अन्य साधने अुपलब्ध झाली पाहिजेतच. पण त्यांचे अकारण व अप्रयोजक स्तोम माजविण्याचे कारण नाही. सामान्य शेतकरी बळीराजा `होण्या'ची किमया साधली जावी.

शेतीला जरूर तिथे मदतीचा हात दिला पाहिजे; तसा तो कोणत्याही अुद्योगाला दिला पाहिजे. सारे काही मुक्त आणि निर्बंध करून टाकले तर लफंगे त्यांना लुटतील. तशी तितकी मुक्त व्यवस्था खरे तर असली पाहिजेच; पण त्यासाठी आपल्या देशाची आजची स्थिती अनुकूल नाही. भारतात शिक्षणासाठी आजवर जे प्रयत्न झाले ते दांभिक होते, त्यामुळे आजही लोक शिकलेले म्हणता येत नाहीत. शहाणेे लोक त्यांना फसवतील, लुटतील. त्यांना आळा घालण्यासाठी  काही बंधने, काही व्यवस्था, काही नियम असले पाहिजेत; त्यांची आज तरी गरज आहे. तात्पुरत्या मदतीचा हात  अपंगांना, गतिमंदांनाही दिला पाहिजे. त्यांनाही स्वावलंबन शिकवून सन्मानाने व समान प्रतिष्ठेने जगता यायलाच हवे. पण आज जे दुबळेपण त्या घटकांच्या माथी मारले जात आहे  त्याचा पुनर्विचार करायला हवा. `दुबळयाला काही धर्म करा..' असली  करुण साद घालण्यासाठी कोणालाही  प्रोत्साहन देअू नये. अगदी खऱ्या भिकाऱ्यालाही धर्मादाय वाढू नये, त्याला तशीच सवय लागते, तोच काहींचा धंदा बनतो. त्यांच्या नावावर मदत लाटणारेही अुपजतात.

`आपल्या देशातील बळीराजा दैन्य भोगतो, तसाच ग्राहकराजाही लुटला जातो. स्त्रीशक्तीवर अत्याचार चालू आहेत'... या विधानांच्या आशयांचे अेक वलय निर्माण झाले आहे. पुष्कळदा तसे अनुभव येतही आहेत, पण ते भासमानही आहे. सरसकट तशी स्थिती नाही. त्या वलयामुळेच दुर्गाशक्तीला `अबला' म्हणण्यासारखे ते आहे. अेकदा तिची  खरी परीक्षा करून मग तिच्या सामर्थ्यासाठी प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या नेमक्या दुखण्याला कर्जमाफीसारखा अुपाय करताना काही मुद्द्यांचा विचार करायला हवा. मुख्य म्हणजे आितकी दुर्बलता असेल तर त्या घटकाला अन्नदाता, बळीराजा, पोशिंदा वगैरे शब्द निदान वापरू तरी नयेत. आज दुर्बळ व अडाणी माणसेच शेती करण्याला शिल्लक राहिली असतील तर त्यांना मदत केलीच पाहिजे, पण राजा मानून नव्हे तर गरजू म्हणून. त्यांना राजा म्हणायचे आणि सतत गरजू ठेवायचे हे राजकारण आहे.

शेती हा आितका दुर्बळ व्यवसाय झाला असेल तर मग त्याच्या आर्थिक वृध्दीचा दर विचारातही घेअू नये. दुसरे म्हणजे ज्या कुटुंबांत अेक माणूस नोकरी करतो, त्याला नोकरदार म्हणावे; शेतकरी नव्हे. जवळपासच्या शहरांतून नोकरी करणारे कित्येकजण फटफटीवरून कामावर जातात, चांगल्या स्थितीत राहतात. त्यांच्या घरी काही  शेती असेल तर त्यास कर्जमाफी कशासाठी? ते लोक दिवसभर शेतीत घाम गाळत नाहीत, तर नोकरी करतात. कित्येकांना सातवा वेतन आयोग किंवा खाजगी मोठ्या कंपन्यांत चांगले पगार आहेत, त्यांनी स्वत:च्या किंवा आपल्या कुटुंबाच्या शेतीकर्जाचा भार अुचलला तर काय हरकत आहे?आणखी अेक प्रश्न असा की,  शेती तोट्यात आहे हे खरेही असेल, पण मग त्या शेतीला भरमसाठ दर कसा काय; याचे अुत्तर कोणी देत नाही. किंबहुना कोणी तसे फार मोठ्याने विचारतही नाही, कारण तो शेतकऱ्याशी किंवा काळया आआीशी द्रोह मानला जाण्याचे भय आहे. सरकारने आता जमिनींच्या आधारभूत किंमतीही बऱ्याच वाढविल्या आहेत, आणि ते योग्यही आहे. अजिबात न परवडणारा, कर्जाच्या विळख्यात बुडविणारा शेतीचा व्यवसाय करण्यापेक्षा सरकारी दराने जरी शेती विकली तर महामूर पैका हाती येअून शेतकरी खरोखरीच राजा होआील. पण तसे का होत नाही? आणि सारेजण शेती विकायलाच लागले तर त्या जमिनींच्या किंमतीही खाली येतील, तसेही होताना दिसत नाही. आजकालचे राजकारणी लोकही आपल्या `विकासप्रकल्पांसाठी' शेतकऱ्यांच्या दराने जमिनी  न  घेता सरकारी जमिनी स्वस्तात किंवा सवलतीत मिळवतात. याचे आिंगित काय?

कर्जमाफीच्या समर्थनाच्या संदर्भात विजय मल्ल्या किंवा त्यांच्यासारख्या बुडव्या बड्यांचा दाखला दिला जातो. वास्तविक त्या दोन भिन्न बाबी आहेत. शिवाय मल्ल्या किंवा कोणा बड्याचे कर्ज माफ केले आहे असे अजून तरी नाही. कठीण स्थितीतून बाहेर पडण्यासाठी काही सवलत द्यायची ती शेतीलाही दिली जाते. मोठ्या माणसाने  आर्थिक घोटाळा केला, म्हणून आमच्या कर्जमाफीची मागणी सारखी योग्य मानता येणार नाही. ते तर मोठे दराडेखोरच आहेत. परंतु त्यांच्या दरोड्यावर काही शिक्षा देता येत नाही, तर आमची पाकीटमारी माफ करायला हवी  हे म्हणणे न्याय्य नाही. मोठी धेंडे ही समाजात सदैव साळसूदपणे सुटतात. `पतिव्रतेच्या गळयात धोंडा, वेश्येला मणिहार' हा तर कोणत्याही काळातील अुध्दवी सरकारचा अजब कारभार असतो. तो अन्याय आहेच पण सहन करणे तेवढेच भाग असते. औरंगजेबाच्या राज्यात बदमाशांना सरदारकी मिळत असेल, पण आपण अर्धपोटी लंगोटीवर राहून श्रींचे राज्य आणण्याचा चंग बांधायची प्रेरणा आपल्यापुढे असायला हवी. `त्यांना' त्यांची दुखणी भोगावी लागावीत यासाठी आपल्याला कठोर तपश्चर्येचे जिणे पराक्रमाने आणि अभिमानाने जगले पाहिजे. ती आिथल्या सामान्य शेतकऱ्यांची अुज्ज्वल आणि अुर्जस्वल  परंपरा आहे.

शेती आणि शेतकरी  हा या देशाला मिळालेला पुण्यप्रद वारसा आहे. त्याचे मोल खरे तर भावनिक आहे, श्रध्देचे आहे, तितकेच ते व्यावहारिक आणि व्यावसायिकही असले पाहिजे. त्या साऱ्या वैशिष्ट्यांचा अुत्कर्ष झाला तर त्यास प्रतिष्ठा मिळेल. अेखाद्या अनपेक्षित संकटावर तात्पुरता अुपाय म्हणून काही योजना केली पाहिजे. तथापि त्याअैवजी  अर्थ, तर्क,प्रशासन वगैरे कोणत्याही  शास्त्रीय  शिस्तीच्या कसोटीचा विपर्यास करून राजकारणी मागण्या करत राहण्यात काय अर्थ?

त्रि स्थ ळी
सामाजिक कप्पे
परवाच्या आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम होता. अर्थातच तो कार्यक्रम काही दलित मंडळांनी आयोजित केलेला होता. निळे ध्वज, मिरवणुका, त्याच त्या पठडीतील भाषणे... असे सारे चालू होते. काही तथाकथित अुच्चवर्णी तिथे गेले. यांनाही आंबेडकरांना प्रणाम करावासा वाटत होता. पण त्यांना तिथे पाहून तिथले अेक दोन कार्यकर्ते म्हणाले, ``आँ, तुम्ही आिथं कसे काय?''प्रश्नाचा रोख कुणाच्याही लक्षात येआील अशी विघटित स्थिती सध्या आहे. जी थोर माणसे होअून गेली, त्यांची वाटणी कोणत्या थराला गेलीय हे लक्षात आल्यावर खरंच वाआीट वाटतं. ज्यांनी असल्या सामाजिक भेदांचा नि:पात करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला, त्यांचा पराभव आपण आजच्या काळात किती सहजगत्या करतो आहोत!
शिवाजी महाराज असोत, परशुराम असो, तुकाराम, रामदास असो, किंवा नुसता राम असो. सगळयांना अेकेक जात जमात मिळाली आहे. ती त्यांच्याही नशीबातून जात नाही. आंबेडकरांसारखा प्रकांड पंडित, बुध्दिमान, प्रयत्नवीर, महामानव भारताला ललामभूत आहे. पण त्याच्या अुत्सवात `आितर' कुणी जाअूच नये, असा  संकेत का पाळला जातो? `तुम्ही आिथं कसे काय?' या प्रश्नाचे अुत्तर, `तुम्ही असे विचारून आम्हाला दूर ठेवता, म्हणूनच आम्ही यायला कचरतो...' असे दिले तर? यापुढची पायरी म्हणजे अशी अेक भीती आहे की, अुद्या जर कुठल्या अुच्चवर्णी मंदिरात आंबेडकर जयंती आयोजित केली तर त्यावर आक्षेप घेतला जाआील की काय? `आमचे बाबासाहेब यांनी पळविले...' असे म्हणण्याचे राजकारण होणार नाही याची खात्री आजच्या काळात देता येआील?
मनात हा कल्लोळ आहे. खंत आहे. काळजी आहे. ही विषवल्ली नष्ट करण्यासाठी काय करायला हवे? आणि ते कोण करेल? सरकार? शाळा? राजकीय पक्ष? अुत्सव मंडळे? सामाजिक संस्था? धार्मिक संस्था? कोण? कोण?

अुलटा प्रवाह
आपल्याकडे सध्या आिंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले आहे. कुठल्याही खेड्यापाड्यात `आिंटर नॅशनल स्कूल' च्या पिवळया गाड्या धावताना दिसतात. त्यात शिकणारी पोरं `ब्बिचारी' म्हणण्याच्याच पात्रतेची आहेत. सारे शिक्षणतज्ज्ञ ओरडओरडून सांगतात की प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून द्यायला हवे; पण ते अैकण्याच्या मन:स्थितीत कोणी नाही. आजचे जगही लहान झाल्यामुळे अेका ठराविक अंतराच्या कक्षेत फिरणारी माणसे आता मोठ्या वर्तुळात घुमू लागली आहेत. मराठी  नवऱ्याची बायको हिंदी पट्ट्यातील असेल तर त्यांच्या बालकांची मातृभाषा कोणती, असाही प्रश्न पडू शकेल. आणि तसा प्रसंग हल्ली सरसकट येत आहे. चेन्नआी किंवा जलंदर अशा शहरांत गेलेल्या मराठी कुटुंबांनी मराठी शाळा कुठून शोधायच्या हा प्रश्न येतोच. याही प्रांतात समरसून जाण्याअैवजी तिथे आपले मराठीपण जपण्याचे कोण कौतुक असते.
मातृभाषेतून शिक्षण म्हणजे `आआीच्या' भाषेतून असा अर्थ न घेता, `सभोवतालच्या भाषे'तून असा अर्थ घ्यावा लागतो. आपला मित्रपरिवार, सवंगडी, दुकानदार, रिक्षावाले जी भाषा बोलतात, त्या भाषेतून शिकले तर ते लवकर समजते, असे मानले जायला हवे. त्यास मातृभाषा म्हणायचे. आपल्यातली पुष्कळ कुटुंबे आजकाल विदेशी जातात, राहतात. तिथे त्या त्या भाषेतील शिक्षण घ्यावे लागत असते. जगाच्या पाठीवरचा विचार केला तर बहुतेक देशांतून आिंग्रजी चालते, त्या माध्यमाच्या शाळा अुपलब्ध होअू शकतात. मराठी मुलखात हट्टाने आिंग्रजी शाळा चालविण्याचा मक्ता हल्ली  पालकांनीच घेतला आहे  याचे अजब वाटते..
तितकेच अजब वाटणारी बातमी अलीकडे प्रसारित झाली आहे. ती म्हणजे अमेरिकेत मराठी शाळा काढली असून तिला `फॉरिन लँग्वेज स्कूल' या सदरात शिकागोच्या आिलिनॉय स्टेट बोर्डाने मान्यताही दिली आहे. अमेरिकेत जन्मलेल्या व त्या भाषेशी अेकरूप झालेल्या नव्या पिढीला मराठी बोलता यावी यासाठी हे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेतील `महाराष्ट्न् मंडळाच्या झेंड्याखाली अशा ४० मराठी शाळा सुरू आहेत. त्यामुळे तिथल्या मुलांना  निदान `कामापुरते' मराठी बोलता येआील, आिथे राहणाऱ्या आजी-आजोबांशी संवाद करता येआील. आपल्याकडच्या मुलांना `कामापुरते' आिंग्रजी यायला हवे; आणि तिकडच्या मुलांना `कामापुरते' मराठी यावे..... माणसांचा खटाटोप  न  कळणारा आहे!!

आता काय भूमिका घेणार?
अेका अुपवर मुलीने स्वत:च्या लग्नासाठी तिच्या बापाकडे पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सर्वांना विचार करायला लावणारी आहे.अलीकडे आत्महत्या झाल्याच्या बातम्या वारंवार येत असतात, आणि कोणताही प्रकार हृदयाचे पाणी करणाराच असतो. पण ताजी घटना वेगळी याकरिता आहे की, त्या पोरीने जीव देताना लिहून ठेवलेली चिठी. आपले ठरलेले लग्न पैशाअभावी पार पाडता येत नाही, याबद्दल बापाची कीव करून या पोरीने आयुष्य संपविले. त्याशिवाय तिच्या मराठा कुणबी जातीत हुंड्याचा काच असह्य झाल्याची नोंद तिने आवर्जून केलेली आहे. गेल्या काही दिवसांत त्या समाजाने आपल्यावर आितरांकडून होणाऱ्या तथाकथित अन्यायावरून राजकीय रान पेटविले आहे; त्यामुळेच या दुर्घटनेविषयी त्यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रियेची आणि आंदोलनाची दिशा जाणून घेण्याची सर्वत्र अुत्सुकता आहे.
असा काही प्रकार कोणाच्याही बाबतीत घडतो तेव्हा तो तितकाच भीषण असतो. शेतकऱ्याने केलेली आत्महत्या गंभीर आणि कर्जबाजारी  रिक्षावाल्याने किंवा अुद्योजकाने केलेली ठीक, अशी काही विभागणी करणे गैर आहे. कोण्या महिलेवर किंवा कुटुंबावर अतिप्रसंग झाला की, तो कोणत्या जातीच्या माणसाने कोणत्या जातीच्या माणसावर केला, यावरती त्या संदर्भातील आंदोलने अुभी करण्याची अविचारी प्रथा पडली. आिथे तर आता आपल्याच अेका मुलीवर आलेला प्रसंग आपल्यातल्या रूढीमुळे गुदरलेला आहे; हे पाप कुणाच्या मस्तकी मारायचे? समाजात अन्याय होअू नये, तर प्रथम आपल्यातल्या आपल्यात होणारे अन्याय दूर करायला हवेत. `आमच्यातल्या रूढींचं आम्ही पाहून घेअू..' असे त्यावर म्हणता येआील काय? ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मण स्त्रियांवर होणाऱ्या केशवपनाच्या अन्यायाविरुध्द न्हावी लोकांचे आंदोलन अुभारले होते, हे या संदर्भात सर्वांनी ध्यानी घेतले तर बरे!!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन