Skip to main content

1 june 2017

मोडीत चाललेली मूल्यवान लिपी
बाराव्या शतकातील यादवांच्या साम्राज्यापासून  पुढे बहामनी काळ, शिवकाळ, पेशवेकाळ आणि आंग्ल काळ या साऱ्या कालखंडांत; आणि अगदी आपल्या आजोबा-पणजोबांच्या कारकीर्दीपर्यंतही केवळ महाराष्ट्न्भरात नव्हे तर साऱ्या हिंदुस्थानात मोडी लिपीने अधिराज्य गाजविले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मात्र १९५० साली तत्कालीन मुंबआी सरकारने -बाळासाहेब खेरांच्या पहिल्याच मंत्रीमंडळाने - कोणताही साधक बाधक विचार न करता तडकाफडकी ती लिपी कालबाह्य ठरवली. आणि अेकदम मोडी लिपी मोडीत निघाली. तोपावेतो शाळाशाळांतून मोडी लिखाण शिकवले जात असे. तेथपासून मात्र मोडी वाचनाची प्रक्रिया बंद पडली. आज ज्यांचे वय ८०-८५ आहे, अशांतील काही मोजक्या लोकांस चाचपडत मोडी वाचता येते. पण त्यांची वाचनक्षमताही तितकी राहिलेली नाही. मोडी चांगल्या रीतीने वाचता येणारी माणसे आता अगदी हाताच्या बोटांवर मोजता येतील.
तथापि त्या लिपीची गरज संपलेली आहे असे मुळीच नाही.  स्वातंत्र्यानंतर त्या लिपीचे आधुनिकीकरण तसेच किमान गरजेआितका प्रचार प्रसार व संवर्धन करायला हवे होते पण दुर्दैवाने तसे झाले नाही. महत्वाची अैतिहासिक माहिती, कागदपत्र, पुरावे, जमिनीच्या खरेदीविक्रीचे व्यवहार, आज्ञापत्रे, मृत्यूपत्रे, सनदा, नोंदी, वंशावळी, जातींचे दाखले, असे असंख्य प्रकार कधीकाळी लिहून ठेवलेेले असतात. पण आजच्या काळातही त्यांचा वापर पुष्कळदा करावा लागतो. महाराष्ट्नच्या आितिहास संशोधनासाठी तर मोडीला पर्यायच नाही. पूर्वीचे ते सारे कागदपत्र मोडीत असल्यामुळे  स्थावरांचे वारस, वाटण्या, हक्क, वगैरे कारणांसाठी ती लिपी शिकून त्याचे आजच्या देवनागरीत लिप्यंतर करणे आवश्यक ठरते; आणि शुध्द व्यावहारिक बाब म्हणजे तो अेक अुत्तम व्यवसाय होअू शकतो.
शासनाकडील, व जनतेकडील मोडी कागदपत्रांचे देवनागरीत लिप्यंतर करण्याबाबत आज खूप अडचणी येत आहेत कारण ते काम करणारी माणसे नाहीत. महाराष्ट्नच्या कोणत्याही तालुक्यांत जिल्ह्यांत अधिकृत मोडी लिपीचा तज्ज्ञ नसतो; त्यामुळे शासनाचे निर्णय खोळंबून पडलेले असतात, किंवा अेकतर्फी निकाली काढले जातात. त्यामुळे वाद वाढत जातात. पुष्कळांवर अकारण अन्यायच होतो. त्याविरोधांत पिढ्यान्पिढ्या कज्जे खटले चालू राहतात. जनतेचे स्वास्थ्य कमी होते, अनेकांचे  नुकसान होते.
भारत स्वतंत्र झाल्यावर १९४७ साली भारत सरकारने अैतिहासिक दस्तावेज आयोग (हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशन) नेमला. त्यांनी मोडी लिपीतील कागदपत्रांची अे बी सी अशी विभागणी केली. त्यातला पहिला भाग राजकीय पत्रव्यवहाराचा - म्हणून तो महत्वाचा ठरला. ते कागदपत्र सरकारने पुरातत्व विभागाकडे सुपूर्द केले. तिसऱ्या प्रकारातील बहुतांश कागदपत्र निरुपयोगी ठरवून नष्ट करण्याचा निर्णय केला. पण पूर्वीच्या राजघराण्यांतील बऱ्याच मंडळींनी त्यास विरोध केला. ती कागदपत्रे ज्यांना जशी हवी होती, ती त्यांच्या ताब्यात देण्यात आली. त्यांनी ती खाजगी संग्रहात ठेवली. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू अेकोजीराजे  यांनी दक्षिणेत तंजावरला मराठी राज्य स्थापन केले होते; तिथे `सरस्वती महाल'  या नावाचे ग्रंथालय अुभारले. सन १६७६ ते १८९५ या प्रदीर्घ कालखंडातील कागदपत्र तिथे जतन करून ठेवले आहेत.
आितिहास समजून घ्यायचा तर मोडी वाचकंाशिवाय सारे अडते. मोडी वाचकांअभावी अैतिहासिक घटनांची अुकल होअू शकत नाही. आपल्याला विचारच करायला लावणारी - किंवा मान खाली घालायला लावेल अशी  - गोष्ट म्हणजे, परकीयांनी मोडी लिपी अुत्तम प्रकारे आत्मसात केली होती. आपण विशेषत: मराठ्यांचा आितिहास शिकला, तो ग्रँट डफ याच्याकडून! फादर पर्लिन, मोलीसन, स्टुअर्ट गार्डन, मादाम अेलिझाबेथ, पेचकॉव्ह, चार्ल्स किेकेट ही सारी  पश्चिमी देशांतील माणसे आपला आितिहास आपल्याला शिकवतात. त्या लोकांनी मोडी लिपीचा आणि पूर्वीच्याही मराठी भाषेचा अभ्यास केला हे अजब म्हणावे का?
प्राचीन काळापासून साऱ्या भारतभर विस्तारलेली व आजही वापरली जाणारी देवनागरी लिपी संख्येच्या बाबतीत प्रथम ठरेल. त्या वैभवशाली भाषेची शीघ्र लिपी म्हणून मोडी वापरत.. जिथे मराठे पोचले  तिथे त्यांच्याबरोबर मोडी पोचली. हिंदुस्थानातील १३ विविध भाषांसाठी त्यांनी मोडी लिपी वापरली. आजच्या काळात संगणकाचा प्रसार वेगाने वाढला, वाढतो आहे. तरीही मोडीविषयी जागृती होणे योग्य होआील. इतिहासात डोकावण्याची  खिडकी म्हणून त्या लिपीला महत्व आहे. मोडी लिपीने आपल्या पानांपानंात दडविलेल्या गूढ व रहस्यमय आितिहासाला अशा लोकांची ओढ आहे. शिवाय थोड्याफार प्रयत्नांनी साध्य होणारी ती लिपी अर्थार्जनाचेही चांगले साधन होअू शकते.
मोडीचे वर्ग चालतात. काही व्यवसायिक आहेत. त्यासाठी परीक्षा होते. शासकीय परवाना घेतल्यानंतर त्याचे वाचन आजच्या आिंग्रजी हिंदी वा मराठी भाषेत करून देण्याचे काम करता येते व ते अधिकृत मानले जाते.
-राधाकृष्ण ब. बुट्टे पाटील

जुन्या काळातील राजेरजवाडे, सरदार-नबाब, यांनी त्या काळात विशेष पराक्रम गाजविणाऱ्यांना आिनामी जमिनी, वतने दिली. त्यांचे अभिलेख शिवाय वारसा हक्कांचे दस्तावेज मोडीत लिहून ठेवले आहेत. सध्या बऱ्याच जणांकडे मोडी लिपीतील दस्त आहेत,  पण ती लिपी वाचणारे लोकच नाहीत. परिणामी `आंधळीया हाती दिले जरी मोती, वाया जाय ।' अशी स्थिती आहे. मोडीतील अगणित कागदांचे आधुनिक लेखन वा अनुवाद करून दिल्यास  त्यायोगे अगदी सामान्यजनांपासून सर्वांना फायदा होणार आहे.
माझ्या बाबतीत सांगायचे तर बार्शी तालुक्यातील पांगारी गावात श्री रंगनाथ स्वामींचा मठ आहे; तेथील आद्य मठाधिपती कोण, मठाची घटना कशी आहे, आतापर्यंतचे मठाधिपती कोणत्या वारसाने आले, मठाची मालमत्ता कोठेकोठे व किती आहे वगैरे सारे कागद मोडीतून आजच्या भाषेत मला करून घ्यावे लागले.
-शंकर अभिमान बावकर, मांजरी बु ।। (पुणे)
 मोडी लिपीसंबंधी अधिक माहितीसाठी-
वैशाली मोहन फडणीस, बेलबाग, लक्ष्मी रोड, पुणे ४११ ०
फोन : ०२०-२४४ ५५ ९०१ मो.न.९८८ १६९५ ५६२

आपल्या स्वास्थ्यासाठी इतरांशी दुरावा
ज्यांना जगण्यासाठी डोळयासमोर काही साध्यच नसते असा समाज कालांतराने नामशेष होतो असे म्हणतात. काही वर्षांपूर्वी किंवा दशकांपूर्वी जे कोणी फुकटचंबू आयतोबा असे समाजगट होते, त्यांच्याविषयी आितरांच्या मनांत रोषही नव्हता; कारण त्यांचे आयते मोठेपण त्या आितरांना कळत नव्हते आणि त्यांचे स्वत :चे कमीपणही कळत नव्हते. दिवस बदलले, काळ बदलला, स्थिती बदलली. गेल्या अेक दोन पिढ्यांमागील महापुरुषांनी  सामाजिक चळवळी केल्या, त्यांतून दबलेल्या दुर्बळांना हळूहळू आवाज प्राप्त झाला. त्यांना स्वत:च्या दुस्थितीची जाण आली. त्या जाणिवेची पहिली प्रतिक्रिया आपल्या क्षमता व मर्यादांच्या कमीपणापेक्षाही, आजवर श्रेष्ठस्थानी असलेल्यांबद्दल सूडाची  होती. ज्यांनी सामाजिक शिक्षणावर भर देअून दुर्बळांच्या अुत्थानाला बळ द्यायचे होते त्या नव्या लबाड नेतेमंडळींनी  नवजागृतांच्या सूडभावनेलाच खतपाणी घालण्याचे प्रयत्न केले, आणि तसेच ते आजही चालविले आहेत. याचा परिणाम म्हणून किंवा त्या सूडप्रवासाची प्रतिक्रिया म्हणून समाजात अेक प्रकारे दुभंगलेपण आले आहे.

सोयी सवलती, आरक्षणे, अनुदाने, माफी या साऱ्या अुपाययोजना वास्तविक  समुत्कर्षाच्या भावनेतून केल्या गेल्या, आणि त्या गरजेच्याही  होत्या. पण त्यांचा अुद्देश राहिला बाजूला! दुर्बलांचे दुबळेपण ही त्यांच्या हक्कांसाठी पात्रता मानली जाअू लागली आहे. त्यामुळे मग स्वत:चे दुबळेपण दाखविण्याचा खटाटोप सुरू करावा लागला. आपल्या दुर्बलतेच्या हक्कासाठी  शक्तीप्रदर्शन करणे ही अजब विचारांची चळवळ फोफावू लागली आहे. आमचे दुबळेपण आितरांना दाखवून देण्यासाठी मंत्रालयावर विराट मोर्चा काढणे हे परस्पर विरोधी आहे, हेही कुणाच्या लक्षात येत नाही. `कोण म्हणतो देत नाही? घेतल्याशिवाय राहात नाही'.. ही भाषा  त्या समाजगटाची दुर्बलता दर्शवीत नसून मनाचा मागासलेपणा दर्शविणारी वाटते. ते मागासलेपण कोण्या जन्मजात जातीवर ठरलेले नाही, तर कोणीही व्यवसायिक, कोणताही वयोगट, कोणताही प्रांत असल्या मागासलेपणात मागे नाही . फार कशाला आमचे आमदार खासदार आणि मंत्रीसुध्दा अजूनी आपल्या हीणत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी चमत्कृतीची बालिश आंदोलने करतात. तसेच साधूसंत म्हणविणारेही त्यांच्या हक्कंासाठी आितरांचा रस्ता रोधणारी शक्ती प्रदर्शने करीत असतात. आपल्याला त्या मानसिक मागासलेपणाच्या विरोधात काम करायला हवे.

ते काम करण्याचे समंजस मार्ग फारसे कठीण नसतात, पण ते सातत्याने चिकाटीने श्रध्देने अनुसरत राहावे लागेल. मुख्य म्हणजे ते मागासलेपण समाजातून हटविले गेलेच पाहिजे अशी आत्यंतिक आिच्छा हवी.  ते काम आपण आणि आपणच करू शकतो हेही  समजून घेतले पाहिजे. पहिला अुपाय करण्याआधी चालू व्यवहारांत जे चूक वाटते ते आपल्याकडून आपल्यापुरते तरी रेाखले पाहिजे. कुठली तरी कुणाची तरी जयंती पुण्यतिथी असली की त्या त्या महनीयास आपले मानणारा समाजगट गावभर दंगा करतो. मिरवणुका-डॉल्बी यांचा दणदणाट चालतो. ते जर चूक असेल तर आपल्या अुत्सवातील आपले वागणे वेगळे असायला हवे. लग्नाची वरात आपल्या तालेवारीची काढायला हवी असते, त्यावेळी पोलीसांनी आपल्याला मार्ग प्रशस्त करून द्यावा; परंतु दुसऱ्याची वरात आपल्या गाडीच्या आडवी आली तर मात्र त्यांनी `रस्ते अडवून काय तमाशा चालविला आहे', असा कांगावी त्रागा करावा; असे सध्या चालले आहे. त्यांतून जो विखार तयार होत जातो तो आजच्या सामाजिक भेदांची दरी वाढविणारा आहे.
केवळ माझे साधले पाहिजे, आितरांशी मला काही देणे घेणे नाही;  हा आजच्या समाजजीवनाचा मंत्र बनू पाहात आहे. काही प्रमाणात ती वृत्ती समाजात नेहमीच असते परंतु तिचे प्रमाण किती त्यावर समाजाची अुंची ठरते. अेरवी विविध प्रकारच्या प्रवृत्तींचे लोक या भूमीवर नांदतच असतात. सगळे जर संतमहंत झाले, तरी आपल्यातली मानवी व्यवस्था कोलमडेल. आपल्यात चोरी झालीच नाही, सर्वांनी अेकमेकाला खाअू पिअू घातले तर मग पोलीसांना काम राहणार नाही. न्यायालयांस काम नाही. कागदोपत्री नोंदी गरजेच्या नाहीत. सरकारचीच गरज नाही. सारा अनर्थच घडेल. जगात जसे मोर, ससे, असे संुदर प्राणी हवेत तसे कीटकही हवेत. तसेच मानवी वृत्तींचे आहे. पण म्हणून आपण त्यांपैकी कोण व्हायचे हे ठरवावे लागते. असे म्हणतात की, आपल्याला शिवाजी होता येणार नाही, पण त्याचा सैनिक व्हावे. तेही सोपे नाही म्हणून शिवाजीचा सैनिकही होण्याचे राहो, परंतु निदान अफजलखानाचा सैनिक होण्याचे टाळता येआील.

समाजात जी  नेते म्हणवणारी माणसे आहेत, त्यांना आपल्या दुर्बलतेची काळजी नाही, तर त्यांच्या नेतेगिरीची काळजी आहे. म्हणून ती नेतेमंडळी  दुर्बलतेचे प्रदर्शन करून सगळीकडे मागायला शिकवत आहेत; कमवायला शिकवत नाहीत. अपघात झाला तरी त्यातील जखमींना अुपचाराची घाआी करण्याअैवजी विम्याचे पैसे मिळण्यासाठी  थांबवून राहावे लागते. मेलेला माणूस फटिंगपिंटक असला तरीही वारसाला पाचसहा आकड्यांची भरपाआी मिळण्याची  मागणी शिकविली जाते. या अमानुषी व्यवहारांना रोखण्याची ज्यांची जबाबदारी आहे, तो वर्ग दुर्दैवाने त्या समाजापासून दूर चालला आहे. त्याच्यापुढेही प्रश्न आहेत पण ते वेगळे! ते सुटण्यासाठी काहीतरी मार्ग दिसतील सापडतील; पण समाजच पार तुटून फुटून गेला तर माणूस तरी कसा टिकणार आहे?

चोरी-चोरी 
`जागृत ग्राहक' या वडोदराहून ग्राहक जागृतीचे काम करणाऱ्या मासिकात, मूळ जुनागढच्या अनुभाई यानी ब्रिटानिया बिस्कीटसारख्या बहुराष्ट्नीय कंपनीची लबाडी कशी उघडकीस आणली, त्याची सुरस कथा वाचनात आली, ती आपल्या जागरूक सदस्यांसाठी :
अनुभाई भिमाजीयाणी ह्यांनी डिसेंबर २०१४ मध्ये `गुड डे' बिस्किटाचे २१० ग्राम वजनाचे १० पुडे विकत घेतले. पण २१० ग्रॅम वजन छापलेल्या त्या  पाकिटांचे प्रत्यक्ष वजन १८५.१४ ते १९२.१० ग्रॅम भरले. अनुभाइंर्नी प्रथम ब्रिटानिया कंपनीशी संपर्क साधला. कंपनीने `सगळी १० पाकिटे तपासणीसाठी परत द्या' असे सांगितले. मात्र हातातील पुरावा नष्ट होईल असे लक्षात येऊन, त्यांनी ५ पाकिटे देण्याची तयारी दाखविली, त्यास कंपनीने उत्तर दिले नाही. अनुभाइंर्नी कंपनीस नोटीस पाठवली. त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मग मात्र अनुभाइंर्नी जिल्हा ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
कंपनीचा असा पवित्रा होता की, ख्यातनाम कंपनीला ब्लॅकमेल करण्यासाठी सदर तक्रार केली आहे, ती रद्द करावी! देशभरात कुठूनही अशी तक्रार आलेली नाही. वजन माप अधिकाऱ्यांच्या समक्ष वजन केले असता, ते कमी भरले. ब्रिटानियाने असा युक्तिवाद केला की दीर्घ काळ पाकीट ठेवले तर वजनात घट होऊ शकते, पण तोही मान्य झाला नाही.
ब्रिटानिया कंपनीकडून सेवेत त्रुटी झाली असे सिद्ध झाले. तक्रारदार अनुभाई यांना १० हजार रुपये नुकसान भरपाई, ५००० रुपये मानसिक त्रासापोटी आणि २५०० रुपये खर्चापोटी असे ब्रिटानिया कंपनीने द्यावेत, असा आदेश जिल्हा मंचाने दिला.
प्रत्येक पाकीट जरी १०-१५ ग्र्रॅम कमी भरले, तरी कंपन्यांची कोट्यवधी पाकिटे खपत असतात, त्या कंपनीला किती फायदा होत असेल? लाखो ग्राहकांची छुपी फसवणूक!!

राष्ट्नीय प्रतिज्ञेची कथा
भारत स्वतंत्र झाल्यावर देशाची राज्यघटना तयार करण्याचे काम घटनासमितीकडे आले. घटनेची संहिता लिहिण्यासाठी त्या अंतर्गत वेगळी समिती होती, तिचे अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी घटनेचा मसुदा तयार करून तो सरकारला सादर केला. त्यात ३५०पेक्षा जास्त दुरुस्त्या सुचविण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्याचे अंतिम रूप २६ नोव्हेंबर १९४९ला तयार झाले. व  नंतर दोन महिन्यांनी ती भारतात लागू झाली.
तथापि या घटनेच्या अंमलबजावणीत कोणत्या अडचणी व अडथळे येतील, त्यांचा अंदाज घटनाकारांना होता. निव्वळ कागदावरच्या नियमांनी राज्यशकट चालतो असे नाही. कारण मग त्या नियमांचा आपल्या सोयीने अर्थ लावण्याचे कसब अंगी मुरते. आणि जे घटनेतील नियमांना अभिप्रेत नव्हते, ते लोकांच्या प्रत्यक्ष व्यवहारात डोकावू लागते. भारताची जनता धर्मांत, जातीं-पोटजातींत, प्रादेशिकतेत, भाषिक अस्मितेत विभागली गेली आहे. त्यांतून जे वाद निर्माण होतील ते राष्ट्नला धोकादायक स्तरापर्यंत वाढू शकतात, याची कल्पना आंबेडकरांनाही असणार. १९२८ साली सायमन कमिशनपुढे त्यांची त्याच आशयाची साक्ष झाली, त्यावरून भारतीय जनतेची ती दुखरी  नस बाबासाहेबांनी ओळखली होती हे दिसते. भारतीय लोकशाही आणि सार्वभौमत्व टिकण्यासाठी सुजाण नागरिक, आणि त्यांची अेकात्मता महत्वाची ठरेल हे त्यांनी त्यावेळीच सांगून ठेवले आहे.
त्याच अेकात्मतेसाठी अेक संस्कार म्हणून शालेय मुलांसाठी रोजच्या परिपाठात राष्ट्नीय प्रतिज्ञेचा समावेश करण्यात आलेला आहे. ``भारत हा माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत.....माझा देश आणि देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी.....'' ही शाळेतली प्रतिज्ञा वा शपथ कोण किती निष्ठेने पाळतो यावरच देश टिकून राहतो की नाही हे ठरणार!
भारताच्या साऱ्या घटकराज्यांतून सर्व शाळांतील विद्यार्थी  रोजच्या प्रार्थनेनंतर ही प्रतिज्ञा घेतात. बहुतांशी पालकांनाही ती पाठ असेल. शिक्षण खात्यातील लोकांना किंवा शिक्षकांना ती प्रतिज्ञा कोणी लिहिली याविषयी माहिती असण्याची शक्यता आहे.
महंमद करीम (अेम सी)छागला हे आपले मुख्य न्यायाधीश होते. नेहरूंच्या नंतर शास्त्रीजी पंतप्रधान झाले, त्यांच्या मंत्रीमंडळात छागला हे शिक्षणमंत्री झाले.  शालेय वयापासून मुलांच्यात राष्ट्नीयत्वाची समज यावी या अपेक्षेने शाळेच्या वेळेसच अशी प्रतिज्ञा लागू करण्याची  कल्पना त्यानी मांडली. पेदेमरी व्यंकट सुब्बाराव यांनी ही प्रतिज्ञा लिहिलेली आहे. हे सुब्बाराव आंध्रप्रदेशाच्या नालगोंडा जिल्ह्यातील अन्नेपर्थी या गावचे रहिवासी होते. ते आंध्रात विशाखापट्टण येथे शासकीय अधिकारी होते. त्या राज्याचे त्या काळचे शिक्षणमंत्री पी व्ही जी राजू यांना प्रतिज्ञेचे शब्द फार भावले, व त्यांनी त्याचा प्रसार प्रचार मोठ्या  प्रमाणात केला. छागलांनी देशभरासाठी तसा विचार मांडल्यानंतर त्यांनाही तो मसुदा चांगला वाटला व तोच साऱ्या देशभरांत स्वीकारण्याची शिफारस त्यांनी केली. आज साऱ्या देशभरात ती प्रतिज्ञा मोठ्या प्रमाणात प्रसार पावली आहे.
संकलक- अरुण ग.राजहंस, गोडोली, सातारा
 फोन ९९२१ ९५८०९१

आम्ही कोक्स म्हणजे हलकंसं खाणारे!!
शेगटाच्या शेंगाची आमटी, भात आणि घरी कढवलेलं कणीदार तूप, पोळी, मटकीची उसळ, नारळाची चटणी, पोह्याचा पापड. खीर, पुरण. कैरीचं ताजं लोणचं, दूध तुपासहित पुरणपोळी....
सणासुटीचा हा फर्मास बेत आणि त्यानंतर तासाची झोप! त्याक्षणी समोर विठोबा उभा राहिला तरी एकच मागणं असतं, ``हेचि घडो मज, जन्मजन्मांतरी! मागणे श्रीहरी, नाही दुजे!!'' बदल करायचाच असेल तर पुरणपोळीऐवजी श्रीखंड; किंवा मटकीच्या उसळीऐवजी बटाट्याच्या काचऱ्या, किंवा पीठ पेरलेल्या तोंडलीच्या काचऱ्या, पडवळाच्या बियांची चटणी, पापडाऐवजी मिरगुंड, तीळ दाण्याची चटणी किंवा तळलेली सांडगी मिरची एवढं काहीतरी चालतं. ब्रह्मानंदी की कुठंशी टाळी लागते म्हणतात, ती अवस्था इतकी सहजसोपी. मी जातीयवादी नाही पण एखाद्या भरलेल्या पानात हिरमुसलेला तळणीचा मोदक, किंवा लसणीच्या चटणीत लसणीच्या मोठ्या मोठ्या कळया दिसल्या की मी भातीयवादी नक्की होतो. आपल्या ताटात किती किती चांगलं वाढलं जातं, ह्या विचाराने माझा ऊर भरून येतो.
आपल्याकडे प्रत्येक समाजगटाची एकेक खासीयत असते. जन्मापासून मी ती बघत आणि उपभोगत आलोय. मला आमच्या घरातल्या पदार्थांचं अपार कौतुक वाटतं. सुटीच्या दिवशी सकाळी हातात पिशवी घेऊन बाजारात गेल्याशिवाय स्वयंपाक चांगला होऊ शकतो, हे आमच्याकडून शिकावं; बिनकामाचे दहा-पंधरा मसाले न वापरता स्वयंपाक चांगला होऊ शकतो हे शिकावं, स्वयंपाकघरात शिजणाऱ्या पदार्थाची शेजारच्या आळीत वास-दवंडी न पिटवता चविष्ट कसं शिजवावं हे देखील आमच्याकडून शिकावं.
नारळावर आमचा विशेष जीव आहे. नारळातलं कोलेस्ट्नॅल वगैरे आमच्यासाठी भाकडकथा आहेत, किंवा अंधविश्वास! परशुरामांनी कोकणात नारळ रुजवला तो मुळात पोह्यांवर, साबुदाण्याच्या खिचडीवर,उपम्यावर, उसळी, कोशिंबिरीत किंवा आमटीत. आठवड्याभरात नारळाच्या दोन-चार वाट्या तुमच्या घरात संपत नसतील तर तुम्ही बारावा भिडू म्हणूनही पात्र होऊ शकत नाही; तो अगदीच मेषपात्र!
भाताबरोबर रस्सा हा प्रकार प्रचलित म्हणतात; पण तो चालवून घ्यायचा म्हणून घ्यायचा. भातासोबत आमटीच हवी. गोडं वरण किंवा साधं वरण चालेल कधीतरी; पण रस्सा म्हणजे अगदी क्रॅयतॅरीच! शहाळे, नारळ आणि सुकं खोबरं असं नारळ वर्गीकरण आणि गोडं वरण, साधं वरण आणि आमटी हे वर्गीकरण माहिती नसलेला कोक्स `बॉल बॉय' म्हणूनच चालेल. नारळावर जेवढा आमचा जीव आहे, तेवढाच तो उकडीच्या मोदकांवर आहे. कोक्स कधी तळणीच्या मोदकांच्या प्रेमात पडणार नाहीत. मोदक हे उकडीचेच; तळलेले तर वडेही असतात!  वाफाळणारे उकडीचे मोदक, ते उघडून त्यात तूप आणि जोडीला नारळाचं दूध -त्याला आपरस म्हणतात राजेहो!  मुनींचं तप मोडायला इतनाही काफी है; अप्सरा वगैरे गरज नाही.
सरते शेवटी ताक! ही उदरभरणाच्या यज्ञाची पूर्णाहुती आहे. त्याच्याशिवाय जेवण होऊच शकत नाही. ताकावर पोहणाऱ्या लोण्याच्या छोट्या छोट्या दळदार दाण्यांसहित शेवटची आहुती द्यायची, या खाद्य परंपरेचा पाईक व्हायची पुन्हा एकदा प्रतिज्ञा करायची, आणि निवांत वामकुक्षीच्या रस्त्याला लागायचं! विठोबा मोक्ष द्यायला उभा असतोच!!
जेवणाची आवड प्रत्येकाला असते, तशी ती मलाही आहे. यात अवाजवी श्रेष्ठत्वाचं प्रदर्शन करून कुणाला दुखवायचा हेतू अजिबात नाही.
 -सारंग लेले, आगाशी (अनिल नेने, इंग्लंड  यांच्याकडून)

एका सत्यकथनाचे ७ दिवस  ते  ७ वर्षे
 या पुस्तकातील काही अंश -
माझ्या धाडसी वृत्तीची एक कथा सांगितल्याशिवाय मस्कतची कहाणी पूर्ण होऊ शकत नाही. एके दिवशी संध्याकाळी माझा सेल्स डिपार्टमेंटचा साउथ इंडियन पार्टनर मला म्हणाला, की ``आपटे, माझ्या एका मित्राला एअरपोर्टवर सोडायचे आहे, तर येतोस का?'' रात्री मला दुसरा उद्योग नसल्याने व गाडीतून अनायासे चक्कर होईल म्हणून मी `हो' म्हणालो. त्याच्या मित्राला घेऊन आम्ही त्याला एअरपोर्टवर सोडलं व तीस किलोमीटर घराकडे परतू लागलो. रात्रीचे ११.३० वाजले होते. पौर्णिमेच्या जवळची रात्र होती. वाटेत थोडावेळ जवळच असलेल्या समुद्रकिनारी जाण्याची कल्पना निघाली.
तो म्हणाला, ``आपटे, इतक्या रात्री समुद्रात उतरण्याची कल्पना काय भयानक आहे नाही!''
मी म्हणालो, ``अरे त्यात काय? आपल्या अंगात धारिष्ट्य असल्यास असे करणे विशेष भयानक नाही!''
बघता बघता आमच्यात वाद होऊन बिअरच्या बारा टिन्सची पैज लागली. अशा रात्री गळयापर्यंत पाणी असलेल्या समुद्रात जाऊन येणे अशी पैज लागली. किनारा निर्मनुष्य होता. गाडीतून खाली उतरून आम्ही पाण्याजवळ गेलो. खरंतर जवळ साधा टॉवेलही नव्हता. सर्व कपडे काढून मी पाण्यात उतरलो. मनातील धैर्य एकवटून एकेक पाऊल पुढे टाकून मी गळयापर्यंतच्या पाण्यात लाटांचे अनेक धक्के खात पोचलो. तोंड उलटे करून आनंदाने व थोड्याशा बेहोशीने मी त्याच्याकडे पाहून हात हलविले. किनाऱ्याकडे येताना लाटांवर स्वार होत मला जातानापेक्षा निम्माच वेळ लागला. पाण्यातून बाहेर पडताना आश्चर्यचकित झालेल्या त्या गृहस्थाने माझ्याशी कौतुकाने हस्तांदोलन केले. आता बिअरचे १२ टिन माझे होणार होते, काय मंडळी कशी वाटली ही एका रात्रीची धाडसी कथा?
एव्हाना मला मस्कतमध्ये येऊन दहा महिने पूर्ण झाले होते; पण वयाच्या चौदा वर्षापासून पत्नीच्या आसपास राहण्याची सवय असल्याने मला आता प्रत्येक संध्याकाळ व रविवारचा दिवस काढणे अवघड वाटू लागले होते. आयुष्यात प्रथमच बायकामुलांचा सहवास, का पैसा? याची तुलना मनाला त्रास देऊ लागली होती. पत्नीला मस्कतला आणणे पूर्णत: अशक्य होते.

अपुरे काम व वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक संध्याकाळ व रविवारचा एकटेपणा माझे मन कुरतडू लागला होता. शेवटी मनाशी निर्णय घेऊन मी नोकरी सोडण्याचे ठरविले. त्या काळात भारतात मिळणाऱ्या पगाराच्या तिप्पट पैसे मिळणारी नोकरी सोडणे हा सर्वसामान्यांच्या दृष्टिकोणातून मूर्खपणा होता. कधीच न मिळणाऱ्या फॅमिली अॅकॉमोडेशनची मागणी करीत मी मित्रांकडे राजीनामा सादर केला. ते कंपनीच्या पॉलिसीमध्ये बसणार नसल्याने अपेक्षेप्रमाणे या वेळी तो मान्य झाला व अकरा महिन्यांनी नोकरी सोडून मी पुणे मुक्कामी परत आलो.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन