Skip to main content

Posts

Showing posts from 2013

16Dec.2013

स्वदेशीच्या चळवळीनं प्रेरित होऊन महाराष्ट्नतील अनेक तरुणांनी कारखानदारी चालू केली. त्यात ओगलेवाडीसारख्या छोट्या गावात `स्टील विंडोज' उद्योग `डी.एन.म्हैसकर आणि कंपनी'नं सर्वप्रथम चालू केला.या कारखान्याचे प्रवर्तक दामोदर नृसिंह म्हैसकर यांचा जन्म जोतिबाचे डोंगरावर २५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. एक होता उद्योजक दामोदर नृसिंह म्हैसकर त्यांचे वडील नृसिंह रामचंद्र (नरसोपंत) कीर्तनकार होते. नरसोपंतांचे सासरे प्रभाकरपंत ओगले. दामोदरचं आजोळ कोल्हापुरातच असल्यानं मामा लोकांकडे ओढा होता. त्यांना आठ मामा होते. व्यंकटराव व अवधूतराव यांचं नातं मित्रासारखं होतं. थोरले मामा गुरुनाथपंत व धाकटे आत्मारामपंत ओगले यांनी २५/१/१९१६ रोजी आैंध संस्थानातील विरवड्याच्या माळावर (कऱ्हाडजवळ) काच कारखाना चालू केला. दामोदरपंत १९२४ साली ओगलेवाडीत काच कारखान्यात रुजू झाले. इंजिनियरिंग कामाची आवड निर्माण झाली. गुरुनाथपंत जर्मनीस गेले होते. प्रभाकर कंदिल बनवण्याची यंत्रसामग्री तयार होईल तशी ते इकडे पाठवत होते. यंत्र उभारणीचा अनुभव दामोनर म्हैसकरांना श्री.आर.एन.लेले या तज्ज्ञ इंजिनियरच्या हाताखाली मिळाला. हे लेल

9Dec.2013

व्यक्तीऐवजी संघटनात्मक संघर्ष स्त्रियांवरील अत्याचार ही गोष्ट सध्या फारच संवेदनशील मानली जात आहे. स्त्री-पुरुष असमानता जगाच्या प्रारंभापासून आहे. शारीरिक, स्वाभाविक आणि प्राकृतिक दृष्टीने पुरुष निसर्गत: सबल असतो म्हणून त्याने अरेरावी करावी हे आज कोणीच मान्य करणार नाही. त्या अरेरावीमुळे निम्मी मानवसंख्या पीडित होणे निखालस वाईट, पण त्याहीपेक्षा कौटुंबिक व सर्व सामाजिक असंतुलन होणे हे तर महाभीषण! ज्या आधारे कुटुंबसंस्था विकसित झाली आणि कुटुंबांच्या समन्वयातून समाज सुसंस्कृत सुदृढ व्हावा, तो आधार समानतेच्या भावनेवर भक्कम राहायलाच हवा; समानतेच्या आचरणावर नव्हे! बायकांनी पॅन्ट-शर्ट घालण्याने समानता येत नाही, उलट पुरुषांप्रमाणे वागण्याच्या इच्छेतून पुरुषांचे प्राबल्य स्वीकारल्याप्रमाणेच होते. त्यांनी निसर्गत: ज्या मर्यादा सांभाळायच्या असतात, त्यांचे उल्लंघन होण्यातूनही त्यांच्याविषयी अनादर वाढू शकतो आणि समस्याही वाढू शकतात. सुसंस्कृतपणे, हळूवारपणे समाजमनावर हे सर्व बिंबवले पाहिजे, तसे योग्य वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घराघरांनी घ्यावी लागते. त्याऐवजी महिलांच्या बाजूने कायदे आणि कोर्

25Nov.2013

भय नको,बदल हवा नव्या जागतिक धोरणानुसार सर्व जगभर खुलीकरणाचे वारे सध्या वाहात आहेत. कोणत्याही देशामध्ये गुंतवणूक करून उत्पादन आणि व्यापार करण्याला खुलेपण येत आहे. आपल्या देशात मोठमोठे मॉल्स आणि किरकोळ विक्रीसाठी परदेशी कंपन्यांना परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय पुष्कळदा वादग्रस्त होतो आहे. त्यातले राजकारण सोडून दिले तरी, दळणवळणाची साधने आणि जागतिक आर्थिक नीती विचारात घेतली तर अशा प्रकारच्या मोठ्या व्यापारी संस्था-संघटनांना एकमेकांच्या देशात जाऊन व्यवसाय-धंदा करणे आवश्यकही बनले आहे. यापैकी सरकारी गोंधळ किंवा राजकारण बाजूला ठेवले तरी गावोगावच्या सामान्य व्यापाऱ्यांना खूप धास्ती आणि भय घातले गेले आहे. विदेशी कंपन्यांची मोठी दुकाने किरकोळ व्यापार करण्यासाठी गावोगावी आली तर, आपल्या इथला सामान्य व्यापारी संपून जाईल असे भय व्यापाऱ्यांनाही आतून वाटत असेल तर ते तितकेसे खरे नाही हे समजून घेतले पाहिजे. कुठल्याही व्यवसायाच्या दोन गरजा असतात. एक म्हणजे भांडवल पुरवठा आणि दुसरी गरज सेवाभाव अशी असते. केवळ भांडवल गुंतवून एखाद्या पेठेत दुकान सुरू केले की गिऱ्हाईक मुकाट्याने दारात येते असा आजपर्यंतचा

11Nov.2013

बुजुर्गांची जबाबदारी नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील का हा विषय आता तसा खेड्यापाड्यांपर्यंत चर्चिला जाऊ लागला आहे. काँग्रेसच्या गेल्या दहा वर्षात, लोकांना साऱ्या अटळ स्थितीचा विलक्षण उबग आला आहे, हे कुणालाही - काँग्रेसनिष्ठांनाही - जाणवत असेल. मोदींची पात्रता किंवा क्षमता हा विषय नाही, पण काँग्रेसने देशाची दयनीय अवस्था केली त्यासाठीचा राग लोकांच्यात आहे हे नाकारण्यात अर्थच नाही. मोदींविषयीच्या आशाअपेक्षांपेक्षा काँग्रेसप्रणित सरकारने केलेली दारूण निराशा अधिक परिणाम करेल असे दिसते. काँग्रेसवरचा हा राग ग्रामीण भागात मनमोहनसिंगांवर निघतो, पण राहुल गांधींविषयी आकर्षण आहेच आहे. त्याउलट शहरी भागात मनमोहनसिंगांचा अनुभव आणि आर्थिक धोरण यांस काहीतरी वजन आहे, पण राहुलबाबाच्या अस्तन्या सावरण्याची खिल्ली उडवली जात आहे. एक गोष्ट वास्तव आहे की, देशाच्या वर्तमानाबद्दल खूप नाराजी आणि भविष्याबद्दल खूप चिंता सार्वत्रिक आहे. राहुल गांधींचा अनुभव, पोक्तपणा, राजकीय समज, मुत्सद्देगिरी अशा सर्वांगांनी ते परिपक्व वाटत नाहीत; तरीही त्यांचे नाव पुढचा पंतप्रधान म्हणून प्रत्यक्ष मनमोहनसिंगच कसे काय ठासून सांगू

28 Oct.2013 ank

फिक्सिंगसाठी पुरस्कार हवा `चकाकतं ते सारं सोनं नव्हे' अशी म्हण आहे. कोणत्याही चांगल्याला चांगलं म्हणण्यासाठी सहसा जीभ रेटत नाही, असा आपला मराठी स्वभाव आहे. त्याचं कारण, ती म्हण त्याला पक्की ठाऊक आहे. चांगलं म्हणून जे समोर येतं आहे, ते खरोखरीच चांगलं असेल का, असा संशय आपल्याला येत राहतो. ते पाणी किती खोल आहे, त्याचे अंतस्थ झरे किती निर्मळ आहेत हे नक्की समजून घेतल्याशिवाय आपण मराठी माणसं त्या पाण्यात उतरत नाही, ते पाणी वापरत नाही. पूर्वाश्रमी बेताच्या मिळकतीचा व्यवसाय करणारा एकजण अलीकडच्या काळात चांगला गब्बर झाला. त्याला असं वाटू लागलं की, पैसा रग्गड झाला हे खरं पण अजूनी आपल्याला तसं मोठेपण आलेलं नाही, प्रतिष्ठा आलेली नाही. आपण पैसेवाले झालो, पण उच्चभ्रू मान्यवर झालो नाही. मित्रमंडळींसमवेत चाललेल्या गप्पांतून त्याने हे बोलून दाखवलं. मोठ्या कार्यक्रमात आपल्याला बोलावलं पाहिजे, वृत्तपत्रांतून वारंवार नाव आलं पाहिजे, लब्धप्रतिष्ठितांची ये-जा वाढली पाहिजे. हे सगळं कसं साधेल याची इलम शोधण्यासाठी, त्यानं सगळया मित्रांना आवाहन केलं. कुणी सुचवलं चार पत्रकार हाताशी धर, त्यांच्याशी दोस्त

21oct.2013

मनामनांत दीप लावू... दिवाळी म्हणजे नरकासुराचा वध, आणि नरक म्हणजे अस्वच्छता, घाण, अमंगल असा भवताल, घर आणि कलुषित मनसुद्धा! या सर्व ठिकाणची साफसफाई करून शुभ संकल्पांचा दीप लावायचा, ही मूळ कल्पना आपण लक्षात घेतली, म्हणजे मग आजच्या काळातील दिवाळी कशी साजरी करावी याची दिशा स्पष्ट कळते. कधी काळी - पन्नास-साठ वर्षांपूर्वी - साजरी केलेली दिवाळी आपल्या मनांत घर करून राहिलेली असते. त्यावेळी फटाके, फराळ, पहाटेच्या आंघोळी, सोंगट्याचा खेळ या सगळया रूढींचा आनंद घेतला. परंतु आजच्या काळात ते सगळे प्रकार तसे विसंगत आहेत. फटाक्यांच्या आवाजाचे प्रदूषण, शहरी दाट लोकवस्तीला धोका, आणि कागदकपट्याचा कचरा निर्माण करणारा हा प्रकार जितक्या लवकर बंद होईल तितका बरा; ही जाणीव आली तरच शुभकाल निर्माण करता येईल. याशिवाय, फटाक्यांच्या कारखान्यांत बालमजूर घातक वातावरणात काम करतात. त्यांना विम्याचे संरक्षणही नसते. आपल्या मुलांच्या आनंदासाठी त्या असंख्य मुलांचा जीव धोक्यात जातो, हा विचार करायला हवा. फराळाचाही वेगळा विचार केला पाहिजे. `त्या' काळी ते जिन्नस अपूर्वाईचे होते. एकत्र कुटुंबातील पाककलेची ती बहार होती. आज

14OCT.2013

अन्नसुरक्षेचा बारीपाडा मार्ग बारीपाडा हे महाराष्ट्नतले एक छोटेसे गाव (ता.साक्री, जि.धुळे) पलीकडे गुजरातचा डांग जिल्हा. शासन जेव्हा अन्नसुरक्षेच्या विधेयकाची तयारी करत होतं, तेव्हा हे गाव वेगळयाच गडबडीत होतं. गेली दहा वर्षे वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते. यावर्षी १८० स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. गावाची लोकसंख्या जेमतेम ७००. गावात शंभरच्या जवळपास घरे. जवळपासच्या वाडी-वस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहाने भाग घेतला. शहरी लोकांना माहीत नसलेल्या जवळपास २७ भाज्या या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या. एका म्हाताऱ्या बाईला मी अन्नसुरक्षा विधेयकाबाबत विचारले. ती माझ्याकडे बघतच राहिली. तिने साधा प्रश्न केला `काय देऊन राहिले भाऊ त्यात?' मी पोपटपंची केल्याप्रमाणे `१ रुपयाला ज्वारी/बाजरी, २ रुपयाला गहू, ३ रुपयाला तांदूळ' असं सांगितलं. म्हातारी हसून म्हणाली, `ज्वारी आमी खाईना, गहू जमत नाई. त्यो तसला तांदूळ आमी खाईना.' तांदळात नाही म्हणण्यासारखं काय आहे? बाजूला उभ्या असलेल्या एका तरुण पोरानं समजावून सांगितलं, ``साहेब, य