Skip to main content

Posts

Showing posts from March, 2012

Maza Column in 28 Dec.2012

उत्तरांतून प्रश्न एका वृद्धाश्रमात नुकताच गेलो होतो. अजूनी तरी माझ्यावर `तशी' वेळ आलेली नाही; तर नेहमीच्या भटकंतीपैकी ती एक सदीच्छा भेट होती. एरवी कोणत्याही ठिकाणी मी कधी `पाहायला' म्हणून जात नाही. देऊळ, जंगल, समुद्रकाठ किंवा संग्रहालय यांत पाहण्यासारखं मला तरी काही वेगळं दिसत नाही; यात माझा दृष्टिदोष असेल. पण काही कामासाठी किंवा त्या निमित्ताच्या मुक्कामी धामासाठी हिंडायला मी सहसा तयारच असतो. तशा एका फिरतीत वृद्धाश्रमात गेलो. अपंगालय, रुग्णालय, अनाथालय, मतिमंद गृह वगैरे सगळे प्रकार मी कित्येकदा अनुभवले आहेत. या वृद्धाश्रमातही तसं काही नवीन नव्हतं. इथं म्हाताऱ्यांची व्यवस्था तशी छान होती. पोटपाणी, विरंगुळा, औषधपाणी यांची सोय होती. संडास-मोरी, अंथरुणं हेही योग्य होतं. खर्चाची चौकशी सहज व्यवस्थापकाकडे केली तर दरमहा माणशी तीन हजार म्हणाले. त्यात रोजचं साधारण राहणीमान असतं. यातल्या बहुतेकांची मुलं-मुली-सुना अधून मधून भेटायला येतात. एकमेकांशी उत्तम संबंध आहेत.... वगैरे! एकूण इथं सगळे वृद्ध अगदी मजेत आहेत असं व्यवस्थापकाचं म्हणणं होतं. पण तिथं राहणारी माणसं आतून पुष्कळशी हलली हो

Lekh on Railway in 28 Nov.2011

रुळलेले रुळ रुळावरून गुडगुडत जाणारी धुडधुड गाडी जगभरातल्या प्रवासाचं एक सर्वमान्य वाहन आहे. तिला `रेल्वे' शब्द सर्वत्र `रूळला' आहे. आगगाडी आता कोळशाच्या आगीवर चालत नाही. ती आगीनगाडी राहिली नाही कारण त्यातला अग्नी विझून गेला. डिझेलवर इंजिन असेल तर धुरांच्या रेषा नाहीत पण भपकारे असतात. त्यात झुकझुक गाडीचं सौंदर्य नाही. विविधतेतील एकता दर्शविणारं उदाहरण पाहायचं तर रेल्वेगाडी पाहायलाच हवी. चड्डीतल्या पोरापासून बंडीतल्या आजोबांपर्यंत कुणालाही आकर्षित करणारी रेल्वे जगाच्या पाठीवर अनेक रूपांतून अनेक आविष्कार घडविते. त्यातील हे काही मासले - वायुवेगी वास्तविक या गाडीला वायुवेगी म्हणणे हा कोतेपणाच आहे. आपल्याकडे भन्नाट वादळ होतं, त्यावेळी त्या वाऱ्याचा वेग ६०-६५ किमी असतो. त्या वेगानं तर हल्ली पोरांच्या फटफट्या पळतात. हनुमंताला `मारुततुल्य वेगम्' म्हणायचं, तो त्याचा धावण्याचा वेग होता म्हणून. पण वायुवेग हे अतिवेगाचं एक जुनं प्रमाण म्हणून तो शब्द आपण वापरतो. चीननं तसल्या वाऱ्याला कधीच मागं टाकलं, त्यांची एक रेल्वेगाडी वारा प्याल्यासारखी तुफान वेगानं - (पुन्हा तेच! तुफान फारच थि

Lekh on Dattatraya Apte & Hari Phatak

गोव्यातील आल्मोद हायस्कूलचे शतक आपले पूर्वदिव्य लोकमान्य टिळकांचे दोन विश्वासू देशभक्त छात्र हरी गणेश फाटक आणि दत्तात्रय विष्णू आपटे यांना लोकमान्यांनी शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेण्याकरिता आणि ते जमले नाही तर गोव्यात शैक्षणिक कार्य करण्यासाठी १९११ मध्ये पुण्यातून गोव्याला पाठविले. फाटक-आपटे या जोडीने पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात तळ ठोकून कारवाया चालू ठेवल्या. त्यावेळी अहवाल गुप्तहेर खात्याने मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोचविला. परंतु पोर्तुगीज शासनाने फाटक-आपटे जोडीविरुद्ध काही कारवाई केली नाही. ब्रिटीशांविरोधात गोव्यात राहून काही करता येईल असे या दोघांना वाटेना. त्यांनी गणेशचतुर्थी १९११ या मुहूर्तावर `आल्मेद' या पोर्तुगीज शासकाच्या नावाने शिक्षणसंस्थेची स्थापना केली. केरीचे प्रसिद्ध देशभक्त समाजसेवक दादा वैद्य यांनी यासाठी पुढाकार घेऊन या तरुणांना गोमंतकात बोलावून घेतलेले होतेे. या त्रिकूटाने १९११ मध्ये स्थापन केलेल्या गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या `आल्मोदा हायस्कूल'ने शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यानिमित्ताने त्यांची छायाचित्रे संस्थेच्या कार्यालयात नुकतीच लावण्यात आली.

Sampadkya Book

बराच काळ प्रतीक्षेत असलेले पुस्तक प्रसिद्ध झाले... `आपले जग'मधील निवडक संपादकीय लेखांचे  संकलन पुस्तकरूपात उपलब्ध....  प्रकाशक - इंद्रायणी साहित्य, पुणे ३० (पृष्ठे : २२४  मूल्य रु.२००/-) प्रस्तावना   : श्री. सुधीर मोघेे   भाष्य : श्री.भानू काळेे    विशेष लेख : श्री.दीपक टिळक  दि.३१ मार्च २०१२ पर्यंत रोख/मऑ/किंवा `अॅट पार' चेकने रु.१६० मिळाल्यास पुस्तक पाठविण्यात येईल.   -`आपले जग', वाल्मिकी, पो.किर्लोस्करवाडी (जि.सांगली) ४१६३०८

Sampadkiya in 5 March 2012

व्यक्तीकडून समष्टीकडे नाशिक, पुणे-मुंबई, ठाणे यानंतर सांगलीमध्ये चित्पावन उद्योजक प्रतिष्ठानची स्थापना होऊन त्याचा पहिला शानदार मेळावा नुकताच पार पडला. `चित्पावन उद्योजक' हा शब्द आजपर्यंतच्या काळात वदतोव्याघात चे उदाहरण म्हणून उच्चारला जात असे. कारण या समाजात शिक्षण आणि राष्ट्न्कार्य याला प्राधान्य होते आणि त्या क्षेत्रात अनेकांनी कर्तबगारी दाखवून दिली ही वस्तुस्थिती असली तरी उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात, काही अपवाद वगळता फारसे काही भरीव करण्याची प्रवृत्ती दिसत नव्हती. ही गोष्ट जमण्यासारखी नव्हती अशातला भाग नव्हे, तर परिस्थितीचेही कारण होते. एकतर ही ज्ञाती सतत स्थलांतर करणारी आहे. बुद्धिमत्तेला जितके महत्त्व दिले जाते तितके, पैसे कमावण्याला दिले जात नाही. भांडवलाची कमतरता नेहमीची होती. कर्ज काढण्यासाठी कुणी जामीन राहण्यास उत्सुक नसत. कारण परस्पर विश्वासाचा अभाव होता आणि एकादशीच्या घरी शिवरात्र जाण्याचा तो प्रकार असल्यामुळे कोणी वित्तीय संस्था यांचा जामीन मान्य करणेही कठीणच होते. लक्ष्मी आणि सरस्वतीचे भांडण असल्याचा समज करून घेतल्यामुळे सरस्वतीचे पूजन करताना लक्ष्मीला घराबाहेरच

Lekh on Baya Karve in 5 March 2012 (Mahila Din Vishesh)

लग्न पाहिलं (पुन्हा) करून स्त्री शिक्षणाची गंगा अविरत व्हावी म्हणून ज्यांनी भगिरथ प्रयत्न केले त्या महर्षी अण्णासाहेब ऊर्फ धोंडो केशव कर्वे यांची द्वितीय पत्नी म्हणजे सौ.आनंदीबाई ऊर्फ बाया कर्वे. स्वत:चा संसार सावरत, अनेकांचे संसार त्यांनी मार्गी लावले. सौ.आनंदीबाई कर्वे यांनीही समाजाची अवहेलना सोसत समाजसेवा केली. सौ.आनंदीबाइंर्चा जन्म १८६५ सालचा. देवरुखच्या पावसकर जोशांपैकी बाळकृष्ण केशव जोशी यांचे सातवे अपत्य म्हणजे गोदूबाई. लहानपणीच गोवर आला. तान्ह्या गोदाला दूध देण्याची आवश्यकता होती म्हणून बाळकृष्ण पंतांनी म्हैस आणली; पण तिच्या खाण्याचा खर्च भागवावा तर दूध, तूप विकण्याचे पाप ब्राह्मणांनी करायचे नाही असा दंडक होता; तरीही  बाळकृष्णबुवांनी गुपचूपपणे तूप विकून खर्च भागवला. गोदा व पाठची कृष्णा या दोघींना देवी आल्या. आजारातून कृष्णा जगली नाही; गोदा मात्र वाचली. तिची प्रतिकारशक्ती चांगली होती म्हणूनच पुढे तिला काही कर्तृत्त्व दाखवता आले. गोदा अंगापिंडाने तशी थोराडच होती. वयाच्या आठव्या वर्षीच अचानक तिचे लग्न झाले. घरात लग्नाचा विषय कुणाच्या मनातही नव्हता. पण लग्न झालेली तिची आतेब

article from Sampadkiya book

न्यायदान न्याय्य मानावे  दोन संघांतील खेळाचा सामना कठोर संघर्ष असेल तर इरेसरीने खेळला जातो, त्यात कितीही खिलाडूपणा असला तरी पंच आवश्यक आणि अटळ असतो. तथापि एकदा पंचाचे अस्तित्व मान्य केल्यावर त्याचा निर्णय स्वीकारला गेलाच पाहिजे. एखाद्या वेळेस पंच पक्षपात करण्याचा संभव असतो तर एखाद्या वेळी त्याची चूकभूलही असू शकते. अशा अन्याय्य प्रसंगीसुद्धा तो न्यायच असल्याचे गृहीत धरावे लागते. जरी तो निकाल मान्य नसला तरीही त्याविरुद्ध चडफडाट किंवा बडबडाट करण्याचा असभ्यपणा क्षम्य नसतो. साध्या खेळातही ही सहजीवी माणुसकी जपावी लागते, प्रत्यक्ष न्यायालयाच्या बाबतीत तर त्याचे कठोर पालन जिवापाड केले पाहिजे. लोकशाही कायदेमंडळाने आखून दिलेली चौकट सांभाळण्याचे काम न्यायपालिकेचे आहे. न्यायाधीश हासुद्धा माणूसच आहे आणि त्याच्याही मर्यादा अथवा दोष `चुकीचा न्याय' करणे शक्य असते. तरीसुद्धा तो न्याय न्याय्यच म्हटला पाहिजे. दोन्ही पक्षांना स्वत:ची बाजूच योग्य वाटत असते म्हणून तर संघर्ष उभा राहतो आणि न्याय मागून निवाडा करावा लागतो. अर्थात निकाल काहीही लागला तरी एका बाजूला तो न पटणारा असणारच. तसे झाले तर वरच्या