Skip to main content

Maza Column in 28 Dec.2012


उत्तरांतून प्रश्न
एका वृद्धाश्रमात नुकताच गेलो होतो. अजूनी तरी माझ्यावर `तशी' वेळ आलेली नाही; तर नेहमीच्या भटकंतीपैकी ती एक सदीच्छा भेट होती. एरवी कोणत्याही ठिकाणी मी कधी `पाहायला' म्हणून जात नाही. देऊळ, जंगल, समुद्रकाठ किंवा संग्रहालय यांत पाहण्यासारखं मला तरी काही वेगळं दिसत नाही; यात माझा दृष्टिदोष असेल. पण काही कामासाठी किंवा त्या निमित्ताच्या मुक्कामी धामासाठी हिंडायला मी सहसा तयारच असतो. तशा एका फिरतीत वृद्धाश्रमात गेलो. अपंगालय, रुग्णालय, अनाथालय, मतिमंद गृह वगैरे सगळे प्रकार मी कित्येकदा अनुभवले आहेत. या वृद्धाश्रमातही तसं काही नवीन नव्हतं.
इथं म्हाताऱ्यांची व्यवस्था तशी छान होती. पोटपाणी, विरंगुळा, औषधपाणी यांची सोय होती. संडास-मोरी, अंथरुणं हेही योग्य होतं. खर्चाची चौकशी सहज व्यवस्थापकाकडे केली तर दरमहा माणशी तीन हजार म्हणाले. त्यात रोजचं साधारण राहणीमान असतं. यातल्या बहुतेकांची मुलं-मुली-सुना अधून मधून भेटायला येतात. एकमेकांशी उत्तम संबंध आहेत.... वगैरे! एकूण इथं सगळे वृद्ध अगदी मजेत आहेत असं व्यवस्थापकाचं म्हणणं होतं. पण तिथं राहणारी माणसं आतून पुष्कळशी हलली होती. तशी ती वृद्ध मंडळी साऱ्या व्यवस्थेवर खूश, पैसे तर गाठीला होतेच.
असं जर सगळं आहे तर मग वृद्धाश्रमात राहण्याचं नेमकं कारण काय? हेच माणशी तीन हजार आपल्या मुलाला किंवा जावयाला दरमहा दिले; किंवा तोच जर इथं देत असेल तर त्याचे वाचले तरी चालेल ना! प्रश्न जागेचा असेल तर मुलांच्या फ्लॅटला लागून एक खोली सहज मिळू शकेल. एका सोसायटीत अगर गावातल्या गल्लीत पाचसात वृद्धांसाठी एकत्र सोय करता येईल. तिथं `माणसात' राहायला मिळेल.
कुठंतरी शेपन्नास मैलांवर हे आश्रम शोधत जायचे; आणि तिथं पुन्हा या वृद्धांनी `माणसं भेटावीत' म्हणून टिपं गाळायची, असं का? ज्यांचं पटत नाही, त्यांच्या बाबतीतसुद्धा समुपदेशनाचे काही प्रयोग करून पाहायला हवेत. तेही जर अयशस्वी झाले तर शेवटचा पर्याय म्हणून वृद्धाश्रम असायला हरकत नाही. वृद्धाश्रम घराशी आले तर पाळणाघरंही दूर होतील.
वृद्ध माणसं ही गंगाजळी आहे, तरूण पिढी हे खेळतं भांडवल आहे, आणि बालकं ही भविष्यासाठी गुंतवणूक आहे. या सगळयांचा समतोल हवाच, पण इष्ट वेळेस हे निधी हाताशी असले पाहिजेत.... ही `पैशाची' भाषा तरी सध्याच्या युगात प्रत्येकाला समजायला हवी. समस्येवर उत्तर काढायचे, त्यातून अधिक गंभीर समस्याच तयार होत असेल तर मूळची समस्या सोसण्याचा पर्याय अधिक श्रेयस्कर ठरतो. ते सोसण्याचे बळ निर्माण करण्याची इलम प्रत्येकाजवळ हवी.

Comments

  1. Only because of Bhavanik-halkallol - which all are (1)Not wishing, (2)brought-up in v.selfish manner (3)SANSKAR-cha tase so are unable to control and get life&death troubles - so we have to accept this as situation and try to- take a way out per our own capacity. i have thought over, going thru this all type of phases, thoughts and available information etc. To transport Human- is v.difficult though it's between 5 to 150 kg.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन