Skip to main content

Lekh on Railway in 28 Nov.2011


रुळलेले रुळ

रुळावरून गुडगुडत जाणारी धुडधुड गाडी जगभरातल्या प्रवासाचं एक सर्वमान्य वाहन आहे. तिला `रेल्वे' शब्द सर्वत्र `रूळला' आहे. आगगाडी आता कोळशाच्या आगीवर चालत नाही. ती आगीनगाडी राहिली नाही कारण त्यातला अग्नी विझून गेला. डिझेलवर इंजिन असेल तर धुरांच्या रेषा नाहीत पण भपकारे असतात. त्यात झुकझुक गाडीचं सौंदर्य नाही. विविधतेतील एकता दर्शविणारं उदाहरण पाहायचं तर रेल्वेगाडी पाहायलाच हवी. चड्डीतल्या पोरापासून बंडीतल्या आजोबांपर्यंत कुणालाही आकर्षित करणारी रेल्वे जगाच्या पाठीवर अनेक रूपांतून अनेक आविष्कार घडविते. त्यातील हे काही मासले -
वायुवेगी
वास्तविक या गाडीला वायुवेगी म्हणणे हा कोतेपणाच आहे. आपल्याकडे भन्नाट वादळ होतं, त्यावेळी त्या वाऱ्याचा वेग ६०-६५ किमी असतो. त्या वेगानं तर हल्ली पोरांच्या फटफट्या पळतात. हनुमंताला `मारुततुल्य वेगम्' म्हणायचं, तो त्याचा धावण्याचा वेग होता म्हणून. पण वायुवेग हे अतिवेगाचं एक जुनं प्रमाण म्हणून तो शब्द आपण वापरतो. चीननं तसल्या वाऱ्याला कधीच मागं टाकलं, त्यांची एक रेल्वेगाडी वारा प्याल्यासारखी तुफान वेगानं - (पुन्हा तेच! तुफान फारच थिटं!!) धावते. गुआगंजो आणि वुटान या स्टेशनांदरम्यान १०६९ किमी अंतर धावणारी ही सुपरफास्ट ३५०.१४ किमी या वेगानं जाते. म्हणजे तुफान वायुवेगाच्या ६ पट.
रेल्वेगाडीच्या केवळ वेगाचा प्रयोग म्हणून फ्रान्सनं एक गाडी खच्चून पळवून बघितली. त्या गाडीचं नाव टीव्हीजी ट्न्ेन. २००७ साली एके दिवशी हा प्रयोग झाला, ती गाडी ताशी ५७४.८ किमी. या वेगात धावली. मात्र यावेळी गाडीत एकही प्रवासी नव्हता. आपल्यातले काहीजण हायवेवरती `आपली गाडी किती पळते बघू' असे म्हणत गाडी थर्रर्रर्र होईपर्यंत दामटतात, तशातला तो प्रयोग होता.
सरळमार्गी
रेल्वेगाडी लांबलचक असते, पण ती अशी वळतवळत चालते तेव्हा देखणी दिसते. नाकासमोर जाणारी गाडी पाहण्यात मजा नाही. परंतु अस्ट्न्ेिलॉयातील ट्नन्स अट्न्ेिलास्यन या रेल्वेचा एकूण मार्ग हजारेक किमी आहे. त्यातला जवळपास निम्मा भाग सपाट वाळवंटी आहे, तिथं रूळ अंथरत जायला काही त्रास झालाच नाही. ४७८ किमी. अंतरात हातभरसुद्धा वळण नाही. इंग्रजीत त्यास डेड-स्ट्न्ेट म्हणतात, इतकं सरळ चालण्यात जिवंतपणाच नाही ना!
उंच उंच चाल
हिमालयाच्या `त्या' बाजूनं चीन आपल्याला उपद्रव करू पाहात असतो, त्याने या दुर्गम पर्वतरांगांत रस्ते आणि रेल्वेही बांधली आहे. २००६ साली झियांग स्टेशनपासून तिबेटच्या ल्हासापर्यंत रूळ टाकण्यात आले. हे अंतर १९५६ किमी असून त्यापैकी ९६० किमी भाग सरासरी ४ हजार मीटर उंचीवर आहे. तंगगुला घाटात ती रेल्वे ५ हजार मीटरहून जास्त उंचीवर असते. त्यात एक बोगदा व एक स्टेशनही आहे. (स्टेशनवर कुणी फिरायला येत नसावे) (एव्हरेस्ट ६ हजार) एवढ्या उंचीवर हवा विरळ असते. उतारूंना त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक डब्यातील हवेचा दाब समपातळीवर ठेवावा लागतो, शिवाय गाडीत एक डॉक्टरांचे पथक असते. चीनच्या बाबतीत कामाचा विलक्षण झपाटा हेही वैशिष्ट्य असते. हा लोहमार्ग फक्त ५ वर्षात बांधला. त्यावर ६७५ पूल आहेत. वेगही सरासरी १०० किमी.
दूर दूर टूर
१८९१ मध्ये रशियाचा झार सम्राट अलेक्झांडर यानं सायबेरियाच्या थंडगार प्रदेशापर्यंत रेल्वे नेऊन तो प्रांत रशियाला जोडण्याचा प्रकल्प हाती घेतला. ट्नन्स सायबेरियन हा तो प्रसिद्ध रेल्वेमार्ग तेरा वर्षांनी पूर्ण झाला. मास्को ते व्लादिवस्तोक हे ९४१७ किमीचं आहे. भारताच्या लांबीच्या दुप्पट. त्यातील सर्व बोगद्यांची एकूण लांबी ३० किमी., पूल १८९७. ही एक्सप्रेस आठ दिवसांनी मुक्कामावर पोचते.
बस्स! चलते जाना
भारतात दुरोंटो एक्सप्रेस बऱ्याच आहेत. दुरोंटो हा बंगाली शब्द, त्याचा अर्थ गतिमान. १२२८३ या क्रमांकाची नानस्टाप गाडी दिल्लीचे निजामुद्दीन स्टेशन ते केरळातील कोची टर्मिनस अशी धावते. हे अंतर सुमारे ३ हजार किमी आहे. ४२ तासात ते गाठते, सरासरी वेग पडतो ७० किमी.
हाय रे हाय
जपानमधील मिनामिसाओ आणि ताकामोरी हे १७ किमी अंतर आहे. त्या अंतरातील लोहमार्गाजवळ माऊंट आसो हा डोंगर आहे. तिथे जिवंत ज्वालामुखी आहे. तो अद्यापि सक्रिय असल्यामुळे पुष्कळदा लाव्हा बाहेर येत असतो. रेल्वे-उतारूंना ज्वालामुखीचे छोटे विस्फोट दिसतात. ज्वालामुखीतून येणारा लाव्हा धो धो वाहात नाही, तर थोड्या थोड्या अंतरानं उचंबळल्यासारखा बाहेर डोकावतो. इथे एकही रेल्वे दुर्घटना झालेली नाही, काही म्हटलं तरी ही आग-गाडी म्हणजे आगीशीच खेळ.
चल जाऊ निवांत
जलद, अतिजलद धावण्याची स्पर्धा एकीकडे तर `काय घाई आहे, जाऊ की निवांत' असं म्हणणाऱ्या स्वस्थ गाड्या दुसरीकडे. आपल्याकडे मिरज-कुर्डुवाडी बार्शी लाइट रेल्वे पूर्वी `देवाची गाडी' म्हणून प्रसिद्ध होती, कारण त्या मार्गावर पंढरपूर आहे. ती कधीतरी एकदा पोचायची असं म्हणतात. आता तिचा मार्ग रुंदावला, गती वाढली. आज गुजरातमधली बडोदा (प्रतापनगर) ते भरुच (जंबुसर) एवढं ६० किमी अंतर जाण्यासाठी तीन तास घेणारी गाडी आहे. तेवढ्यात ती ११ स्टेशनांवर थांबते.
याबाबतीत भारतालाच नावं ठेवायला नकोत. स्वित्झर्लंडमध्ये ग्लेशियर एक्सप्रेस (?)चा वेग ३६ किमी असतो. ती २५० कमी धावते. परंतु ती आठ तासांहून जास्त रेंगाळली तर प्रवाशांना खूप आनंद होतो कारण सगळा प्रवास निसर्गरमणीय आहे. शांतपणी निसर्गाचा आस्वाद घेता येतो. दर एका किलोमीटरवर पूल आहे आणि ३ किलोमीटरवर बोगदा. रमत गमत जाण्यातच या गाडीची मजा.
बादशाही रुबाब
इंग्लंडची माणसं कष्टाळू खरी, पण ऐटदार ऐश करावी तीही त्यांनीच! रॉयल स्कॉटमन ही गाडी भलतीच तालेवार. आपल्या डेक्कन पीनचं किती ते कौतुक; पण ही आपली उगीच आपल्या घरची राणी म्हणावी, अशी ती ब्रिटिश रॉयल गाडी. इंग्लंड-स्कॉटलंडच्या सुंदर प्रदेशातून ती धावते. त्या गाडीत नऊ कंपार्टमेंटस् आणि एकात चार, म्हणजे एकूण ३६ प्रवासी. त्यांनी शाही रीतीरिवाज पाळायचे - उदा. पुरुषांनी रात्री जेवणाच्या वेळी (डिनरला) काळा सूट-पांढरा शर्ट, चकचकीत बूट वापरायचे. वाटेतल्या शहरांत स्थलदर्शनासाठी तितक्याच भपकेबाज सुखसोयी. थोडक्यात म्हणजे रुळावर धावणारं हे डी-लक्स हॉटेल. दिवसाचं भाडं दरमाणशी साधारण ९० हजार रुपये फक्त!!
भारतात महाराजा ट्न्ेन तशीच, त्यास पॅलेस ऑन व्हील्स असंच नाव आहे. त्याचं भाडं दरमाणशी दररोज ३६ हजार रुपये. त्यातही अगदी खासम्खास केबीनसाठी १.२० लाख रुपये. या गाडीला २३ डबे असतात. त्यात गुबगुबीत गाद्या-गिर्द्या, टीव्ही-डीव्हीडी, एसी न्हाणीघर, इंटरनेट वगैरे ऐवज असतो. आठ दिवसांची फेरी करण्यासाठी ८८ प्रवासी असतात. उत्तर-पूर्वेच्या आसाममधील दिब्रुगढ ते भारताचे दक्षिण टोक कन्याकुमारीपर्यंत ४२८६ किमी एवढ्या पल्ल्याची `विवेक एक्सप्रेस' नुकतीच सुरू झाली. त्यासाठी ८२.५ तास लागतात. अर्थात् आठवड्यातून त्या गाडीची एकच फेरी होईल.

लोहमार्गाचं जाळं असेल तर तितकं भूमीवरील दळणवळण सुलभ होतं. भारतात रेल्वे प्रवास पुष्कळसा वैतागवाणा ठरतो कारण गरजेपेक्षा अपुरी सोय, आणि मठ्ठ प्रशासन. - (मंत्रीसुद्धा लालू किंवा ममता असली हेकेखोर माणसं!) तरीही रेल्वेनं आपल्या देशात एकता-अखंडता-समरसता आणायला बरीच मदत केली आहे.
आहे ती सोय चांगलीच म्हणायची. एका प्रवाशाला वाटत होतं की, आपल्या पायात घालायला जुनी चप्पलही नाही. त्यासाठी त्याच्या डोळयाला पाणी आलं. ते पुसत त्यानं समोर पाहिलं तर पुढं बसलेल्याला पायच नव्हता! एंडोरा, कुवैत, लिबिया, माल्टा, मॉरिशस, ओमान, येमेन, भूतान, नायजर इत्यादि देशांना लोहमार्गच नाहीत!!    (संकलित)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन