Skip to main content

Lekh on Dattatraya Apte & Hari Phatak


गोव्यातील आल्मोद हायस्कूलचे शतक
आपले पूर्वदिव्य

लोकमान्य टिळकांचे दोन विश्वासू देशभक्त छात्र हरी गणेश फाटक आणि दत्तात्रय विष्णू आपटे यांना लोकमान्यांनी शस्त्रास्त्रांचे शिक्षण घेण्याकरिता आणि ते जमले नाही तर गोव्यात शैक्षणिक कार्य करण्यासाठी १९११ मध्ये पुण्यातून गोव्याला पाठविले. फाटक-आपटे या जोडीने पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात तळ ठोकून कारवाया चालू ठेवल्या. त्यावेळी अहवाल गुप्तहेर खात्याने मुंबई आणि दिल्लीपर्यंत पोचविला. परंतु पोर्तुगीज शासनाने फाटक-आपटे जोडीविरुद्ध काही कारवाई केली नाही.
ब्रिटीशांविरोधात गोव्यात राहून काही करता येईल असे या दोघांना वाटेना. त्यांनी गणेशचतुर्थी १९११ या मुहूर्तावर `आल्मेद' या पोर्तुगीज शासकाच्या नावाने शिक्षणसंस्थेची स्थापना केली. केरीचे प्रसिद्ध देशभक्त समाजसेवक दादा वैद्य यांनी यासाठी पुढाकार घेऊन या तरुणांना गोमंतकात बोलावून घेतलेले होतेे. या त्रिकूटाने १९११ मध्ये स्थापन केलेल्या गोवा विद्या प्रसारक मंडळाच्या `आल्मोदा हायस्कूल'ने शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. त्यानिमित्ताने त्यांची छायाचित्रे संस्थेच्या कार्यालयात नुकतीच लावण्यात आली.
दत्तात्रय विष्णू आपटे यांचा जन्म १८८० चा. जमखिंडी (कर्नाटक) येथे मॅटि्न्क झाल्यावर पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (१९०२), वंगभंग चळवळीत सहभाग, यवतमाळच्या राष्ट्नीय शाळेत हरीभाऊ फाटक या ज्येष्ठ आचार्याचे सहकारी म्हणून अध्यापन करीत असतानाच `हरिकिशोर' साप्ताहिकात लेखन. त्यानंतर मुंबईत राष्ट्न्मत दैनिकात सहसंपादक. ते बंद पडल्यानंतर लोकमान्य टिळकांच्या आदेशावरून हरिभाऊ फाटक यांच्याबरोबर गोमंतकात येऊन `आल्मोद हायस्कूल'ची स्थापना करण्यात सहभाग. तिथे संस्कृताध्यापक म्हणून काम करीत असतानाच पोर्तुगीज भाषा शिकले. परंतु पाच वर्षांत दुसरे महायुद्ध सुरू होताच तिथे राहणे अशक्य झाले आणि हरिभाऊ फाटक यांच्याबरोबर पुण्यात आले. `इतिहास संशोधक' म्हणून कीर्तिमान होऊन १९४३ मध्ये अमर झाले.
पुणे येथे प्रथम दत्तात्रय आपटे पत्रकार क्षेत्रात `चित्रमयजगत्' व `शालापत्रक' या मासिकांचे संपादकीय काम पाहात. त्यानंतर `आनंदाश्रम' संस्थेचे व्यवस्थापक पदही त्यांनी सांभाळले. मुधोळकर महाराजांनी यांच्याकडून मुधोळ राजघराण्याचा इतिहास लिहून घेतला. इतिहासकार राजवाडे यांचे शिष्योत्तम या नात्याने आपटे यांनी व्यासंगी अभ्यासकांची प्रभावळ उत्पन्न केली. मराठ्यांच्या इतिहासाचा सखोल व्यासंग करून १)इतिहास मंजिरी २) श्रीरंगपट्टणची मोहीम  ३) शिवचरित्र प्रदीप  ४) शिवभारत-प्रस्तावना ५) घोरपडे घराण्याचा इतिहास  ६) शिवचरित्र निबंधावली  ७) पत्रकारसंग्रह ही ऐतिहासिक महत्तेची ग्रंथसंपदा निर्माण केली.
इतिहासाप्रमाणेच `गणित ज्योतिष' या संस्कृत विद्या-विश्वातील महत्त्वाच्या शास्त्रावर त्यांचा गाढा व्यासंग होता. करणकौस्तुभ, बीजगणित, लीलावती या प्राचीन गणितशास्त्र विषयक ग्रंथरत्नांचे विवरण केले. केरोपन्ती साधनांचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. पुणे भारत इतिहास संशोधन मंडळ या विश्वख्यात संस्थेचे नुसते सन्मान्य आजीव सदस्यच नव्हे तर ते उपाध्यक्षही होते.
हरिभाऊ फाटक यांचा जन्म १०/११/१८७४. मृत्यू २५/५/१९६७. फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (१८९५) झाल्यानंतर आठ वर्षे विदर्भातील अकोट विद्यालयात ते शिक्षक होते. राष्ट्न्सेवेसाठीच जीवन समर्पण ही शपथ घेऊन यवतमाळच्या राष्ट्नीय शिक्षण विद्यालयात `आचार्य' म्हणून विद्यादानाचे व्रत घेतले. रा.स्व.संघ संस्थापक डॉ.हेडगेवार यांनी लाडक्या विद्यार्थ्याला राष्ट्न्सेवेची शपथ दिली.
लोकमान्य टिळकांचा `गोव्यात जा' हा आदेश शिरसावंद्य मानून हरिभाऊ फाटक दत्तोपंत आपटे यांच्यासह १९११ मध्ये गोव्यात आले. त्यांनी जर्मनीकडून शस्त्रास्त्रे मिळविल्याचा प्रयत्न केल्याचे सांगतात. १९१८ मध्ये महात्मा गांधींना सर्वप्रथम पुणेकरांसमोर आणले ते हरिभाऊ फाटक यांनीच. १९१६ ते १८ होमरूल लीगचे कार्य केल्यानंतर १९२१ च्या मुळशी सत्त्याग्रहात ते सेनापती बापटांचे साक्षीदार होते. १९३०, ३२, ४२ असा तीनदा त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात कारावास भोगला. सर्वोदयी राष्ट्न्भक्त या नात्याने त्यांनी वनमहोत्सव, स्वच्छता मोहीम, पर्वतीवर वृक्षारोपण, विद्यार्थी सहाय्यक समितीची स्थापना इ. कार्ये करीतच या थोर राष्ट्न्भक्ताने शेवटचा श्वास घेतला. असे हे सच्चे देशभक्त `आल्मोद' (फोंडा-गोवा)चा एक संस्थापक होते हे आज महाराष्ट्नत किती माहीत आहे?
- पं. वसंत अनंत गाडगीळ
(श्री.रामचंद्र आपटे-फोंडा गोवा यांच्या सौजन्याने : फोन ०८३२-२३१४२०२)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन