Skip to main content

Posts

Showing posts from July, 2014

14 July 2014

प्राचीन संस्कृतींच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा आधार मानला जातो, तो म्हणजे स्वयंपाकाची साधने. त्या संस्कृतीच्या चालीरिती, प्रगती, भौगोलिक आणि सांपत्तिक परिस्थिती याविषयीचे अंदाज स्वयंपाकाच्या साधनांवरून बांधले जातात. कारण माणसाच्या खाण्याच्या सवयी आणि स्वयंपाकाची साधने ही शक्यतो बदलत नाहीत; आणि बदललीच तर त्यासाठी शेकडो वर्षे जावी लागतात असा पुरातत्त्व विद्वानांचा सिद्धांत आहे. विळीचं पातं स्थिर ठेवायचं आणि भाजी चिरणाऱ्या सुरीचा हात हालता ठेवायचा ही द्रविडी परंपरा आहे; तर भाजी हाताच्या मुठीत स्थिर धरून पाते हालते ठेवायचे ही म्हणे आर्यांची पद्धत आहे. सध्याच्या महाराष्ट्नचा विचार केला तर, कधी काळी हा महाराष्ट्न् भुईत गाडला गेल्यावर शेकडो वर्षांनी उत्खननात गावं, घरं सापडतील आणि त्यावेळी घरोघरी विळया पाहून `महाराष्ट्नत या काळात द्रविड संस्कृती होती' असा निष्कर्ष तेव्हाचे संशोधक काढतील. हे सारं एका भाषणात मी कधीतरी ऐकल्याचं आठवतं. त्या त्या ठिकाणचं हवापाणी, त्यानुसार निघणारी पिकं, फळं-भाजी हेच त्या गावचं प्रमुख अन्न असणार हे एकेकाळी ठीक होतं. निसर्गनियमाने तेच अन्न पचन आणि पुष्टीसाठी

14July 2014

कर्मयोग्याची लोकमान्यता २३ जुलै (१८५६) हा टिळकांचा जन्मदिन आणि ०१ ऑगस्ट (१९२०) निर्वाणदिन. या `बाळा'ची जन्मस्थिती क्षीण होती आणि निर्वाण स्थिती भव्योदात्त लोकमान्य बनली! मधल्या ६४ वर्षांची विलक्षण तपश्चर्या त्यास अर्थातच कारणीभूत झाली.  (गंधर्व-वेद प्रकाशनचे `कर्मयोगी लोकमान्य' हे चिकित्सक चरित्र नुकतेच प्रकाशित झाले. त्यातून संपादित) जन्म  बाळ गंगाधर टिळकांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव हे होय.  टिळकांचे `श्रीतिलकयशो%र्णव' नामक संस्कृत चरित्र लिहिणाऱ्या विदर्भातील माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांनी या कोकणच्या भूमीचे वर्णन केले आहे. भूमि: शस्त्रबलविदिता रामेण सिन्धो: पुरा पुण्यश्लोक जति: खनिश्च महती मनुष्यरत्नाश्मनाम् । पूता सिद्धतपोधनाश्रमपदैर्या पुण्यम् सेविता प्राज्ञै: कोङ्कणसंज्ञितेयममला देवर्षिसंघैर्मुदा ।। अर्थ असा की, `पुण्यवंतांची जन्मदात्री व मनुष्यरत्नांची मोठी खाण असलेली, पूर्वी परशुरामाने शस्त्रबलाने हस्तगत केलेली ही समुद्रभूमी प्रसिद्ध आहे. सिद्धांच्या आणि तपोधनांच्या आश्रमांनी पावन झालेली, विद्वानांनी जिची सेवा केली आहे अशी ही देव आणि ऋष

30 june 2014

सर्वात जास्त लोकप्रियता लाभलेले राष्ट्न्पती ए.पी.जे.अब्दुल कलाम. अबूल पाकिर, जैनलुब्दिन कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामीळनाडू येथील रामेश्वरम् येथे झाला. कलाम जेव्हा जेव्हा कुठे जात, त्यावेळी जिव्हाळयाच्या वाटणाऱ्या असंख्य विषयांवर लोक त्यांना प्रश्न विचारीत. या प्रश्नांना कलाम समर्पक उत्तरे देत. अशी निवडक प्रश्नोत्तरे `स्पिरीट ऑफ इंडिया' मधून... शिक्षण हेच सर्वस्व शिक्षणामुळे माणसात आमूलाग्र परिवर्तन होते, सर्वगुणसंपन्नतेचा आविष्कार त्याच्यात होऊ शकतो आणि अशा माणसाला जगात मानाचे स्थान असते. खरे शिक्षण हे माणसाची प्रतिष्ठा आणि आत्मिक सन्मान वाढवते आणि विश्वबंधुत्वाची भावना त्याच्या मनात निर्माण करते. शिक्षणाचा खरा अर्थ सत्याचा शोध. आपल्या शिष्यांना त्यासाठी माहिती आणि ज्ञानाचा अखंड पुरवठा करत राहणारे शिक्षक हे केंद्रस्थानी असतात. शिष्याच्या दृष्टीने गुरू हा एखाद्या विश्वकोशाप्रमाणे असतो आणि त्याच्या सहवासात असलेल्या शिष्याला प्रेम आणि माणुसकीचे भरभक्कम पाठबळही सातत्याने लाभते. शिक्षणाचा खरा अर्थ जर प्रत्येकाला त्याच्या शिक्षकांकडून नीट समजावून घेता आला, आणि जीवनाच्

23 june 2014

जातिधर्मांस आरक्षण नको लोकसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्नच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले. लोकसभेसाठी मिळालेल्या निकालांचा परिणाम राज्यस्तरावर होणारच असतो, पण सर्वस्वी तोच कल राहतो असे नाही. म्हणून तर सर्व पक्षांनी नव्या दमाने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्नत जे प्रश्न आहेत त्यांची चर्चा तर होणारच. पण मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना सोयी सवलतींची व आर्थिक लाभाची लालूच निवडणुकीपुरती दाखविली की यश मिळते, हे अजूनी गृहीत धरले जाते. वास्तविक लोकसभेच्या परवाच्या निवडणुकीत काँग्रेससारख्या पक्षाने अन्नसुरक्षा विधेयक त्या कुबुद्धीने आणले. जाट आरक्षण, राजकीय गुन्हेगारांस संरक्षण, मनरेगा इत्यादी निर्णयांचा काय परिणाम झाला तेही दिसले. एक तर खरेच आहे की, हितकर निर्णय घेऊ शकणाऱ्या व मुख्यत: ते राबवू शकणाऱ्या लोकांस मत दिले पाहिजे. पण हितकर कुणाला? स्वत:पुरती सवलत किंवा आपल्याच पोराला नोकरी मिळत असेल तर तेवढ्यावर हितकर कारभार मोजता येत नसतो. तसा तो मोजणारेच मतदार जर सरकार निवडून आणू शकत असतील तर सर्वांगी हितकर निर्णय होणार कसे? परवाच्या निवडणुकीत तरुण मतदार जास्त होते, मतदानाचे प्रमाण जास्त हो