Skip to main content

23 june 2014

जातिधर्मांस आरक्षण नको
लोकसभेच्या पाठोपाठ महाराष्ट्नच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागले. लोकसभेसाठी मिळालेल्या निकालांचा परिणाम राज्यस्तरावर होणारच असतो, पण सर्वस्वी तोच कल राहतो असे नाही. म्हणून तर सर्व पक्षांनी नव्या दमाने तयारी सुरू केली आहे.

महाराष्ट्नत जे प्रश्न आहेत त्यांची चर्चा तर होणारच. पण मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी त्यांना सोयी सवलतींची व आर्थिक लाभाची लालूच निवडणुकीपुरती दाखविली की यश मिळते, हे अजूनी गृहीत धरले जाते. वास्तविक लोकसभेच्या परवाच्या निवडणुकीत काँग्रेससारख्या पक्षाने अन्नसुरक्षा विधेयक त्या कुबुद्धीने आणले. जाट आरक्षण, राजकीय गुन्हेगारांस संरक्षण, मनरेगा इत्यादी निर्णयांचा काय परिणाम झाला तेही दिसले. एक तर खरेच आहे की, हितकर निर्णय घेऊ शकणाऱ्या व मुख्यत: ते राबवू शकणाऱ्या लोकांस मत दिले पाहिजे. पण हितकर कुणाला? स्वत:पुरती सवलत किंवा आपल्याच पोराला नोकरी मिळत असेल तर तेवढ्यावर हितकर कारभार मोजता येत नसतो. तसा तो मोजणारेच मतदार जर सरकार निवडून आणू शकत असतील तर सर्वांगी हितकर निर्णय होणार कसे? परवाच्या निवडणुकीत तरुण मतदार जास्त होते, मतदानाचे प्रमाण जास्त होते आणि त्यांच्यावर असल्या सोयीसवलतींच्या भंपक घोषणांचा परिणाम झालेला नाही असा निष्कर्ष बऱ्याच तज्ज्ञांनी काढलेला आहे.

असे असूनही पुन्हा मराठा आणि मुस्लिम समाजास आरक्षण जाहीर करण्याची घाई `पवार परिवारा'ने चालविल्याचे प्रसिद्ध होत आहे. ज्याला गेल्या शेपाचशे वर्षांचा साधारण इतिहास आणि पाचपन्नास वर्षांचे वर्तमान ठाऊक आहे असा कोणताही सुज्ञ माणूस मराठा आरक्षण मनातून मान्य करणार नाही. मराठी ही जातजमात तर नव्हेच, तर ती क्षात्रवृत्ती, अस्मिता इत्यादी उत्प्रेरक भावनांची मिरास आहे. मराठा साम्राज्य म्हटल्यावर सगळया जातीपंथांची छाती फुगावी असा परिपाठ आहे. त्याऐवजी या मानी समाजाला ही आरक्षणाची इच्छा व्हावी हा दैवदुर्विलास वाटतो.

अलीकडे ब्राह्मण समाजाचे मेळावे-संमेलने वगैरे होतात, त्यातही कुणीतरी ब्राह्मणांना आरक्षण मिळावे असे पिल्लू सोडतो. प्रत्यक्षात ती ठोस मागणी अद्यापि पुढे येत नाही, पण हा विषय चर्चेत तरी यावा काय? इतर सगळयांना आरक्षण देतात मग आपल्याला का नाही, हा विचार त्यामागे असेल तर यांचे वेगळेपण ते काय? आरक्षण योग्य, की अयोग्य, यावरती एकदा आपापल्या ज्ञातिसंघटनेत सर्वपक्षीय सर्वस्पर्शी अधिकारी मंडळींनी सखोल चर्चा तरी करावी. निष्कर्ष काय निघतो, ते पाहू. परंतु ते न घडता सर्व समाजाचे प्रतिनिधित्व आपल्याकडे असल्याच्या थाटात, या स्वरूपाच्या उथळ मागण्या फेकण्याचे सार्वत्रिक दुष्परिणाम होतात याचे भान असायला हवे. एकीकडे डॉ.आंबेडकरांचे नाव मोठेपणाने घ्यायचे, त्यांच्या विद्वत्तेचा आदर करायचा, आणि त्यांनी ज्या परिस्थितीत, ज्या कालावधीसाठी आरक्षणाचा पुरस्कार केला त्याकडे मात्र दुर्लक्ष करायचे; हा दुटप्पीपणा झाला.

दुर्बलांस समान सबल करण्यासाठी तात्पुरता उपाय म्हणजे त्याचे पोषण होण्यासाठी त्यास आधार देणे. तो देण्यामागची भावना शुद्ध हवी, अभेदाची हवी. त्याचबरोबर तो आधार घेणाऱ्याची भावना उन्नयनाची हवी, न्यूनतेतून वर उठण्याची हवी. या दोन्ही घटकांत उपकाराचा अंश किंवा देण्याघेण्याचा सौदा असेल तर हा आव ओळखू येतो. कोणत्याही सोयीसवलतींचा विचार आजच्या काळात या राजकारणी किंवा व्यक्तिगत सौदेबाजीतूनच होतो हे समाजघातक आहे. धर्म-जातींचा अंत करण्याची, धर्मनिरपेक्षतेची भाषा सतत खेळवणारी मंडळी सातत्याने तेवढ्याच आधारावर कारभार करू पाहतात. कुणाला आरक्षण दे, कुणाला अल्पसंख्य ठरव, कुणाला कशातून सूट दे.... हे खेळ करत राहण्याने ते जातीधर्मपंथ तात्पुरते खूश होत असतील; कुणाला व्यक्तिगत लाभ होत असतील; पण समाजात दुही-फूट वाढते हे अगदी सत्य आहे.

ती तशी वाढावी, हाच तर त्या राजकारण्यांचा स्पष्ट हेतू आहे. अंदमानमध्ये सावरकरांची स्मृतिशिला उखडली, त्यात मणीशंकर अय्यरची कोणती निरपेक्षता होती, हे वेगळे सांगावे लागत नाही. त्याच अनुरोधाने मराठ्यांना आरक्षण देण्याची किंवा ब्राह्मणांनी आरक्षण मागण्याची संभावना करता येईल. ब्राह्मण किंवा मराठे सामाजिक दुर्बळ आहेत हे उच्चारतानाही सुज्ञ माणसाला कसनुसे वाटेल, त्यांच्यातील काही कुटुंबे अधू राहिली असतीलही; पण त्यांची जबाबदारी त्याच ज्ञातींच्या संघटना किंवा व्यक्ती यांनी घ्यायला हवी. आपल्या खिशाला किंवा दाराला तोशीस लागू न देता, सरकारच्या सामुदायिक तिजोरीवर हात मारण्यात पुरुषार्थही नाही आणि समन्यायाचे तत्वही नाही. मराठ्यांनी क्षात्रतेज प्रकट करून बादशहाची पंचहजारी मनसबदारी नाकारली हा इतिहास विसरणे कसे शक्य होते? ब्राह्मणांच्या याज्ञिकी मुलांना किंवा मराठ्यांच्या शेतकरी मुलांना वधू मिळत नाहीत म्हणूनही सरकारने हस्तक्षेप करून तिथेही आरक्षण द्यावे अशी मागणी अजूनी ऐकली नाही, पण तोही दिवस येणार की काय?

सगळया प्रश्नांच्या बोळयांचे गाठोडे सरकार नावाच्या अदृश्य घरापुढे नेऊन ओतण्याने तिथे घाणीचा ढीग साचेल इतकेच. तो ढीग उद्या सर्वांनाच उपद्रव देणार हेही स्पष्ट आहे. मराठा समाजाचे आरक्षण घटनेतील कायद्याने टिकण्याची खात्री नाहीच पण ही धूर्त मंडळी तेवढ्यासाठी `घटना बदला' म्हणायला कमी करणार नाहीत. तूर्त हा मुद्दा केवळ विधानसभा निवडणुकीपुरता फुलवायचा हा उद्देश स्पष्ट आहे. त्यातून निर्माण होणारे वाद परस्पर झुंजीला पुरेसे आहेत. निदान असल्या वादग्रस्त प्रश्नांचा आश्रय घेण्याचे सुज्ञ म्हणवणाऱ्या समाजाने मनातही आणू नये. नोकरी आणि कॉलेजात प्रवेश मिळायला अडचणी येतील हे खरे, पण प्रतिकूलतेशी झगडण्याचे सामर्थ्य याच समाजाने अभिमानाने मिरवले आहे. सावरकर स्मृतिफलक हटविण्याची वेदना ज्यांच्या उरी उमटते, त्यांनी कारकुनीच्या नोकऱ्यांसाठी आरक्षण मागावे काय? याच आशयाचा प्रश्न कित्येक विचारवंत मराठ्यांनाही पडला असेल. प्रा.एन.डी.पाटील हे एके वेळी म्हणाले होते म्हणे की, ``नोकरीसाठी आरक्षण मागणारा मराठा तरुण, लग्नाला उभारला की शहाण्णव कुळी म्हणवतो.''

आरक्षण, कर्जमाफी, मोफत वीज, फुकट धान्य इत्यादी धोरणे निखालस फसवी ठरतात. त्या सुविधा गरजूंना मिळण्याऐवजी कोणी टिकोजी सोकाजी सरंजामे पळवतात. यासाठी वेगळे उदाहरण देण्याची गरजही नाही; कारण पहिल्या पिढीत ज्यांना आरक्षण मिळाले ते आता तीन पिढ्यांच्यानंतरही `सुधारले' नाहीत काय? किंबहुना अशा दुर्बळांची संख्या कमी होण्याऐेवजी ती वाढतच चालली आहे याचा अर्थ दुर्बळता ठरविण्यातून काहीजणांचा फायदा होत आहे. आरक्षणाचे तत्व चुकीचे नाही, ते चिरंतन आहे. गरजूंसाठी मदत-सवलत असायलाच हवी. पण असे गरजू जन्मजात धर्मजातींवर ठरविणारी धोरणे व कायदे, जातीनिरपेक्षता किंवा जातीअंत या दिशेने न जाता दुफळीकडे नेणारे ठरतील. महाराष्ट्नतील अठरा पगडींच्या कोणाही मराठमोळयांनी असल्या मानसिक दुर्बलतेच्या आधारे आरक्षणाचा विचार करू नये. त्याचबरोबर आपल्यास दैवयोगाने मिळालेल्या संपन्नतेचा, परंपरेचा, संस्कारांचा आणि स्वकष्टाच्या सामर्थ्याचा, श्रीमंतीचा उपयोग खऱ्या गरजूंसाठी करून देण्यास कदापि चुकू नये. जातिभेद हे पाप असेल तर त्याच भेदांवर आधारित लुबाडणूक हेही पापच ठरेल. परंतु सध्यातरी ही गीता कुणापुढे गायची असा प्रश्न आहे, कारण आजच्यापेक्षा कालचा गोंधळ कमीच वाटावा!


....... पाण्याचा असा उपयोग .......
`पाणी' हे तर अतिशय वेगळे आव्हान आहे. मानवी जीवनात पाण्याचे महत्त्व किती, व कमी पाण्यात देखील मानवी जीवन कसे खुलून येऊ शकते याची छोटी गोष्ट.
एक भोजपुरी गाणे असे -
पनियन चले नाग धनिया
केरूण धून बाजेरे  पैंजनिया
गाणर लेकी चली कुँवा पर
एक ही डोल उभानिया
छोटकी नदी ताना मारे
झोमके फेकी उभानिया
गागर लेकी चली कुँवा पर
हतवा मे लेली उभानिया ।
एक तरफ से हिंदू भरत है ।
एक तरफ से मुसलमानिया
गे धनिया पनियन चले नाग धनिया ।
आशय असा - घागर घेऊन, पायात छुमछुम घालून, एक महिला गावच्या विहिरीवर पाणी आणण्याकरिता चालली असून, विहिरीवर सगळया धर्माचे लोक पाणी भरत आहेत. एका बाजूला हिंदू आणि दुसऱ्या बाजूला मुस्लीम. पाण्यासाठी भेद नाही, याचा तिला आनंद आहे.
हे भोजपुरी सुरेल गीत किंवा पाण्यावर अगर पावसावर कानावर येणारी गाणी अतिशय गोड वाटतात. पाऊस जेथे भरपूर प्रमाणात असतो व नद्या नाले ओढे भरून जातात, तेथील लोकांना हा आनंद व पाणी याचे कौतुक असते. पण जेथे पाऊस अतिशय कमी, वर्षाकाठी ४-५ इंच पडतो, एक दोन वर्ष पडत नाही-अशा भागातील लोकांना पाणी हे अतिशय मोलाचे व प्राणपणाने जपण्याचे आहे असेच वाटते.
आपल्या भारतातील राजस्थानचे पश्चिमेकडील वाळवंटी गावातील लोक व तेथील पाणी या विषयी तिथे कथा आहेत. `जैसलमेर' या गावी आम्ही गेलो होतो. आमच्या प्रवासात खूप तहान लागली म्हणून तेथील एका सेवकाकडे पाणी मागितले. तो म्हणाला,``भाभीजी अभी हम आपको पानी पीनेके लिये देते हैं, पर कई साल पहले आदमी को प्यास लगती, और उसने पानी माँगा तो हम यहाँके लोग उसको थोडा घी और खानेको गुड देते थे । क्योंकी यहाँ पानी बहुत ही कम चीज थी । सिर्फ घरके आदमी थोडा थोडा पानी सँभालके रखकर पीते थे । हररोज स्नान भी लोग नहीं करते, सिर्फ बडे आदमी और राजा लोग ही रोज स्नान किया करते थे । घर में पानी का उपयोग बहुत काम अनेक बार करते थे ।''
भांडी घासणे, धुणे वगैरेकरिता पाणी कसे वापरत? एकाच पाण्याचा उपयोग पाच वेळा केला जात असे. प्रथम मातीने भांडी कोरडी घासणे, ती उन्हात ठेवून स्वच्छ फडक्याने साफ करणे यालाच `सूखी सफाई' (ड्नय क्लीनिंग) करणे असे म्हटले जाई. घरामध्ये अंघोळ करतेवेळी मोरीत बसले की मोरीचे तोंड बंद करून स्नान केले जाई. ते पाणी बादलीत घेऊन कपडे धुणे व इतर कामास म्हणजे शेणसारवणे वगैरे करून त्यातून उरलेले पाणी झाडास दिले जाई. जनावरांना पाणी पाजून ते थोडे उरले की त्या पाण्यात सारवण केले जाई. अशा प्रकारे पाण्याचा उपयोग तीन-चार वेळा केला जाई. आता धरणे व नहर निर्माण केल्यामुळे पाणी बरे आहे, पण पूर्वीचे हाल त्या लोकांस आठवतात. पाणी खूप कमी प्रमाणात वापरले, तर त्याची नासधूस कमी होते.
हे ऐकून नकळत आपली व आपल्या शहरी लोकांची पाण्याबद्दलची अवहेलना व बेपर्वाई याबद्दल खूप लाज वाटली. पाण्याचे महत्त्व कळण्याकरता एकदा तरी दुष्काळी भागात जाऊन यावे, इतर लोकांना प्रत्यक्ष घेऊन जायला हवे असा विचार मनात आला.
पाण्याचे महत्त्व मी काय सांगू? प्रत्येक सुज्ञ माणसाने जाणावे व इतरांस सांगावे. अनादर कमी करावा, इतरांस करणे भाग पाडावे, पाण्याचे प्रदूषण कमी करावे याकरिता ही गोष्ट खूप काही सांगून जाते.
- वैशाली मो.फडणीस
(पूर्वीश्रमीच्या शशीकला स.आपटे, सांगली)
बेलबाग संस्थान, १७७/१७८ बुधवार पेठ,
पुणे ४११००२   (मोबा. ९८८१६९५५६२)

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन