Skip to main content

Posts

Showing posts from July, 2018

23 july 2018

असाच एक दिवस `त्या अेके दिवशी' काय घडलं ते आितरांना आपण सांगत असतो. त्याच त्या घटनांचे तसेच प्रसंग अैकणाऱ्यालाही आठवू लागतात. अेकमेकांस त्या प्रसंगांनी काय वाटतं त्यालाही गती मिळते.  त्याच हेतूने हा अेक दिवस लिहिला आहे. त्यातला मी म्हणजे कोणीही  -तुम्हीसुद्धा! प्रसंग सगळयांच्याच आयुष्यात येणारे; सांगितले यासाठी की, जसं आपण घरी येअून जरा विचारांत पडतो, काहीतरी प्रतिक्रिया अुमटते..... तितकंच व्हावं. त्यात कोणी चूक बरोबर योग्यायोग्य काहीही नाही. -मनुष्यस्वभावाचे नमुने आणि प्रसंग पाहायचे, इतकंच! तर त्या दिवशी सकाळी अेका परिचित  घरातून फोन आला, त्या घरच्या महिलेनं फोनवर सांगितलं की, तिच्या सासूबाआी कसंतरी करू लागल्यात, डोळे निस्तेज वाटतात, बोलायचं बंद झाल्यात. लग्गेच या. त्या बाआींचे पती काही कामासाठी परगावी शहरात सकाळीच गेले होते. फोनवर या बाआींचा निरोप येताच हातातलं काम टाकून झट्कन निघालो. वाटेतूनच निकट परिचयातल्या अेका डॉक्टरला फोन केला. तो तर आमच्या मित्र-परिवारातलाच होता; फार तज्ज्ञ बडा डॉक्टर नव्हे, पण चांगलं प्रॅक्टीस आणि मुख्यत: सामाजिक जाण असलेला. कुणाच्याही मदतीला शब्

16 July 2018

मध्ययुगीन हिंदुस्थानातील  पथिक-गृहे आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पाहतो. सध्याच्या इंटरनेट युगात हे काम एका `क्लिक'सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल बुक करून निश्चिंत होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का? हिंदुस्थानाबाहेरून जे लोक (परदेशी प्रवासी) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे? मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतांतून माहिती मिळते. १७व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. व्यापारासाठी, डॉक्टर म्हणून, सैनिक म्हणून, आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून, साहस करण्याच्या ओढीपायी, -तर काही केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. यांपैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो, कसा प्रवास केला, येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे. त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच, शिवाय या प्रवासवृत्तांतामधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात

9-7-2108

सेवाव्रती बापट भारतीय कुष्ठ निवारक संघाचे पूर्व सचिव श्री.दामोदर गणेश बापट यांना `पद्मश्री' जाहीर करून सरकारने सन्मानित केले.  श्री.सदाशिव गोविंद कात्रे हे रेल्वेकर्मचारी १९६२ साली निवृत्त झाल्यावर, स्वत:ला कुष्ठरोगाची बाधा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळच्या मध्यप्रदेशातील चांपा या ठिकाणी िख्र्चाश्न मिशनरी इस्पितळात ते उपचारार्थ दाखल झाले. मिशनरींच्या सेवाभावी वृत्तीच्या मागे असलेला धर्मांतराचा कुटील डाव लक्षात घेऊन, दाद मागण्यासाठी कात्रे हे त्यावेळचे म.प्र.चे राज्यपाल हरिभाऊ पाटसकर यांना भेटले. राज्यपालांनी त्यांना सांगितले की, `हजारो मैलांवरून येऊन मिशनरी इथे सेवा देत आहेत. तुमचा उद्देश साध्य होण्यासाठी तुम्हीच का नाही `आपली' संस्था करत?' श्री. कात्रे या सल्ल्याने अस्वस्थ झाले व त्यांनी अशी संस्था उभी करण्याचा निर्णय त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या पाठिंब्याने घेतला. कात्रे आपल्याबरोबर आणखी ४-५ कुष्ठरोगी घेऊन एका झोपडीवजा घरात राहू लागले व त्यांची सेवा करू लागले. कात्रे आता थकत चालले होते, एवढ्यात एके दिवशी बापट त्यांच्याकडे आले, संस्थेकरता मी का

2 July 2018

अरुणा असफअली १९४२च्या ९ ऑगस्टला गोवालिया टँक मैदानावर (आताचे क्रांतिमैदान) `भारत छोडो' या ऐतिहासिक आंदोलनाचा प्रारंभ झाला. अश्रूधुराचा मारा सतत चालू होता, अशा वेळी एका तरुण महिलेच्या हस्ते ध्वजारोहण झाले. काही योगायोग मजेदार असतात. १९८९ साली त्याच मैदानावर ९ ऑगस्टला त्या महिलेचा ८०वा वाढदिवस साजरा झाला. `महाराष्ट्नचे नेहरू' म्हणून एकेकाळी ज्याची गणना केली जात होती असे श्री.अच्युतराव पटवर्धन आणि श्रीमती अरुणाजी बराच काळ भूमिगत होऊन क्रांतिकार्यात मग्न झालेले होते. त्या काळातील क्रांतिकारकांच्या प्रभावळीत अरुणा असफअली हे नाव अग्रभागी विराजमान झालेले होते. भूमिगत असताना श्रीमती अरुणाजी सतत चौफेर संचार करीत राहिल्या. प्रकृतीनेही त्या बऱ्याच खंगल्या असून आजारी असल्याचे वर्तमान महात्मा गांधींच्या कानी गेले. त्यांनी अरुणाजींना निरोप धाडला की, ``तुझी धिटाई आणि वीरबाणा गौरवास्पद असला तरी भूमिगत असतानाच मरून जाणे इष्ट नाही.'' या गौरवार्थ निरोपाबरोबरच गांधीजींच्या शैलीनुसार असाही निरोप त्यांनी अरुणाजींना धाडला होती की, ``इंग्रज सरकारने तुला पकडण्यासाठी जे पारितेषिक घोषित के