Skip to main content

Posts

Showing posts from June, 2018

11 June 2018

संस्कृती आणि आर्थिक विकास `आर्थिक विकास' ही संकल्पना उत्क्रांतशील आहे. `विकासाचे अर्थशास्त्र' ही अर्थशास्त्राची उपशाखा १९६०च्या दशकात उगम पावली. सुरुवातीच्या पर्वात `आर्थिक वाढ' आणि `आर्थिक विकास' या दोन्ही संकल्पना समनार्थीच असत. पुढे आर्थिक विकास ही संकल्पना व प्रक्रिया बहुआयामी असल्याचे प्रस्थापित झाल्यानंतर तिची फारकत झाली. दरडोई उत्पन्नाच्या जोडीनेच मग शिक्षण, आरोग्य यांसारख्या जीवनांगांचा आर्थिक विकासात प्रवेश झाला. १९९०च्या प्रारंभी महबूब उल् हक आणि अमर्त्य सेन या अर्थतज्ज्ञांनी मानवी विकास निर्देशांकाची संकल्पना प्रस्थापित करून नवीनच वळण दिले. अमर्त्य सेन यांनी `व्यक्तीच्या निवड स्वातंत्र्याचा विस्तार म्हणजे आर्थिक विकास गतिमान असल्याचे सिद्ध होणे' अशी व्याख्या मांडत `क्रॅपेबिलिटी'चा एक नवीनच आयाम जोडून दिला. जागतिक तापमानवाढीचा निर्देश याच संदर्भात केला जातो. येत्या काळात शुद्ध व पिण्यायोग्य पाण्याला असलेला `अॅक्सेस' उत्तरोत्तर दुर्लभ होत जाईल, अशी भीती आहे. तिचा धागाही जोडला जातो तो विकासाच्या प्रश्नाशीच. स्थलांतराला अडथळे हा आर्थिक विकासाचा प

28 May 2018

आपले श्रीनगर         दंगे दंगली दगडफेक असल्या अतिरेकी धुडगुसांच्या कथा ऐकल्या तरच श्रीनगर हे नाव आपल्याला परिचयाचे वाटते.  परंतु त्याव्यतिरिक्त शांत रमणीय श्रीनगर ही अनुभवण्याची गोष्ट आहे.  साक्षात् श्री-नगर म्हणून आमच्या अनुभवात आलेले हे निसर्गसंपन्न नगर कोणालाही  धर्मसंस्कृतीचा प्रसन्न प्रत्यय देअू शकते. पुण्यातील वेदाचार्य घैसास गुरुजी वेदपाठशाळा या संस्थेच्या कार्याविषयी आम्ही जाणून होतो. त्या कार्याबद्दल आस्था व अभिमान होता. वेदपाठशाळेने रट्निहाष्तासाठी व सीमेवरील सैनिकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी श्रीनगरला एक कार्यक्रम आयोजित केला, असे आम्हाला समजले. या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे असे ठरविले. त्याचे कारण श्रीनगर या स्वर्गभूमीवर जाण्याची संधी मिळते. या श्रीनगर भेटीचे वैशिष्ट्य असे की, सकाळी ऋग्वेद संहिता महायज्ञ, दुपारी श्रीनगर दर्शन, संध्याकाळी यज्ञशाळेत आरती, मंत्रपुष्प, अष्टावधान सेवा असा कार्यक्रम होता. संहिता महायज्ञामुळे शुद्ध ऋग्वेद मंत्रांचे श्रवण व दुपारी ऐतिहासिक मंदिरांना भेटी व दर्शन घडले. श्रीनगरमध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरे असून, त्या मंदिरांचे निर्माण शेकडो वर्षां