Skip to main content

Posts

Showing posts from June, 2011

Maza Column of 13 June

सुख वाढण्याची कला  ऊस तोड करण्यासाठी उत्तर कर्नाटक किंवा बीड-लातूर कडून कित्येक शेतमजूर पश्चिम महाराष्ट्नत येत असतात. त्यांनी दरवाढीसाठी आखडून धरले. संप-संघटना वगैरे नेतेगिरी झाली, साखर कारखाने खोळंबले. अशा वेळी काही गावातले शेतकरी सरसावले, त्यांनी आपापसात एकी केली. ऊसतोड करण्यासाठी टोळया तयार केल्या, एकमेकांच्या रानातला ऊस तोडायला सुरुवात केली. शेतकरीच होते, सवय मोडली होती पण फार अवघड गेले नाही. काम मार्गी लागले. ही कथा असेल आठ-दहा वर्षांपूर्वीची.  अशा कितीतरी अडचणींचे पाढे वाचण्याची सवय लावून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची ती कथा आठवून पाहण्याजोगी असते. नुकत्याच झालेल्या एका लग्नसमारंभातील पंगत चर्चेत होती. पंगतीचं वाढप अगदीच (बे)सुमार दर्जाचं असतं हा सगळीकडे अनुभव असतो. कुणीतरी आेंगळ किंवा अत्याधुनिक नटरंगी पोरं लग्ना-मुंजीसारख्या भारदस्त प्रसंगात पंगत वाढायला हल्ली येतात. त्या पोरांचे एकूण अवतार पाहिल्यावर पपन्नाची प्रसन्नता जाऊन मळमळ वाढते. वाढपशास्त्राशी तर त्यांचा काही मेळ नसतो. त्यामुळं तुपाच्या पाचसहा थेंबांचीच धार निम्मी आमटीच्या वाटीत आणि बाकीची मिठात जाते. भाताची शितं टेबलावर वि

sampadkiya of 13 JUNE 2011

अराजक योग `हे सरकार खाली खेचलेच पाहिजे' अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुखांनी बाबा रामदेव प्रकरणात त्त्वरित दिली. सामान्य माणसाच्या तात्कालिक उचंबळत्या भावनांना शब्दरूप देण्यात ते वाकबगार आहेतच. त्यामुळे रामदेवांना व त्याहीपेक्षा त्यांच्यावर (अंध?)श्रद्धा ठेवणाऱ्या भगतांना सरकारने ज्या प्रकारे वागवले त्यावर सहज उमटणारी  सर्वसामान्य प्रतिक्रिया सेनाप्रमुखांनी नेमकीच व्यक्त केली आहे. इतरही पक्षांनी सरकार खाली खेचण्यासाठी त्या खुर्चीचेे पाय पकडून ठेवले आहेत. आहे ती व्यवस्था वाईटच आहे. तरीही ती उधळून टाकणे किंवा नाहीशी करणे हे पोरपण देशकारणातील मुत्सद्देगिरीत लागू पडत नाही. तिथे तातडीने पर्याय उपलब्ध असावा लागतो. एखादा खोंबारा लागून पोराचा कपडा फाटला तर तो अंगातून काढून फेकणारे पोर दुसऱ्या नव्या अंग्यासाठी भोकाड पसरते किंवा प्रसंगी नागवे फिरते. देशकारणात असली पोराटकी कशी चालणार? काही दुर्दैवी घटनेत उच्चस्थानच्या व्यक्तीचे बरेवाईट झाले तर पुढच्या विधींची वाट न पाहता तात्पुरत्या कोणा पर्यायीचा शपथविधी करावा लागतो. एखादे मंत्रीमंडळ गडगडले तरी दुसरी व्यवस्था होईपर्यंत त्यास पद सांभाळून राहावे