Skip to main content

Posts

Showing posts from July, 2012

About Murlidhar Chhatre

संपूर्ण नाव - मुरलीधर काशीनाथ छत्रे टोपणनाव - भाऊ,  जन्मतारीख - २४/१२/१९३४ फोन-(०२५१)२४८५८८२, मोबा.०८६९२०२२५७४ पत्नी - सौ.स्नेहलता छत्रे धर्मात विज्ञान / विज्ञानात धर्म (इति डॉ.आईनस्टाइन) तेच माझे धर्माविषयीचे मत आहे. महाराष्ट्नचे `दत्तात्रय'-ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक हे माझे श्रद्धास्थान. द्वितीय पुत्राचे अकाली निधन हा माझ्या आयुष्यातील दु:खद व धक्का देणारा प्रसंग. असे म्हणतात की गाढवाचे पिल्लू गोंडस दिसते. मोठेपणी ते गाढव बनते. याउलट लहानपणी शालान्त परीक्षेपर्यंत मी लाजरा, भित्रा, अबोल (नावच मुळी मु का छत्रे) होतो. घरातील तसेच बाहेरील मंडळींना माझा बावळट स्वभाव चेष्टेचा विषय असे. १९३४ (जन्म) ते १९५१-५२ आणि १९५२ ते २०१२ या कालखंडात जमीनअस्मानाचा फरक आहे. या प्रवासात मित्रमंडळी, गप्पा-चेष्टा, खेळ, सहलीतून माझा स्वभाव बदलत गेला. समाजशास्त्राचे प्राध्यापक श्री.व्ही.जी.सहस्रबुद्धे यांच्या प्रोत्साहनामुळे मला श्रमदान, शिबीर, सैनिकी छावणी, रा.स्व.संघाचे शिबीर वगैरेमुळे धीटपणा आला. सुरवंटाचे फुलपाखरू झाले! मित्रांमुळे मोर्चा. चळवळ, संप वगैरेत सहभागी होऊ लागलो

About Allhad Apte, Tasgaon (Dist.Sangli)

तासगावच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी श्री.आल्हाद आपटे हे तासगावचे (जि.सांगली) सुपुत्र. एका तालुक्याच्या गावात लहानाचा मोठा झालेला माणूस. आपल्या कर्तृत्वावर भरारी घेऊ शकतो, याचे हे एक उदाहरण. सांगलीच्या महाविद्यालयातून बी.ई. झाल्यानंतर ते भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागले. आपल्या बौद्धिक क्षमतेवर ते एक एक पायरी चढत संप्रेषण विभागाचा प्रमुख या पदावर पोहोचले. या पदावरून ते दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. दरम्यान त्यांनी `सर्न' या एका महत्त्वाकांक्षी प्रयोगात भारतातर्फे भाग घेतला. सृष्टीच्या उत्पत्तीचा वेध घेण्याच्या या प्रयोगात त्यांचं मौलिक योगदान आहे. निवृत्तीनंतर दोन वर्षांची वाढीव नेमणूक झाली. तीही नुकतीच संपली. मग ते अधिकृतपणे दिल्लीला हजर झाले. दिल्ली येथे त्यांची नेमणूक नॅशनल टेक्नॉलॉजी रीसर्च ऑर्गनायझेशन (राष्ट्नीय तांत्रिक संशोधन संस्था) येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून झाली आहे. ही संस्था आर.ए.डब्ल्यू. (रॉ) शी संलग्न आहे. आर.ए.डब्ल्यू. ही भारताची हेरगिरी व आंतरराष्ट्नीय गुन्हेगारी तपास या विषयात काम करणारी संस्था आहे. इंदिराजींच्या काळात या संस्थेचे काम सुरू झाले. ति

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाला स्वत:ची नीती नसल्यामुळ

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

Lekh of Jayant Barve in 9/7/2012

सेंद्रिय शेतीचा राजमार्ग - जयंत बर्वे, विटा(जि.सांगली) प्रयोगशील शेतकरी, गोपालक आणि सेंद्रिय उत्पादनांचे निर्यातदार अभिनेता आमीर खान याच्या मालिकेने सध्या चांगली हवा निर्माण केली आहे. आमीर खान प्रॉडक्शनच्या `सत्यमेव जयते' या स्टार चॅनलवरील २४ जूनच्या कार्यक्रमाने एक अत्यंत महत्त्वाचा विषय लोकांपुढे आणला आहे. त्याबद्दल प्रथमत: त्याचे अभिनंदन केले पाहिजे. आजच्या काळातील रासायनिक शेतीचे दुष्परिणाम अन्न, फळे व भाज्या या सर्व खाद्यपदार्थांतून मनुष्यजीवनावर कसे होत आहेत याची जाणीव त्या कार्यक्रमातून उच्च स्तरावरून होऊ शकेल. गेली काही वर्षे पारंपरिक शेतीचे अभ्यासक आणि भारतीय कृषी संस्कृतीवर श्रद्धा असणारे संशोधक यांनी हा विषय वारंवार मांडला आहे, परंतु त्यांचा आवाज रासायनिक पद्धतीच्या आक्रमणापुढे पुरेसा ठरला नव्हता. आमीर खानच्या कार्यक्रमाने या विषयाची जाणीव समाजाला होईल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमातून एका गंभीर विषयाला तोंड फोडून किमान हा विषय तरी लोकांच्या ध्यानी आला इतपत समाधान मानले पाहिजे. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ जूनला `एबीपी माझा' या वाहिनीवरून एक चर्चा घडून आली. महार

sampadkiya in 9 July 2012

सर्वधर्मी समानत्त्व भारतीय जनता पक्षाने भावी निवडणूक जिंकली तर त्या पक्षाचा पंतप्रधान कोण होणार हा आजच्या वादाचा विषय झाला आहे. बिहारच्या नीतिशकुमारांनी त्यात धर्मनिरपेक्षतेचा बाष्कळ मुद्दा फेकून पुष्कळांना उचकून दिले आणि अस्थानी व अव्यवहार्य वाद झडू लागले. अर्थातच अशा वादाशी आणि त्यावेळच्या प्रधानपदाशी आज तरी काही घेणे नाही. त्यातील `धर्मनिरपेक्षता' या नावाचे खूळ कित्येक बुजुर्ग म्हणविणाऱ्या उच्चपदस्थांच्या डोक्यांतून अद्यापि का जात नाही एवढाच एक चिंताजनक प्रश्न शिल्लक राहतो. राष्ट्नीय लोकशाही आघाडी नावाच्या कामापुरत्या एकत्र आलेल्या पक्षांचे एकत्रीकरण आज क्षीण स्थितीत आहे. बिहारमध्ये नीतिशकुमार मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे भाजपचे आहेत. बिहारमधल्या सत्तेपुरते ते दोन पक्ष एकत्र आले. ते राज्य रालोआ कडे आहे, असा कुणाचाही समज नाही. त्यामुळे उद्या खरीच मध्यवर्ती सत्ता या रालोआकडे आली तर, त्यातला फार मोठा पक्ष भाजप असेल तर, आणि त्या पक्षाने नरंेद्र मोदींना ते पद दिले तर... तो त्यांचा अधिकार म्हणून नीतिशकुमारांसह सर्वांनी मान्य करणे हा सरळ व्यवहार झाला; प

sampadkiya in 2 July 2012

आग शमली, क्षोभ शमवा मंत्रालयास आग लागली तो प्रकार दुर्दैवी आहेच. इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी एवढी भीषण आग लागणे हे अचंबित करणारे असले तरी आपल्या राष्ट्नीय व सार्वजनिक स्वभावाच्या दृष्टीने अशक्यही वाटत नाही. कारण तितकी बेफिकीरी व सामुदायिक गलथानपणा आपण अंगी बाणवलेले आहे. आपली आधुनिकता एका पायावर पळते आहे, आणि दुसऱ्या पायावर पिढीजात भोंगळपणा स्वस्थ आहे. त्यामुळे मुंबईत असो किंवा कोण्या ओसाड गावात असो, आधुनिकतेला जी एक शिस्त, काटेकोरपणा व सावधता असली पाहिजे ती कुठेही दिसत नाही. वाहनांची संख्या बेसुमार वाढली, पण तितकी संख्या सामावू शकणारे रस्ते मोठे करता येत नाहीत. गाड्या उभ्या करण्याला जागा  उपलब्ध नाहीत, आणि कुठेही गाडी उभी केली तर ती सुरक्षित राहील अशी शाश्वती लोकांच्या प्रवृत्तीत नाही. या प्रकारच्या गजबजाटाचे आत्यंतिक भिकार उदाहरण म्हणून मंत्रालयाचेच द्यावे अशी स्थिती होती. हल्लीच्या कोणत्याही व्यवहारांची पद्धत अशी की, सत्तेचे विकेंद्रीकरण फक्त नावापुरतेच असते; आणि सर्व शासकीय कामांची टोलवाटोलवी किंवा दरनिश्चिती मंत्रालयातच होते. नर्सची बदली, वाळूचा ठेका, ५ वी च्या तुकडीला परवानगी

Lekh in 2 July 2012

एक तरी `वारी' अनुभवावी... - विनिता तेलंग विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा घोष अन् दिंड्या पताकांनी महाराष्ट्न्च जणू पंढरी झाला. आषाढी वारीसाठी ठिकठिकाणहून दिंड्या मार्गस्थ होत गेल्या. वर्तमानपत्रे, त्याहीपेक्षा वेगवेगळया टीव्ही चॅनल्सच्या चढाओढीमुळे वारी - पंढरपूर - विठ्ठलभक्ती याविषयी खूप वेगवेगळया गोष्टी घरबसल्या पहायला मिळतात. भारताबाहेरील लोकांना मुंबईच्या डबेवाल्यांसारखंच या पंढरीच्या वारीबद्दलही खूप कुतूहल, आश्चर्य वाटतं. कुणीही फतवा न काढता, काहीही आकर्षक योजना, फायदा नसताना, ठरलेल्या दिवशी, विशिष्ट नियम पाळून लाखो लोक एकत्र येतात, तेही आपल्या विठुरायाला फक्त पाहायला! परदेशातून अनेक लोक मुद्दाम या `सिस्टीम'चा अभ्यास करायलाही येतात, तर वर्षानुवर्षे वारी करून अस्सल वारकरी बनलेले काही परदेशी लोकही आहेत. आपल्या, विशेषत: उच्चभ्रू, बुद्धिवादी वर्तुळात  वारीविषयी विषय काढून तर पहा...`वारी म्हणजे प्रचंड गर्दी, गोंधळ.. अस्वच्छता, अनारोग्याला निमंत्रण, गैरप्रकारांना वाव... आणि मुख्य म्हणजे व्यवस्थेवरचा ताण!' निसर्गाच्या वा मानवनिर्मित व्यवस्थांवरचा पहिला अधिकार आपलाच अस