तासगावच्या सुपुत्राची उत्तुंग भरारी
श्री.आल्हाद आपटे हे तासगावचे (जि.सांगली) सुपुत्र. एका तालुक्याच्या गावात लहानाचा मोठा झालेला माणूस. आपल्या कर्तृत्वावर भरारी घेऊ शकतो, याचे हे एक उदाहरण.
सांगलीच्या महाविद्यालयातून बी.ई. झाल्यानंतर ते भाभा अणुसंशोधन केंद्रात नोकरीला लागले. आपल्या बौद्धिक क्षमतेवर ते एक एक पायरी चढत संप्रेषण विभागाचा प्रमुख या पदावर पोहोचले. या पदावरून ते दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाले. दरम्यान त्यांनी `सर्न' या एका महत्त्वाकांक्षी प्रयोगात भारतातर्फे भाग घेतला. सृष्टीच्या उत्पत्तीचा वेध घेण्याच्या या प्रयोगात त्यांचं मौलिक योगदान आहे. निवृत्तीनंतर दोन वर्षांची वाढीव नेमणूक झाली. तीही नुकतीच संपली. मग ते अधिकृतपणे दिल्लीला हजर झाले.
दिल्ली येथे त्यांची नेमणूक नॅशनल टेक्नॉलॉजी रीसर्च ऑर्गनायझेशन (राष्ट्नीय तांत्रिक संशोधन संस्था) येथे वरिष्ठ सल्लागार म्हणून झाली आहे. ही संस्था आर.ए.डब्ल्यू. (रॉ) शी संलग्न आहे. आर.ए.डब्ल्यू. ही भारताची हेरगिरी व आंतरराष्ट्नीय गुन्हेगारी तपास या विषयात काम करणारी संस्था आहे. इंदिराजींच्या काळात या संस्थेचे काम सुरू झाले. तिचा संबंध थेट पंतप्रधान कार्यालयाशी असून आल्हाद आपटे यांची संस्था आर.ए.डब्ल्यू. शी संबंधित आहे. श्री.आल्हाद थेट पंतप्रधान कार्यालयास कामाचा वृत्तांत देतील.
ही एक मोठी संधी आहे आणि विशेष म्हणजे कसलाही अर्ज, प्रयत्न न करता ती त्यांच्याकडे चालत आली. आल्हाद आपटे यांनी आजवर जे काम केले, त्याची ही पावतीच म्हणायला हवी.
तासगाव येथील जुन्या पिढीतले प्रख्यात वकील कै.गोविंदराव आपटे यांचे हे चिरंजीव आणि तासगाव हायस्कूल (सध्याचे चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर)चे माजी विद्यार्थी होत. १९९९ साली आपटे कुलवृत्तांत प्रकाशित झाला. या ग्रंथातील वंशावळ जोडून शाखा-वृक्ष जोडणीचे अत्यंत किचकट काम श्री.आल्हाद गोविंद आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले होते. त्यासाठी संगणकाचे सॉफ्टवेअर त्यांनीच तयार केले.
मोबा : श्री.आल्हाद : ९८९२७७१४३३
सौ.रेखा आल्हाद : ९८९२४५६०२९
***
Comments
Post a Comment