Skip to main content

About Murlidhar Chhatre


संपूर्ण नाव - मुरलीधर काशीनाथ छत्रे
टोपणनाव - भाऊ,  जन्मतारीख - २४/१२/१९३४
फोन-(०२५१)२४८५८८२, मोबा.०८६९२०२२५७४
पत्नी - सौ.स्नेहलता छत्रे


धर्मात विज्ञान / विज्ञानात धर्म (इति डॉ.आईनस्टाइन) तेच माझे धर्माविषयीचे मत आहे. महाराष्ट्नचे `दत्तात्रय'-ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज व लोकमान्य टिळक हे माझे श्रद्धास्थान. द्वितीय पुत्राचे अकाली निधन हा माझ्या आयुष्यातील दु:खद व धक्का देणारा प्रसंग.
असे म्हणतात की गाढवाचे पिल्लू गोंडस दिसते. मोठेपणी ते गाढव बनते. याउलट लहानपणी शालान्त परीक्षेपर्यंत मी लाजरा, भित्रा, अबोल (नावच मुळी मु का छत्रे) होतो. घरातील तसेच बाहेरील मंडळींना माझा बावळट स्वभाव चेष्टेचा विषय असे. १९३४ (जन्म) ते १९५१-५२ आणि १९५२ ते २०१२ या कालखंडात जमीनअस्मानाचा फरक आहे. या प्रवासात मित्रमंडळी, गप्पा-चेष्टा, खेळ, सहलीतून माझा स्वभाव बदलत गेला. समाजशास्त्राचे प्राध्यापक श्री.व्ही.जी.सहस्रबुद्धे यांच्या प्रोत्साहनामुळे मला श्रमदान, शिबीर, सैनिकी छावणी, रा.स्व.संघाचे शिबीर वगैरेमुळे धीटपणा आला. सुरवंटाचे फुलपाखरू झाले! मित्रांमुळे मोर्चा. चळवळ, संप वगैरेत सहभागी होऊ लागलो. संयुक्त महाराष्ट्न् (बेळगाव अधिवेशन)यातून अंगात हुरूप आला. आज वाटते की, ते टॉनिक अपेक्षेपेक्षा जास्तच परिणामकारक ठरले. एवढे वयोमान (७७ पूर्ण) त्यात मधुमेही असूनही खुमखुमी आहेच!
एमएसईबीत नोकरीस होतो. छोट्या गावात नोकरी होती. गावातील संपाचे नेतृत्व माझ्यावर. मग मोर्चे, सायकलफेरी, घोषणा, सभा वगैरे. नंतर मोठ्या शहरात कारखान्यात रुजू झालो. पण पक्षपात, राजकारण, बॉसगिरी चालू झाली. कटु अनुभव. कामगार संघटनेत सामील झालो. कामगार नेते मनोहर कोतवाल आणि डॉ.दत्ता सामंत. मवाळ आणि जहाल दोहोंचा अनुभव मिळाला. त्या कारखान्यात करारनामा, मसुदा, वाटाघाटीत दोनवेळा सहभाग. पक्षपात, बॉसगिरी सर्वच संपले. कारखान्यात मानसन्मान मिळत होता आणि अचानक मधुमेहाने गाठले. जीवनशैलीच बदलली. वयोमानही वाढले. साठाव्या वर्षी निवृत्त झालो.
त्या मिळालेल्या टॉनिकचा अंश अंगात आहेच. छत्रे कुलबंधू मंडळाची स्थापना केली. बैठका-संमेलने सुरू झाली. `छत्रे कुलवृत्तांत' प्रकाशित केला. तणावाला उत्तर म्हणून काड्यापेट्या, शुभेच्छापत्रे यांच्या संग्रहाचे छंद जोपासले. डोंबिवलीत तीन दिवस प्रदर्शन भरविले. मधुमेहाचा पूर्ण बंदोबस्त करण्यासाठी संस्था स्थापन झाली. त्यासाठी कार्यक्रम चालू झाले. व्याख्यानांतून, पुस्तकांच्या अभ्यासातून ज्ञान मिळाले. मासिकातून लेख, विचार मांडू लागलो. पन्नास लेख प्रकाशित झाले. `मधुमेह माझा जीवनसाथी' हे पुस्तक प्रकाशित केले. मधुमेहासंगे यशस्वी जीवन - मोठा सत्कार झाला. सुवर्णपदकाचा मानकरी झालो!
असा `मी' घडविण्यास तरुणपणी भेटलेली मित्रमंडळी, माझी पत्नी, तज्ज्ञ डॉक्टर मंडळी या सर्वांमुळे मी आज `असा मी' आहे.
पत्ता - २/५, नीळकंठ प्रेरणा, महर्षी कर्वे पथ, विष्णूनगर,  डोंबिवली (प.) ४२१२०२

Comments

  1. असे म्हणतात की गाढवाचे पिल्लू गोंडस दिसते. मोठेपणी ते गाढव बनते. याउलट लहानपणी शालान्त परीक्षेपर्यंत मी लाजरा, भित्रा, अबोल (नावच मुळी मु का छत्रे) होतो temvha baavaLaTa disaNaare pillU ghoDyaace asaave kaay?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन