Skip to main content

Posts

Showing posts from March, 2019

24 Feb & 4 March

उद्याच्या प्रशासकांना आव्हाने अुत्तराखंडमधील मसुरी येथे लालबहादुर शास्त्री राष्ट्नीय प्रशासन अकादमी आहे. तेथे महाराष्ट्नचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली, त्यावेळी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.  प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिका व जबाबदारी, प्रेरणास्रोत, भावी काळातील तंत्रज्ञान व त्याची आव्हाने आित्यादी विषयांवर त्यांनी भाष्य केले. त्याचा स्वैर अनुवाद जयश्री देसाआी यांनी `लोकराज्य'साठी केला, तो संक्षिप्त रूपात सादर - आिथं यायला मिळावं, शिकायला मिळावं अशी आिच्छा माझ्या मनात कायमच होती. तुम्हाला कल्पना असेलच की, प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थी, अेक ना अेक दिवस आिथं यायला मिळेल असं स्वप्न पाहात असतो. परंतु तुमच्यासारखे काही विद्यार्थीच आिथे प्रवेश घेण्यासाठी पात्र ठरतात. या प्रबोधिनी (अॅक्रॅडमी)च्या संचालक श्रीमती अुपमा चौधरी यांचे मी विशेष आभार मानू आिच्छितो, कारण त्यांनी मला या वेगळयाच निमित्तानं आिथं थेट प्रवेश दिला. वास्तविक मला तरी आिथं बराच काळ व्यतीत करायला आवडलं असतं, आणि आिथल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात राहायलाही आवडलं अ