Skip to main content

Posts

Showing posts from March, 2014

31March2014

कवी होता कसा आननी? - सुपर्णा बापट किर्लोस्करवाडीतच लहानाचे मोठे झालेले सुधीर मोघे यांची  प्रकट मुलाखत मार्च २००७ मध्ये तेथील सोशल क्लबमध्ये घेतली, त्याचे रसग्रहण (पूर्वप्रकाशित) फाल्गुनातील सुरेख संध्याकाळ. हलके उबदार वारे. वडा-पिंपळाच्या, बदाम-सागाच्या झाडांनी समृद्ध परिसर. जुन्या काळच्या वास्तूशैलीचा आभास देणारे  देखणे सभागृह. सूर्याचा केशरी गोळा हळूहळू क्षितिजाआड होत होता अन्... `होईल केशरी पहाट साक्षात, साक्षात् तुझ्यात उजाडेल' असे म्हणणारा कवी आपले कवीत्व उलगडून दाखवत होता. `कवी तो आहे असा आननी' एवढीच उत्सुकता असलेल्या वयाचा श्रोतृवर्ग; आणि कवीच्या कवीत्वाचीच केवळ नव्हे तर स्वत:च्या भूमिकेची पुरेपूर जाण असणारा मुलाखतकार. कार्यक्रम नुसता रंगला नाही तर भिजला, दरवळला. `कविता होते कशी' अशा प्रकारच्या प्रश्नांना बगल देऊनही कवीच्या अन् चांगल्या कवितांच्या धमन्यांमधून काय वाहतंय अन् ते किती प्रसन्नपणे, प्रवाहीपणे वाहतंय हेही सर्वांना कळलं. कवीच्या स्मृतींची पाने फडफडली अन् सुधीर मोघे नावाच्या ह्या मौल्यवान ग्रंथातले काही वेधक उतारे दृष्टीस पडले. तेवढ्यानंही भारावले

15March2014

चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) - यंदा ३१ मार्च शालिवाहन `जय'नाम संवत्सर १९३६ चा आरंभ. त्यानिमित्ताने.... संस्कृतीचे अंग - पंचांग `पंचांग' हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक होय. पंचांग हा तसा क्लिष्ट आणि काहीसा अवघड विषय ठरवून सर्वसामान्य माणूस त्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करीत नाही. पण त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. देश, प्रांत सोडून परदेशातही पंचांग उपलब्ध असते. पंचांगाची मूळ परिभाषा संस्कृत असूनही परदेशस्थ भारतीयांकडून पंचांगाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ज्योतिष व गणितशास्त्रांचा उपयोग करून पंचांग तयार केले जाते. तिथी, वार, नक्षत्रे, योग व करण ही पंचांगाची पाच अंगे. कालगणन व कालनिर्देश हे पंचांगाचे प्रमुख कार्य आहे. सूर्यचंद्रादी ग्रहांच्या गतीमुळे काळाची पाच अंगे तयार होऊन पंचांग तयार होते. भारतीय पंचांगात सर्वसाधारणपणे चैत्र शुद्ध (गुढीपाडवा) प्रतिपदा या दिवसाने वर्षाची सुरुवात होते. सरासरी महाराष्ट्नत शालिवाहन राजाचे शक प्रमाण मानतात. त्याशिवाय महावीर संवत्, विक्रम संवत्, इसवी सन, हिजरी सन, पारशी सन, शिव शक असा वेगवेगळया संवत्सरांनाही प्रमाण मानतात. शक, संवत्,

3March2014

स्वयंसेवी संस्था प्रभावी हव्यात संस्था चांगली चालण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे मानले आहेत. १) निधी (संकलन आणि व्यवस्थापन) २) कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे शिक्षण ३) संस्थेच्या कार्याचे व कार्यपद्धतीचे मूल्यांकन अशा स्वयंसेवी सामाजिक संस्थांचे संघटन होण्यासाठी तीन घटक महत्त्वाचे मानले आहेत १) वैचारिक देवाणघेवाण २) परस्पर स्नेहसंबंध आणि सहकार्य ३) चांगल्यासाठी दबावगट व सकारात्मक वातावरणाचे प्रयत्न या दोन्ही दृष्टींनी जे प्रयोग करण्यात येतील त्याचा एक भाग म्हणजे ही कार्यशाळा होय. पहिल्या सत्रात संस्थेची घटना, त्यातील कलमे व पोटनियमांत होणारे बदल, पदाधिकारी व त्यांची निवड याविषयी माहिती देण्यात आली. आयकर नोंदणी (१२अ), कायमचा नोंद क्रमांक (पॅन), ८० जी करिता तरतूद, आयकर ३५ एसी साठी निकष, तसेच विशिष्ट उद्देशाने मोठे आर्थिक व्यवहार करताना घेण्याची काळजी इत्यादींविषयी ऊहापोह करण्यात आला. `धर्मादाय आयुक्त वा उपायुक्तांचे कार्यालय हे कोर्ट स्वरूप असते. तिथे आपले म्हणणे मांडायचे असते. त्या व्यवस्थेच्या संदर्भात कागदपत्र व नियम यांबद्दल काळजी घेऊन शक्यतो त्यातील अनियमिततेमध्ये अडकू

24Feb.2014

देवाचिये द्वारी, क्रांतीचे सोहाळे पंढरपूर, कोल्हापूर अशा तीर्थक्षेत्रांत पूर्वकाळी कधी जातीय अनाचार होत असतील, ते रोखण्यासाठी व भेदाभेद नाहीसे करून समानता रुजविण्यासाठी कित्येकांनी प्रयत्न केल्याचे इतिहास सांगतो. देव देऊळी कोंडून त्याचा बाजार मांडण्याचे पाप काहींनी केले, पण त्याच्या भक्त रयतेचा कैवार घेऊन त्यास मुक्त करण्यासाठी तळमळून प्रयत्न करणारेही सर्व जातीपातींचे श्रेष्ठ विचारवंत होते.परंतु ज्यांना क्षुद्र अमंगळ भेद फुलवत ठेवायचा असतो अशांना सध्याच्या काळात अस्थानी स्थान मिळते आहे. ही तीर्थक्षेत्रे शासकीय देवस्थान समितीकडे व्यवस्थापनासाठी आहेत. आणि शासकीय म्हणून जो बरा-वाईट किंवा पक्षपाती कारभार चालायचा, तो तिथे चालणे हेही ओघानेच येते. पण त्याबद्दल रोष मानावा असे काही नाही. आपला शासकीय व्यवहार राज्यघटनेप्रमाणे धर्मनिरपेक्षतेने चालणे अपेक्षित आहे. पण राजकारणी पुढारी देवलोकांतून आलेले नाहीत, ते राजकीय लंपटगिरीमुळे तितकी धर्मनिरपेक्षता प्रत्यक्षात आणू शकत नाहीत. त्यांना झुंडशाहीचा विचार बोटचेपेपणाने करावा लागतो आणि त्यालाच `प्रागतिक पुरोगामी विचार' म्हणून मिरवत ठेवावे लागते.