Skip to main content

15March2014

चैत्र प्रतिपदा (गुढीपाडवा) - यंदा ३१ मार्च
शालिवाहन `जय'नाम संवत्सर १९३६ चा आरंभ. त्यानिमित्ताने....
संस्कृतीचे अंग - पंचांग
`पंचांग' हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक होय. पंचांग हा तसा क्लिष्ट आणि काहीसा अवघड विषय ठरवून सर्वसामान्य माणूस त्या वाटेला जाण्याचा प्रयत्न करीत नाही. पण त्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे आहे. देश, प्रांत सोडून परदेशातही पंचांग उपलब्ध असते. पंचांगाची मूळ परिभाषा संस्कृत असूनही परदेशस्थ भारतीयांकडून पंचांगाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
ज्योतिष व गणितशास्त्रांचा उपयोग करून पंचांग तयार केले जाते. तिथी, वार, नक्षत्रे, योग व करण ही पंचांगाची पाच अंगे. कालगणन व कालनिर्देश हे पंचांगाचे प्रमुख कार्य आहे. सूर्यचंद्रादी ग्रहांच्या गतीमुळे काळाची पाच अंगे तयार होऊन पंचांग तयार होते. भारतीय पंचांगात सर्वसाधारणपणे चैत्र शुद्ध (गुढीपाडवा) प्रतिपदा या दिवसाने वर्षाची सुरुवात होते. सरासरी महाराष्ट्नत शालिवाहन राजाचे शक प्रमाण मानतात. त्याशिवाय महावीर संवत्, विक्रम संवत्, इसवी सन, हिजरी सन, पारशी सन, शिव शक असा वेगवेगळया संवत्सरांनाही प्रमाण मानतात.
शक, संवत्, सन, अब्द, संवत्सर हे शब्द वर्षाच्या कालावधीसाठी वापरले आहेत. भारतीय कालगणनेत प्राचीन काळाशी अखंड नाते जोडणारे कलियुग शक, द्वापारयुगाच्या शेवटी झालेल्या महाभारत युद्धानंतर ३६ वर्षांनी सुरू झाले. त्यास युगाब्द म्हणतात. ते शालिवाहन शकपूर्व ३१८० पासून मोजतात. पहिला शककर्ता राजा युधिष्ठिर धर्मराज, दुसरा उज्जैनीचा विक्रम, तिसरा पैठणचा राजा शालिवाहन, चौथा सिंधू देशाचा राजा विजयाभिनंद, पाचवा धारातीर्थीचा राजा नागार्जुन व सहावा रायगडचा राजा शिवछत्रपती यांना शककर्ते म्हणून ओळखले जाते.
महावीर संवत इ.स.५२६ या वर्षी कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून (महावीर निर्वाण दिनापासून) सुरु झाले. विक्रम संवत उज्जैनीच्या विक्रमादित्य राजाने इ.स.पूर्व ५६ व्या वर्षी सुरू केला. इसवी सन िख्र्तासपासून सुरू झाले. िख्र्तासी लोकांच्यात ज्युलियन क्रॅलेंडर प्रचारात होते. परंतु त्यामध्ये काहीसा फरक येऊ लागल्याने पोप ग्रेगरीने नवे क्रॅलेंडर सुरू केले. १६ व्या शतकात याचा प्रारंभ झाला. ग्रेगरीन पद्धती आता सर्व जगमान्य झाली. गोदावरी तीरावर पैठण क्षेत्री शालिवाहन राजाने आपल्या राज्याभिषेकाच्या स्मृती म्हणून (िख्र्तास्वध ३ मार्च ७८) शालिवाहन शक सुरू केला. पहिल्या शतकात महाराष्ट्न् प्रांतातील राजा पलुमाची सातकर्णी यांने आपल्या नावे शालिवाहन शक सुरू केले. सन व शालिवाहन शक यामध्ये ७८ वर्षाचा फरक आहे. संवत व शक वर्ष यात १३५ वर्षांचा फरक आहे. सध्या विक्रम संवत २०७१ व शालिवाहन शक १९३६ सुरू होत आहे.
हिजरी सन मूळचा अरबस्तानातील. १५ जुलै ६२२ ला महंमद पैगंबर मक्केहून मदिनेस गेले, तेव्हापासून या सनाची सुरुवात. हिजरी आणि जलाली कालगणना पूर्वी राजकीय पत्रव्यवहारांत आढळून येते.
पारशी सन इराणात इ.स.६२० या वर्षी सुरू झाला. त्यानंतर ४२ वर्षांनी पर्शियातून हे लोक हिंदुस्थानात आले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शके १७९६ आनंद संवत्सर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिव शक सुरू केला. त्या दिवशी त्यांना राज्याभिषेक झाला.
भारतीय पंचांगाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. महाराष्ट्नत एकूण १८ पंचांगे प्रसिद्ध होतात. पंचांगांचा कालावधी निर्मितीचा काळ ३००० वर्षांपूर्वीचा आहे. कौन्सिल ऑफ सायंटिफीक अॅन्ड इंडस्ट्नीयल रिसर्च विभागाने डॉ.मेघानंद सहा यांच्या अध्यक्षतेखाली, भारतातील सर्व राज्यांतील पंचांगांच्या एकवाक्यतेसाठी समिती निर्माण केली होती. त्यामुळे विविध कालातील आधारावर सुरू झालेली पंचांगाची मांडणी व ग्रहरचना वेगळी असली तरी, त्यामध्ये आता एकवाक्यताही आढळते. इसवी सनापूर्वी १५००च्या सुमारास तिथी व नक्षत्रे अशी दोनच अंगे होती. कालांतराने वार, करण ही अंगे समाविष्ट झाली. योग हे अंग इ.स.७ व्या शतकात समाविष्ट झाले.
प्रत्येक सणामध्ये टिळक पंचांगात चार-पाच दिवसांचा फरक आढळतो. १९०६ साली या विषयावर सांगोपांग चर्चा व्हावी म्हणून मुंबईत एक `ज्योतिष परिषद - पंचांग संमेलन' भरविण्यात आले होते. आकाशात दिसणाऱ्या ग्रहताऱ्यांच्या सूक्ष्म अभ्यासाने पंचांग तयार करावे असेही या परिषदेत ठरले. पंचांगाचा अभ्यास, प्रचारपूर्व अभ्यासिका, प्रशिक्षण, गरज, महत्त्व आणि उपयोग याचा अभ्यास करणेसाठी १९६० साली नाशिक येथे पंचांग संमेलन भरविण्यात आले. त्यामध्ये पंचांगाच्या अभ्यासाचा शालेय शिक्षणात अंतर्भाव करावा, असा ठराव करण्यात आला. मानवी जीवन सुसह्य आणि सुखकर व्हावे या मूळ पायावरच पंचांगाची उभारणी व्हावी, असे ठरले. महाराष्ट्नत सोलापूरकर दाते यांचे पंचांग, नागपूरचे राजंदरेकर यांचे `महाराष्ट्नीय व वैदर्भीय पंचांग', कराडचे `रुईकर पंचांग', पारनेरकर महाराज यांचे `शास्त्रशुद्ध पंचांग', पुण्याचे `टिळक पंचांग', मुंबईचे ढवळे `बृहत् पंचांग', साळगांवकरांचे `कालनिर्णय', कोल्हापूरचे `लाटकर पंचांग', गुजराती भाषेतील `जन्मभूमी पंचांग', अहमदाबादचे `गुजराथी संदेश', हरदेव शास्त्री यांचे `विश्वविजय पंचांग' व `गजेंद्र विजय पंचांग', मारवाड येथील `मारवाडी पंचांग' प्रामुख्याने प्रचारात आहेत. शिवाय `भारतीय पंचांग', `निर्णयसागर' इ.पंचांगे आहेत. गुजराथ पंचांगाचा आरंभ कार्तिक प्रतिपदेकडून, व बाकी पंचांगांचा प्रारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होतो.
पंचांगात अनुक्रमे ६० संवत्सरे, ६ ऋतू, १२ मास, २ पक्ष, १६ तिथी, ७ वार, २७ नक्षत्रे, दक्षिणायन-उत्तरायण अशी दोन अंगे बसविलेली असतात. कर्क राशीला रवि गेल्यापासून रवि धनु राशीत असेपर्यंत दक्षिणायन व मकर राशीला रवि गेल्यापासून मिथुन राशीत तो असेपर्यंत उत्तरायण असा कालावधी असतो. ६० संवत्सरांची मांडणी इ.स.१७६४ पासून; `सोमदैवज्ञ' नावाच्या ज्योतिषाने कल्पलता नावाच्या मेदिनीय ज्योतिषावर ग्रंथ लिहिला. तेव्हापासून सुरू झाली. भगवान नारदमुनी यांची भार्या नार्दीस ६० पुत्र झाले. त्यांच्या नावाची ही संवत्सरे असल्याचे पौराणिक उल्लेख आढळतात. पहिले संवत्सर प्रभव, शेवटचे संवत्सर क्षय.
आजतागायत पंचांग संशोधनावरून त्यांची प्राचीनता सिद्ध झाली आहे. सूर्य आणि चंद्र हे मन आहे, असे वेदांतात सांगितले आहे. याशिवाय आकाशातील ग्रह पुढे सरकत असतात. नक्षत्रापासून मिळणारा प्रकाश जो ग्रहण करतो, त्याला ग्रह म्हणून संबोधतात.
२१ व्या शतकात वाटचाल करणाऱ्या देशात या साऱ्याचे स्थान काय? एकूण वैज्ञानिक प्रगती लक्षात घेता, पंचांगावर आधारित असणारे ज्योतिषशास्त्र मागे पडते का अशी एक सुप्त भीती व्यक्त केली जाते. पंचांगाचे गणितशास्त्र आजतागायत खरे ठरले असून कालचक्रामध्ये फरक पडला नाही. हा पंचांगशास्त्राचा विजय आहे. १६४२ सालच्या प्राचीन पंचांगाची हस्तलिखित प्रत धुळे येथे राजवाडे संशोधन मंदिरात आहे.
पंचांगाची मूळ कल्पना वेदात आहे. तारे, देवता यांचे वर्णन तैत्तिरीय ब्राह्मण ग्रंथात आहे. ती एक भारतीय कला आहे. प्राचीन काळी पंचांगात घटिका-पळे अशी वेळ नमूद करीत. दिवसेंदिवस पंचांगात नवनवीन सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे घटिकेबरोबर प्रमाणवेळ, दिवस, नक्षत्र, राशीभविष्य, मुहूर्त, शुभयोग इत्यादींपासून `पंचांग कसे पाहावे' याची नोंद असते. पंचांग सामान्यजनांचे होकायंत्र बनले आहे.
अमेरिका व इंग्लंड देशांनी पंचांगाला आवश्यक असणारी पुस्तिकाही तयार केली, त्यामुळे समुद्रातील खलाशी, आकाशातील वैज्ञानिक यांना वातावरणातील बदल, धोके, पर्जन्यमान यांची अचूक माहिती पंचांगाने मिळते. आकाशवाणी, दूरदर्शनही पंचांगाचा उपयोग करतात. पंचांग हा भारतीयांचा अमोल ठेवा आहे.
- नंदकुमार मराठे,
२२५७/ए , फ्लॅट नं.१०१, जीवबानाना जाधव अपार्ट,
बाबूजमाल दर्ग्यामागे, कोल्हापूर
फोन (०२३१) २५४१८२३,  ९९७५४२९४९४

जातिनिहाय व्यवस्था
भारतात अनेक धर्म-पंथ-जाती अस्तित्वात आहेत असे म्हटले जाते. वास्तविक जगभरातल्या कोणत्याही क्षेत्रात जिथे मनुष्यवस्ती आहे तिथे अशा धर्म-जाती अस्तित्वात असतातच. परंतु हिंदुस्थानचे वैशिष्ट्य हे की, इथे इतके वैविध्य कित्येक वर्षे नांदत आहे. ते सुखानेच नांदत असेल असे नाही. पण त्यांचे संघर्ष आणि आपसातील समरसता हेच इथले वैशिष्ट्य आहे. रशियासारख्या देशात साम्यवादाचा फार उदोउदो केला जातो. तिथे `जे रशियन आहेत त्यांनी इथे राहावे, बाकीच्यांनी राहायला हरकत नाही पण त्यांना समानत्त्व वगैरे मिळणार नाही.' असे ठणकावून सांगण्याचे धाडस किंवा उद्दामपणा पुतिनकडून केला जातो. इस्रायलसारख्या ज्यू देशात किंवा मूर्तिमंत शांततामय तत्त्वज्ञान बाळगणाऱ्या बौद्ध राष्ट्नतसुद्धा इतर कुठल्या धर्म-जातींना सामावून घेण्याची बात ऐकूनसुद्धा घेतली जात नाही. पश्चिमी देशात िख्र्चाश्नांचे प्राबल्य असले तरी क्रॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातील भेद हाणामारीवर येतातच. पाकिस्तानसारखा देश इस्लामी म्हणून मिरवत असला तरी शिया आणि सुन्नी पंथीय समाजात कायमच्या लढाया सुरू असतात. त्या मानाने भारतातल्या धर्म-जातींमध्ये संघर्ष पेटविण्यासाठी जी चिथावणी दिली जात असते त्याचा फारसा उपयोग होत नाही. तात्कालिक उद्रेक कुठेतरी होतो आणि काही नासधूस होते. तेवढा अपवाद वगळता येथील जातीधर्मांनीच आपापसातले संबंध सामंजस्याचे ठेवले आहेत.

याच मनोभूमिकेवर या देशातील राजकारण उभे आहे. भारतातील राजकीय पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणत असोत किंवा दुसऱ्याला परंपरावादी किंवा सनातनी म्हणून हिणवत असोत, त्या दोन्हींही विचारपद्धतीमध्ये लोकांना झुंजवत ठेवून स्वत:चा राजकीय लाभ उठविणे एवढाच उद्देश स्पष्ट असतो. सांप्रदायिकता हा वास्तविक अभिमानाने मिरवण्याचा एक स्वभाव आहे. जे राजकीय पक्ष आपण सांप्रदायिक नसल्याचे समजतात तेसुद्धा त्यांच्या पक्षाचा आणि पूर्वकाळात होऊन गेलेल्या नेत्यांचा  एक संप्रदाय बनवूनच त्याची कर्मकांडे स्वत:च्या खांद्यावर मिरवत असतात. गांधी-नेहरूंच्या संप्रदायातच वावरत असल्याचा आभास निर्माण करून त्याबद्दल नाक वर करून बोलणाऱ्यांना सांप्रदायिक का म्हणायचे नाही?

परंतु राजकारण म्हटले की या सर्व गोष्टींचा विचार प्राधान्याने केला जातो. चांगल्या लोकांनी राजकारणात यावे असे काही लोक अधूनमधून पिल्लू सोडत असतात. राजकारणात वाईटच लोक आहेत असे मानण्याचे कारण नाही. आणि वाईट लोक केवळ राजकारणातच आहेत असेही नाही. चित्रपट, उद्योग आणि प्रशासन या क्षेत्रांमध्ये कोणी हरिश्चंद्राचे अवतार आहेत असे मानत नाही. राजकारणी लोकांनी कोळसा घोटाळा केला त्यामध्ये उद्योग क्षेत्रही सहभागी होतेच. पण कोळसा घोटाळा म्हटले की राजकारण्यांना शिव्याशाप खावे लागतात. त्या अर्थाने `चांगले लोक राजकारणात यावेत' या विधानाचा परामर्श घेतला पाहिजे. याचा अर्थ चांगले लोकही शोधलेच पाहिजेत. अरविंद केजरीवाल, योगींद्र यादव, किरण बेदी, मेधा पाटकर यांना चांगले लोक असे सामान्यत: म्हणता येईल. या लोकांनी राजकारणात आल्यानंतर त्या क्षेत्राचे जे काही झाले त्याच्या चिंध्या आज पाहायला मिळत आहेत. आणि त्याउलट या लोकांच्या वाटचालीतील एखादे पाऊल रस्त्यावरच्या शेणात पडले तरी त्यांना त्याच घाणीत बरबटलेले हे लोक आहेत असे ठरविले जात आहे. या पार्श्वभूमीवर हे चांगले लोक राजकारणात येऊन राजकारण सुधारेल असेही नाही आणि हे लोक चांगले राजकारण करतील असेही नाही.

मग राजकीय व्यवस्था चांगली व्हायला हवी, ती कशी? राजकारण हा समाजकारणाचाच एक भाग आहे. समाजावर राजकीय प्रभाव अटळ असतो. `राजा कालस्य कारणम्' हे खरेच आहे परंतु ज्या समाजावर तो प्रभाव पडतो तो समाजही संवदेनक्षम असला पाहिजे. आणि तो संवेदनक्षम आहे असे राजाला वाटले पाहिजे. आज सगळेचजण एकमेकांवर दूषणे देण्याची चढाओढ करीत आहेत. अर्थात जी व्यवस्था आपण स्वीकारली आहे त्यामध्ये या गोष्टी अटळच आहेत. त्यांना फार दोष देऊन चालणार नाही. आणि जगाच्या प्रारंभापासून जिथे समाजव्यवस्था सुचारू चालण्यासाठी राजकीय सत्ता आली असेल तिथपासून हा प्रश्न उद्भवलेलाच आहे. समाजातल्या दैनंदिन व्यवहारासाठी धर्म आणि जाती निर्माण झाल्या आणि त्याच व्यवस्थेसाठी त्यांचा विचार राजकारणातही होऊ लागला. जन्माधिष्ठित जात ही निषिद्ध मानलेली नव्हती, परंतु त्यावर उच्चनीचता ठरण्याशी सुतराम संबंध नव्हता. आजकाल राजकारण्यांची जातसुद्धा उच्चनीचता आणि अस्पृश्यता पाळते. गुणकर्मानुसार वर्णजात निर्माण होत असेल तर आजच्या गुणकर्मानुसार जाती तयार झालेल्याच आहेत. त्यात राजकारणी, शासकीय नोकर, साखरवाले, शिक्षणसम्राट असे वर्ण तयार झाले आहेत. आणि त्यांच्यात स्वार्थापुरते सामंजस्य आणि राजकारणापुरता संघर्ष अटळच आहे. त्यामुळे आधीच्या चिंतकांनी जातीअंताचा विचार मांडला तरी फारतर गेल्या शतकापर्यंत अस्तित्वात असलेल्या वर्णजातींची नावे बदलतील पण त्यामधील भेदभाव, ईर्ष्या, संघर्ष आणि उच्चनीचता हे बदलणे अशक्यच दिसते.

जवळ आलेल्या निवडणुकीसाठीच्या तिकीट वाटपामध्ये साधारण नजर फिरवली तरी प्रत्येक मतदारसंघाचा विचार जातीनिहाय केला जात असल्याचे दिसून येते. इतकेच नव्हे तर कोणत्या मतदारसंघात कोणत्या धर्माचे,जातीचे लोक जास्त आहेत याची आकडेवारी देऊन त्याआधारे कोणाला मते जास्त पडतील याचे विश्लेषण उघडउघड होत असते. वस्तुत: ही मांडणी निखालस जातीयवादी आहे. पण `मी वागतो ती समानता आणि दुसरा वागतो तो भेदाभेद' एवढ्याच एका तत्त्वाने आजकालचे समाजकारण व्यापले आहे. राजकीय क्षेत्र त्यात आघाडीवर आहे. इतर क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने आर्थिक विचार होत असल्यामुळे वर्णजातीस कदाचित गौणत्त्व दिसत असेल.


३५ वर्षपूर्ती अंकाविषयी....
वर्षपूर्ती अंक, मुखपृष्ठ चित्र अप्रतिम. आपली निवड आणि तो विषय छानच. ही भरारी आपल्या बाहूंना सहस्रबाहूंचे बळ देईल.
- मंगल फाटक, चिंचवड गाव, पुणे ३३

प्रगल्भ मनोगत
३५ वर्षपूर्ती अंक मुखपृष्ठाविषयी खुलासा व त्याखाली संपादकीय दोन ओळी फारच बोलक्या. इतकी आकर्षक कसरत तुम्हास करावी लागत असेलही, पण त्यांतून सर्वांना फार आनंद देत आहात, वाहवा मिळवत आहात. हे करण्यास खूप साधना केली असणारच. पायाच्या टोकावर हा तोल सांभाळूनही उत्फुल्ल भरारीसाठी हात पसरले आहेत. आणि उन्नत नजर अवकाशी वेध घेत आहे. पण ही अवस्था फार काळ स्थिर राहू शकत नाही, असे तर सुचवीत नाही ना? तसे झाले तरी अलगद दोन्ही पायांवर येऊन `आपले जग' चाहत्यांना विनम्र प्रणाम करेल. ही सारी प्रगल्भता आपण दीर्घ साधनेतून कमावली आहे. `त्या' चित्रातून तुम्हाला व्यक्त करण्याची सद्यस्थिती अशीच आहे ना? मला ते `मनोगत' फार फार आवडले.
- प्रा.रघुनाथ ना.देशपांडे,
`विरहिणी', मारणे प्लॉट, नांदेड

दिशा योग्य
अंकातील लिखाण व विचार प्रेरणा देणारे व उद्बोधक आहेत. विनिता तेलंग यांचा `पेरणीइतकी निगराणी महत्त्वाची' हा लेख आणि `एका जिद्दीची कहाणी' फार आवडले. मी पाच-सहा वर्षे हे अंक वाचतोय. त्यातील मजकूर व विचारांची दिशा फार चांगली असते.
- अनंत भा. भावे,
६२ अ, विद्याविहार कॉलनी, नागपूर २२

देवळेकरांविषयी थोडे
वैकुंठ सरदेसाई यांचा `अभिरुची घडवावी लागते' हा लेख मनस्वी भावला. साहित्यकलांची जाण-संस्कारांची खाण. अशा लेखांनी वाचकाची अभिरुची घडण्यासही मदत होते. कऱ्हाडच्या पं.रमाकांत देवळेकर यांच्या सत्काराबद्दल वाचले. ते व्यक्तिगत परिचयाचे असल्याने आम्ही `तात्या' म्हणतो. देशात आणि परदेशांतही त्यांनी नामवंत संगीत-सभांतून अप्रतिम तबला साथ केलेली आहे. अनेक बुजुर्गांकडून वाहवा मिळवली आहे. `सवाई गंधर्व' व आैंध संगीतोत्सवात ते असत. पं.काणेबुवा, कै.गणपतराव कवठेकर आणि तात्या या कलाकारांनी मोठे नाव केले. त्यांचा सत्कार कराडला झाला याचा आनंद. संपादकीय (नेहमीच) चांगले.
- बा.वि.गोडबोले,
घर नं.९५, गृहनिर्माण कॉलनी, पलूस

कलाकारास हॅटस् ऑफ
मुखपृष्ठावरील चित्र खूप भावले. दोन्ही हात निकामी असताना तोंडात ब्रश धरून ते चित्र साकारले. त्या कलाकाराचे खूप कौतुक व `हॅटस् ऑफ'. त्या कलाकारांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. त्या चित्राबद्दल आपण केलेली टिपणी जास्त भावली व पत्रकारितेतील कुशाग्रता जाणवली.
- डॉ.एस.बी.कुलकर्णी,
श्रीकला हॉस्पिटल, चांदणी चौक, सांगली
`आपले जग', ३५ वर्षपूर्ती अंक, त्यातील लेख व लेखन, विषय, यांबद्दल खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या. द्विरुक्ती टाळण्यासाठी केवळ नामोल्लेख करत आहे -
* महादेव साने, शास्त्रीनगर, कऱ्हाड
* बी. एन. जाधव, शाहूनगर परिते
* शरद भोंडे, कोरेगाव (सातारा)
* शरद शांताराम सहस्रबुद्धे
स्टेट बँक कॉलनी, सांगली
* अनिल स.आपटे, `गुरुमुख' कल्याण
* रजनी ठुसे, नारायणगाव (जुन्नर)
* गोविंद करमरकर
गुलमोहर कॉलनी, सांगली
* अशोक म. बोडस शनिवार पेठ, कऱ्हाड
* ग. दि. आपटे, `गुरुवैभव', पुणे ३८
* भूषण दात्ये, मणिनगर, अमदाबाद
* रजनी बावचकर, नया मोंढा, लातूर
* शिरीष देवणकर, उदगीर (उस्मानाबाद)
* राजन शिरसाट, कणकवली (सिंधुदुर्ग)
* अरुण गोडबोले, सातारा
* इंदुमती जोशी, चिपळूण
* सुभाष गोवेकर, गरड, सावंतवाडी
* वि. म. मराठे,  विश्रामबाग (सांगली)
* एन.ए.कुलकर्णी, जरगनगर, कोल्हापूर
`हे' संघर्ष अभिप्रेत नाहीत
आपल्या अंकातील विचार पटतात. `धर्मभास्कर' अंकात दादूमियाँ यांनी आपला उल्लेख केलेला वाचला. पंढरपूर विठ्ठलाची पूजा बडव्यांकडून काढून घेतली, हे योग्य झाले. भक्तांची संख्या कशी रोखणार? प्रत्येकाला डोके टेकायला दोन सेकंद मिळूनही भक्त संपत नाहीत. आंबेडकरांच्या अनुयायांनी हेच संघर्ष करीत राहावे असे त्यांनाही अभिप्रेत नव्हते. `तुझ्या पायीचा मी महार' असली लाचारी त्यांना आवडलीच नसती. `हनीमून कपल' घर्षण.. असले विनोद आपल्या अंकात येऊ नयेत. आपले अंक जपून ठेवणारे वाचक आहेत, हे वाचून नवल व आनंद वाटला.
- सतीश पटवर्धन, कागवाड (जि.अथणी)

माहिती उपलब्ध आहे का?
१९४४ साली अंदमानातील पोर्ट ब्लेअरजवळील होम्फ्रेगंज येथे जपानी राज्यकर्त्यांनी ४४ भारतीयांना गोळया घालून ठार मारले. त्यांचे एक स्मारक त्या गावात उभे केलेले आहे. त्यावर हुतात्म्यांची नावेही आहेत. त्यात एकमेव मराठी व्यक्ती आढळली ती म्हणजे एच.एच.रहाळकर! त्यांच्याबद्दल आणखी काही माहिती उपलब्ध आहे का? अशी माहिती उपलब्ध होऊ शकेल का? हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
- श्रीनिवास केळकर, ३+४, मंजुषा, ए गुलमोहर पथ, पुणे ०४
मोबा.९८५०९०२०६०

मधुकर श्रीधर उर्फ म. श्री. दीक्षित
महाराष्ट्न् साहित्य परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पुण्याचा चालता-बोलता इतिहास असलेले लेखक-संपादक मधुकर श्रीधर उर्फ म.श्री.दीक्षित यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे वय ८९  होते. त्यांच्या पश्चात पुत्र डॉ.राजा दीक्षित, सून मीनल, कन्या, नातवंडे इ. परिवार आहे.
संस्थांच्या जडणघडणीत, वाटचालीत त्यांनी मोलाचा सहभाग दिला. वसंत व्याख्यानमाला, पुणे नगर वाचन मंदिर, पुणे सार्वजनिक सभा, थोरले बाजीराव पुतळा समिती, पुणे ऐतिहासिक वास्तू स्मृती समिती, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, महाराष्ट्न् ग्रंथोत्तेजक संस्था, भारत इतिहास संशोधक मंडळ, महाराष्ट्न् चित्पावन संस्था, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, श्रीसमर्थ रामदास अध्यासन या संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली.
`आपले जग'विषयी त्यांना आस्था होती. त्यांच्या भेटींतून होणाऱ्या सहज संवादात सदैव आशादायक सूर असे.
` समर्थ रामदास हे राष्ट्न्संत होते व शक्तीचे उपासक होते असे मला वाटते. त्यांच्या श्लोक वाङ्मयातून एखादी ओवी निवडून त्यांना ब्राह्मणवादी म्हणणे हे केवळ अज्ञानमूलकच नव्हे तर नव्याने ब्राह्मणद्वेष पसरविण्याचा जात्यांधांचा यत्न असतो. संभाजीस केलेल्या उपदेशपत्रातील शिवरायांचा गौरव काय दर्शवितो? माझ्या मते हे पत्र म्हणजे एका समकालीन संताने लिहिलेले शिवरायांचे पहिले अल्पाक्षरी चरित्र आहे. आणि तरीही समर्थांची निंदानालस्ती! अशांना तुकोबांच्या शब्दांत `तुका म्हणे ऐशा नरां ।' हेच खरे तर योग्य उत्तर. काही वृत्तपत्रे जातिवाद उकरू पाहणाऱ्या विचारवंतांचे (?) लेखन छापतात हे मला संखेदाश्चर्य वाटते.पुष्कळ लिहिण्यासारखे आहे पण सांप्रत बौद्धिक क्षेत्रातही मनगटशाही सुरू असल्याने आटोपते घेतो.

प्रा. पी. बी. पाटील
दशसहस्रेषु वक्तृत्त्व असलेले प्राचार्य पी.बी.पाटील निवर्तले. विनोबांच्या भूदान चळवळीत भाग घेतलेला हा कार्यकर्ता, अभ्यास-अनुभव-आणि काम यांच्यातून विचारवंत झाला. तसे ते काँग्रेसवाले होते, पण आजच्या पक्षपद्धती व नेतेगिरीवर सडकून टीका करत. लोकशाही, पंचायती राज्य, ग्रामविकास यांवर त्यांचे प्रभुुत्त्व होते. त्यांच्या मतांबद्दल पुष्कळांचे आक्षेप ऐकू येत. पण देशकार्याच्या प्रयत्नांचे व स्वच्छ स्पष्ट विचारांचे ते चाहते असत. रा.स्व.संघाच्या मेघालय वसतिगृहात राहणाऱ्या पूर्वांचलातील मुलांना त्यांच्या `शांतिनिकेतन'मध्ये नि:शुल्क प्रवेश व शिक्षण असे. तर इस्लामपूर येथील ब्राह्मण महाअधिवेशनाचे अध्यक्ष कै.रा.गो.प्रभुणे यांना स्नेहपूर्वक भेटून त्यांनी घसघशीत देणगीचा चेक दिला होता. हे पुष्कळांस नवलाचे होते; पण पी.बी.सरांचा व्यासंग ज्यांना जवळून परिचित होता, त्यांना यातील उदारमतवाद ठाऊक असे. उत्तरायुष्यात कर्करोगासारख्या व्याधीमुळे ते त्रस्त असले तरी पूर्ण धीराने ते वावरत होते, मिष्कीलपणी बोलत होते. खरा विचारवंत काळाआड गेला.
----------------------------------------------
प्रा.पी.बी.पाटील यांचे ४ मार्च १९८१ चे पत्र, त्यांच्याच सूचनेवरून आजवर त्यांचे नाव प्रसिद्ध केले नव्हते. पण `आपले जग' विषयी त्यांचा जिव्हाळा दिसून यावा म्हणून ते आता प्रसिद्ध करावेसे वाटते.
` आपला १०० वा अंक याच आठवड्यात प्रसिद्ध होत आहे. आपल्या जिद्दीच्या प्रयत्नांबद्दल व यशस्वी वाटचालीबद्दल मनापासून अभिनंदन.
यानिमित्ताने अल्पशी देणगी म्हणून रु.३००/- चा चेक पाठवीत आहे. ही देणगी आम्ही पैशाने श्रीमंत आहोत म्हणून पाठवत नाही तर आपल्या जिद्दीच्या प्रयत्नाला शुभेच्छा म्हणून, माजी आमदार म्हणून मिळणारे एक महिन्याचे निवृत्तीवेतन पाठवत आहे.'
----------------------------------------------
`आपले जग'च्या प्रांगणात कै.लक्ष्मणराव किर्लोस्कर अंकाचे प्रकाशन झाले, त्यावेळी प्राचार्य पी.बी.पाटील

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन