Skip to main content

Posts

Showing posts from February, 2018

ADVT Letter

४० व्या वर्षात पदार्पण लेखन आणि जाहिरात साहाय्य यासाठी आवाहन

26 Feb.2018

वास्तुप्रेरणा जपायला हव्यात मी नुकताच अुत्तर भारतात प्रवासाला गेलो होतो. त्या भागात मुगल सल्तनत दीर्घ काळपर्यंत होती. त्या काळातील, प्रसिध्द स्थळे आज अैतिहासिक ठरली आहेत. `पुरातत्व विभागा'च्या वतीने त्यांची देखभाल होत असते. काही ठिकाणी स्थानिक संस्था व सरकारेेही त्यासाठी प्रयत्न करतात. लोकांच्यात  त्या त्या व्यक्ती स्थाने आणि तो आितिहास यांविषयी जागरूकता टिकविण्याचे कार्य त्यायोगे होत राहते. मी १९६६ मध्ये पोटासाठी पुणे येथे आलो. तिथे थोडा स्थिर झाल्यानंतर मोठ्या अभिमानाने व अुत्सुकतेने, अुत्साहाच्या भरात, भक्तीनेही म्हणा; -पुण्याचा प्रसिध्द शनवार वाडा पाहायला गेलो होतेा. तो पार पडीक मोडकळलेला होता. मला खूप वाआीट वाटले, भरून आले. सरकारचे अेक सोडा, -पण सामाजिक अनास्थाही आितक्या थराला खाली गेली असेल असे वाटले नव्हते. असो. पेशवाआीतही महापराक्रमी बाजीरावाच्या वाट्याला तशी अनास्था आली होतीच. बाजीरावांच्या पराक्रमाचा अभिमान व आदर असण्याअैवजी त्यांचे अभक्ष्यभक्षण वा मस्तानीकथा यांचा बभ्रा जास्त केला गेला जात होता. पुण्यातल्या ब्राह्मणांनीही म्हणे त्याकाळी शनवार वाड्यावर बहिष्कार घात

19 Feb.2018

कमल हासन हास्यास्पद का ठरला? तामिळनाडू हे दक्षिण भारतातील एक द्रमुकचे महत्वाचे राज्य. पण मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकीय वर्तुळात एक अभूतपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असलेले ज्येष्ठ नेते करुणानिधी हे आपल्या घरातील कलहामुळे हतबल झाले आहेत. त्यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष एम.के.स्टॅलिन हे अधूनमधून हिंदू मंदिरांना भक्तिभावाने भेटी देत आहेत. डीएमके हा हिंदू भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, असा संकेत देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांची स्टॅलिन यांच्या उपस्थितीत  सदिच्छा भेट घेतली. सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई.पलानीस्वामी यांच्यातील दुरावा वाढत चालला आहे. पलानीस्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली जवळीक लपून राहिलेली नाही. एकूणच भारतीय जनता पक्ष २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करीत आहे. या वेळी तामिळनाडूत काँग्रेस कुठेही स्पर्धेत दिसत नाही. या पार्श्वभूमीवर
`सिरीभूवलय' - अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ भारताच्या ज्ञानभंडारात इतक्या गोष्टी लपलेल्या आहेत की, मन अक्षरश: थक्क होतं..! त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता का नाही? कुठं गेलं हे ज्ञान..? हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात..! याच श्रेणीतला अद्भुत ग्रंथ आहे -`सिरीभूवलय' किंवा श्री भूवलय. जैन मुनी आचार्य कुमुदेंदू यांनी रचलेला. राष्ट्न्कूटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्षं होती आणि सम्राट अमोघवर्षनृपतुंग (प्रथम) हे जेव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४०च्या काळात केव्हातरी लिहिला गेलेला..! मात्र मागील हजार वर्षे हा गं्रथ  गायब होता. कुठेकुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र लुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही एक मजेदार गोष्ट आहे. राष्ट्न्कूटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रज्ञात केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक धरणेंद्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर-तुमकूर रेल्वे मार