Skip to main content
`सिरीभूवलय' - अद्भुत आणि चमत्कारिक ग्रंथ
भारताच्या ज्ञानभंडारात इतक्या गोष्टी लपलेल्या आहेत की, मन अक्षरश: थक्क होतं..! त्या काळात हे असलं भारी ज्ञानभांडार आपल्या जवळ होतं, मग आता का नाही? कुठं गेलं हे ज्ञान..? हे प्रश्न आपल्याला सतावत राहतात..!
याच श्रेणीतला अद्भुत ग्रंथ आहे -`सिरीभूवलय' किंवा श्री भूवलय. जैन मुनी आचार्य कुमुदेंदू यांनी रचलेला. राष्ट्न्कूटांचं शासन होतं, मुस्लिम आक्रमक यायला बरीच वर्षं होती आणि सम्राट अमोघवर्षनृपतुंग (प्रथम) हे जेव्हा राज्य करत होते, त्या काळातला हा ग्रंथ. अर्थातच सन ८२० ते ८४०च्या काळात केव्हातरी लिहिला गेलेला..! मात्र मागील हजार वर्षे हा गं्रथ  गायब होता. कुठेकुठे याचा उल्लेख यायचा. पण ग्रंथ मात्र लुप्तावस्थेतच होता. हा ग्रंथ मिळाला कसा, याचीही एक मजेदार गोष्ट आहे.
राष्ट्न्कूटांच्या काळात कोण्या मल्लीकब्बेजी या बाईने या ग्रंथाची एक प्रत नकलून घेतली आणि आपले गुरु माघनंदिनीजी यांना शास्त्रज्ञात केली. या ग्रंथाची प्रत, हस्ते परहस्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक धरणेंद्र पंडितांच्या घरी पोहोचली. हे धरणेन्द्र पंडित, बंगळूर-तुमकूर रेल्वे मार्गावरील दोड्डबल्ले नावाच्या लहानशा गावात राहायचे. या ग्रंथाबद्दल त्यांना फारशी माहिती नसली, तरी याचं महत्व ते जाणून होते. म्हणूनच आपले मित्र, चंदा पंडितांबरोबर ते `सिरीभूवलय' या ग्रंथावर कन्नड भाषेत व्याख्यानं द्यायचे.
या व्याख्यानांमुळे, बंगळूरच्या `येलप्पा शास्त्री' या तरुण आयुर्वेदाचार्याला, हा ग्रंथ धरणेन्द्र शास्त्रींकडे आहे हे समजले. या ग्रंथासंबंधी येलप्पा शास्त्रींनी बरेच काही ऐकले होते; तेव्हा हा ग्रंथ मिळवायचाच, हा निश्चय होता. काहीही करून या ग्रंथाचे हस्तलिखित मिळविण्यासाठी येलप्पा शास्त्रींनी, दोड्डाबेलाला जाऊन धरणेन्द्र शास्त्रींच्या पुतणीशी विवाह केला.
पुढे १९१३ मध्ये धरणेन्द्र शास्त्रींचे निधन झाले. पूर्ण वेळ विद्याभ्यासात दिल्याने त्यांच्या घराची आर्थिक स्थिती खराब होती. म्हणून त्यांच्या मुलाने, धरणेन्द्र शास्त्रींच्या काही वस्तू विकावयास काढल्या. त्यात `सिरीभूवलय' हा ग्रंथही होता. अर्थातच आनंदाने येलप्पा शास्त्रींनी हा ग्रंथ विकत घेतला. त्यासाठी त्यांना बायकोचे दागिने विकावे लागले. मात्र ग्रंथ हातात आल्यावरही शास्त्रींना त्याची उकल करता येत नव्हती. १२७० पानांच्या या हस्तलिखित ग्रंथात सारेच अगम्य होते. पुढे १९७२ला प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी करमंगलम श्रीकंठय्याजी बंगळुरात आले. त्यांच्या मदतीने या ग्रंथाची कवाडं काहीशी किलकिली झाली.
या हस्तलिखितातील माहितीच्या आधारे प्रयत्न करत करत, त्यातील सांकेतिक माहितीची फोड करायला तब्बल ४० वर्षे लागली. १९५३ मध्ये कन्नड साहित्य परिषदेनं या ग्रंथाचं पहिल्यांदा प्रकाशन केलं. ग्रंथाचे संपादक होते -येलप्पा शास्त्री, करमंगलम श्रीकंठय्या आणि अनंत सुब्बाराव. यातील अनंत सुब्बाराव हे तंत्रज्ञ होते. त्यांनीच पहिला कन्नड टाईपरायटर तयार केला होता.
हा ग्रंथ इतर ग्रंथांसारखा एखाद्या लिपीत नाही. तर हा अंकांमध्ये लिहिलेला आहे. हे अंकही १ ते ६४ मधील आहेत. हे अंक किंवा आकडे विशिष्ट पद्धतीने वाचले की एखाद्या विशिष्ट भाषेत, विशिष्ट ग्रंथ वाचता येतो. ग्रंथ- कर्त्याच्या, अर्थात मुनी कुमुदेन्दूंच्या मते हा ग्रंथ १८ लिप्या आणि ७१८ भाषांमध्ये वाचता येतो.
हा ग्रंथ म्हणजे अक्षरश: विश्वकोश आहे. या ग्रंथात अनेक ग्रंथ दडलेले आहेत. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, अनेक जैन ग्रंथ या एका ग्रंथात सामावलेले आहेत. गणित, खगोलशास्त्र, रसायनशास्त्र, इतिहास, वैद्यक, तत्वज्ञान यांसारख्या अनेक विषयांवरील ग्रंथही या एकाच ग्रंथात वाचता येतात.
या ग्रंथाची १६ हजार पाने होती असा ग्रंथातच कुठे-तरी उल्लेख आहे. त्यातील फक्त १२७० पानेच सध्या उपलब्ध आहेत. एकूण ५६ अध्याय असलेल्या या ग्रंथाच्या फक्त तीन अध्यायांचीच उकल करणे सध्या शक्य झाले आहे. १८ लिप्या आणि ७१८ भाषांपैकी सध्या कन्नड, तामिळ, तेलुगु, संस्कृत, मराठी, प्राकृत इत्यादी भाषांमधूनच हा ग्रंथ  वाचता येतो. एखाद्या संगणकीय विश्वकोशासारखे या ग्रंथाचे स्वरूप आहे. या ग्रंथाची संपूर्ण संहिता जेव्हा उलगडली जाईल, तेव्हा त्याची प्रमुख वैशिष्ट्ये स्पष्ट होऊ शकतील.
कुमुदेंदू मुनींनी फक्त ६४ पर्यंतच आकडे का घेतले..? तर ६४ हे ध्वनींचे संकेत आहेत, ज्यात ऱ्हस्व, दीर्घ आणि लुप्त मिळून २५ स्वर, क,च,न,प सारखे २५ वर्गीय वर्ण, य,र,ल,व सारखे अवर्गीय व्यंजन इत्यादी मिळून ६४ ही संख्या होते.
या संख्यांना २७ु२७ च्या चौकोनांमध्ये मांडले जाते. आता हे जे ७२९ अंक चौकोनांमध्ये येतात, त्यांना ग्रंथात दिलेल्या निर्देशांनुसार खालून-वर, वरून-खाली, उभे-आडवे वगैरे करून लिहिले आणि त्यांना त्या भाषेच्या वर्ण क्रमानुसार मांडले (उदा-४ हा अंक असेल तर मराठीतील वर्ण घ येईल. क,ख,ग,घ...प्रमाणे), तर छंदोबद्ध काव्य अथवा धर्म, दर्शन, कला...वगैरे प्रकारचा ग्रंथ तयार होतो..! सारंच अतर्क्य..!!
या ग्रंथाचं प्रत्येक पान म्हणजे २७ु२७ असा ७२९ अंकांचा भला मोठा चौकोन आहे. या चौकोनाला चक्र म्हणतात. अशी चक्र १२७० सध्या उपलब्ध आहेत. या चक्रांमध्ये ५६ अध्याय आहेत आणि एकूण श्लोकांची संख्या सहा लाखांच्या वर आहे. या ग्रंथाचे एकूण ९ खंड आहेत. उपलब्ध असलेले १२७० चक्र हे पहिल्या खंडातीलच आहेत, ज्याचं नाव आहे `मंगलाप्रभृता'. एक प्रकारे हा खंड म्हणजे इतर ८ खंडांची फक्त ओळख आहे. अंकांच्या स्वरूपात यात १४ लाख अक्षरं आहेत. यातून ६ लाख श्लोक तयार होतात.
या प्रत्येक चक्रात काही `बंध' आहेत. बंध म्हणजे अंकांना वाचण्याची पद्धत किंवा एका चक्राच्या आत अंक मांडण्याची पद्धत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर `बंध' म्हणजे तो श्लोक, किंवा तो ग्रंथ वाचण्याची किल्ली (किंवा पासवर्ड) आहे. या बंधामुळे आपल्याला त्या चक्रातील ७२९ अंकामधला पॅटर्न कळतो आणि मग त्या त्या भाषेप्रमाणे तो ग्रंथ उलगडू लागतो. या बंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे चक्र-बंध, नवमांक-बंध, विमलांक बंध, हंस-बंध, सारस बंध, श्रेणी-बंध, मयूर-बंध, चित्र-बंध इत्यादी.
गेल्या अनेक वर्षापासून या भूवलय ग्रंथाला `डी-कोड' करण्याचे काम चालू आहे. अनेक जैन संस्थांनी हा ग्रंथ, प्रकल्प म्हणून स्वीकारला आहे. इंदूरला जैन साहित्याच्या संशोधनाचं `कुन्दकुंद ज्ञानपीठ' उभं राहिलंय, जिथे डॉ.महेंद्र कुमार जैन यांनी या विषयावर बरेच काम केले आहे. आय.टी. क्षेत्रातल्या काही जैन तरुणांनी या विषयावरील वेबसाईट तर चालू केलीच आहे, पण संगणकाची मदत घेऊन या ग्रंथाला `डी-कोड' करण्याचं काम केलं जातंय. अगदी लहान प्रमाणात त्याला यशही आलंय.
मात्र तरीही... जगभरातले अनेक जैन विद्वान या ग्रंथावर काम करत असताना, प्रगत संगणक प्रणालीचे अल्गोरिदम वापरूनही.... या ग्रंथाची उकल झालेली नाही..! ५६ पैकी फक्त तीनच अध्याय `डी-कोड' होऊ शकले आहेत.
मग हजार-बाराशे वर्षांपूर्वी आजच्यासारखी कसलीही साधनं हाताशी नसताना, मुनी कुमदेन्दूनी इतका क्लिष्ट ग्रंथ कसा रचला असेल..? बरं, मुनिवर्य कन्नड भाषिक होते. मग त्यांना इतर भाषांचे असे अवजड अल्गोरिदम्स तयार करणं कसं जमलं असेल..? आणि मुळात इतकी कुशाग्र आणि अफाट बुद्धिमत्ता त्यांच्याजवळ कुठून आली असेल..?
`इंडोलॉजी'च्या क्षेत्रातलं, भारतातलं आदरानं घेतलं जाणारं नाव आहे, श्री.एस. श्रीकांत शास्त्रींचं (१९०४-१९७४). त्यांनी `भूवलय' या ग्रंथाबद्दल लिहून ठेवलंय -`हा ग्रंथ कन्नड भाषा, कन्नड साहित्य, तसेच संस्कृत, प्राकृत, तामिळ, तेलगु साहित्याच्या अभ्यासासाठी हा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे. भौतिक-शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवन विज्ञानाच्या विकासाच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. तसेच तो शिल्पे आणि प्रतिमा, प्रतीके यांच्या अभ्यासासाठीदेखील उपयुक्त आहे. यातील रामायण, महाभारत, भागवत, गीता, ऋग्वेद आणि इतर ग्रंथाची फोड करता आली तर त्यांची आणि सध्या उपलब्ध असलेल्या ग्रंथांची तुलना अभ्यासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरेल. नष्ट झालेले अनेक जैन ग्रंथ सिरीभूवलयमध्ये सापडू शकतात.'
या ग्रंथाची माहिती जेव्हा आपले पहिले राष्ट्न्पती डॉ.राजेन्द्र प्रसाद यांना मिळाली, तेव्हा त्यांचे उत्स्फूर्त उद्गार होते -`श्री भूवलय ग्रंथ म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे..!'
जगाच्या पाठीवर कुठेही असा `एकात अनेक ग्रंथ' असलेला, कूटपद्धतीनं लिहिलेला विश्वकोश आढळत नाही. आपलं दुर्दैव इतकंच की भारतीय ज्ञानाचा हा अमोल खजिना आपल्याला तरी कुठे माहीत होता?
-प्रशांत पोळ, जबलपूर(म.प्र)   फोन-०९४२५१५५५५१
(`एकता'मध्ये पूर्वप्रकाशित)

 संपादकीय
न्यायाधीश सामान्य होऊ नयेत
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांबद्दलच्या तक्रारी जाहीरपणे मांडण्यासाठी प्रसारमाध्यमांचे व्यासपीठ वापरले ही मोठी मौजेचीच बाब घडली. त्यात गंभीर असे काही म्हणवत नाही, त्यांतून काही पेच अुद्भवेल असेही नाही, आणि त्यांचा प्रश्न माध्यमांच्या माध्यमातून सुटेल असे तर मुळीच नाही. तरीही सर्वोच्च मानलेल्या या स्तराच्या मंडळींंनी असला गावगन्ना बभ्रा करण्यात काय शोभा होती हे त्यांचे त्यांना ठाअूक. आजकाल प्रसारमाध्यमांचा हाही अेक दुरुपयोगच होतो म्हणायचे. अचानक ढगफुटी किंवा भूकंप झाल्यावर टीव्ही ची माणसे तिथे पोचतात; तोपर्यंत स्वत:चे झालेले नुकसान विसरून ते संकटग्रस्त, टीव्ही समोर काय सांगायचे याची तयारी करूनच बसलेले असतात. `सरकारने आमच्याकडं अजून लक्ष दिलेलं नाही, मदत पोचलेली नाही, आम्हाला भरपाआी मिळाली पाहिजे...' ही त्यांची गाणी-रडगाणी-मागणी सुरू होते. त्यांना तेच शिकायला मिळाले आहे. त्यांचा प्रश्न असल्या टीव्हीखोर वागण्यातून सुटत नसतो, तरीही या न्यायमूर्तींनी तोच मार्ग पकडावा हे जरा जास्तच झाले.

न्यायमूर्तींना जर त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटत असेल तर, ते सगळेजण आम्हा सामान्य नागरिकांवर होणारा अन्याय कसा दूर करणार असा प्रश्न येतो. त्यांची निवड नियुक्ती झालीच आहे, आणि त्यंानी ती स्वीकारली आहे म्हटल्यावर त्या पदाची काही मर्यादा, काही संकेत त्यांनी पाळायला हवे होते. त्यांची नियुक्ती ज्यांनी केली त्यांच्याकडे त्यांनी हा विषय काढायचा, त्यात सुधारणा करू पाहायचे. ते सारे प्रयत्न समजा करून झाले तरीही प्रश्न सुटत नसेल तर मुकाट सहन करायचे, किंवा राजीनामा देअून - तोही वाच्यता न करता, मुकाटपणी - मोकळे व्हायचे. त्यात शान राहिली असती, मान राहिला असता, आणि मुख्य म्हणजे आम्हा सामान्यांच्या मनांतील प्रतिमांना धक्का लागला नसता; तो विश्वास टिकणे फार महत्वाचे असते. अेरवी प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यावर अन्यायच झाला आहे असे आयुष्यभर वाटतच असते; आणि न्यायाधीशही शेवटी माणसे आहेत अेवढेच म्हणून अुगा राहावे लागते. पण तो काही न्याय नव्हे!

विरोधी पक्षातील काही आक्रस्ताळी पुढारी मंडळी सरकारकडून कायम अन्याय चालू असल्याचे किंचाळत असतात. नोकरीतही आपल्या पात्रतेपेक्षा पद आणि पैसा फारच कमी असल्याची नोकरदारांची भावना असते. शेतकऱ्यांना, डॉक्टरांना, मास्तरांना आणि माथाडींना - आितकेच नाही तर मुस्लीम-दलित-अुच्चवर्णी  या साऱ्याच जाती समाजांना आपल्या हक्कांवर गदा येत राहिल्याचे भास सतत होत असतात. तो अन्याय कधीच दूर होत नसतो, परंतु त्यासाठीचा आक्रोश करण्यासाठी प्रसारमाध्यमांना काम द्यावे लागते. सामाजिक संघटना जरी समानतेसाठी झगडत असल्याचा दावा करीत असल्या तरी आपल्या संघटनात्मक रचनेत त्यांना समानता चालत नाही; तर आपल्याला मोठे पद आणि अधिकार मिळायला हवेत असे वाटत असते. ते मिळत नसले तर संघटना बदलण्याचा प्रयोग होतो. तिथेही आपल्या पात्रतेचे वाटणारे, ते मिळायला वेळ लागला तर `आपल्या संयमाचा अंत पाहू नये' अशा धमक्याही द्याव्या लागतात.

हे सारे आपणा पामर सामान्यांच्या बाबत ठीक म्हणू, पण त्यांविरोधात ज्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडावे त्यांचेच गाऱ्हाणे ऐकावे लागले. दोन पक्षकारांना आपल्यावर अन्याय होतो असे वाटते तेव्हाच ते न्याय मागायला न्यायाधीशाकडे जातात. कोणताही निर्णय झाला तरी तो अेका पक्षावरती अन्यायच असतो. तथापि त्यासाठी तक्रारी मांडण्याची प्रसारमाध्यमे ही जागा नसते. निवडणुकीत मतदारांनी दूर ढकलून दिल्यावर मतदान यंत्रांवर दोषारोप करण्यासाठी पत्रकारांना गाठणे ही आपल्यासारख्या सामान्यांची बिनडोक रीत झाली; न्यायाधीशांनी ती का आचरावी?

माणसांचे व्यवहार अुत्तम, आणि मानवी संबंधांच्या समन्वयाचे असले पाहिजेत. ज्या माणसाच्या विरोधी निकाल लागतो त्याचेही समाधान होणे ही आदर्श मानवी सत्वर्तनाची अेक गरज आहे. पण तसे व्यवहारात होत नाही. साक्षात् देवसुद्धा आपल्यावर अन्यायच करतो, अशीही आपल्यासारख्यांची तक्रार असते. पण तिथेही समन्वयासाठी देवत्वाची आळवणी करावी लागते, तरच जे वाट्यास आले त्या अन्यायाचे परिमार्जन झाल्यासारखे वाटते. - म्हणजे बदल काहीच होत नाही, पण जे वाट्याला येआील ते सहन करण्यासाठी मनाचा समजूतदारपणा आणि व्यवहाराचा विवेक अंगी येतो.

न्यायमूर्तींच्या त्या वागण्यावरून बरीच चर्चा वाद झडल्यावर `तो प्रश्न संपला असून ते चहाच्या पेल्यातील वादळ होते' असे काही अधिकारी व्यक्तींनी म्हटले. -म्हणजे तो प्रश्न मुळातच फार मोठा नव्हता; किंवा तो चुकीच्या ठिकाणी मांडला गेल्याचे लक्षात येअून तातडीने दडपला गेला. तसे दोन्ही नसेल तर मग तो प्रश्न वृत्तपत्रांकडे मांडल्यावर चुटकीसरशी सुटला असे तरी म्हणावे लागेल. हल्ली प्रसारमाध्यमे तर आपण वाचा फोडल्याचा `आिफेक्ट' म्हणून अेखादा गहन प्रश्नही लगेच मार्गी लागल्याची प्रैाढी मिरवत असतातच. पण तसा त्यांच्यापुढे आलेला प्रश्न साक्षात सर्वेाच्च न्यायमूर्तींचा असला तरीही तो अेवढ्या झटपट सुटू शकतो असे म्हणणे अंमळ जास्तच होेआील! अेकूणात हे प्रकरण प्रकट झाल्यावर आंतरराष्ट्नीय स्तरावर खळबळ वगैरे अुडाल्याचे म्हटले गेले, आणि क्षणकालातच ते पेल्यातील वादळही ठरविले गेले! यावरून आपल्या सामाजिक जीवनात न्यायाबाबतही पोच किती आहे हे समजून येते.

मुळातच तसा पोच आपल्याकडे कमी होत चालला असून, हल्ली तर कोणत्याही बाबतीत समन्वय, संवाद, सामोपचार, सहानुभूूती  यांच्यापेक्षा  आक्रोश, अुतावीळ, अुथळपणा यांचा प्रभाव वाढत असल्याचे दिसत आहे. विकसित मानवी पध्दतींसाठी सुसंवादाची फार गरज असते, तीही निकड समाजशास्त्र्यांना जाणवत  आहे.. कुटुंब असो, राजकीय पक्ष असो, सामाजिक संघटना असो किंवा न्यायक्षेत्रही असो माणसे अेकमेकाशी सहजसाध्य संवाद साधू शकत नाहीत, ती  केवळ रस्त्यावर जाअून शंख करण्याचेच शिकली आहेत. प्रसारमाध्यमांना तर विस्कळीतपणाचे, अुध्वस्तपणाचे वृत्तांत देण्यात धंदा मिळतो. शिळोप्याच्या वेळी  घरगुती वातावरणातसुध्दा सासू सून किंवा दोन प्रियकरांतील खुन्नस पाहण्यात आपल्याला रंजकता वाटू लागली आहे. न्यायमूर्तींनी त्यांच्या समकक्ष कायदेपंडितांशी किंवा राष्ट्न्पतींशी काही चर्चा केली असेल हे संभवत नाही. ती करूनही न्याय मिळाला नसेल तर तो न्याय प्रसारमाध्यमे किंवा जनता देणार होती काय? हे सर्वोच्च न्यायमूर्तीही जेव्हा काही निर्णय देतात तो तरी अेका पक्षकारास निरुपाय करणाराच असतो; पण त्याविरुध्द जर तो पक्षकार प्रसारमाध्यमांकडे जाअून तक्रार करू लागला तर न्यायमूर्तींना बेअदबी वाटून ती शिक्षेला पात्र ठरेल. त्यांनी तो मार्ग चालतांना ते सारे लक्षात घेणे किती आवश्यक होते!!

हे सारे प्रकरण त्यांनीच म्हटले म्हणून संपले म्हणायचे; पण आपल्यासारख्या सामान्यजना-मनांंतील न्यायासनाची प्रतिमा तडकली ती सांधता येणार नाही. न्यायव्यवस्था ज्या अेका सामंजस्याच्या विश्वासाच्या श्रद्धेच्या पायावर अुभी असायला हवी, तिथल्या माणसांचे पायही मातीचेच आहेत हे मान्य करणे कठीण होते. ज्यांचा त्राता देव असतो, त्या देवाचीच चोरी झाली तर माणसे दिङ्मूढ होतात, तसेच काहीसे झाले. अेरवी आजची पुष्कळ प्रसारमाध्यमे कुणाला तरी मोठे करण्यासाठी त्यांना चिखलाचे कुल्ले चिकटविण्यास सज्ज आहेत. तो चिखल वाळून गेल्यावर हसे होते. न्यायासनाबाबत तसे घडू नये अशी काळजी सर्वांनीच  घ्यायला हवी, तरच समाज म्हणून आपण टिकून राहू.

खटाटोपांची घाई नको
सध्य ा राजकीय क्षेत्रात खूप खळबळ चालली आहे, कारण पुढच्याच वर्षी लोकसभेच्या निवडणुका आहेत.आरोप-प्रत्यारोप आणि आंदोलने अडवणूक यांमुळे प्रगती व विकासाला खीळ बसते. जनतेने त्याकडे केवळ हताशपणे पाहात बसावे का? तेही पाहावत नाही, अस्वस्थ होते.

आपल्याकडून अेक करता येआील. आपण आपल्याकडून अेका सामाजिक कामाला मदत करावी. समाजाला तीन शक्ती तीन दिशांना खेचत आहेत. अेक हिंदुत्ववादी, दुसरे अल्पसंख्य म्हणविणारे, आणि तिसरे समन्वयवादी - त्यात साऱ्या पक्षांचे धर्मांचे लोक आहेत.वि हिं प ने फक्त खऱ्या हिंदू धर्माचा प्रचार जगभरात करायला हवा, देशाच्या राजकारणात त्यांनी भाग घेअू नये. आितिहासातील चुका सुधारण्याचा खटाटोप आजच्या घडीला तरी करू नये. त्यामुळेही सामाजिक ताणतणाव कमी होतील. चांगली सत्ता मिळालेल्या भा ज प ने या धोरणाने फक्त विकासाच्या दिशेनेच काम करून आितर बाबतीत त्या त्या संघटनांना रोखले  पाहिजे. तसे केेले तर आितर पक्षही चढाओढीने प्रगतीचेच काम करतील, त्यांना ते करावेच लागेल. त्यामुळे निम्मे तरी मतदार ज्या पक्षाने चांगले काम केले असेल त्यालाच मत देतील. भ्रष्टाचार बराचसा कमी होआील. अधिकारी साथ देतील. भाजप ला चांगली सत्ता मिळाली म्हणून त्या परिवारातल्या लोकांनी आपापले कार्यक्रम जोराला लावल्याचे दिसते, त्यामुळे विरोधकांना अकारण निमित्त मिळते आहे. समन्वयवादी लोकही त्यांच्या विरोधात जात आहेत. काही काळ तरी केवळ प्रगती व विकासाचा ध्यास घेअून बाकीचा अजेंडा दूर ठेवावा.
-सतीश पटवर्धन,कागवाड (जि बेळगाव) फोन-०८३३९२६४७०५


भडकविण्यापेक्षा जरा चिंतन करावे
विविध समाजगटांना भडकविण्यासाठी सारे नेते प्रयत्न करीत आहेत. आपले नेतृत्व आंदोलनाच्या नावाखाली साऱ्या समाजावर लादण्याचा त्यांचा  अुद्योग आहे. त्यांना देशाची खरीच काही काळजी असेल तर त्या साऱ्याच नेत्यांनी पंधरा दिवसांचे अेक शिबिर आयोजित करावे. त्या साऱ्यांनी अेकत्र राहावे. साऱ्या परिस्थितीची जाण करून घ्यावी. समाजात कटुता निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी शपथ घेअून मार्ग ठरवावा. अेकमत होआीपर्यंत चर्चा करावी. अेकमेकांस समजून घ्यावे. गैरसमज दूर करावेत.अर्थाचे अनर्थ करण्याचे टाळावे. आम्ही सारेजण भारताच्या कल्याणासाठी अुत्थानासाठी कटिबद्ध आहोत हे लोकांना दाखवून द्यावे. पंधरा दिवस अेकत्र राहण्यानेे त्यांच्यातील दुरावा नाहीसा होअू शकेल.
तशीच गुणवत्तापूर्ण कामांसाठी शपथ घ्यायला हवी. मी आिंजिनियरिंग कॉलेजात दीर्घ काळ शिकविले. माझे बरेच विद्यार्थी मोठ्या पदांवर काम करीत, ते कधीमधी भेटायला येतात. त्यांतील काहीनी  प्रामाणिकपणे अेक अुपाय सुचविला की, रस्ता तयार करण्याचे काम देताना त्या कंत्राटामध्ये काही अटी घातलेल्या असतात. त्यात अेकाची भर घालावी. रस्त्याच्या कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्याने शपथपत्र द्यावे की, `या रस्त्याचे काम गुणवत्तेनुसारच झालेले आहे. हे पूर्ण झालेले काम कोणा ज्येष्ठ व तज्ज्ञ अभियंत्याने निकृष्ट असल्याचे दाखवून दिल्यास मी जेवढे दिवस या कामावर देखरेख करीत होतो, तेवढ्या दिवसांचा माझा पगार कापून घेण्यात यावा. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही.' त्या कामाच्या कंत्राटदारानेही तशा आशयाचे शपथपत्र लिहून द्यावे. त्याच्या बिलाची रक्कम परत करण्याची अट लिहून घ्यावी.
या दोघांना नैतिक बंधनात अडकवून घेतले तर बराच परिणाम होआील. त्यांच्यावर अेक प्रकारे टांगती तरवार राहील. व त्यामुळे कामे चांगली होतील.
-अेच.यू कुलकर्णी, (वि.बाग)सांगली    फोन : ९८६०७६२३००

घराडीची अंधशाळा 
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुका डोंगरदऱ्यांनी व्यापलेला, दळणवळणाच्या दृष्टीने आडवळणी व त्यामुळे जरा मागे पडल्यासारखा होता. तो मूळ पेटा ७८ गावांचा होता, तिथे मामलेदार नव्हता तर महालकरी असे. आता त्या तालुक्यात ९०-९५ गावे असल्याचे समजते. मंडणगडच्या खुद्द भागात किंवा त्या परिसरांतील खेडोपाडी पांढरपेशी  वसती कमी होती. त्या तालुक्यात घराडी हे अेक छोटे गाव, शे-दीडशे अुंबरठ्यांचे आहे. सारस्वत आणि ब्राह्मण यांची चार दोन घरे होती, बहुतेक साऱ्यांची आडनावे वागळे!
या गावातल्या दोन बहिणी - अेक कामत व दुसरी सेनगुप्ता या आडनावाच्या, त्यांचे आजोळ घराडी  गावात होते. ती दोघींची आजोळघरे अेकमेकापासून तशी दूर होती. कामत ताआींची आआी दूर अंतरावर बाजूच्या अेका घरात अेकट्या राहात; तिथे कुण्या अेका दांडगोबाने भर दिवसा त्या वयोवृद्ध महिलेचा खून करून, चीजवस्तू दागिने लुबाडून पोबारा केला होता. त्या घराच्या मागच्या दाराशी काजूच्या झाडाची अेक फांदी आडवी होती, तीवरून या झाडावरून त्या झाडावर असे करीत माकडाप्रमाणे तो गुन्हेगार निघून गेला. ही गोष्ट नंतर त्या दोघी बहिणींना कळली. त्या व त्यांचे पती असे सारे घराडीला आले. कामत ताआींचा पती पोलीस अधिकारी होता, त्याने खुन्याचा तपास लावला.
कामत ताआी व त्यांची बहीण सेनगुप्ता यांनी त्यांच्या आआीच्या आिच्छेप्रमाणे श्रीकृष्णाचे मंदीर गावात बांधले. सेनगुप्ता बाआी अंधमुलांच्या शाळेत होत्या, ब्रेल लिपीचे त्यांचे शिक्षण झाले होते. त्यामुळे आआीचे स्मारक म्हणून त्यानी या घराडी गावात अंध मुलांसाठी शाळा काढली. ही गोष्ट १८-२० वर्षांपूर्वीची, त्या दोन बहिणींनी जिद्दीने चालविलेली ती शाळा. खरं तर त्या दोघीजणी सुखवस्तू. कामत ताआींचे यजमान चांगल्या पगारावर पोलीस अधिकारी, निवृत्त झाल्यावर पेन्शन, राहायला चांगले बंगलेवजा घर, मुलगा चांगल्या नोकरीत, विमानावर पायलट आहे. थोडक्यात म्हणजे चांगल्या मिळवत्या खात्या कुटुंबातील ही मंडळी. त्यांनी या घराडी गावात अंधशाळा काढायचे ठरविले.
माहेरच्या त्या जुन्या घरात कामाला सुरुवात केली. अंध मुले शिकायला येण्यासाठीच त्यांना खूप प्रयत्न करावे लागले. कष्ट तर होतेच. मुलांना जेवण शिक्षण हे मोफत द्यायचेच होते, तरीही पालकांचा विश्वास मिळविणे आवश्यक झाले होते. पालकांना संशय यायचा. त्यांचा शोध घेअून समजूत काढावी लागे. काही घरांतील अंध मुलांना पडवीत बांधून ठेवून घरची माणसे दिवसभर शेतावर कामाला जात असत. त्या मुलांना कोण पाहणार? त्या पालकांना समजून सांगणे हे अेक मोठेच चिकाटीचे आव्हान होते. या भगिनी तर शहरातून येअून राहिलेल्या. जवळपास दुसरे घर नाही, पाणी नाही, सोयी नाहीत अशा अडचणी सांभाळत त्या राहिल्या.
जिद्दीने ही अंधशाळा सुरू केली, तरी शासनाची मान्यता नव्हती, अनुदान तर फारच दूर. लोकाश्रय आणि स्वत:जवळचा पैसा खर्च करून त्या काम करत राहिल्या. अनेक लोकांनी मदतही केली. आतापर्यंतच्या ओळखी-संपर्कांतून काही मोठ्या व्यक्ती आिथे भेट देअून गेल्या. सुखद आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रसिद्ध क्रिकेटपटु सचिन तेंडुलकर तिथे भेट देअून गेला. काही भार कमी झाला. आणि त्या शाळेला अेक वजनही प्राप्त झाले.
आता त्या शाळेत ३०-३५ अंध मुले आहेत. त्यांना या दोन बहिणींनी ज्ञानाचा प्रकाश दाखविला आहे. त्यांचे जिणे सुसह्य केले आहे. या रंजल्या गांजल्यात देव पाहिला आहे. मी मंडणगड येथे पोस्टमास्तर होतो, पण त्या नोकरीच्या काळात माझे तिथे जाणे घडले नाही, याची चुटपूट होतीच. निवृत्त झाल्यावर आम्ही दोघे पतिपत्नी तिथे गेलो. परिस्थिती पाहून यथाशक्ती देणगीही दिली, आितर काही परिचितांस सांगून काही मदत मिळवून देअू शकलो; पण त्या दोघींच्या कार्याला काय अुपमा द्यावी ते आजवर कळलेच नाही.  या शाळेचे नाव आहे `स्नेहज्योत'. नावात बरेच काही आहे !!
-वा.मो.बर्वे, सुर्वे आिमारत, पोष्ट गल्ली, दापोली (रत्नागिरी)
         फोन ९९७५ ०९६ ४१६
शाळा संपर्क : स्नेहज्योत अंधशाळा,  पो घराडी (ता मंडणगड)
फोन : ९६७३ ४७४ ६२३,    ७५०७ २९७ ०५०

तीर्थयात्रा
एक प्रसंग माझ्या स्मृतिपृष्ठावर कधी कधी उमटू लागतो. गंगेच्या तीरातीराने आमची यात्रा मार्गस्थ झाली होती. सकाळची वेळ होती. सूर्याच्या कोमल किरणांनी परिसर व्यापला होता. गंगेचा प्रवाह कलकलनाद करीत, अडखळत, उसळत हास्य करीत वाहात होता. स्नान झालेला महिलांचा एक समूह गंगातटाकी कोवळया उन्हात दाटीवाटीने बसला होता. त्या महिला बहुधा राजस्थानातील असाव्यात; कदाचित अनिकेत विदेहवासी असाव्यात. पोळयावर मधमाशा बसाव्यात, तशा त्या दिसत होत्या. फुलांनी डवरलेल्या फांदीवर फुलपाखरांची झुंबड बसावी असे ते दृश्य होते.
गंगेचा प्रवाह गंगा-गीत गांगेय भाषेत गात होता. त्या गाण्याचा विषय काय होता? हरी आणि हर यांचे गौरवगीत? हरीच्या म्हणजे भगवान श्रीविष्णूंच्या पदकमलांपासून ही गंगाधारा उगम पावली, हराने म्हणजे श्री शिवशंकराने ती स्वत:च्या मस्तकी जटाकलापात धारण केली. स्वर्लोकातून ही गंगा भूलोकावर जगतकल्याणार्थ आली आहे. ती कोणते आदिम स्तोत्र कलकलनादापिषाने गात आहे बरे? तिकडे महिलांचा तो समूह कोमल किरणांमध्ये आत्ममान होऊन, मूकत्व धारण करून, ध्यानस्थ बसला होता. अकस्मात त्या समूहातील एक मध्यमवयीन महिला स्मित करीत उठली. तिने हलकेच एक टाळी वाजवली. ती नृत्य करण्यास उत्सुक झाली.
ती म्हणाली-
काशीनगरीसे आया है शिवशंकर........ ।
लगेच तो महिला संघ उठला. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आनंद फुलत गेला. गाण्यासाठी, नाचण्यासाठी त्या उत्सुक असल्याचेे स्पष्ट दिसू लागले. त्या तीरावर पाषाणभूमीवर कुठले नेपथ्य? कुठली वेशभूषा? कुठला रंगमंच? तरीसुद्धा त्या फरसबंदीवर एकाच वेळी हळूहळू एक नृत्य नाट्यगीत उमलू लागले. एका महिलेने शिवशंकराचा आविर्भाव धारण केला. दुसऱ्या महिलेने यशोदामैयाचे भावरूप घेतले. आणखी कुणी कुणी व्रजगोपिका झाल्या. आत कुठेतरी कृष्ण कन्हैयाची चाहूल एक महिला देत राहिली.
तो नृत्य नाट्यमेळा भावविभावातून आणि गाण्याच्या ओवींमधून विविध रूपे प्रगट करीत गेला. एकीने योगीस्वरूप शिवशंकर आणला. काखेला झोळी, गळयामध्ये सर्पमाळा, जटाजूटधारी, भस्मचर्चित, व्याघ्रचर्म परिधान केलेली शिवशंकरमूर्ती तिथे सदेह प्रगट झाली. साक्षात शिवशंकर गोकुळामध्ये यशोदामैयाच्या द्वारी अवतीर्ण झाले. भोलेनाथ शिवशंकर पुन: पुन: यशोदामातेकडे एकच मागणी करीत आहेत. कोणती मागणी? ती मागणी अशी- `हे माते मला कृष्णकन्हैयाचे दर्शन दे.
`पहुँचे नन्दजीके द्वार, शिवजी भोले बारंबार!'...
यशोदामाता द्वारी आलेल्या त्या योगियाची विनवणी ऐकते. मग ती माता एका गोपिकेच्या हाती काहीतरी भिक्षा देते; दारी जाऊन तिथे उभ्या असलेल्या योग्याला देण्यास सांगते. त्या गोपिकेला योगियासाठी एक निरोप देते. तो निरोप असा... `हे योगिराजा, तुझ्या गळयातील सर्पमाळा बघून माझा लल्ला भयभीत होईल, तेव्हा ही फक्त भिक्षा घे!
`डर जायेगा मेरा लाल, जब देखे सर्पोकी माल'
योगी तो निरोप ऐकतो, तरी तो हट्ट धरतो कन्हैयादर्शनाचा. गोपिका नम्रपणे नकार देते. योगी वितंडवाद करू लागतो. तेव्हा यशोदामाता आतल्या बाजूने योग्याला म्हणते, `मला ठाऊक आहे की तू माझ्या लल्लावर गूढ मंत्र टाकणार आहेस.'
यशोदामातेचे हे बोलणे ऐकून योगी म्हणतो, `हे माते, तुझ्या कुशीमध्ये असलेले बाळ हे सामान्य मूल नव्हे, हा साक्षात श्रीनारायण विष्णू इथे अवतार घेऊन आला आहे.
`दर्शन कर दे रानी ...... सुनकर नारायण अवतार । आया हूँ मै तेरे द्वार
हे माते कृपा कर, उसका केवल चेहेरा मुझे दिखाओ'
शिवयोगी अशी पुन: पुन: प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना ऐकून यशोदामाता घरात जाते. तर तिला आश्चर्य पाहायला मिळते, तिथे यशोदामातेला दिसते की तिचा लल्ला कृष्णकन्हैया बाहेर येण्यास आतुर आहे. तो बाहेर येण्यासाठी चुळबूळ करीत आहे. मग यशोदामाता लल्ला कृष्णकन्हैयाला बाहेर आणते. योग्याच्या मांडीवर त्याला ठेवते. त्यावेळी भर्ता श्रीविष्णूू आणि हर्ता श्रीशंकर यांचे मीलन या धरतीतलावर घडून येते. असे हे लीलानाट्य गोकुळामध्ये यशोदामातेच्या दारात प्रस्तुत होते.
पुराणांतरी अशी अनेक भावविभोर करणारी लीलानाट्ये विखुरली आहेत. `मैया मोरी, मैं नही माखन खायो' हे संत सूरदासरचित गीत-नाट्य साधुसंतांनी आपल्या प्रतिमेच्या स्पर्शाने लिहून ही लीलानाट्ये अजरामर केली आहेत. त्या लीलानाट्यपदांमधून प्रवाहित झालेला अंतर्भाव नित्य निर्मळ आनंद देत असतो.
-म.वि.कोल्हटकर, सातारा
फोन-०२१६२-२३२५०४

Comments

  1. Discover a premium collection of Panchgavya-based wellness, herbal cosmetics, natural Gomay products, and everyday FMCG essentials, all crafted with the purity of traditional Indian wisdom. At Deendayalkamdhenu, we bring to you the finest range of Ayurvedic and cow-based products that promote health, sustainability, and conscious living.

    💼 बिज़नेस का सुनहरा मौका – हमारे साथ जुड़ें!
    अब आप भी बन सकते हैं हमारे [पंचगव्य उत्पाद] के ऑफिशियल डीलर।
    ✅ कम निवेश, ज्यादा मुनाफा
    ✅ सपोर्ट + ट्रेनिंग उपलब्ध
    ✅ WhatsApp और कॉल से ऑर्डर सुविधा
    ✅ फास्ट डिलीवरी और सटीक सप्लाई
    ✅ ऑनलाइन और डिजिटल पेमेंट सपोर्ट
    ✅ ट्रस्टेड और रिजल्ट वाले प्रोडक्ट्स

    📞 संपर्क करें: [9520890088]
    🛍 Visit करें आज ही और पाएं खास ऑफर!
    Shop Now - www.deendayalkamdhenu.com
    📍 पता: [Deendayal Dham (Nagla Chandrabhan) Farah Mathura 281122]

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्...

Thoughts of Shivajirao Bhosale

२९ जून : २ रा स्मृतिदिन शिक्षण हे जीवनाचे संस्करण       पुणे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी व्यक्त केलेले विचार. या चिंतनाचे, त्यावेळचे दै.तरुण भारतचे मुख्य उपसंपादक विद्याधर ताठे यांनी केलेले संकलन - (संक्षिप्त) आजचा बुद्धिमान विद्यार्थी पूर्वीच्या बुद्धिमान विद्यार्थ्यापेक्षा अधिक जाणता झाला आहे. त्याला जाता-जाता आणि पाहता-पाहता बरेच काही कळू शकते एवढी अनुकूलता निर्माण झाली आहे.  हा सगळा या पिढीच्या भाग्याचा भाग आहे. पण एक भयावह गोष्ट या पिढीच्या वाट्याला आली आहे - भविष्याची अनिश्चिती. ही नको त्या वयात विद्यार्थ्यांच्या वाट्याला आली आहे. एक प्रकारची अस्वस्थता मनात घर करून राहिली आहे. कितीही शिकले तरी पुढे काय या प्रश्नाला नेमके उत्तर नाही. नोकरी मिळेल याची खात्री नाही. व्यवसाय साधेल असा विश्वास नाही. शहरात जागा मिळत नाही, खेड्यात चित्त रमत नाही. घरात प्रेम मिळत नाही, समाजात सुख लाभत नाही. काय करावे ते कळत नाही. पण काहीतरी केल्याशिवाय राहवत नाही.  उभ्या राष्ट्नला एकच एक ब्रीद नसल्यामुळे आणि समाजाल...