Skip to main content

26 Feb.2018

वास्तुप्रेरणा जपायला हव्यात
मी नुकताच अुत्तर भारतात प्रवासाला गेलो होतो. त्या भागात मुगल सल्तनत दीर्घ काळपर्यंत होती. त्या काळातील, प्रसिध्द स्थळे आज अैतिहासिक ठरली आहेत. `पुरातत्व विभागा'च्या वतीने त्यांची देखभाल होत असते. काही ठिकाणी स्थानिक संस्था व सरकारेेही त्यासाठी प्रयत्न करतात. लोकांच्यात  त्या त्या व्यक्ती स्थाने आणि तो आितिहास यांविषयी जागरूकता टिकविण्याचे कार्य त्यायोगे होत राहते.
मी १९६६ मध्ये पोटासाठी पुणे येथे आलो. तिथे थोडा स्थिर झाल्यानंतर मोठ्या अभिमानाने व अुत्सुकतेने, अुत्साहाच्या भरात, भक्तीनेही म्हणा; -पुण्याचा प्रसिध्द शनवार वाडा पाहायला गेलो होतेा. तो पार पडीक मोडकळलेला होता. मला खूप वाआीट वाटले, भरून आले. सरकारचे अेक सोडा, -पण सामाजिक अनास्थाही आितक्या थराला खाली गेली असेल असे वाटले नव्हते. असो.
पेशवाआीतही महापराक्रमी बाजीरावाच्या वाट्याला तशी अनास्था आली होतीच. बाजीरावांच्या पराक्रमाचा अभिमान व आदर असण्याअैवजी त्यांचे अभक्ष्यभक्षण वा मस्तानीकथा यांचा बभ्रा जास्त केला गेला जात होता. पुण्यातल्या ब्राह्मणांनीही म्हणे त्याकाळी शनवार वाड्यावर बहिष्कार घातला होता. पेशवाआीचा पराभव होअून मराठा साम्राज्य संपुष्टात आल्यावर  कुण्या अज्ञात ब्राम्हणानेच तो जाळला अशीही वदंता अेकण्यात वाचण्यात आहे. पेशवाआीतले; पराक्रम आणि मुत्सद्देगिरी यांपेक्षा केवळ घाशीराम हा विषय आितर समाजांना नाट्यपूर्ण वाटत असतो. अशी ही सामाजिक अनास्था; त्याच्या मानसिक वेदना जास्त. शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे रूपांतर पेशव्यांच्या काळात मराठी साम्राज्यात झाले. त्या पराक्रमी कारकीर्दीविषयी महाराष्ट्नतली राजकीय अनास्था साऱ्यांना माहीत आहे, समजूनही येते. पण सुजाण व श्रेष्ठ विचारांचा व कार्याचा वारसा सांगणाऱ्या मराठी समाजाला त्या आितिहासाविषयी काही करावेसे वाटायला नको का?
आता या पत्राच्या निमित्ताने मुख्य मुद्दा सांगतो. महाराष्ट्नत व भारतातही - तसेच विदेशांतही मराठी कर्तबगार लोकांच्या संघटना आहेत. वेगवेगळया ज्ञातिबांधवांच्या आहेत, तशा  ब्राह्मणांच्याही आहेत. ७-८ वर्षांपूर्वी अखिल भारतीय -नव्हे तर जागतिक चित्पावन संमेलन घडले. लाखावर लोक जमले, काही संकल्प  झाले; काही कार्येही सुरू झाली असतील. बहुतांश सगळया घराण्यांच्या कुलसंस्था आहेत. पैसाही आहे. स्थैर्य आहे. त्या साऱ्यांनी संघटित प्रयत्न करून  शनवार वाडा पुन्हा `जागा' करावा असे वाटते. सध्या ती वास्तू पुरातत्व विभागाकडे आहे. सरकारशी बोलणी करून तो वाडा जसा होता तसा पुन्हा अुभा करता येआील. अनेक अभियंते अनेक वास्तुरचनाकार, शिल्पज्ञ महाराष्ट्नत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानातही प्रवीण आहेत. प्रत्येक कुटुंबाने सरासरी १०हजार दिले तर शेदोेनशे कोटि जमतील. हरयेक प्रयत्ने करून हे जाज्ज्वल्य प्रेरणास्थळ पुढच्या पिढ्यांसाठी जिवंत करावे. कै.शंतुनराव किर्लोस्कर व तत्कालीन काही उद्योगपतींनी ही कल्पना एकेकाळी मांडली होती, असे आठवते.
बरीच घराणी अलीकडे काही मंदिरांचे जीर्णोध्दार, भक्तेनवास वा स्थानिक स्वरूपाचे काही अुपक्रम हाती घेत असतात. त्यांचेही महत्व आहेच, पण काही कालावधीपुरते  ते थोडे स्थगित ठेवून ही महाराष्ट्नच्या पराक्रमाची  गाथा  कालसरितेतून पुन्हा वर आणावी यासाठी तन मन धन अर्पण करावे. अन्यथा मोठमोठे मेळावे, संमेलने, अधिवेशने अेवढ्यावर आपण अडकून पडू.... आले-जेवले-गेले अेवढाच त्यांना अर्थ राहील.
-श्रीकृष्ण वासुदेव फडके,  ठाणे ४०० ६०२ फोन : ९९ २०२० ८०३९

गो-जैविक शेतीचे विजयी प्रयोग
विजय ठुबे हे माहिती तंत्र (आय टी) क्षेत्रातील आिंजिनियर आहेत. अमेरिकेत चांगल्या हुद्द्याची आणि अर्थातच लठ्ठ पगाराची नोकरी होती. पण त्यांना वाटत होतं की, आपल्याला परक्या नोकरीत हे यश मिळतंय्, मग ते आपल्या शेतीतही मिळेल. असा विचार करूनही यश मिळणे तसे सोपे नसते. अशा छान विचारांचे कालांतराने `काय' होते  त्याचीही  बरीच अुदाहरणे आपल्याभोवती असतात. ठुबे हे मूळचे नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातले. अण्णा हजारे यांच्यामुळे माहीत झालेल्या राळेगणसिद्धी या गावापासून दहाबारा किमी अंतरावर त्यांचे गाव आहे. हा तालुका दुष्काळाच्याच मोजपट्टीने मोजला जातो. दुष्काळामुळे समस्यांचे अमाप पीक असते. परंतु कुकडीचे धरण झाल्यामुळे गेल्या काही वर्षांत तिथे निदान थोडे तरी पाणी फिरू लागले आहे.
-तर या गावाात ठुबे यांची पडीक मुरमाड अशी सुमारे शंभर अेकर जमीन आहे. ती त्यांना विदेशातल्या नोकरीकाळात खुणावू लागली आणि नोकरी सोडून देअून ते आपल्या गावाकडं परत आले. चांगल्या ठिकाणचं जग पाहिलेलं होतं, आणि नोकरीतल्या कामाचा अनुभव होता, त्यामुळं त्यांनी आपली शेती फुलविण्यासाठी पुरेसा अभ्यास केला. प्रथम या रानात गो-जैविक पध्दतीनं फक्त गवत पिकवले. शंभर अेकरांवर गवत लावणारा हा `शेतकरी' लोकांच्या कुतुहलाचा आणि कदाचित चेष्टेचाही विषय झालेला असू शकेल. त्या गवताच्या पिकावर स्प्रिंकलरने पाणी मारून त्याची वाढ चांगली करून घेतली. गवत वाढू लागल्यावर त्यांनी देशी गायी आणि म्हशी यांची संख्या वाढवत नेली. सध्या त्यांच्या कडे गीर, कांकरेज, डांगी, खिलार अशा देशी गायी ७५ आहेत, आणि तितक्याच म्हशीही आहेत. शेण भरपूर अुपलब्ध झाले, त्यामुळे १० किलो ताजे शेण आणि त्यात पाव किलो मध असे मिश्रण शंभर लिटर पाण्यात तयार करून त्यांनी स्प्रिंकलरने मोकळया शेतावरही मारण्याची पध्दत ठेवली.
त्याचा चांगला परिणाम दिसू लागला आणि हळूहळू ती जमीन चांगली पिकाअू बनली. गेल्या तीन वर्षांत तिथे चांगला भाजीपाला, फळभाज्या आणि चांगली किंमत देणारी नगदी पिकेही येअू लागली आहेत. पहाटे दोन वाजल्यापासून गुरांच्या धारा काढायला सुरुवात होते, ते दूध ७० किमी अंतरावर पुण्याला पहाटे साडेचार वाजता पोचते. त्यासोबत बाकीचा शोतीमालही त्या शहरात पोच होतो, दर चांगला मिळतो. विजय ठुबे यांची ही विजयी गाथा अनेक शेतकऱ्यांना गो-जैविक प्रयोगाचे अुदाहरण ठरेल.
त्यांच्याकडे शंभर अेकर शेती होती, हे खरेच आहे; पण ज्यांच्याकडे जमीन कमी असते त्यांनी आपली शेती भरघोस पिकविली तर त्यांच्यासारखे राजे तेच ठरतील. त्यांत राबणूक मात्र हवीच. नोकरीत दुसऱ्याकडे राबायला काही वाटत नाही, पण आपल्या शेतीत राबायचे तर मनात शंका कुशंका सुरू होतात. पंधरा वीस गुंठे जमिनीत लाखावारी किंमतीचे आले बऱ्याच शेतकऱ्यांनी पिकविल्याचे साऱ्यांनी वाचले असेल. शेती आधुनिक करायची म्हणून त्यास रासायनिक खते व औषधे वापरली जातात; त्यासाठी मोठा खर्च होतो, कर्ज काढावे लागते. त्याअैवजी दुभती किंवा भाकडसुध्दा गाय शेणातून शेतीला चांगले दिवस दाखवू शकते. चिकाटी धीर आणि प्रयोगशील मेहनत तर हवीच. शेणाच्या मिश्रणाला बरेच शेतकरी `अमृतपाणी' म्हणतात. भाकड गायीपासून अमृतपाणी तयार केले तरी शेती सुधारू शकते हा फायदा करून घेता येआील. यासाठी सामुदायिक शेतीचेही प्रयोग करायला हवेत.
सामुदायिक शेतीचा दुसरा फायदा म्हणजे आपल्या शेतमालाला थेट ग्राहकापर्यंत पोचवून चांगला भाव मिळणे, -म्हणजेच त्याची विक्री व्यवस्था  शक्य होते. शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की, ठोक व्यापाऱ्याला माल विकणे आणि थेट ग्राहकाला विकणे यांच्या दरांत साधारण दुपटीचा फरक पडतो. परंतु शेतातील काम करायचे की शहरात जाअून बाजारात बसण्यात वेळ घालवायचा असा प्रश्न असतो. तशी सोयही होत नाही. त्यावर अशा सामुदायिक प्रयत्नांतून अेकत्र शे सवाशे अेकरांचा अुद्योग करणे आवश्यक ठरते. शेतकरी माल घेअून बाजारात जातो, तिथे व्यापाऱ्यांच्या संघटना असतात, अेकट्या शेतकऱ्यांना कोण विचारणार? तिथे शेतकऱ्यांनीही अेकी केलीच पाहिजे. आपापल्या जमिनी जोडून गटशेतीवर आपापल्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारे `नवी शेती' पिकवायला हवी. विजय ठुबे हे केवढे मोठे अुदाहरण आहे!! गो-जैविक अुत्पादनांस जगाच्या बाजारात फार मोठी मागणी आहे हेही जाताजाता सांगितलेच पाहिजे.

(विजय ठुबे यांचा संपर्क : ९९२२९ ६९९३९)
 याविषयी अधिक माहिती `मुंबआी -तरुण भारत' २७-१२-१७च्या अंकात

किती फटकरायचे!
प्रत्येक व्यवस्था सुधारण्यासाठी एकेक कायदा असला पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. चोरांना शिक्षा देण्यासाठी कायदा हवाच; पण अंधश्रद्धा हटविण्यासाठी, म्हातारपणी पोरांनी सांभाळ करण्यासाठी, रस्त्यात शौचाला बसणे थांबविण्यासाठी, मास्तरनी छडी मारू नये या सर्वासाठी कायदा हवा अशा समजुतींमुळे आपल्याकडे महासंख्येचे कायदे झालेत आणि अजूनही त्यात भर पडते आहे. परंतु त्या कायद्यांची अंमलबजावणी करायची निकड मुळीच वाटत नाही. मक्तेदारी नियंत्रण, क्रॅरीबॅग वापर, भेसळ, आवेष्टित वस्तू, अधिकतम किंमत असे कितीतरी कायदे व त्यांचे नियम रोजच्या बाजारासाठी केलेले आहेत. पण ते न पाळता कुठेही राजरोस व्यवहार चालू असतात.
अंमलबजावणी झुगारण्यासाठी सरकारकडे आणखी एक युक्ती असते. ती म्हणजे पुरेसे कर्मचारी व यंत्रणा द्यायचीच नाही. एखादी भव्य पाणी योजना मंजूर करायची, कोनशिला बसवायची, पण नंतर सर्वेक्षण करायला पैसेच नाहीत. चोऱ्या वाढल्या की चौकी द्यायची  परंतु तिथे पोलीस नाही! न्यायालयाकडेही पुरेशी माणसे आणि यंत्रणा-जागा-साहित्य हे नसेल तर न्याय कोण देणार? आणि न्याय मिळतच नसेल तर तिथे जायचे कशाला. तशीही लक्षावधी प्रकरणे पिढ्यान् पिढ्या साचून आहेत, त्याचबरोबर न्याय मागायला जाणेच नको असे म्हणून अन्याय सोसणारी प्रकरणे जास्त असतील!
१९८६ साली ग्राहक संरक्षण कायदा संसदेत झाला. महाराष्ट्नत ३५ जिल्हे, प्रत्येकी तक्रार-निवारण मंच (ग्राहक न्यायालय) असायला हवे, त्यात ३ सदस्य हवेत. पण सध्या १९ मंच कार्यरत आहेत. १२ ठिकाणी अध्यक्षच नेमलेले नाहीत, तर ३३ सदस्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत.
मुंबई ग्राहक पंचायतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने सरकारला फटकारले, ते ठीक आहे. पण न्यायाची सोय करावी म्हणून न्यायालयाचेच दरवाजे ठोठावायचे हा अजब न्याय झाला!

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन