Skip to main content

Posts

Showing posts from October, 2015

Oct.2015

वानप्रस्थी कर्तव्य गतकाळातील काळा कालखंडसुद्धा काळाच्या पडद्याआड गेल्यावर, कालांतराने रम्य भासू लागतो. माणसाला भविष्याची चिंता सतावते, वर्तमान खडतर भासते; पण भूतपूर्व स्मृती मात्र सुखावतात. साध्यासुध्या व्यक्तीलाही आयुष्याच्या संध्याकाळी संध्यारंगांसमवेत स्मरणरंजन करायला खूप आवडते; मग ज्यांचा सगळा जीवनप्रवास वाटावळणांनी, चढउतारांनी भरून गेलेला असतो, त्याच्या बाबतीत सांगण्याजोगे,-आणि पुढच्या पिढ्यांनी ऐकण्याजोगे किती किती असेल! परंतु अशा अनुभवसंपन्न व्यक्तीसुद्धा स्वत:च्या आठवणी लिहून ठेवत नाहीत, हा प्रवाद नसून सार्वत्रिक वास्तव आहे. चरित्र किंवा आत्मचरित्र या साहित्यप्रकाराने कोणत्याही भाषेचे दालन समृद्ध असते. तथापि ते लिहिले जाण्याकरिता चरित्रनायक महान असला पाहिजे असा गैरसमजही असतो. माणूस अगदी सामान्य, मोरू किंवा बाळू या वर्गातला असला तरी त्याच्या चरित्रकथनात त्या त्या काळातील समाजस्थिती उमटत असते. लक्ष्मीबाई टिळक यांनी लिहिलेली स्मृतिचित्रे, त्यातील साहित्यगुणामुळे श्रेष्ठ ठरली असे नाही, पण त्या काळची समाजस्थिती त्यांतून समजली, आणि एका साध्या घरच्या महिलेने टिपलेले त्या काळातील क्

sept2015

आजचे शिक्षण  आणि पालकांची जबाबदारी - शामराव बा.टोणपे     कनिष्ठ प्राथमिक शिक्षणासाठी पहिलीच्या वर्गात प्रवेश देताना बालकाची सहा वर्षे पूर्ण झाली असावीत. त्यावेळी त्याची आकलनक्षमता पुरेशी असते आणि मेंदूचीही वाढ झालेली असते. हल्लीच्या काळात त्याच्या फारच अगोदर म्हणजे मूल जेमतेम तीन वर्षांचे झाल्यावर त्याच्या शालीय शिक्षणाची सुरुवात करण्याची घाई पालकांना झालेली असते. तीन वर्षे पूर्ण होताच मुलाच्या शिक्षणाला सुरुवात करण्याने बरेच अन्यायी गोंधळ होत असतात. आपण मुलाच्या शिक्षणाची घाई केल्यामुळे मुलाचे शिक्षण लवकर उरकेल अशी कल्पना करता कामा नये. आपण रेल्वे स्थानकावर लवकर गेलो तर रेल्वेगाडी लवकर येते, असा काही प्रकार नसतो. मराठी माध्यमाची बालवाडी किंवा इंग्रजी माध्यमातील नर्सरी, केजी१, केजी२ असे छोटे वर्ग सध्या बहुसंख्य शाळांमधून चालविले जातात. माध्यम मराठी असो अथवा इंग्रजी असो, या छोट्या वर्गांमध्ये बालकांना अनौपचारिक शिक्षण देणे अपेक्षित आहे. या तीन वर्गांतील मुले आनंदाने हसतखेळत राहिली पाहिजेत. त्यांना शाळेत जाण्याविषयी आवड निर्माण व्हायला हवी. प्रत्यक्षात मात्र पालकांच्या विचित्र हट्टाग

sept.2015

सुशासन की अनुनय दहीहंडीच्या निमित्ताने काही वादविवाद झाले, कोर्टबाजी झाली, त्यांचा थोडासा परिणाम झाला. तथापि धार्मिक उत्सवांच्या नावावर जी झुंडगोंधळाची लाट यायची ती आलीच. असल्या प्रकारांमुळे गावे-शहरे सर्वार्थाने प्रदूषित होत असताना, त्यांच्या खेळांत आमदार-खासदार पुढाकार घेत असल्याचे पाहून हसायचे की रडायचे? नगरपालिका, प्रशासन, नियम-कायदा, पोलिस, न्यायालय इत्यादी सगळया घटनात्मक यंत्रणा कोलून लावणाऱ्या लोकांवर कोण, कसा वचक ठेवणार आहे? राज्यघटना व त्याआधारे अस्तित्त्वात आलेले नियम झुगारून देणारे पुढारी, तोंड वर करून पुन्हा आंबेडकर-शाहूंचे नाव घेतात हे अजब आहे. सरकाराला तर हल्ली नको ती कामे अंगावर ओढवून घेण्याची कंड सुटली असावी. साहित्य चळवळी, दहीहंडी, गणपती, पंढरीची वारी, पर्युषण, इफ्तार पार्टी यांत सरकारने वास्तविक लक्ष घालू नये. सार्वजनिक जागा, सार्वजनिक पैसा, सार्वजनिक यंत्रणांचे श्रम आणि मुख्य म्हणजे सार्वजनिक कामांचा वेळ यांचा धडधडीत गैरवापर सर्रास चालू आहे. दुष्काळ, नक्षलवाद, विचारवंतांचे खून, मूलभूत सुविधांची टंचाई हे भीषण प्रश्न कोण हाताळणार? राजकीय पक्षही तसल्या आक्रस्ताळया भ

sept.2015

सामान्यांची घुसमट भाजपने सत्तेवर आल्यानंतर केलेल्या पुष्कळ निवडनियुक्त्या त्रयस्थ व सुजाण विचार करणाऱ्या कित्येकांस खटकणाऱ्या असतील; परंतु राज्यकर्त्यांचा तो अधिकार मानायला नको काय? पूर्वकाळची ढोबळ उदाहरणे कुणालाही आठवतील. काँग्रेसचे बाबासाहेब भोसले, जनता दलाचे देवेगौडा, समाजवादी राजनारायण किंवा आजचे लालूप्रसाद; फारच भीषण म्हणजे राबडीदेवी वगैरे वगैरे! असल्या `नियुक्त्यां'वर या पराभूत परिवारा'ने फारसे तोंड टाकले नव्हते, जेवढे ते आज मोदी किंवा सुषमा स्वराजवर बडबड करत आहेत! बाबासाहेब पुरंदरे यांना `महाराष्ट्न् भूषण' द्यायचा निर्णय या तोंडपाटील मंडळींनी अकारण वादग्रस्त केला. आजवर कुणाकुणाला `भारतरत्न' ते `पद्मश्री'वाटल्या गेल्या ती यादी त्यांनी एकदा डोळयापुढे आणली असती तर त्यांना रडण्यासाठी, किंवा पत्रके काढून माध्यमबाजीने सत्यशोधक विरोध करण्यासाठी किती संधी होती ते त्यांच्याही लक्षात येईल. सध्याच्या सत्ताधारी भा.ज.प.चा कारभार, नियुक्त्या, निर्णय हे सर्वकाही छानछान होईल असे कोणी मानत नाही. किंबहुना गेल्या वर्षभराचे मूल्यांकन कुणी हल्लीच्या शालान्त परीक्षेप्रमाणे काठा