Skip to main content

Posts

Showing posts from 2011

nivedan

निवेदन या अंकातील संपादकीय लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने करावा अशी खूप वाचकांची सूचना होती, तशी जुळवाजुळव सुरू आहे. सुमारे २०० पृष्ठांचे पुस्तक प्रकाशित करायचे आहे.   पृष्ठसंख्या : सुमारे २०० छापील किंमत : २००/- (प्रकाशनपूर्व) नाव नांेदल्यास किंमत रु.१००/- आपण कोणत्याही प्रकारे साहाय्य करू शकता. ं या प्रकल्पासाठी मदतरूपात देणगी   ं फक्त रु.८००/- भरून १० प्रतींची नांेदणी (टपालखर्चासह) ं आपापल्या संपर्कातील व्यक्ती, संस्था, नियतकालिके, ग्रंथालये यांच्यामार्फत प्रसार व नोंदणी  ं शुभेच्छा व आशीर्वाद

MAZA COLOMN in 8 AUG 2011

पोळणारं वास्तव  एका दानशूर गृहस्थानं भलीमोठी रक्कम बाजूला काढून त्याचा ट्न्स्ट केला. हेतू चांगला होता. गुणीजनांसाठी प्रोत्साहन, अडल्या नडल्यांस मदत वगैरे. एकूणात समाजासाठी म्हणून खर्च करायला घसघशीत रक्कम होती. ही रक्कम अर्थातच सत्पात्री पडावी अशी दात्याची आणि त्याच्याशी संबंधित सर्व `कार्यकर्त्यां'ची प्रामाणिक इच्छा होती. त्या दिशेने प्रयत्न सुरू झाले.  पहिला शोध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांचा करायचा होता. हा गुणवत्तेचा शोध लागता लागेना. संपूर्ण जिल्ह्यातून फक्त शंभर कार्ये आपल्या यादीवर आणण्यासाठी सर्वांनी घोषणा केल्या. प्रत्येकाला ही यादी करण्याची जबाबदारी अगदीच किरकोळ वाटली. प्रत्येकजण `कसा'चा होता, त्यामुळं या पात्रतेसाठी निकष केवळ विश्वासाचा होता. निवडलेलं कार्य खऱ्या पात्रतेचं असावं एवढीच माफक अपेक्षा. संस्था नोंदलेली असायला हवी असं नाही, संस्थाच हवी असंही नाही... एकांडी शिलेदारी चालेल, ऑडिट-हिशेब यांबद्दल आग्रह नाही, कार्याचा विषय (अपंग-अनाथ-पर्यावरण-अध्यात्म-रुग्णसेवा वगैरे) कोणताही असेल, दाखले-शिफारसी-अर्ज यांची गरज नाही.... तर आपण खरी तळमळ शोधायची आहे!! शंभर संस्थ

sampadkiya in 8 AUG 2011

शैक्षणिक निर्बंध आणि मूल्यवाढ शिक्षण क्षेत्राशी संबंधित शुल्क-वसूलीविषयी कायदा विधिमंडळात झाला. त्याचा उल्लेख करताना सर्वत्र `शिक्षणसंस्थांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी' हा निर्णय घेतल्याचे प्रसविले गेले. मंत्रीमंडळ किंवा विधिमंडळाने काही नियम केल्यामुळे कुणाला चाप वगैरे लागण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. जमीन-उद्योग-औषध-पर्यावरण इत्यादि कोणत्याही विषयांचे नियम गंुडाळून ठेवण्याची गुंडगिरी किंवा त्या नियमांस बगल देण्याची ठगगिरी किंवा त्यांतून पद्धतशीर वाट काढत हात मारण्याची धूर्तगिरी साधणारे धंदे चालूच राहतात. मुळात त्या कायद्याचा व नियमाचा उद्देश फार उदात्त असल्याचे भासवून, त्याच आधारे धंदेवायीक राजकारण साधले जाते हा आता व्यवहार बनला आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रातील शुल्कवाढीच्या मनमानीला चाप वगैरे लागण्याची वेडपट आशा फारसे कुणी करणार नाही. तरीही हेतू चांगला असल्याचे मान्य करून त्याच्या अंमलबजावणीचा प्रश्न सोडवायला हवा. पोरांना चांगले शिक्षण द्यायचे म्हणजे जास्तीत जास्त शुल्क घेणाऱ्या शाळेत घालायचे ही सर्व पालकांनी सोयीस्कर समजूत करून घेतली आहे. मुले `मोठी' व्हावीत ही प्रत्येक

mazya anubhavatil brahmin

माझ्या अनुुभवातील ब्राह्मण  मी रयत शिक्षण संस्थेत शिकत होतो. तो काळ १९५६-६४ चा. या काळात जाती व्यवस्था मजबूत होती. असे असूनही महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे कार्य प्रसार पावत होते. या चळवळीस ब्राह्मण-ब्राह्मणेतर स्वरूप होते. अशा काळात रयत संस्थेचे अनुदान मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी स्थगित केले होते. ते ब्राह्मण असल्याने मोठा गदारोळ झाला. ब्राह्मण समाजाविषयी चीड जन्माला आली. मीसुद्धा ब्राह्मणांचा कमालीचा द्वेष करू लागलो. किंबहुना या विचाराच्या अग्रभागी राहिलो होतो. पण त्या सगळयाचा फेरविचार करावा असे प्रसंग घडले.  विटे येथील वाडा. माडीवर माझी खोली होती. शेजारच्या खोलीत सुधाकर कोडगुले रहात. एसटीमध्ये क्लार्क होते. पाचपंचवीस जण एकत्र येत होते. गप्पा आणि चर्चा बामणावर, नको त्या शब्दात, चढाओढीने सुरू रहायची. कोडगुले असायचे. रंगाने काळसर, मजबूत देह आणि राकट आवाज. यामुळे `आपल्यापैकीच' अशी समजूत होती. टवाळीच्या शेवटी ते शांतपणे म्हणायचे, `बामणावर तुमचा एवढा राग का?' मी एक दिवशी विचारले, `तुम्ही ब्राह्मण आहात का?' तेव्हा थंडपणे म्हणाले, `होय! मी बामणच आहे.&#

sampadkiya of 18july2011

हट्टाग्रहात सत्य हवे महाराष्ट्नत `अंधश्रद्धा' निर्मूलनासाठी भोंदूगिरी-विरुद्ध कायदा करावा यासाठी एकीकडे आंदोलन होत आहे, त्यास पाठिंबा असल्याचे सरकार भासवते. आपल्या पुरोगामित्त्वाचा टेंभा मिरवत राज्याचा मुख्यमंत्री विठ्ठलाची पूजा बांधून `वेळेवर पाऊस पाड, जनतेला सुखी ठेव' असे साकडे घालतो हीच तर भोंदूगिरी झाली. वास्तविक पाऊस पडत नाही त्या संकटाशी सामना करणारे सरकार गरजेचे आहे. पण `कर्म करोनी म्हणती साधू' असे लोकच सर्वत्र बोकाळले आहेत. त्यामुळे भोंदू अंधश्रद्धेविरुद्ध कायदा कसा होणार, आणि त्याचा कसचा उपयोग होणार, याबाबत सच्च्या पुरोगामींनी तरी विचार करायला हवा. सत्य श्री साईबाबांचे निधन झाल्यावर त्यांच्या संपत्तीविषयी चमत्कार कथा प्रसृत होत आहेत. हातातून उदी, गुलाल निघणे किंवा बंद मुठीतून घड्याळ-अंगठी येणे असले मंतरखेळ छोट्या बालकांना अचंबित करतात. ज्यांची बालबुद्धीच आहे असे पब्लिक असल्या चमत्कृत अध्यात्मास भुलले. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्यापासून सगळया बड्या लोकांसही भुरळ पडल्याचे दिसले त्यात सत्यत्त्व किती आणि साईत्त्व किती असा प्रश्न आहे. नास्तिकांनी साई भक्तांच्या झालेल्य

panchgavya

पंचगव्य  वेद काळापासून गाय ही शेती व्यवसायाशी अत्यंत निगडीत आहे. गाईला सर्व धर्मांत व शास्त्रात पवित्र मानले गेले आहे. `गावो विश्वस्य मातरम्' असे म्हटले आहे. गाईच्या स्वामित्वासाठी युद्धे होत व गोधन ज्याच्याकडे जास्त तो सामर्थ्यवान, वैभवसंपन्न व शूरवीर समजला जात असे. गोमय, गोमूत्र व दुध, गाईचे तूप, गाईचे दही या पंचामृताची आहुती यज्ञांमध्ये देत असत. याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. गाईच्या या पाच पदार्थांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात.  शेणाने सारवलेल्या जमिनीत कीड व बुरशीनाशक गुणधर्म कसे येतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. गोमय व गोमूत्र एकत्र करून ते १० हजार आरपीएम ने घुसळले. तापमान वाढू नये म्हणून तेथे थंड करण्यासाठी शीतपद्धती वापरली. त्या मिश्रणातील रस बाहेर काढला. तो रस पेट्नीडिशमध्ये अगार हे माध्यम वापरून त्यावर घेतला. सर्व प्रकारच्या बुरशी त्यावर सोडल्या. कोणत्याही बुरशीची वाढ झाली नाही. अगदी इकोलाय व साल्मुनेला बुरशीपण रोखल्या गेल्या. हा कीड व बुरशीनाशक गुणधर्म आहे.  वशिंड व आकाशाकडे टोके असणारी शिंगे धारण करणारी भारतीय गाय कोणत्याही तापमानात राहू शकते. तिच्या ग

sandriya sheti

सेंद्रीय शेती शेतातील विविध पिकांवर तरतरी आणि त्यांचे सकस उत्पादन असे दृश्य पिचतच दिसते. शिवाय त्या ठिकाणी गायींचे खिल्लार, फळबागांवर धूर पसरविणारे अग्निहोत्र, दूध-दुभत्यांचे असंख्य प्रकार आणि वनस्पतींचा औषधी वापर हे सर्व पाहिल्यानंतर कुठल्यातरी ऋषी काळातील कृषीची कल्पना करता येते. श्री. जयंत वामन बर्वे यांच्या विटे (जि.सांगली) यांच्या शेतावर तसे प्रयोग प्रत्यक्ष पाहता येतात. हा सर्व शेती व्यवहार आता प्रयोग अवस्थेतून कायमच्या यशस्वी व्यवसायामध्ये स्थिर झाला आहे. पाण्याची कमतरता असूनही एकरी एेंशी टन ऊस नदीकाठच्या बागायतीलाही दुर्मिळ झाला आहे. लगडलेले आंबे किंवा फुलारलेली डाळींबाची झुडपे कोणत्याही किडीची माशी अंगावर बसू देत नाहीत. या सर्वांच्या मुळाशी निसर्गाने दिलेली विविधता आपल्या सामर्थ्याचा ओलावा टिकवून ठेवते आहे. श्री.बर्वे यांचे हे सेंद्रिय शेतीचे तंत्र आता सर्वदूर शेतकऱ्यांच्या सहजपणी आटोक्यात येत आहे. अर्थातच विदेशी रासायनिक खते आणि नाकारलेली कीडनाशके यांच्या वेढ्यात सरकारी यंत्रणा गुंतलेली असल्यामुळे त्यांचाच प्रचार अधिक होत असतो. मात्र खरा शेतकरी तशा फसव्या हरितक्रांतीपासून आता

Maza Column of 13 June

सुख वाढण्याची कला  ऊस तोड करण्यासाठी उत्तर कर्नाटक किंवा बीड-लातूर कडून कित्येक शेतमजूर पश्चिम महाराष्ट्नत येत असतात. त्यांनी दरवाढीसाठी आखडून धरले. संप-संघटना वगैरे नेतेगिरी झाली, साखर कारखाने खोळंबले. अशा वेळी काही गावातले शेतकरी सरसावले, त्यांनी आपापसात एकी केली. ऊसतोड करण्यासाठी टोळया तयार केल्या, एकमेकांच्या रानातला ऊस तोडायला सुरुवात केली. शेतकरीच होते, सवय मोडली होती पण फार अवघड गेले नाही. काम मार्गी लागले. ही कथा असेल आठ-दहा वर्षांपूर्वीची.  अशा कितीतरी अडचणींचे पाढे वाचण्याची सवय लावून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांची ती कथा आठवून पाहण्याजोगी असते. नुकत्याच झालेल्या एका लग्नसमारंभातील पंगत चर्चेत होती. पंगतीचं वाढप अगदीच (बे)सुमार दर्जाचं असतं हा सगळीकडे अनुभव असतो. कुणीतरी आेंगळ किंवा अत्याधुनिक नटरंगी पोरं लग्ना-मुंजीसारख्या भारदस्त प्रसंगात पंगत वाढायला हल्ली येतात. त्या पोरांचे एकूण अवतार पाहिल्यावर पपन्नाची प्रसन्नता जाऊन मळमळ वाढते. वाढपशास्त्राशी तर त्यांचा काही मेळ नसतो. त्यामुळं तुपाच्या पाचसहा थेंबांचीच धार निम्मी आमटीच्या वाटीत आणि बाकीची मिठात जाते. भाताची शितं टेबलावर वि

sampadkiya of 13 JUNE 2011

अराजक योग `हे सरकार खाली खेचलेच पाहिजे' अशी प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुखांनी बाबा रामदेव प्रकरणात त्त्वरित दिली. सामान्य माणसाच्या तात्कालिक उचंबळत्या भावनांना शब्दरूप देण्यात ते वाकबगार आहेतच. त्यामुळे रामदेवांना व त्याहीपेक्षा त्यांच्यावर (अंध?)श्रद्धा ठेवणाऱ्या भगतांना सरकारने ज्या प्रकारे वागवले त्यावर सहज उमटणारी  सर्वसामान्य प्रतिक्रिया सेनाप्रमुखांनी नेमकीच व्यक्त केली आहे. इतरही पक्षांनी सरकार खाली खेचण्यासाठी त्या खुर्चीचेे पाय पकडून ठेवले आहेत. आहे ती व्यवस्था वाईटच आहे. तरीही ती उधळून टाकणे किंवा नाहीशी करणे हे पोरपण देशकारणातील मुत्सद्देगिरीत लागू पडत नाही. तिथे तातडीने पर्याय उपलब्ध असावा लागतो. एखादा खोंबारा लागून पोराचा कपडा फाटला तर तो अंगातून काढून फेकणारे पोर दुसऱ्या नव्या अंग्यासाठी भोकाड पसरते किंवा प्रसंगी नागवे फिरते. देशकारणात असली पोराटकी कशी चालणार? काही दुर्दैवी घटनेत उच्चस्थानच्या व्यक्तीचे बरेवाईट झाले तर पुढच्या विधींची वाट न पाहता तात्पुरत्या कोणा पर्यायीचा शपथविधी करावा लागतो. एखादे मंत्रीमंडळ गडगडले तरी दुसरी व्यवस्था होईपर्यंत त्यास पद सांभाळून राहावे

samvad

याला उत्तर काय?  जपानचा भूकंप-त्सुनामी पाहतो, वाचतो आहोत. जपानी माणूस शांतताप्रिय, निसर्गप्रेमी, बौध्दभक्त, शिस्तप्रिय, कार्यमग्न, सेवातत्पर, स्वच्छताप्रेमी, प्रामाणिक, देशभक्त, मानवहितैषी इत्यादी सद्गुणांनी परिपूर्ण असूनही निसर्गाची-देवाची त्यावर अवकृपा का? हजारोंना दिलेली मृत्युदंडाची शिक्षा का? लाखोंच्या जीवनाची अशी परवड का? त्यासोबत पशु-पक्षी, वनस्पती या सर्वांचा विनाश का? देव खरंच इतका अन्यायी-निर्दयी आहे का? विज्ञानाकडून या आपत्तीस उत्तर आहे. हे का व कसे घडले हे विज्ञान सांगते, पण या सगळयाला `देवा'ची कारणमीमांसा काय आहे? - रा.खु.भावसार  ई-७, अंबड एमआयडीसी, नाशिक संवाद  हा प्रश्नस्वरूपी विषय प्राचीन काळापासून अनेकांच्या संदर्भात चर्चिला जात असतो. पुष्कळ स्वयमासक्त लोकांना `मी इतका चांगला वागतो तरी माझ्याच नशीबी हे भोग का?' असा प्रश्न नेहमी पडतो. त्यास निर्विवाद उत्तर देण्याची पात्रता नाही, पण त्या संदर्भात मत मांडता येईल.  भूकंप-त्सुनामी हे निसर्गखेळ एकूण ज्ञात विश्वाच्या पसाऱ्यातही `फार मोठे' नव्हेत, अज्ञाताचा वेध घेणाऱ्यांना तर ही क्षुल्लक हालचाल वाटेल. केवळ जपान

Tristhali

यांचा अपवाद नसावा  प्रधानमंत्री मनमोहनसिंग गेली २० वर्षे खासदार आहेत. ते आसाममधून राज्यसभेवर निवडून येतात. लोकसभेच्या थेट निवडणुकांचा धबडगा त्यांना सोसणार नाही, पण त्यांच्या बुद्धी-अनुभव-कौशल्य यांचा उपयोग देशाला व्हावा म्हणून ते राज्यसभेवर `आणले' जातात. त्यात वावगे काहीच नाही. परंतु त्यामुळे ते स्वत: आसामच्या पत्त्यावर असतात. म्हणजेच आसामातील मतदारयादीत त्यांचे व त्यांच्या पत्नीचे नाव आहे.  नुकतेच आसाममधील विधानसभेचे मतदान झाले, त्यात मनमोहनसिंग व त्यांच्या पत्नीनी मतदान केले नाही हे तीव्र आक्षेपार्ह आहे. भारतीय राज्यघटनेने मताचा `अधिकार' दिला आणि मतदान हे लोकशाहीतील मूलभूत कर्तव्य असल्याचे म्हटले जाते. ते मूलभूत कर्तव्य पंतप्रधानच करत नाहीत हे लाजिरवाणे आहे. भारतातील राजकारण अशा थराला गेले आहे की, तरूण साक्षरांना मतदानाचा उबग आहे. मतदान कमी होण्यामुळे खरे प्रतिनिधित्त्व होत नाही, म्हणून मतदान सक्तीचे करावे असाही मतप्रवाह आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री व त्यांच्या पत्नीनी मतदान न करण्याचे समर्थन होणार नाही.  जे प्रशासकीय कामात असतात अशा पोलिस, निवडणूक कर्मचारी, सीमेवरच

advertisement

तुम्हाला काय हवं? आणि तुम्ही काय द्याल?  शिक्षणासाठी, औषधोपचारासाठी आर्थिक मदत - शहरात राहण्यासाठी `आपुलकीचं' घर, चार दिवस निवांत खेड्यात राहण्यासाठी `आपलं' ठिकाण, चांगली सून, चांगला जावई, चांगली सोबत, नोकरी, एजन्सी, प्रशिक्षण - अनुभव, घर, स्थावर, वाहन वगैरे......  तुम्हाला जे पाहिजे किंवा जे तुमच्याकडं आहे ते आपल्या लोकांना सांगा. आपली थोडक्यात माहिती, आणि अपेक्षा कळवा. या अंकातून सर्वांना समजू शकेल. अर्थातच त्यासाठी ठराविक काही शुल्क नाही.  ऐच्छिक सहभागासाठी `भिक्षांदेहि'ची साद आहेच.  आपले नाव प्रगट करायचे नसेल तर तसे कळवावे. मात्र ज्या नावावर अंक येत असतो ते नाव-पत्ता-फोन आम्हास कळविणे आवश्यक.  प्रेस धंद्यात तसेच संपादन - वितरण इ.साठी उमेदवार पाहिजेत. पुढे-मागे सर्वच जबाबदारी देऊ शकू.  शहरी कोलाहलापासून दूर पण दळणवळणाच्या सोयी असलेल्या ठिकाणी  २८०० मीटर रम्य जागा. वनविहार-निवास या दृष्टीने विकसित करून    व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांनी लिहावे. संपर्क :  वसंत आपटे, वाल्मिकी (प्रेस), किर्लोस्करवाडी   (जि.सांगली) ४१६३०८ फोन : ०२३४६-२२२०५८, २२२५५८

sampadkiya of 25 april2011

गाभारा देवीचा राहो कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील गाभाऱ्यात यापुढे महिलांनाही प्रवेश राहील. यासाठी वास्तविक आंदोलन करावे लागावे हेच कालविसंगत आहे. परंतु शासन-प्रशासन क्षेत्रातील राजकीय मंडळींच्याच हाती प्रश्न गेल्यावर धडकमोर्चा, डांबरफासो, हल्लाबोल याशिवाय गत्यंतर नाही. दुसरे हेही खरे की, आंदोलनाचा नारा घुमेपर्यंत हा असा काही प्रश्न आहे असेही  फार कुणाच्या गावी नव्हते. कोल्हापूरचे शाहू छत्रपती-फुले-आंबेडकर यांचा त्रिकाल जप करून स्वत:भोवतीच फट्कारी सोंगाचे पुरोगामित्त्व घुमवणारे पक्ष व संघटनांऐवजी अंबाईच्या गाभाऱ्यात घुसखोरी करणारे भाजप आणि मनसे हे तथाकथित जातीयवादी पक्ष, आणि पुष्कळशा `ब्राह्मण्यवादी' महिला हे पुढे होते. पुजारी, देवस्थान मंडळ, जिल्हाधिकारी हेही सर्व `ब्राह्मण्यवादी' असून त्यांनी सामोपचाराची भूमिका घेऊन फार न चिघळता योग्य बदल अनुसरला. एकंदरीत जी गोष्ट झाली ती स्वागतार्ह आहे. पंढरपूरच्या सार्वजनिक मंदिरप्रवेशासाठी (पुन्हा `ब्राह्मण्य'च) साने गुरूजींनी उपोषण केले त्याला पाचसात दशके उलटली. त्या काळात मंदिरप्रवेश करीत असलेला अस्पृश्य कसा ओळखू येई असा एक प्रश्न

marketing method

मार्केटिंग पद्धती  सकाळी लवकर फिरायला बाहेर पडून बोळकांडीतून मोठ्या रस्त्याला लागलं तर तिठ्ठ्यावर चतकोर भाकरी-लिंबू-मिरची वगैरे कुणी त्रस्त समंधानं ठेवलेलं दिसतं. अमावास्या लक्षात येते. पुढचा मैलभर रस्ता विरळ होत गावातून बाहेर पडतो, तिथवरच्या प्रत्येक दहावीस पावलांवर ही आरास दिसते. झुंजुमुंजू दिसू लागल्यामुळं रस्त्याची माणसं ही बला चुकवीत पाय टाकत असतात. पूर्वी पिचत् कुठंतरी केव्हातरी हा उतारा दिसायचा. हल्ली त्याचंही प्रमाण खूप वाढलं आहे. सध्या सगळयाच गोष्टींना मार्केट चांगलं आहे म्हणतात; त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ जोरात आहे, शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढूनच देवदर्शन करणारी हट्टी आंदोलनंही जोरात आहेत, आणि ही उतारे-मंतराची दृष्टही खूप फोफावली आहे.  महामार्गावर गाडी टोलनाक्यावर थांबली, तशी आरडाओरड करत वस्तूविके घोंघावत येतात. त्यात शनिवार-अमावास्या असेल तर मिरची-लिंबू माळा लोंबत पुढे आणणारी पोरं खूप असतात. महामार्ग वाढले, कार-वाहनं वाढली, तसं हे लिंबू-मिरचीवालेही वाढले. एकदा कोल्हापूर-पुणे महामार्गावरच्या टोलनाक्याशी रांगेत थांबलो तर तीन-चारजण तसल्या माळा घेऊन भोवती आले. आमच्य

ICE-CREAM & TEA

 एक सरदारजी दुकानात जातो. तिथे त्याला एक नवी वस्तू दिसते. तो विचारतो, `हे काय आहे?' दुकानदार उत्तरतो, `थर्मास - तुम्ही यात थंड पदार्थ भरून ठेवला तर तो तीन-चार तास तसाच थंड राहतो किंवा गरम पदार्थ भरून ठेवला तर तो तीन-चार तास गरम राहतो.'  सरदारजीला ती वस्तू फारच आवडते नि थर्मास विकत घेऊन तो घरी येतो. मग तो त्यात आईस्क्रीम भरून ठेवतो. ते तीन तास घट्ट राहतं. चहा भरून बघतो. तोही तीन तास गरम राहतो. सरदारजी एकदम खूष होतो. कधी एकदा आपल्या मित्राला ती वस्तू दाखवीन असं त्याला होऊन जातं. तो मित्राकडे जातो नि त्याला तो थर्मास दाखवतो.  `हे काय आहे?' मित्र विचारतो.  `थर्मास! अरे काय अफलातून वस्तू आहे ही! हिच्यात आईस्क्रीम ठेवलं तर ते तीन तास तस्संच राहतं अन् चहा ठेवला तर तोही तीन तास तस्साच गरम राहतो.''  `खरं की काय!' मित्रही आश्चर्यचकीत होतो.  `मग; तुला खोटं वाटतंय की काय? थांब तुला पुरावाच दाखवतो. मी ह्यात दोन्हीही भरून आणलंय. तुला काय पाहिजे बोल..!'  - थर्मासात एकाचवेळी आईस्क्रीम आणि चहा भरणाऱ्या सरदारजीला आपण हसतो पण त्याचवेळी विकास आणि पर्यावरण संरक्षण हे दोन्ह

sampadkiya of 30may2011

कोण नागर, कोण गावंढळ! लोकपाल विधेयक लवकर मंजूर व्हावे यासाठी ते येत्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्याचा मसुदा तयार करण्यासाठी एक समिती गठित झाली. आजपर्यंत असे विधेयक तयार करण्याचे काम सभागृहाचे सदस्य सरकारच्या वतीने करीत, किंवा कोणी सदस्य स्वत: तयार करून - म्हणजे कुणाकडून तरी करवून - ते सदनात मांडत, त्या अशासकीय विधेयकावर चर्चा होऊन, दुरुस्त्या, सूचना यांसह ते संमत होण्याचा प्रघात होता. यावेळी प्रथमच हे विधेयक तयार करणाऱ्या समितीत बाहेरचे लोक आहेत. वास्तविक सदनातील सदस्य हे लोकांचेच प्रतिनिधी आहेत पण ते `शत्रू-सरकार पक्षा'तील मानल्यामुळे या बाहेरच्यांना सामान्य जनांचे प्रतिनिधी असे त्यांनीच स्वयंस्फूर्तीने मानले आहे. जनलोकपाल नावाची एक हापीसर यंत्रणा यायची, तिचा कायदा करण्यात हे नागर-जन सहभागी होणार. ज्याचा उल्लेख आण्णा हजारेंनी त्यांच्या उपोषणकालात `सिव्हिल सोसायटी' असा खूपदा केला, त्या सुजाण वर्गाचा वचक आणि नियंत्रण लोकपालावर असावा असे  सर्वांनी गृहित धरले आहे. असा सुजाण, कर्तव्यदक्ष, निष्ठावान, विवेकी, समाजहितैषी वर्ग म्हणजेच सिव्हिल सोसायटी असा अर्थ

book of sampadkiya

आपले जग या अंकातील संपादकीय लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने करावा अशी खूप वाचकांची सूचना होती, तशी जुळवाजुळव सुरू आहे. सुमारे २०० पृष्ठांचे पुस्तक प्रकाशित करायचे आहे.  पृष्ठसंख्या : सुमारे २०० छापील किंमत : २००/- ३१ जुलैपर्यंत (प्रकाशनपूर्व) नाव नांेदल्यास किंमत रु.१००/- आपण कोणत्याही प्रकारे साहाय्य करू शकता. ं या प्रकल्पासाठी मदतरूपात देणगी   ं फक्त रु.८००/- भरून १० प्रतींची नांेदणी (टपालखर्चासह) ं आपापल्या संपर्कातील व्यक्ती, संस्था, नियतकालिके, ग्रंथालये यांच्यामार्फत प्रसार व नोंदणी ं शुभेच्छा व आशीर्वाद

geeta tatparya

आद्य शंकराचार्य आणि लोकमान्य टिळक यांचे गीतातात्पर्य  आद्य शंकराचार्यांच्या संदर्भामध्ये लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यावर सांप्रदायिक टीकाकारांनी जी टीका केली आहे त्यामध्ये एका परिमाणाचा विचार केलेला नाही. ते परिमाण म्हणजे आद्य शंकराचार्यांचा गीतातात्पर्य निर्णय आठव्या शतकातील असून लोकमान्यांचा १९ व्या शतकातला आहे. जवळजवळ ११ शे वर्षांचे अंतर आहे. परिस्थितीत बदल नक्कीच झालेला आहे. आद्य शंकराचार्यांच्या वेळेला बौद्ध जीवनपद्धतीचा परिणाम होता तर टिळकांच्या काळामध्ये ब्रिटीश सत्ता होती. म्हणून आद्य शंकराचार्यांच्या समोरचा प्रश्न हा बौद्ध प्रभावाचे निर्मूलन करून वैदिक धर्म व संस्कृतीची पुनर्स्थापना करणे हा होता तर लोकमान्यांची समस्या परकीय सत्ता परास्त करून स्वराज्य संस्थापनेचा होता. म्हणून कर्मसंन्यास हे गीतेचे तात्पर्य म्हणून आद्य शंकराचार्यांनी प्रतिपादन केले तर लोकमान्यांनी कर्मयोग हे तात्पर्यसुद्धा काळाची आवश्यकता म्हणून प्रतिपादन केले.  बौद्ध भिक्षूंच्या संन्यस्त जीवनाचा प्रभाव वैदिक धर्मियांवर पडून मिमांसकांच्या वैदिक कर्मकांडाचा प्रभाव निष्प्रभ झाला होता. वैदिक धर्म आणि संस्कृती यां

PARASHURAM

...... भाष्यकार ......  `भाष्यकार' म्हटले की जगद्गुरू आद्य शंकराचार्य डोळयापुढे येतात, इतका तो शब्द त्यांच्या नावाशी जोडला आहे. लोकमान्य म्हणजे लोकांनी मानलेला, मान्यता दिलेला. पण तो शब्द लोकमान्य झाला तो टिळकांमुळे.  आजकाल शब्दांचे अर्थ लावताना कसेतरी शब्द वापरले जातात त्यामुळे शब्दाचे अवमूलन होते. काही शब्दांच्या वापराची काही काळ लाट येते. कार्यसम्राट, दिग्गज, महर्षी, आचार्य असे शब्द लंग्यासुंग्या व्यक्तींसाठी वापरून कोणी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवतो तेव्हा ती लाचारी चाणाक्षांच्या नजरेतून सुटत नाही.  धर्माच्या अत्यंत प्रतिकूल काळात शंकराचार्यांनी वैदिक धर्माची पुन्हा प्रस्थापना केली. त्यासाठी ब्रह्मसूत्रे, उपनिषदे व भगवद्गीता यांच्यावर भाष्ये रचली. ती आपल्या शिष्यांना शिकविली. ज्ञानकांडाची प्रस्थापना केली व चौदिशांना चार मठ स्थापून धर्मव्यवस्था लावून दिली. हा सगळा विषय श्रीशंकर दिग्विजय या विद्यारण्यस्वामींच्या ग्रंथात आहे. तो आता मराठीत उपलब्ध आहे.  गूढ अनाकलनीय अशा वाक्यांचा सुसूत्र अर्थ स्पष्ट करून सांगणे म्हणजे भाष्य. वेद हे अपौरुषेय असल्याने त्यावर भाष्य कुणीही करावे

sampadakiya of 16 may 2011

सत्ताकारण चालेल; आवश्यक नाही `राजा कालस्य कारणम्' असे म्हणतात. आपल्या सभोवतीची सगळी घडी विस्कटून गेली आहे हे तर आपण पाहतोच आहोत. त्या अराजकाला राज्यकर्ते, आणि निर्नायकीला आजचे नायकच कारणीभूत आहेत हे बव्हंशी खरे आहे. परंतु  ही स्थिती ज्यांना कळते, त्याची कारणे ज्यांना कळतात, त्यावरचे उपायही ज्यांना सुचतात असे प्रजानन, ते उपाय का सुरू करत नाहीत असा प्रश्न आहे. तशी काही कृती करणे आटोक्याबाहेर असेल तर त्यांस `उपाय' म्हणत नाहीत. उदाहरणार्थ `अमेरिकेचा नक्शा उतरवायचा असेल तर आपली फौज व्हाईट हाऊसमध्ये घुसवावी...' याला उपाय म्हणत नाहीत. जे आपल्यास करण्याजोगे आहे तेच उपाय पुढे आले पाहिजेत. राजकीय परिस्थिती सुधारली पाहिजे याबद्दल वाद नाही, पण ती सुधारण्यासाठी आपण त्यात घुसले पाहिजे का? स्वत:चा पक्ष काढावा, निवडणुका लढवाव्यात याची गरज आहे का; आणि `उपाय' म्हणून तसे केल्यास ते किती `उपायकारक' होईल असा विचार केला पाहिजे. राजकारणावर सध्या सर्वांचा भर असतो. कोणत्याही क्षेत्रात राजकारण आहे. लागेबांधे-हितसंबंध असले तरच काही करता येते, लाचखोरी बोकाळली आहे आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे