Skip to main content

panchgavya

पंचगव्य

 वेद काळापासून गाय ही शेती व्यवसायाशी अत्यंत निगडीत आहे. गाईला सर्व धर्मांत व शास्त्रात पवित्र मानले गेले आहे. `गावो विश्वस्य मातरम्' असे म्हटले आहे. गाईच्या स्वामित्वासाठी युद्धे होत व गोधन ज्याच्याकडे जास्त तो सामर्थ्यवान, वैभवसंपन्न व शूरवीर समजला जात असे. गोमय, गोमूत्र व दुध, गाईचे तूप, गाईचे दही या पंचामृताची आहुती यज्ञांमध्ये देत असत. याला आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. गाईच्या या पाच पदार्थांच्या मिश्रणास पंचगव्य म्हणतात.
 शेणाने सारवलेल्या जमिनीत कीड व बुरशीनाशक गुणधर्म कसे येतात हे पाहण्यासाठी एक प्रयोग केला गेला. गोमय व गोमूत्र एकत्र करून ते १० हजार आरपीएम ने घुसळले. तापमान वाढू नये म्हणून तेथे थंड करण्यासाठी शीतपद्धती वापरली. त्या मिश्रणातील रस बाहेर काढला. तो रस पेट्नीडिशमध्ये अगार हे माध्यम वापरून त्यावर घेतला. सर्व प्रकारच्या बुरशी त्यावर सोडल्या. कोणत्याही बुरशीची वाढ झाली नाही. अगदी इकोलाय व साल्मुनेला बुरशीपण रोखल्या गेल्या. हा कीड व बुरशीनाशक गुणधर्म आहे.
 वशिंड व आकाशाकडे टोके असणारी शिंगे धारण करणारी भारतीय गाय कोणत्याही तापमानात राहू शकते. तिच्या गळयातील पोळीमध्ये तापमान सहन करण्याची शक्ती आहे. गाईच्या खाण्यात विषारी पाला आला तरी तिच्या दूधावर दुष्परिणाम होत नाही. गाईच्या वशिंडात `सूर्यकेतू' नावाची नाडी आहे. सूर्य प्रकाशात ती कार्यान्वित होते. सूर्यापासून आलेले सुवर्णभार यातूनच तिच्या दुधात, शेणात व गोमूत्रात मिसळतात. त्यामुळे सर्व रोगनाशक, सर्व विषनाशक गुणधर्म प्राप्त होतात. गाय नेहमी कोवळया/हलक्या उन्हात राहणे पसंत करते.
 भारतीय वंशाच्या गाईमधून बाहेर पडणारी ऊर्जा ही इतर सर्व प्राण्यांहून जास्त असते. देवाच्या फोटोत त्याच्या चेहऱ्यामागे एक तेजोवलय (आभा मंडल) दाखविलेले असते. प्रत्येक प्राणिमात्राला असेच तेजोवलय असते. ते त्याच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या ऊर्जेचे द्योतक असते. डॉ.मूर्ती या न्यूक्लिअर शास्त्रज्ञाने या ऊर्जेचे मोजमाप केले आहे. मनुष्य प्राण्यांचे आभा मंडल २.५ ते २.८ मीटर असते. तर गाईची आभा ऊर्जा ४.५ ते ६ मीटर असते. गाईच्या तुपाची आभा ऊर्जा १४ मीटर, शेणाची ६ मीटर, गोमूत्राची ८.९ मीटर, दुधाची १२ ते १३ मीटर, दह्याची ६.५ ते ६.७ मीटर असते. ही सर्व मोजमापे युनिव्हर्सल थर्मोस्क्रॅनरच्या सहाय्याने घेतली आहेत. गाय आपल्या उच्छ्वासातून प्राणवायू सोडते. गाईच्या शरीरातून गुग्गुळ नामक पदार्थ गंधरूपाने बाहेर पडतो त्यामुळे प्रदूषण नष्ट होते.
 कोडूमुडी येथील शंकराच्या देवळात डॉ.नटराजन गेले होते. त्यांना पंचगव्याचा तीर्थप्रसाद देण्यात आला. कुतुहलाने डॉ.नटराजन अंतर्मुख झाले. गाईच्या आंबवलेल्या मलमूत्रापासून माणसातील रोगांवर कसे औषध तयार करता येईल याचा विचार सुरू झाला. सलग तीन वर्षे पंचगव्य या सेंद्रीय पदार्थावर ते प्रयोग करत राहिले. पंचगव्यामुळे वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढते व वाढ चांगली राहते ही त्यांची निरीक्षणे आहेत. डॉ.नटराजन यांनी त्यांच्या भागाील संशोधक शेतकऱ्यांच्या सहकार्याने त्याचे थोड्या वेगळया पद्धतीने प्रमाणीकरण केले आहे.
 वशिंड व शिंगे ही भारतीय गाईच्या ओळखण्याच्या खुणा आहेत. वशिंड हे अंतरिक्ष लहरींना अती संवेदनशील असते. भारतीय वंशाच्या गाई आणि बैल त्यांचे वशिंड हाताने दाबले तर त्या गुडघे टेकतात. खच्चीकरण केल्यानंतर बैलाच्या वशिंडाचा आकार लहान होतो. त्यांचे वशिंड व प्रजनन क्षमता यामध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन