Skip to main content

Posts

Showing posts from February, 2017

13 Feb 2017

माझी बहादूरवाडी : `आतून' आलेला उपक्रम विश्रामबाग शिक्षण संस्थेचे अध्वर्यु श्री.टी.डी.लाड(वय८३) यांनी अनेकविध शैक्षणिक व पूरक कार्यांत प्रत्यक्ष सहभाग घेतलेला आहे.  प्रारंभकाळात या हाडाच्या शिक्षकाने केलेला प्रयोग, आजच्या खऱ्या शिक्षकाला दिशा दाखवून देईल. बहादूरवाडी येथे नवीन हायस्कूल निघणार असल्याचे समजले. शाळेची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारावी म्हणून पत्र आले होते. गावची चौकशी करता अनेक बाबतीत ते प्रतिकूल असल्याचे समजले. स्वातंत्र्यानंतरचे नवीन विचार या गावात आणण्यास पुष्कळ वाव आहे, याची खात्री झाली. जीवनातील एक धाडसी प्रयोग करण्याच्या हिंमतीने व आत्मविश्वासाने मी बहादूरवाडीला जाण्याचा निर्णय घेतला. जून १९६०. कुंडल-सांगली-पडवळवाडी असा प्रवास करीत पडवळवाडीहून चालत ४ कि.मी. गोटखिंडी या गावी मुक्काम केला. पुढे ५कि.मी. चालत बहादूरवाडी गाठली. डोक्यावर ट्न्ंक, किरकोळ भांडी, चटई, छत्री, केरसुणी, दुसऱ्या हातात कंदील घेऊन धोतर-शर्ट-टोपी अशा पेहरावात मी थेट शाळेत प्रवेश केला. गावात इंग्रजी शाळा निघण्याचे कौतुक, त्यात नवीन आलेल्या शिक्षकाला बघण्यासाठी गर्दी झाली होती. काही दिवस ऑफिसम

30 jan 2017

धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा जालीकट्टू तामीळ वातावरण अुर्वरित भारताशी  नेहमीच जरा फारकत घेणारे असते. तिथल्या राजकारणाचे रंग, चित्रपट कलाकारांचा लोकांवरील प्रभाव, तेथील धार्मिकता, आहार-वेशभूषा-भाषा आणि कलासुध्दा सगळया बाबतींत तिथे वेगळी वैशिष्ट्ये असतात. पण त्या विविधतेत अेरवी सांगितली जाणारी अेकता बाकीच्या भरतखंडात लागू करायची झाली तर पंचाआीत होते. आजकाल सगळया भारतात यच्चयावत् प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचे भरते आलेले आहे.  त्यात कोणतीही तर्कसंगती नाही, परंतु तथाकथित प्राणीप्रेमी चळवळी त्या प्रेमाच्या अुमाळयाचे कढ आणून, नसत्या राजकारणात सगळया सरकारांना फरफटत नेत असतात. तामीळनाडू भागात जालीकट्टू हा बैलांचा खेळ चालतो, तो तेथील धार्मिक परंपरांशी जोडला गेलेला आहे. आपल्याकडे शिराळयाची नागपंचमी तशीच `धार्मिक' बनली आहे. त्यात धर्म काय असतो तो असो, पण त्या प्रकरणात शासन आणि प्रशासन विनाकारण कामाला लागते. आपण आपल्या घटनेप्रमाणे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वीकारली आहे. परंतु धर्मनिरपेक्षतेची नेमकी व्याख्या अद्यापि करता आलेली नाही; आणि ती कदापि करता येणार नाही. मुळात `धर्म' म्हणजे काय हेच ठरवता