Skip to main content

30 jan 2017

धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा जालीकट्टू
तामीळ वातावरण अुर्वरित भारताशी  नेहमीच जरा फारकत घेणारे असते. तिथल्या राजकारणाचे रंग, चित्रपट कलाकारांचा लोकांवरील प्रभाव, तेथील धार्मिकता, आहार-वेशभूषा-भाषा आणि कलासुध्दा सगळया बाबतींत तिथे वेगळी वैशिष्ट्ये असतात. पण त्या विविधतेत अेरवी सांगितली जाणारी अेकता बाकीच्या भरतखंडात लागू करायची झाली तर पंचाआीत होते. आजकाल सगळया भारतात यच्चयावत् प्राणीमात्रांवर प्रेम करण्याचे भरते आलेले आहे.  त्यात कोणतीही तर्कसंगती नाही, परंतु तथाकथित प्राणीप्रेमी चळवळी त्या प्रेमाच्या अुमाळयाचे कढ आणून, नसत्या राजकारणात सगळया सरकारांना फरफटत नेत असतात. तामीळनाडू भागात जालीकट्टू हा बैलांचा खेळ चालतो, तो तेथील धार्मिक परंपरांशी जोडला गेलेला आहे. आपल्याकडे शिराळयाची नागपंचमी तशीच `धार्मिक' बनली आहे. त्यात धर्म काय असतो तो असो, पण त्या प्रकरणात शासन आणि प्रशासन विनाकारण कामाला लागते.

आपण आपल्या घटनेप्रमाणे धर्मनिरपेक्ष लोकशाही स्वीकारली आहे. परंतु धर्मनिरपेक्षतेची नेमकी व्याख्या अद्यापि करता आलेली नाही; आणि ती कदापि करता येणार नाही. मुळात `धर्म' म्हणजे काय हेच ठरवता येत नाही, तिथे तो शासकीय चैाकटीत बसवायचा कसा, किंवा त्यावर बंदी घालायची तरी कशी? शासनाच्या ताज्या आदेशानुसार शासकीय कार्यालये-शाळा यांतून साऱ्या धर्माच्या व देवांच्या प्रतिमा हलविणे भाग पडणार होते. आज कित्येक शासकीय आवारात प्रतिमाच काय, भव्य मंदिरे अुभी राहिली आहेत. ती हलवायचे काम सोपे नाही. घटनेप्रमाणे ती मंदिरे तिथे अुभी राहणे चूक होते, पण तशा कित्येक घटनाबाह्य गोष्टी पाहून चुप्प बसण्याची सवय आपल्याला लावून घ्यावी लागते. पोलीस स्थानकांतही मंदिरे आहेत, आदेशाने ती काढून टाकणे कठीण, कारण पाोलीस झाले तरी आिथलीच माणसे आहेत. वर्दी अंगावर घालून आपल्या जागेवर येताना कितीतरी पोलीस माणसे तिथल्या पायरीला वाकून नमस्कार करतात. म्हटले तर ते धार्मिक वागणे आहे. पोलीस स्थानकांत गणपती बसतात, वर्दीचे अधिकारी आीदला आिफ्तारपार्टीला जातात. कोणते वागणे धार्मिक आणि कोणते निरपेक्ष हे कसे ठरविणार? त्याला सरसकट घटनाबाह्य ठरवून मोकळे होता येत नाही. तसे करू पाहिले तर लोक ती घटनाच दूर करतील व त्याचा जालीकट्टू होआील.

जालीकट्टू हा खेळ बैलांच्या दृष्टीने क्रूर ठरवून त्यास बंदी घातली गेली, तोच निकष लावून आपल्या नागपंचमीवर संक्रांत आली. कोणे अेके काळी त्या परंपरा पडल्या, त्यात निसर्गाची पूजा बांधण्याची - त्याचा सुरम्यपणे आस्वाद घेण्याची कल्पना असेलही, त्यांना धर्माच्या चौकटीत बसविण्यामुळे माणसे त्यांचे `व्रत' म्हणून पालन करतात. तथापि त्या व्रतांचाच बाजार होअून त्यात अवैज्ञानिक अधार्मिकता आपोआप परंपरेतूनच शिरते. ती थोपवायला हवी, कालानुरूप बदलायला हवी; पण ते मात्र राहून जाते. अेकादशीच्या व्रताला लंघन किंवा अल्पाहार घेण्याअैवजी दाणे साबूदाणे रिचवण्याची धार्मिक परंपरा होते. पण ते अधार्मिक, अवैज्ञानिक असूनही अेकादशी मोडण्याचा शासकीय आदेश काढून चालणारच नाही. ती धार्मिक निरपेक्षता नव्हे तर धर्मात ढवळाढवळ मानली जाणार. लोकभावनांच्या नावाखाली झुंडशाहीचा अुद्रेक होणार! जालीकट्टूच्या निमित्ताने तेच घडत आहे. जालीकट्टूला परवानगी दिली की नागपंचमीची मागणी होणारच, आणि मग शासकीय आवारातल्या देवांनी तरी काय घोडे मारले आहे? त्यांना कसे हुसकणार? त्यांना उदबत्ती-आरती करत राहावे लागणार!

`शासकीय कार्यालयांत राष्ट्न्पुरुषांच्या प्रतिमा लावायच्या, धार्मिक प्रतिमा नाहीत;' - या आदेशातून नसत्या कटकटी आणि कोर्टबाजीच्या हाणामाऱ्या अुद्भवणार आहेत. फारतर पुतळेफोडीच्या जातीतले प्रकारही सुरू होतील. म.फुले यांना राष्ट्न्पुरुष म्हटले की, सावरकरांना का म्हणायचे नाही? आिथे तर शैव आणि वैष्णव यांच्यातही भेद चालतात; ते दोघेही धार्मिक असल्याचे मानण्यात येते. कोणाची प्रतिमा ठेवायची? दोन्ही काढायच्या म्हटले तर माणूसच अुध्वस्त होआील. शिवाजी महाराज कार्यालयात ठेवण्याबाबत मान्यता असली पाहिजे, पण मग राम - कृष्ण का  नाहीत? -ते राष्ट्न्पुरुष नसून धर्मपुरुष ठरवायचे का? आंबेडकर-गांधी यांच्यापुढे उदबत्ती लावून त्यांना देव करणारेही आहेत.

जालीकट्टूच्या खेळाला धर्मातून काढून लावले, आणि आजच्या विज्ञान चौकटीत बसवायचे म्हटले तर गोंधळच वाढणार आहे. शास्त्रीय गायन कितीही शास्त्रीय असले तरी ते साऱ्यांना रुचत नाही. रविशंकरची सतार आणि रेड्यांची टक्कर यांतले अधिक रंजक कोणते हे त्या त्या समाजगटाने ठरवायचे असते. आपल्या धार्मिक गणेशोत्सवातील डॉल्बीचा दणदणाट घटनाबाह्य असतो. तो सभ्य म्हणवणाऱ्या नागर वस्तीतही चालतो, आणि अेरवी घटनेच्या शिल्पकाराचे अनुयायी म्हणविणाऱ्या लोकांतही चालतो. तो बंद करणे आजपर्यंत तरी कोणत्याही शासनाला, घटनादत्त अधिकार असूनही - शक्य झालेले नाही. परस्परांना जातीयवादी ठरविणाऱ्या राजकारणी जातींची लक्तरे  अशा धार्मिक परंपरांच्या कारणाने वेशीवर टांगली जातात. त्यांतून मग रस्त्यांतील दहीहंडी धार्र्मिक होते, आणि रस्ते अडवून बसलेल्या देवांच्या  घुमट्या,  लबाडांना राजकारणी राजरस्ते आखून देतात.

जालीकट्टूच्या खेळात क्रूूरता असेल, पण  गायीला ठार  मारण्यात ती  क्रूरता अन्यायी नसावी. दहीहंडीला बंदी घालण्यास कायदा होतो, पण जीवघेणे बॉक्सिंग चालते... ते कमी क्रूर असेल. बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी आहे, पण घोड्यांची रेस चालते. हरणांची शिकार करणाऱ्या सिनेमा नटाला शिक्षा नाही, पण आपल्या शेतातले अुभे पीक खाणाऱ्या मोकाट हरणाला किंवा माकडाला मारणाऱ्या शेतकऱ्यांस शिक्षा होते. भटक्या कुत्र्यांचा अुपद्रव चालतो, पण कुण्या संस्थानिकाने दारी हत्ती पाळायचा तर त्याला बंदी आहे. प्रकाश आमटे यांना वन्य प्राण्यांविषयी असलेल्या करुणाजन्य जवळिकीचे कौतुक राष्ट्न्पतींनी मानपत्रात केले पण त्यांच्याकडे पाळलेले प्राणी हे बेकायदेशीर कृत्य असल्याचा ठपका वनखात्याने ठेवला होता. हे जेवढे अतार्किक वेडगळपणाचे आहे, तितकेच या प्राणीप्रेमाच्या दांभिक सरकारी न्यायाचे आहे.

आचार्य अत्रे यांची अेक सदाबहार कथा आहे. पावसात कुडकुडलेल्या अेका कुत्र्याच्या पिलाला बालसुलभ करुणेतून चिंतू नावाचा अेक मुलगा घरात आणतो, त्या पिलाला कोरडे करून दूध पाजतो. पण त्याची आआी मात्र घरात ही घाण नको म्हणून `चिंत्या मेल्या, टाक ते पिलू! अरे हड् हड' करून फेटाळते. त्याचे बाबा तर त्या पिलाचे मानगूट पकडून दूर पावसाळी रस्त्यात फेकतात, आणि चिंतूला धपाटा घालून धडा वाचायला लावतात. अपार  भूतदयेने पिळवटलेला चिंतू डोळे पुसत धडा वाचू लागतेा, ``...प्राण्यावर दया करा...'' आजचा हा सारा दांभिक राजकारणी न्याय लक्षात घेता, त्यात धर्म नाही, परंपरा नाही, विज्ञान नाही   अथवा न्यायबुध्दीही नाही. मौज अशी की, परंपरावादी  हिंदुत्ववादी म्हणून ज्यांची हेटाळणी केली जाते, त्या राजकीय पक्षाने महाराष्ट्नतील शासकीय जागांतून धर्मप्रतिमा हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता; आणि त्याच पक्षाच्या विरोधात धर्मनिरपेक्ष म्हणून अेकत्र येअू पाहणाऱ्या तामीळवाद्यांनी बैलखेळाच्या धार्मिक परंपरेचे रक्षण करण्यासाठी आंदोलन पुकारलेे आहे.

समाजप्रिय झाला तरी, माणूस हाही अेक प्राणीच आहे, हे खरे!

 डिजिटल अर्थव्यवस्था
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) सुंदर पिचाई यांनी आयआयटी खरगपूर येथे शिक्षण घेतले. पिचाई यांनी तब्बल २३ वर्षांनंतर तेथे भेट दिली. 
यावेळी त्यांनी आयआयटीच्या ३५०० विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  
मी प्रत्येक वर्षाला भारतात येतो. सध्या भारतामध्ये डिजिटल साक्षरता काही प्रमाणात वाढली आहे. मी माझ्या आयुष्यात प्रथम जेव्हा आयआयटी खरगपूर येथे आलो, तेव्हा संगणक काय असतो तो पाहिला; आणि आता देशभरात ३०० दशलक्ष स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. येणाऱ्या वर्षांमध्ये देशात मोठ्या संधी असून, भारतात लवकरच डिजिटल अर्थव्यवस्था होईल.
आयआयटीतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर १० वर्षानंतर मी गुगलमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या दहा वर्षांत मी कंपनीचा सीईओ झालो. आयुष्यातील ही १० वर्षे अतिशय महत्वाची आहेत. आपण १० वर्षानंतर कुठे असू याचा विचार करायला शिकले पाहिजे. मात्र त्यासाठी फक्त पुस्तके वाचून काही होत नाही. तरुण विद्यार्थ्यांनी सर्वांगीण परिपूर्ण होण्याची गरज आहे.
बाजारातील महत्वाची कंपनी असलेल्या गुगलने सध्या मशीन शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासाठी संशोधन आणि विकासावर भर दिला आहे. आम्ही जगातील प्रत्येकासाठी उत्पादन देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांना इंग्रजी भाषा येतेच असे नाही. भारतासाठी अनेक भाषा उपलब्ध करण्यासाठी गुगल काम करत आहे. आम्ही भारतातील ग्रामीण जनतेचे आयुष्य अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. लोकांना जोडण्यासाठी इंटरनेट आवश्यक असून, आम्ही ३० डॉलर(२हजार रु.) पेक्षा कमी किंमतीतील स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
आयआयटीमधील विद्यार्थीच हुशार असतात, असे काही नाही. आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते हे खरे; मात्र त्यातून यश मिळेल हे सांगता येत नाही. गुगलमध्ये अनेक विद्यार्थी आयआयटीचे आहेत. तरीही आम्ही भारत आणि जगभरातील इतरही संस्थांमधील विद्यार्थ्यांची निवड करतो. त्यांच्याकडेही उल्लेखनीय बुद्धिमत्ता असते.
ज्यावेळी मी बेंगळूर आणि दिल्लीला येतो, त्यावेळी अनेक स्टार्टअप कंपन्यांना भेट देतो. यातील अनेक कंपन्या जगातील कंपन्यांशी स्पर्धा करू शकतात. मात्र भारतीय बाजारपेठेमध्ये तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात नाही. भारतामध्ये मोठ्या संधी आहेत. मात्र भारताचा डिजिटल व्यवसाय  अजून विकसित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. सध्या देशात १३० कोटि लोकांपैकी फक्त ३० कोटि लोक स्मार्टफोनचा वापर करतात. असे असले तरी येणाऱ्या काळात भारत जगातील महत्वाची डिजिटल अर्थव्यवस्था बनणार आहे. भारतामध्ये स्टार्टअप कंपन्या मोठ्या प्रमाणात सुरू होत असून, त्यामुळे आपण चीनशी स्पर्धा करू शकतो.
भारतामध्येे सध्या विद्यार्थी आणि पालक यांच्यात शिक्षणाबाबत प्रचंड आवड निर्माण झालेली दिसते. आठवी इयत्तेत असल्यापासून आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी मुलांची तयारी केली जाते, हे सगळे पाहून धक्का बसतो. आपले शिक्षण सध्या फक्त पुस्तकी असून, त्याच्या पलीकडे जाऊन सर्वांगीण विकास साधण्याची गरज आहे. सध्या येथील महाविद्यालयांमध्ये आपल्या करिअरबाबत मोठ्या प्रमाणावर ताण दिला जातो, तो तितका आवश्यक नाही. तंत्रज्ञान व शिक्षण शेवटी मानवी हितसंबंधांसाठी विकसित झाले पाहिजे.

Comments

Popular posts from this blog

marathi mhani (Arkalankar)

अर्कालंकार वाक्प्रचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकारिक सौष्ठव असते. रोजच्या प्रचारातील दृष्टांत देणाऱ्या म्हणी सरसकट वापरल्या जात असत. आजकाल `हाय-हॅलो, टेक केअर, यू नो - आय टेल यू' या जमान्यात म्हणींचा वापर कमी झाल्याचे दिसते. प्रचारात कमी असलेले म्हणींचे  काही नमुने - ं फुटका डोळा काजळाने साजरा ं बावळी मुद्रा देवळी निद्रा ं लाडकी लेक देवळी हागे, ढुंगण पुसायला महादेव मागे ं आंधळयात काणा राजा ं ओळखीचा चोर जीवानिशी मारी ं कोल्हा काकडीला राजी ं गांवचा रांड्या घरचा देशपांड्या ं दुभत्या म्हशीच्या लाथा गोड ं आऊचा काऊ तो माझा भाऊ ं इळा मोडून खिळा करणे /वडी मोडून झुणका करणे - सौ.मंदाकिनी चौधरी १९५ए, `आनंदबाग' मकरपुरा रोड बडोदे (फोन : ०२६५-२६४१९०७)

36th anniversary edition : 12 Feb.2015

वाटले लता-फुलाफुलात चाललो खऱ्या-सच्च्या कवींची गणना करण्याचा एक प्रसंग आला. हाताची बोटे घालण्याची तयारी करून करांगुळीशी `कालीदास' नाव उच्चारले. पण त्यानंतर तसा कुणी कवी डोळयापुढे येईना, आणि ती गणना त्या एका नावावरच थांबली. त्यामुळे करंगळीजवळच्या बोटाचे `अनामिका' हे नाव सार्थ ठरले - `अनामिका सार्थवती बभूव' या आशयाची कालीदासस्तुती आहे. आत्मगौरवाचा थोडा दोष पत्करून, असे म्हणता येईल की, ``एखादी संस्था-संघटना, उद्योग, राजकीय विचार किंवा देवदैवत पाठीशी नसताना; व्यक्तिगत क्षमतेवर दीर्घकाळ चालविली जाणारी वृत्तपत्रे मोजण्याचा प्रसंग आला तर `आपले जग' या नावाशी करंगळी येऊन ती गणना थांबेल. यात अतिशयोक्ती असेलही, त्यामुळे अनामिका सार्थवती झाली नाही तरी हाताची बोटे तरी संपणार नाहीत एवढे खरे. आज तीन तपांची पूर्ती घडत असताना समाधान मानण्यापुरती एवढी एकच गोष्ट ठीक आहे. `हे नियतकालिक तुम्ही का सुरू केलं?' असा प्रश्न कधीतरी कुणीतरी विचारतो. `कशाला सुरू केलं?' असे अजून तरी कुणी विचारले नाही. `सुरू केलं ते केलं; पण सुरू कशाला ठेवलं?' असे कुणी मनात म्हणतही असेल तर, रोजच्या नव्

Lekh obout chitpawan's

चित्पावन कुले व कुलवृत्तांत नंदकुमार मराठे, कोल्हापूर (फोन : ०२३१ - २५४१८२३) विविध जाती-जमातींचे उल्लेख अनेक ठिकाणी होत असतात.देशस्थ, कऱ्हाडे, कोकणस्थ हे महाराष्ट्नतील प्रमुख त्रिवर्ग. त्यांपैकी चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण यांची २९० आडनावे आहेत, पैकी १४० ते १५० आडनावे नित्य परिचयात आढळतात. कोकणस्थ ब्राह्मणांची गोत्रमालिका व त्याचे श्लोकबद्ध पुस्तक जोशी व अमरापूरकर या विद्वानांनी १८५६ मध्ये महत्प्रयासाने तयार केले. १४ गोत्रातील ६० आडनावांचा यात उल्लेख आढळतो. श्लोक संस्कृत भाषेत असून, काही आडनावांचा स्कंद पुराणात उल्लेख आहे. त्यामुळे चित्पावनी गोत्रांची प्राचीनता दिसते. अर्थात याबाबत बरेच मतभेद आहेत. विवाह संबंध याविषयीच्या अनेक लेखांमध्ये चित्पावनांची प्राचीन परंपरा उल्लेखिली जाते. तथापि गोत्र मालिकेत त्याचा अभाव आढळतो. जी आडनावे अर्वाचीन आहेत, त्यांचा उल्लेख साठ आडनावात आहे. परंतु गोत्र मालिका प्राचीन काळातील नाही. गोत्र प्रवरांचा उच्चार संध्या, विवाहकर्म, यज्ञकर्म अशा प्रसंगी करावा लागतो. प्रवर शब्दाचा अर्थ अधिक श्रेष्ठ असा आहे. प्रवर सामान्यपणे तीन व पिचत पाच असतात. एक आणि दोन