Skip to main content

Posts

Showing posts from March, 2015

30March2015

एजंट कशासाठी हवेत महाराष्ट्न् राज्य परिवहन आयुक्तानी राज्यभरातील आरटीओ कार्यालये दलाल-मुक्त करणार असल्याची घोषणा करून, त्यास दणकून प्रसिद्धी दिली. वाहन-परिवहन (आर टी ओ) विभाग भ्रष्टाचारी असून तेथील एजंट हेच त्या भ्रष्टाचाराचे कारण व माध्यम आहेत, असा समज करून देण्यासाठी परिवहन खाते प्रयत्नशील असावे. पण `अंदरकी बात' राज्यातल्या जनतेला ठाऊक आहे. आर टी ओ मधले एजंट बंद करण्यामुळे सरकारी बाबूंची खाबूगिरी कशी काय बंद होणार आहे? उलट जनतेच्या सोयीसाठी तिथले एजंट उपयोगी असतात. तिथले काम दहा-पाच मिनिटांत होत असते तर बात वेगळी. एरवी कामाच्या माणसांनी स्वत:चा दिवस मोडून अशा कार्यालयातील साधे-किरकोळ काम करण्यात काय शहाणपणा? अशा एकाच कामासाठी समजू शंभर रुपये एजंट घेत असेल तर अशा दहावीस जणांची कामे एकत्रित करून त्याने त्याच्या दिवसाची कमाई करण्यात चूक काय? एजंट केवळ आरटीओकडेच असतात काय? स्वत:चा खटला चालविण्यासाठी फी देऊन वकील नेमला तर तो एजंट नव्हे का? हल्ली तर काही ठिकाणी वकील लोक शब्दश: `एजंट' म्हणूनच काम करतात असे ऐकण्यात येते, खरे-खोटे ती आंधळी न्यायदेवता जाणे! महसूल, पोलिस अशा ठिकाण

23March2015

गदिमा रचित गीतरामायण १९५५ सालच्या रामनवमीला  आकाशवाणीवरून प्रसारित होऊ लागले, त्यास ६० वर्षांचा अवधी उलटला.  येत्या रामनवमीच्या निमित्ताने अजरामर गीतमालेविषयी.... वाल्मिकीच्या भास्कराचे, होई चांदणे मराठी एखाद्या गीतसमूहाचे गारूड लक्षावधी जनतेच्या मनावर वर्षानुवर्षे टिकावे हा दैवी चमत्कार. १९५५-५६ सालातील ते गारूड आज हीरक महोत्सव साजरा करीत आहे. केवळ ५६ अप्रतिम सुंदर व अर्थवाही गीतांत गदिमांनी ही किमया केली. १९५२-५३पर्यंत गदिमा चित्रपट क्षेत्रात लेखक आणि गीतकार म्हणून सुप्रतिष्ठित झाले होते. पुरेसे पैसे, प्रसिद्धी मिळूनही त्यांच्यातील अभिजात कवीला एक खंत होती की, आपल्या हातून अमर अशी कलाकृती निर्माण झाली नाही. १९५४ साली इंदूरला झालेल्या विभागीय साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तेथील महाकालीच्या मंदिरात गेले असताना त्यांनी देवीजवळ मनोमन प्रार्थना केली. आकाशवाणी पुणे केंद्र १९५३ साली पुण्यात सुरू झाले होते. त्याचे अधिकारी म्हणून आलेले रसिकाग्रणी सीताकांत लाड गदिमांचे स्नेही होते. या भेटीतील गप्पांमधून अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळे. गदिमांच्या आईचा रामायणाचा व्यासंग होता. त्यां

9March2015

१२ मार्च (१९१४) हा यशवंतराव चव्हाण यांचा जन्मदिवस. त्यांच्या १०१ व्या जयंतीच्या निमित्ताने, त्यांच्या खुल्या संवादपटुत्त्वाचा परिचय देणारी आठवण.  देशमुख आणि कं. (पुणे ३०) प्रकाशित, `माणसं माणसांसारखीच वागतात' या पुस्तकातून संक्षेप ... यशवंतराव चव्हाण काही कामासाठी दिल्लीला गेलो होतो. चहा घेताना सहज म्हणून टेलिफोन डिरेक्टरी चाळायची, तर नेमके पान आले `सदस्य लोकसभा' आणि समोर नाव, पत्ता व अर्थातच फोन नंबर : यशवंतराव चव्हाण. अनेक वर्षांची सुप्त इच्छा जागी झाली. बघू या प्रयत्न करून, म्हणत नंबर फिरवला.   माझे मामा म्हणजे महाराष्ट्नतला गाजलेला प्रकाशक ग.पां.परचुरे. केव्हातरी नवीन प्रकाशने यशवंतरावांना भेट द्यायला तो जात असे. एकदा त्याने मलाही सोबत नेले होते. फार तर दहा-पंधरा मिनिटे आम्ही तिथे असू. (ती आठवण दिली.) ``अरे, गजाननराव तुझे मामा? सख्खे? मग तर तू घरचाच. उतरलास कुठे? नीट सोय नसली तर बॅग उचल आणि इथे ये. मी एकटाच आहे. आज वेणूबाई कऱ्हाडला गेली आहे.'' *** मला एक प्रश्न होता. सहकारक्षेत्रात आयुष्य वेचलेल्या कुणा व्यक्तीचा सत्कार झाला होता. दुर्दैवाने त्यांचे नाव

2 March 2015

दोष धर्माला कशासाठी? श्री.गोविंदराव पानसरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याचा निषेध होणार, व्हायलाच हवा. या प्रकारे कुणीही यावे आणि गोळया झाडाव्यात ही परिस्थिती भलतीच गंभीर आहे. श्री.पानसरे अभ्यासू वक्ता आणि सर्वस्पर्शी विचारवंत होते. त्यांनी कधी तोडफोडीची आंदोलने किंवा भडक भाषणबाजी केली नाही; उलट स्वत:ची ठाम मते असूनही इतरांचे ऐकून घेण्याची प्रगल्भ सभ्यता त्यांच्याकडे होती. तरीही कोणी भाडोत्री गुंड किंवा माथेफिरूच्या गोळीला त्यांना तोंड द्यावे लागावे हा अराजकी दैवदुर्विलास आहे. परंतु त्यांच्यावरील हल्ल्याचा निषेध करतांना कित्येक अविचारवंतांनी ताळ सोडल्याचे ऐकून-वाचून, अराजकाचा अधिक स्पष्ट प्रत्यय येतो. श्री.पानसरे हे साम्यवादी होते, म्हणून त्यांच्यावरील हल्ल्याचे पाप हिंदुत्त्वावर ढकलण्यात काही शहाणपणा नाही. स्वत: पानसरे यांना अहिंदू ठरविण्याचेच काही कारण नाही. साम्यवादी म्हणजे अहिंदू, हे फार उथळ गणित झाले. भारतातील कित्येक-बहुतांशी सर्वच-साम्यवादी हे तर जन्माने हिंदूच होते! हिंदुत्त्व ही तर जीवनपद्धती आहे असे त्याच धर्मातील तत्ववेत्ते सांगतात. तर मग उदारमतवादी, सहिष्णू पुरोगामित्त्व