Skip to main content

Posts

Showing posts from April, 2013

Sampadkiya in 15April2013

पायरेटेड हक्क आपल्यास जे समजले असे वाटते ते दुसऱ्यांना सांगून सकळजनास शहाणे करावे हे समर्थांनी कर्तव्य म्हणून सांगितले. भाषा,त्या आधारे होणारी संवादचर्चा, विचारविमर्श आणि निर्णयमीमांसा या प्रक्रियांतून माणसाची प्रगल्भता वाढते, सुसंस्कृती विकसते. त्या कारणे ग्रंथ-पुस्तके यांचे महत्त्व निर्विवाद मानले जाते. ग्रंथलेखन, ग्रंथनिर्मिती आणि ग्रंथवाचन यांच्यातून संपन्न होणारी बौद्धिक संपदा श्रेेष्ठ मानली तरी आपल्याकडे तिचा वापर सर्व जीवमात्रासाठी व्हावा असेही समजण्यात येते. केवळ स्वत:साठी, पैसा कमावण्यासाठी आणि त्यावर आपला मालकी हक्क प्रस्थापित करून अन्य कुणी वापर केल्यास त्याची रॉयल्टी मिळण्यासाठी बुद्धी, ज्ञान, माहिती या गोष्टींचे पेटंट घेण्याची रीत ही आजच्या धंदेवाईकतेची देणगी आहे. त्यामुळे पुस्तके लिहिण्यातून, ती प्रकाशित करण्यातून व विकण्यातून पैसाच पैसा मिळावा; संस्थांची संस्थाने व्हावीत आणि आपल्या ताब्यात जे ज्ञान-साहित्य येईल ते दुसऱ्यास लाभू देऊ नये हा अतिरेकी विकृत व्यवहार सुरू झाला आहे. विद्या दिल्याने वाढते, परंतु त्यायोगे पैसा, हक्क, मिरास हेसुद्धा वाढते हा आजच्या व्यवसायी ज्

about Bhagini Nivedita Pratisthan

महिला व बाल कल्याणाचा पाया घालणारे भगिनी निवेदिता प्रतिष्ठान गरजू महिलांना बहिणीचा आधार देणारी ही संस्था ४३ वर्षांची झाली. १ एप्रिल हा संस्थेचा स्थापनादिन. त्यानिमित्ताने..... - विनिता तेलंग (फोन : ९८९०९२८४११) स्वामी विवेकानंदांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मार्गारेट नोबल ही आयरिश तरुणी भारतात आली. तिने स्त्री शिक्षणासाठी पायाभूत काम केले. भगिनी निवेदितांच्या समर्पित आयुष्याने भारून एका  ध्येयवेड्या तरुणीने एकटीच्या बळावर महिलांच्या उत्थानासाठी काम करण्याचे स्वप्न पाहिले. स्वत:चे वैद्यकीय शिक्षण संपवल्यानंतर, खाजगी प्रॅक्टीस करून पैसा गाठीशी बांधण्यात स्वारस्य नसलेली एक डॉक्टर तरुणी काही वेगळेच स्वप्न पाहात होती. डॉ.कुसुम घाणेकर, नागपूर ही ती युवती! स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी सर्वव्यापी कामाची गरज आहे हे ओळखून, त्यांनी एक युवतींचा गट बांधला व ६८-६९ सालापासून त्याला संघटनेचे रूप द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला कार्यक्षेत्र निवडले सांगली.१९६७ साल भगिनी निवेदितांची जन्मशताब्दी. १९७० साली भगिनी निवेदिता प्रतिष्ठान या नावाने काम करण्याचे ठरले. सुरुवात झाली ती `माहेर' या य

sampadkiya in 8April2013

पशुत्त्व पुरोगामी कसे? साहित्य, सामाजिक चळवळी, अथवा इतिहासादि शास्त्रे यांच्या क्षेत्रात परिवर्तनाच्या नावाखाली आक्रस्ताळी दांभिकता फैलावत चालली आहे. ती लक्ष्मण माने प्रकरणाने ताळयावर येईल, ही एक इष्टात्पत्ती मानायला हवी. लक्ष्मण माने यांच्याविषयी व्यक्तीगत टीकाटिपणी करण्यात काही हशील नाही. त्यांच्या `उपरा' या आत्मकथनात वर्णन केलेले भोग कुणाही सहृदय माणसाला अस्वस्थ करतील, पण त्यांच्या वाट्याचे उपभोगही अस्वस्थ करणारेच आहेत. आजवर त्यांची जी काही कारकीर्द झाली त्यातील वादविधाने आणि कार्य याविषयी कधी लिहावे लागलेच नाही आणि सध्या प्रकाशात येत असलेली त्यांची `काम'गिरी हा या स्थानी चघळण्याचा विषय नव्हे. ज्या कोणी अभागिनी लक्ष्मणरेषा ओलांडून किंवा न ओलांडताही बळी पडल्या त्यांना सामाजिक न्याय देणारी सक्षम रचना आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांच्याप्रति एक प्रदीर्घ उसासा टाकण्याशिवाय सामान्य भीरुता काही करू शकत नाही. बाकी एरवीच्या व्यवहारी दुकानदारीत माने पद्मश्री म्हणून वाचले काय, आणि गजाआड गेले काय! या प्रकरणाने खऱ्याखुऱ्या परिवर्तनाचे, पुरोगामित्त्वाचे फार मोठे नुकसान झाले आहे. सामा

aathvani

आठवा तो काळ `आपले जग' ३४ वर्षपूर्ती अंक मिळाला. एखादे औद्योगिक संस्थान, पक्ष किंवा पुढारी, संघटना पाठीशी नसतानाही प्रदीर्घ काळ दर्जेदार लिखाण घेऊन वाचकापुढे जाण्याचे अवघड काम, सर्वहिताचा विशाल दृष्टिकोन ठेवून हे व्रतपत्र तुम्ही चालू ठेवले आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील मुकुंदराव किर्लोस्कर यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण, भरीव योगदान असताना त्यांच्या निधनाची वार्ता ठळक न देता कुठेतरी एका कोपऱ्यात इतर वृत्तपत्रांनी दिलेली पाहून, त्यांच्यावर संपादकीय लेख वगैरेही नाही हे पाहून खेद झाला. `माझे शिक्षक आणि मी' हा श्री.नसीराबादकरांचा लेख आवडला. त्यांनी उल्लेखलेल्या शिक्षकांपैकी गुरुवर्य डॉ.शं.गो.तुळपुळे यांचाच लाभ मला झाला. दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विभागप्रमुख होते. त्यावेळी मी त्या कॉलेजात होते. माझे वडील उच्च विद्याविभूषित, जगन्नाथ शंकरशेट स्कॉलर - एम.ए. होते. पण सनातनी वृत्ती. स्नानसंध्या, सोवळेओवळे कडक पाळणारे होते. आमच्या घरी रोज चार-पाच माधुकरी, तसेच दोन-तीन वारकरी (म्हणजे गरीब मुले एकेक दिवस एकेक घरी जेऊन शिक्षण घेत त्यातील) जेवायला असत शिवाय आंधळे पांगळे भिकारीही यायचे. सणावारी

RUKHWAT

काळानुसार रुखवत नुकताच माझ्या मुलीचा विवाह पार पडला. माझी मुलगी चि.मानसी सध्या अमेरिकेतील मिशिगन राज्यातील डेट्नॅईड येथील थरूपश डींरींश णपर्ळींशीीळींू मध्ये डॉक्टरेटचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहे. तिचा विवाह २३ डिसेंबर २०१२ ला ठाणे येथे संपन्न झाला. आमचे जावई अमित श्रीधर जोशी यांनीसुद्धा त्याच युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. मिळवली आहे व सध्या ते वॉशिंग्टन डी.सी.येथील छरींळेपरश्र खपीींर्ळींीींश ेष कशरश्रींह मध्ये पोस्ट डॉक्टरेटचा अभ्यास करीत आहेत. या विवाहानिमित्त मांडलेल्या वेगळया रुखवताची माहिती द्यावीशी वाटते. मराठीत रुखवत म्हणून प्रचलित असलेल्या अपभ्रंश शब्दाचा मूळ शब्द आहे `रक्षावत'! प्राचीन काळी रक्षावतामध्ये देव, शास्त्र, शस्त्र, अन्न आणि वस्त्र देण्याची प्रथा होती. संसार निर्वेध व्हावा म्हणून `देव', कुटुंबाच्या संरक्षणासाठी `शस्त्र', संसार संपन्न व्हावा यासाठी `शास्त्र' आणि ऐहिक गरजा भागवण्यासाठी `अन्न' व `वस्त्र' अशा सर्व वस्तू नवपरिणित दांपत्याला देत असत. जसजसे सामाजिक स्थित्यंतर होत गेले तसतसे रक्षावतात विविध खाद्यप्रकार, कलाकुसरीच्या वस्तू, गृहोपयोगी

Sampadkiya in 18 march 2013

एकत्रीकरणात जिवंतपणा यावा `व्हायला हवे' असं तर अनेकांना अनेक प्रकारे वाटत असे. परंतु `ते करणार कोण?' या प्रश्नावर सगळेच निरुत्तर होतात. एखादा प्रयत्न, मूलभूत समस्येवर पर्यायी उत्तर, एखादी संस्था-संघटना, असे काही सामुदायिक कार्य करण्यासाठी कोणी घराचा उंबरठा ओलांडला की प्रथमत: त्याचे स्वागत शाबासकीने होते हे खरे, पण त्या प्रोत्साहनाच्या आधारे कार्य विस्तारण्याची दिशा मिळू लागली की त्यास फाटे फुटू लागतात. प्रारंभापासूनच अनंत सूचनांस तोंड दिलेले असते; परंतु त्यातून इष्ट ते स्वीकारत मर्यादित संख्येचा गट किंवा एखादीच व्यक्ती सामाजिक स्वरूपाचे काम करत असते. त्या कार्याची गरज त्या कार्य`कर्त्या'ला पटलेलीच असते. त्याच्या त्या प्रयत्नांकडे बघणाऱ्यांच्या तऱ्हा मात्र वेगवेगळया असतात. काहीजण त्या कामाला भरभरून प्रतिसाद देतात, यथाशक्ती पैसे देतात, हे कार्य व्हायला हवे... ते तुम्ही करत आहात... असे प्रोत्साहन देतात. दुसरा गट सावध लोकांचा असतो, ते लोक प्रारंभापासून संशयाने पाहातात, काम चांगले रूप घेऊ लागले तर त्यात सहभागी होऊन नियम-शिस्त यांविषयी कांगावा करतात, हेतू प्रत्यक्षदर्शी शुद्

Dr. Ranjan Kelkar Mulakhat

भारताच्या हवामान वेधशाळेचे निवृत्त महासंचालक आणि नामवंत हवामान तज्ज्ञ डॉ.रंजन केळकर यांची २० जानेवारी २०१२ रोजी कोल्हापूरच्या शाहू स्मारकात प्रा.अतुल आयरे आणि अभिजित घोरपडे यांंनी प्रकट मुलाखत घेतली होती, त्याचा संक्षिप्त वृत्तांत - हवामान शास्त्रज्ञ हे भविष्यवादी नाहीत मान्सून हा बलशाली व अवाढव्य आहे. त्याच्यावर फार थोड्या घटकांचा प्रभाव असतो. मेघदूताला (कालिदासाने लिहिलेले काव्य) चौथ्या शतकात हे कळले. याचा अर्थ त्याच्या आधी शतकानुशतके पाऊस असलाच पाहिजे. सबंध मानव जात तेव्हापासून अस्तित्वात आहे कारण पाऊस होता. एखाद्या क्षुल्लक कारणामुळे तो नाहीसा होणार नाही. `आज ऋतुचक्र बदलले, पाऊस कमी झाला हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आहे' असे काही लोक म्हणतात. गेल्या २०० वर्षांची पावसाची शास्त्रीय आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. या आकडेवारीवरून तसं काहीही झालेलं नाही. सरळ रेषेप्रमाणे तो चालत आहे. मान्सूनचा पाऊस यापुढे वाढेल, तो कमी होणार नाही. पाऊस वाढला तर ग्लोबल वॉर्मिंग वाईट नाही. जास्त पाऊस पडला तर अधिक पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकेल. जाहिरातीत `दाग अच्छे है' असं दाखवितात. त्याप्रमाणे

Vaad - Samvad

वाद हे कुठंतरी थांबायला हवं कालानुरूप समाज बदलत चालला आहे, तो एकमेकाशी एकरूप व्हावा असे आपले प्रयत्न आहेत. परंतु इतर मंडळी ब्राह्मणद्वेष का चालवतात हे कळत नाही. मागे सातारला विद्रोही साहित्य संमेलन झाले. त्यामध्ये समर्थ रामदासांबद्दल अत्यंत शिवराळ चर्चा झाली. त्याविषयी कुणी समर्थभक्त, शिष्य किंवा नागरिकांनी चकार शब्द काढला नाही. कोल्हापूरला कुलगुरु श्री.धनागरे यांना त्रास दिला. (अलीकडे तिथे त्यांचा सत्कार झाल्याचे कळले.) त्यांच्या विद्वत्तेची टर उडवली. चिपळूण संमेलनात परशुरामावर आक्षेप व अवहेलना झाली. पुण्यात दादोजींचा पुतळा हलविला. हे सर्व काय? शासन तर लक्षही देत नाही. तीन टक्के म्हणून हेटाळणी होते, ही शोकांतिका नव्हे का? - रघुवीर फडके, कोटेश्वर कॉलनी, सातारा संवाद समाजातील गटागटांत दुही व द्वेष पसरवून आपली सत्ता मिळविणे किंवा अबाधित राखणे हा पूर्वापार राजकारणाचा भाग आहे. आणि विशेषत: आपल्या देशाला तशा राजकारणास बळी पडण्याचा एक शाप असावा. हे केवळ जाती-उपजातीपुरतेच नाही. उत्तरी-दक्षिणी, मराठी-कानडी, शेतकरी-कारखानदार, सेना-मनसे, नोकरदार-मजूर अशा प्रत्येक गटांच्या बाबतीत घडत अस

Sampadkiya in 11 March 2013

स्वत:पासूनच मुक्तता व्हावी आजच्या जमान्यात बहुतांश भल्या घरांमध्ये स्त्री-पुरुष समानता पटलेली आहे. महिला दिन म्हणून त्यांच्या  समस्यांचा विचार प्रकट व्हावा आणि त्या समस्या हलक्या व्हाव्यात इथपर्यंतची दिशा ठीक वाटते. परंतु स्त्रियांवर होणारे तथाकथित अन्याय हे सदासर्वदा पुरुषच करत असतो या आशयाचे दुसरे टोक गाठण्याचे कारण नाही. स्त्री घराबाहेर पडण्यासाठी पुरुषांनी प्रयत्न केलेले आहेत. ती बाहेर पडते म्हणून तिचे कौतुक करण्याचा काळही आता मागे पडायला हवा. बाहेर पडणारी स्त्री आपले हक्क `तितक्या'च निर्दयपणे बजावू पाहते, हे स्त्रीवादी चळवळीला अपेक्षित नसावे. हल्ली बस, लोकलगाड्या अशा पुष्कळ सार्वजनिक वाहनांत महिलांसाठी राखीव आसने असतात. कुणी वृद्ध पुुरुषच नव्हे, तर वृद्ध स्त्री जरी समोर उभी असेल तरी तिला आपली जागा रिकामी करून देणारी स्त्री सहसा पाहण्यात नाही. घरच्या स्त्रीने दिवसभरात केेलेल्या कामाचे मोल केले जात नसेलही; परंतु दमूनभागून संध्याकाळी घरी येणाऱ्या पुरुषाला चार मायेचे शब्द ऐकवून त्याच्या आवडीचा पदार्थ नेटसपणी देणारी स्त्रीही दुर्मीळ होत चालली आहे, हे नाकारू नये. स्त्रीची दु:खे

Lekh on women

प्रश्न स्त्रियांचा नव्हे, सर्वांचा! - विनिता तेलंग, सांगली भौतिक, वैचारिक आणि आत्मिक दृष्ट्या विकसित अशा समृद्ध समाजाच्या निर्मितीचे स्वप्न आपण नेहमी पाहतो. आपला वैचारिक वारसा लक्षात घेता स्वप्न पाहण्याचा आपल्याला अधिकारही आहे. पण ते स्वप्न साकार करण्यासाठी आधी समोरचे प्रश्न नेमके समजून घ्यावे लागतील; त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रचलित संकल्पना - रचना कदाचित बाजूला ठेवाव्या लागतील; व खुल्या मनाने नि:पक्षपाती उत्तरे शोधून आचरणात तसे बदल करावे लागतील. ते करायला आपण सहजी तयार होत नाही. समाजातील सर्वच प्रश्न हे मुळात साऱ्या समाजाचे आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत हे लक्षात घ्यायला हवे. कोणत्याही  समस्येचा सुटा सुटा विचार करून तो सोडवता येणार नाही. पर्यावरण - जीवनशैली - उद्योग असे प्रश्न सुटे सुटे सोडवताच येणार नाहीत.... त्यावर कितीही काम केले तरी! गुन्हेगारीचे प्रश्न पोलिसांनी हाताळावेत, दुष्काळाचे सरकारने, मुलांची काळजी शाळांनी करावी व स्त्रियांचे प्रश्न त्यांच्या संघटनांनी पाहून घ्यावेत! अशी वर्गवारी केल्याने अनेक वर्षे या सर्व विषयांत कितीतरी कामे होऊनही म्हणावे तसे यश हाती आल्याचे जाणवत

Tristhali in 26/2/2013

विठूचा शासकीय दर हल्ली भक्ताच्या हाती गडगंज पैसा खेळू लागल्यामुळे तो देव-देवस्थानांच्या चरणी ओतू लागला आहे. त्या बाबतीत उत्तर-दक्षिणेत भेद नाही. पद्मनाभ, साई, तिरुपती, सिद्धीविनायक, स्वामीनारायण अशी अतिश्रीमंत देवस्थाने संपत्तीत डुंबत आहेत. गावागावातल्या सगळयाच देवदैवतांना सोन्याचे दिवस आले आहेत. परंतु पंढरीचा विठुराया मात्र या सुवर्णलाटेतून वेगळा होता. `भक्तांचिया काजासाठी, साधूंचिया प्रेमासाठी, सोडिली मी लाज रे ।' असे म्हणणारा विठ्ठल हा सामान्य वारकऱ्यांचा देव होता. त्याला कोंबडं-बकरं तर सोडाच, पण क्षुल्लक नवसाचा वायदासुद्धा कुणी करत नसत. त्याला विनवणी गावी, आळवणी करावी, करुणा भाकावी इत्यादी एकतर्फी भावाचा तो भुकेला होता. वारीच्या वक्ताला तिथं गर्दी वाढत राहिली पण पुरेशी शौचालये आणि गटारेही करता येत नव्हती. परंतु एखाद्या ऑफीसात सगळी माणसे चकाचक होऊन अपटुडॅट्ट वागू लागली की जुन्या धोतरचपलातील धोंडोपंतासही बदलावेच लागते तशी विठूची वेळ आली. हा विठोबा नवसाला पावला म्हणून एका कंत्राटदारानं त्याच्यासाठी दीड हजार कोटि रुपयांची देणगी जाहीर केल्याचे वृत्त आहे. विठ्ठल-रुक्मिणी देवस

Lekh on Sinchan

सिंचन-प्रयत्नांस बळ हवे - वसंत आपटे महाराष्ट्न् जलसिंचन सहयोगाच्या वतीने होणारी १४ वी सिंचन परिषद चालू वर्षी जत तालुक्याच्या पूर्वेला जवळजवळ ३० कोसांवर भयानक दुष्काळाच्या भूमीत होत आहे. सिंचन परिषदेच्या निमित्ताने या भागातील मूलभूत समस्येकडे लक्ष वेधले जाईल हा खूपच मोठा फायदा शक्य दिसतो. या भागाला पाणी जेव्हा कधी मिळेल ते मिळेल परंतु निदान या समस्येकडे जगाचे लक्ष वेधले जाईल हेही कमी नाही. सिंचन परिषदेच्या यशापयशाचा लेखाजोखा जेव्हा कधी मांडला जाईल त्यावेळी अविकसित भागाकडे लक्ष वेधण्याचा हा फायदा निश्चितपणाने जमेच्या बाजूला दिसेल. ही चौदावी परिषद आहे त्यामुळे स्वाभाविकच आधीच्या तेरा परिषदांचा परिणाम मोजला गेला पाहिजे. आपल्याकडे असे अनेक प्रयोग होत असतात परंतु नंतरच्या काळामध्ये त्याचे मूल्यांकन होत नाही. त्यामुळे एखाद्या तात्कालिक अधिवेशनाचा दृश्य परिणाम, इतकेच त्यांचे स्वरूप राहते. शिक्षण, पाणी, दळणवळण, इंधन, पर्यावरण याशिवाय सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक व्यासपीठे दरवर्षी उभी राहतात आणि गणेशमंडळाच्या सजावटीप्रमाणे ती उत्सवानंतर काढून बाजूला ठेवली जातात. त्यातून होणारी निष्पत्ती म